Welcome to Prashant Publications

Rs. 0.00 10% OFF
Availability: 10 left in stock

या ग्रंथाचे तिसरे प्रकरण ‘स्पष्टीकरण कथा' हे असून यामध्ये अनेक लोककथा दिलेल्या आहेत. तसेच त्या लोककथांचा सारांश किंवा त्यातून कथाकाराने दिलेला संदेश सुद्धा तात्पर्य अशा स्वरूपात दिलेला आहे. यातील अनेक...

  • Name : लोककथांमधील भारतीय ज्ञानपरंपरा - निवडक गोष्टींच्या गुहेत (Lokkathanmadhil Bharitya Dnyanprampra Nivadak Goshtinchya Guhet)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : SYBA | IKS | Sem - III |
  • Barcode : 9788199120785

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

लोककथांमधील भारतीय ज्ञानपरंपरा - निवडक गोष्टींच्या गुहेत (Lokkathanmadhil Bharitya Dnyanprampra Nivadak Goshtinchya Guhet)
- +

या ग्रंथाचे तिसरे प्रकरण ‘स्पष्टीकरण कथा' हे असून यामध्ये अनेक लोककथा दिलेल्या आहेत. तसेच त्या लोककथांचा सारांश किंवा त्यातून कथाकाराने दिलेला संदेश सुद्धा तात्पर्य अशा स्वरूपात दिलेला आहे. यातील अनेक स्पष्टीकरण कथा या खऱ्या अर्थाने बोधकथा असून, त्या प्रत्येक कथांतून वाचकांना काही तरी खास संदेश दिलेला आहे. चौथ्या प्रकरणात सृष्टी कथांची मालिकाच दिलेली आहे. यामध्येच विविध पशुपक्ष्यांच्या कथाही दिसून येतात. आपल्याकडे असलेली कावळ्या चिमणीची गोष्ट, हुशार कोल्ह्याची गोष्ट, चतुर कावळ्याची गोष्ट, ससा आणि कासव, उंदीर आणि सिंहाची गोष्ट, उंट आणि कोल्ह्याची गोष्ट अशा अनेक गोष्टी या प्रकरणामध्ये दिसून येतात. वाचकांना सहज आवडतील अशा या सुंदर लोककथा आहेत. पाचव्या प्रकरणामध्ये अद्भुत कथा, परिकथा आणि राजा राणीच्या गोष्टी आहेत. सहाव्या प्रकरणांमध्ये चातुर्य कथा असून माणसाला बुद्धिमान करण्यासाठी या चातुर्य कथा अत्यंत उपयुक्त आहेत. विशेषतः बालमनावर प्रभाव गाजविणाऱ्या या गोष्टी आहेत. सातव्या प्रकरणामध्ये प्रांतोप्रांतीच्या बोधकथा दिलेल्या आहेत. भारताचा विविध कारणांनी जगाशी नेहमीच संपर्क आला आहे. जगातील विविध वंशाचे लोक आजही भारतात राहतात. या लोकांनी आपली भाषा आणि आपली संस्कृती ही येथे रुजवली. लोककथांतून अशा प्रकारची बहुविध परंपरा भारतात दिसून येते. आठव्या प्रकरणात भारतीय ज्ञानपरंपरेचा लोककथेशी असलेला सहसंबंध स्पष्ट करतानाच संकीर्ण कथाही दिलेल्या आहेत. यामध्ये सृष्टीच्या उत्पत्ती विषयीच्या कथा, चंद्र सूर्याच्या कथा आलेल्या आहेत. विशेष म्हणजे या कथांबरोबरच शेवटी सहलेखकांनी या कथांचा सारांश सांगून, त्यातून मिळणारा संदेशही स्पष्ट केला आहे. भारतीय लोककथांचे हे संकलन अत्यंत उपयुक्त आहे. यामध्ये दैवत कथा, परिकथा, दंतकथा आणि कल्पित कथा या चारही मुख्य घटकांच्या माध्यमातून भारतीय लोककथांची समृद्ध परंपरा सिद्ध करण्यात सहलेखक यशस्वी ठरले आहेत.        

1) लोककथांमधील भारतीय ज्ञानपरंपरा...................................13
1.1 लोककथा : स्वरुप व व्याप्ती
1.2 लोककथांचा भारतीय ज्ञानपरंपरेशी असलेला अनुबंध

2) निवडक गोष्टींच्या गुहेत : आशय विश्लेषण............................59
1. पौराणिक गोष्टी
2. स्पष्टीकरण कथा
3. सृष्टीकथा
4. अद्भुतरम्य परिकथा व राजा राणीच्या गोष्टी
5. चातुर्यकथा
6. प्रांतोप्रांतीच्या बोधकथा
7. संकीर्ण कथा

3) निवडक गोष्टींच्या गुहेत या कथासंग्रहातील कथांचा
भारतीय ज्ञानपरंपराशी असणारा अनुबंध...............................114
1. पौराणिक लोककथा आणि भारतीय ज्ञान परंपरा
2. स्पष्टीकरण कथा
3. सृष्टीकथा/पशुपक्ष्यांच्या गोष्टी
4. अद्भुतरम्य परिकथा व राजा राणीच्या गोष्टी
5. चातुर्य कथा
6. प्रांतोप्रांतीच्या बोधकथा
7. संकीर्ण कथा

संभाव्य प्रश्नावली.....................................................137

संदर्भ ग्रंथसूची.........................................................140

💬

Chat with us