Welcome to Prashant Publications

Rs. 185.00 10% OFF
Availability: 10 left in stock

लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणाला असणारे महत्त्व लक्षात घेऊन तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवीच्या प्रथम वर्ष वाणिज्य व विज्ञान...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण व लेखन
- +

लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणाला असणारे महत्त्व लक्षात घेऊन तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवीच्या प्रथम वर्ष वाणिज्य व विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम लक्षात घेऊन सदर पुस्तकाचे लेखन करण्यात आलेले आहे.

व्याकरण हे एक शास्त्र आहे. त्यामुळे व्याकरणाचा अभ्यास करत असताना पाठांतरापेक्षा व्याकरणाच्या संकल्पनांचे आकलन करून घेण्यावर जास्त भर द्यावा लागतो. मराठी व्याकरणाच्या संकल्पना विद्यार्थ्यांना सहज, सोप्या भाषेत समजतील असा प्रयत्न आम्ही केलेला आहे. तसेच त्या संकल्पनांचे आकलन झाले आहे किंवा नाही याचा पडताळा व्हावा म्हणून प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न उत्तरांसह दिलेले आहेत. सदरचे पुस्तक केवळ स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठीच नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांसाठीही हे पुस्तक उपयुक्त ठरेल. तसेच व्याकरण विषयक अध्ययन अध्यापन करणाऱ्या अध्यापकांसाठीही हे पुस्तक उपयुक्त ठरेल असा आम्हाला दृढ विश्वास वाटतो.

१. स्पर्धा परीक्षेत मराठी व्याकरणाच्या अभ्यासाचे स्वरूप व महत्त्व ...... ९
१.१ स्पर्धा परीक्षेत मराठी व्याकरणाच्या अभ्यासाचे स्वरूप
१.२ स्पर्धा परीक्षेत मराठी व्याकरणाच्या अभ्यासाचे महत्त्व

२. सारांशलेखन ...... १४
२.१ सारांशलेखन : संकल्पना, स्वरूप
२.२ सारांशलेखनाचे महत्त्व व गरज
२.३ सारांशलेखनाचे तंत्र
२.४ सारांश लेखनासाठी आवश्यक गोष्टी
२.५ सारांशलेखनाचे टप्पे/पायऱ्या
२.६ सारांशलेखनाचे उपयोजन

३. भाषांतर ...... २०
३.१ भाषांतराची संकल्पना व स्वरूप
३.२ भाषांतरातील काही संज्ञा
३.३ भाषांतराचे प्रकार
३.४ भाषांतर शास्त्र की कला?
३.५ भाषांतर उपयोजन

४. कल्पनाविस्तार ...... २७
४.१ कल्पनाविस्तार संकल्पना व स्वरूप
४.२ कल्पनाविस्ताराच्या पायऱ्या
४.३ कल्पनाविस्तारासाठी उपयुक्त बाबी

५. निबंध लेखन ...... ३१
५.१ निबंधाची संकल्पना व स्वरूप
५.२ निबंधाचे प्रकार व उपयोजन

६. मराठी वर्णमाला ...... ५२
६.१ भाषा, लिपी, व्याकरण, वर्ण, अक्षर, वाक्य
६.२ मराठी वर्णमाला, स्वर, स्वरांचे प्रकार, स्वरादी, व्यंजने, अल्पप्राण, महाप्राण

७. म्हणी व वाक्प्रचार ...... ५९
७.१ म्हणी
७.२ म्हणींचा समर्पक उपयोग
७.३ वाक्प्रचार
७.४ वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग

८. विकारी व अविकारी शब्द ...... ६९
८.१ विकारी शब्द (नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद)
८.२ अविकारी शब्द (क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय)

९. शब्दसिद्धी ...... १०७
९.१ तत्सम, तद्भव, साधित, उपसर्गघटित, प्रत्ययघटित शब्द, सामासिक शब्द
९.२ समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अनेकार्थी, शब्द समूहासाठी एक शब्द

१०. संधी ...... १३३
१०.१ संधी म्हणजे काय?
१०.२ संधीचे प्रकार - स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी

११. समास ...... १४४
११.१ समास म्हणजे काय?
११.२ समासाचे प्रकार - अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीहि समास

१२. विरामचिन्हे ...... १५१

१३. प्रमाणलेखन ...... १५३

परिशिष्ट ...... १६२

आधारभूत ग्रंथ ...... १६८

💬

Chat with us