Welcome to Prashant Publications

Rs. 295.00 10% OFF
Availability: 10 left in stock

सर्जनशील साहित्यकृतींना लिहिलेल्या प्रस्तावनांच्या व्यतिरिक्त डॉ. किसन पाटील यांनी ‘दलित आत्मकथनांचा समाजशास्त्रीय अभ्यास’ या प्राचार्य शिवदास शिरसाठ यांच्या संशोधन ग्रंथाला लिहिलेली प्रस्तावना महत्त्वाची आहे. दलित आत्मकथनांचे श्रेष्ठत्व आणि निराळेपण यातून...

  • Name : वाङ्मयीन दृष्टी आणि दृष्टिकोन
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Marathi
  • Barcode : 9788197216213

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

वाङ्मयीन दृष्टी आणि दृष्टिकोन
- +

सर्जनशील साहित्यकृतींना लिहिलेल्या प्रस्तावनांच्या व्यतिरिक्त डॉ. किसन पाटील यांनी ‘दलित आत्मकथनांचा समाजशास्त्रीय अभ्यास’ या प्राचार्य शिवदास शिरसाठ यांच्या संशोधन ग्रंथाला लिहिलेली प्रस्तावना महत्त्वाची आहे. दलित आत्मकथनांचे श्रेष्ठत्व आणि निराळेपण यातून समोर येते. डॉ. सत्यजित साळवे यांनी लिहिलेल्या ‘खानदेशातील दलित जाणिवेची सम्यक कविता’ या समीक्षा ग्रंथाला डॉ. किसन पाटील यांनी विस्तृत प्रस्तावना लिहिलेली आहे. या प्रस्तावनेतून मराठीतील दलित जाणिवेच्या कवितेचा मागोवा घेण्याबरोबरच खानदेशातील दलित कवितेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केलेले आहे. ‘खानदेशची लोकसंस्कृती आणि लोकधारा’ या लोकवाङ्मयावर आधारित ग्रंथाला व ‘आदिवासी तडवी बोलीचा शब्दकोश’ या शब्दकोशालादेखील त्यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. डॉ. संदीप माळी यांच्या ‘खानदेश-विदर्भ-मध्यप्रदेशात सीमावर्ती भागातील लोकगीते: एक अभ्यास’ या विषयावर संशोधन केले. त्यांच्या संशोधन ग्रंथाला डॉ. किसन पाटील यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिलेली आहे. यातून त्यांनी नवसंशोधकांनी लोकसाहित्याचा अभ्यास कोणकोणत्या नव्या दृष्टिकोन आणि पद्धतींचा अवलंब करून केला पाहिजे. याविषयीचे विवेचन केले आहे. संशोधन ग्रंथातून अभ्यासकाने मांडलेली मते आणि लोकगीतांचे विश्लेषण याचे त्यांनी कौतुक केलेले आहे. या सर्व प्रस्तावनांमधून त्या-त्या लेखक आणि अभ्यासकाचे लेखन आणि भूमिका याचे महत्त्व आणि वेगळेपण मांडलेले दिसते.
डॉ. किसन पाटील यांनी विविध साहित्यकृती आणि ग्रंथांना लिहिलेल्या प्रस्तावना एकत्र करून त्याचे संपादन करण्याची आमची मनीषा या ग्रंथाने मूर्त रूपात साकार होते आहे याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. ह्या प्रस्तावना त्या-त्या साहित्यकृती समजून घेण्यास उपयुक्त आहेत. याबरोबरच ह्या प्रस्तावना खान्देशातील समकालीन साहित्य आणि त्याची वाटचाल याचे आकलन होण्यास सहाय्यभूत ठरतील अशा आहेत. डॉ. किसन पाटील यांची साहित्याकलनाची दृष्टी आणि भूमिका याचे अवलोकनदेखील यामुळे होईल.          

1. कथा : तुमची आमची (कथासंग्रह)...............................13

2. निर्णय (कथासंग्रह)................................................21

3. पायघड्या (कथासंग्रह)...........................................30

4. अरविंद नारखेडे यांच्या सात कथा (कथासंग्रह)...................36

5. माझं काय चुकलं? (कथासंग्रह)..................................41

6. खोप्यामंधी खोपा (कादंबरी)......................................46

7. झाला मोकळा पिंजरा (नाटक)....................................53

8. ग्रामसंस्कृतीचा गंध लाभलेलं आत्मकथन : गल्लीनी भाऊबंदकी
(अहिराणी आत्मकथन)...............................58

9. माय बहिणाई...सावित्रीच्या लेकी गं (ओवीबद्ध गीत)............61

10. घुंगराच्या बोलावर.... (लावणीसंग्रह)............................67

11. क्रांती बीजे पेरणारी परिवर्तनवादी कविता :
‘प्रेषितांचे बेट’ (कवितासंग्रह).....................................71

12. सिक्रेट अजेंडा (कवितासंग्रह).....................................76

13. तृषार्त (कवितासंग्रह)..............................................83

14. काव्यांकुर (संपादित कवितासंग्रह)................................87

15. भक्तिभावाचा नितांत सुंदर मळा-मातीचा सुगंध
(अभंग रत्नावली भाग-1)........................................92

16. आक्रोश (अभंग रत्नावली भाग-2)..............................97

17. मातीचा सुगंध (कवितासंग्रह)...................................103

18. आत्मशोध (कवितासंग्रह).......................................108

19. एकेक घर कवितेचं (कवितासंग्रह)..............................116

20. काव्यरूप श्यामची आई.........................................123

21. आता उठायला पाहिजे (कवितासंग्रह)...........................126

22. अग्निफुले (कवितासंग्रह)........................................132

23. भाग्यप्रभा (कवितासंग्रह)........................................137

24. दलित आत्मकथनाचा समाजशास्त्रीय अभ्यास
(संशोधन ग्रंथ)..................................................142

25. खानदेशातील दलित जाणिवेची सम्यक कविता
(समीक्षा ग्रंथ)...................................................153

26. खानदेशची लोकसंस्कृती व लोकधारा (समीक्षा ग्रंथ)...........180

27. परिवर्तनाचा आत्मबोध (लेखसंग्रह).............................186

28. आदिवासी तडवी बोलीचा शब्दकोश...........................193

29. खानदेश-विदर्भ-मध्यप्रदेशात सीमावर्ती भागातील
लोकगीते : एक अभ्यास (संशोधन ग्रंथ)........................199

30. मॉबलिंचींग (कथासंग्रह)........................................205

💬

Chat with us