Welcome to Prashant Publications

Rs. 75.00 10% OFF
Availability: 10 left in stock

राजामाता जिजाऊंचे विस्तृत जीवनचरित्र लिहले गेले नाही. असे चरित्र लिहिण्यासाठी पुरेशी साधनसामग्री नाही. मात्र वैचारिक चरित्र लिहिण्यासाठी काही महत्त्वाची दस्तावेज उपलब्ध आहेत. त्यातून राजमाता जिजाऊंच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल व त्यांच्यातील गुणवैशिष्ट्यांबद्दल रूपरेषा...

  • Name : स्वराज्य प्रवर्तक राजमाता जिजाऊ माँसाहेब (Swarajya Pravartak Rajmata Jijau Masaheb)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Reference
  • Manufacturing : June 2025
  • Total Pages : 54 Pages
  • Barcode : 9788198865045
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

स्वराज्य प्रवर्तक राजमाता जिजाऊ माँसाहेब (Swarajya Pravartak Rajmata Jijau Masaheb)
- +

राजामाता जिजाऊंचे विस्तृत जीवनचरित्र लिहले गेले नाही. असे चरित्र लिहिण्यासाठी पुरेशी साधनसामग्री नाही. मात्र वैचारिक चरित्र लिहिण्यासाठी काही महत्त्वाची दस्तावेज उपलब्ध आहेत. त्यातून राजमाता जिजाऊंच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल व त्यांच्यातील गुणवैशिष्ट्यांबद्दल रूपरेषा मांडता येते. जिजाऊंच्या जीवनाचा घटनाक्रम जुळवता येतो. त्यामुळे जिजाऊंचे व्यक्तिमत्त्व, जीवनक्रम आणि आधुनिक पूर्व काळ, परिस्थिती या तीन घटकांच्या आधारे एक समग्र वैचारिक चरित्र उभे राहते.
जिजाऊंनी आणि शहाजी राजेंनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि साकारण्याठी शिवबांना सुसंस्कारित घडवले. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला. शिवाजी राजे रयतेचे छत्रपती शिवाजी महाराज झाले. जिजाऊंनी स्त्र्यर्थ (प्रपंच, अर्थ, धर्म, दु:खमुक्ती) साध्य व सिद्ध केला.
जिजाऊंनी तत्कालीन परिस्थितीतला सामाजिक वर्चस्ववाद, जातिव्यवस्था वर्णव्यवस्था, अंधश्रद्धा व अज्ञानावर आधारित रूढी परंपरा नाकारल्या आणि स्वराज्यनिर्मितीस पोषक अशा पर्यायी व्यवस्था उभ्या केल्या. वर्ण्ाव्यवस्थेत त्यांनी ‘उदात्त मानवी चेतना’ हा पर्याय आणला. पुढे अंधश्रद्ध जनमानसातली ‘विवेकी समाजचेतना’ जागृत करून त्यांच्यातून सारासार विवेकबुद्धीने विचार करणारे स्वराज्यनिष्ठ व्यक्तिमत्त्वे घडवली. ‘बळी तो कान पिळी’ या जंगलराज कायद्यावर आधारित राज्यव्यवस्था नाकारली आणि कायद्यांवर आधारित न्यायी स्वराज्याचा पाया रचण्यात सिंहाचा वाटा उचलला. राजमाता जिजाऊ या भारताच्या माउली आणि तेथील समाजाच्या सावली म्हणून नामवंत व कीर्तिवंत ठरल्या. स्त्रीची अर्धांगिनी व अबला ही प्रतिमा पुसून टाकून स्त्री ही अर्धांगिनी नसून ती पूर्णांगिनी व सामर्थ्यशाली सखी केवळ असते हे आपल्या आचरणातून सिद्ध केले. रयतेचे शोषण करणारा अभिजन वर्ग ही संकल्पना स्वराज्यात संपुष्टात आणली. रयतेचे न्यायी राजे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. जिजाऊ, शहाजी राजे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे इतर राजांसारखे आयतोबा नव्हते. त्यांनी अफाट कष्टातून स्वराज्य स्थापन केले होते. हे असामान्य व अतुलनीय असल्याने त्यांच्या शौर्याचा, धाडसाचा, कौशल्याचा, उत्साहीपणाचा, दुरदृष्टीचा, विवेकबुद्धीचा आजही आधुनिक जगातल्या लोकशाही देशात उदो उदो होतो. कारण स्वराज्यात न्याय मिळत होता        

1. राजमाता जिजाऊ : संक्षिप्त परिचय..........................9

2. मालोजीराजे आणि उमाबाई ः झुंजार व्यक्तिमत्त्व............11

3. जिजाऊंचे जीवन व कार्य...................................17

4. राजमाता जिजाऊंची नवीन हिंदवी स्वराज्य स्थापनेमागील विवेकी समाजचेतना.........................28

5. जिजाऊ : सकारात्मक मानवी चेतनेच्या धनी...............31

6. जिजाऊंच्या उदात्त मानवी चेतनेची प्रतीके : आत्मबळ, जगदंब आणि शिवशक्ती........................36

7. जिजाऊंचे व्यक्ती व कुटुंबसंस्थेबद्दलचे विचार...............40

8. जिजाऊंचे स्त्री-सुधारणाविषयक विचार.....................43

9. जिजाऊंवर सामाजिक सलोखा जपण्याचा संस्कार...........48

💬

Chat with us