Your cart is empty now.
चौथा भाग भाषिक असा आहे. ‘भगताची वही’ या कवितेचा भाषिक अंगाने केलेला अभ्यास यात आहे. अशाही अंगाने कवितेचा विचार करता येतो, याचे भान अभ्यासकांना येऊ शकते. ‘तावडपट्टीत स्थिरावलेल्या स्थलांतरितांनी स्वीकारलेली बोली’ हा ससंदर्भ, साधार पुराव्यांनिशी लिहिलेला लेख आहे. सद्सद्विवेकबुद्धी जागृत असणाऱ्या अनेक अभ्यासकांना तो आवडलेला आहे. यापूर्वी तो अहिराणी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत प्रसिद्ध झालेला आहे. ‘खानदेशी - तावडी बोली’ हा लेख ‘वाघूर’ 2017 च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. अभ्यासकांसाठी तो संग्राह्य ठरावा. ‘नागरी लिपी’संबंधी लेख ‘तत्रैव’ डिसेंबर 23 या अंकात प्रसिद्ध झालेला आहे. व्हाट्स अपवरील गृपवर मी लिपीसंबंधी एक पोष्ट टाकली होती त्यावरून मा. संपादकांनी ‘तत्रैव’साठी लेख मागितला. तो मी लिहून दिला. अनेकांनी हा लेख संग्राह्य असल्याच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्या लेखातील ‘त्रुटी, उणिवा, आवश्यक सुधारणा’ इ.संबंधीचे विचार माझे स्वतंत्र चिंतन आहे.
प्रस्तुत समीक्षाग्रंथ चिकित्सक वाचक, जिज्ञासू अभ्यासक यांना नक्कीच आवडेल याची खात्री वाटते.
‘पाठराखण’ अतिशय संकोचाने डॉ.भरतसिंग पाटील करीत आहेत. पुढील पिढी पाठीशी असल्याचा धिवसा आहे!