Your cart is empty now.
हे पुस्तक लोकगितांचा अभ्यास अथवा संशोधनाच्या हेतुने लिहिले नसून घरात पडून असलेला ओव्यांचा मौलिक ठेवा घरात तसाच पडू न देता जाणकार वाचकांना समर्पित करावा याच भावनेतून सदर लेखनप्रपंच मांडला आहे. महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही माझी श्रद्धास्थळे तर आहेतच त्याशिवाय शंकरराव खरात, प्रा. रा. ग. जाधव व प्रा. वसंत कानेटकर ह्यांच्याविषयी माझ्या मनात फार पुर्वीपासूनच आदराची भावना असल्यामुळेच अत्यंत लहान-लहान लेखात का होईना माझी श्रद्धासुमने त्यांना अर्पण केली आहेत. तसेच रामदास कामत, मा. दत्ताराम व हंसा वाडकर ह्या स्मृतिचित्रांना देखील मी थोडक्यात का होईना उजाळा दिला आहे.
– प्रल्हाद खरे