Your cart is empty now.
‘आठवणी’, ‘अनुभव’, ‘लघुनिबंध’, ‘प्रवासलेख’, ‘व्यक्तिचित्रे, ‘ललितलेख’ यांचा समावेश ललित गद्यात होतो. ‘ललितरंग आकलन व आस्वाद’ या पुस्तकात ‘ललितरंग’ या पुस्तकातील लेखांचा आढावा घेतला आहे. स्त्री विषयक ललित गद्य हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. या पुस्तकात आलेल्या लेखातून स्त्री व पुरुष या दोघांचा स्त्री विषयक दृष्टीकोन वर्णन केला आहे. यात ‘मी’ अनुभवाचे स्वरूप सांगितले आहे. ‘मी’ ने जे अनुभवले त्याचे वास्तव वर्णन यात केले आहे. प्रस्तुत लेखनातून भावनात्मक व चिंतनशील अशी वर्णने आली आहेत. तसेच राबणारी, कष्ट करणारी, घर-संसार सांभाळणारी अशा वेगवेगळ्या स्वरूपात स्त्री चे दर्शन घडवले आहे. भाषा व शैली विशेष हे या पुस्तकाचे वेगळेपण आहे.