Your cart is empty now.
Welcome to Prashant Publications
| INTERNATIONAL | XS | S | M | L | XL | XXL | XXXL |
|---|---|---|---|---|---|---|---|
| EUROPE | 32 | 34 | 36 | 38 | 40 | 42 | 44 |
| US | 0 | 2 | 4 | 6 | 8 | 10 | 12 |
| CHEST FIT (INCHES) | 28" | 30" | 32" | 34" | 36" | 38" | 40" |
| CHEST FIT (CM) | 716 | 76 | 81 | 86 | 91.5 | 96.5 | 101.1 |
| WAIST FIR (INCHES) | 21" | 23" | 25" | 27" | 29" | 31" | 33" |
| WAIST FIR (CM) | 53.5 | 58.5 | 63.5 | 68.5 | 74 | 79 | 84 |
| HIPS FIR (INCHES) | 33" | 34" | 36" | 38" | 40" | 42" | 44" |
| HIPS FIR (CM) | 81.5 | 86.5 | 91.5 | 96.5 | 101 | 106.5 | 111.5 |
| SKORT LENGTHS (SM) | 36.5 | 38 | 39.5 | 41 | 42.5 | 44 | 45.5 |
या पुस्तकाच्या लेखनादरम्यान आमचा एकच उद्देश होता - मानव विकास या विषयाकडे विद्यार्थ्यांनी केवळ सैद्धांतिक अभ्यास म्हणून न पाहता, जीवनाचे वास्तव आणि मानवी मूल्यांचे दर्शन म्हणून अनुभवावे.
मानवाच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यात होणारे शारीरिक, बौद्धिक, सामाजिक आणि भावनिक बदल हे केवळ वैज्ञानिक दृष्टीनेच नव्हे, तर संवेदनशील आणि मानवी दृष्टीनेही समजावेत, यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे.
या पुस्तकात प्रत्येक घटकाची मांडणी सुसंगत, सुबोध आणि विद्यार्थ्यांच्या आकलनक्षमतेनुसार करण्यात आली आहे. विषय अधिक स्पष्ट होण्यासाठी आवश्यक ठिकाणी उदाहरणे, तक्ते आणि सिद्धांतांचा सुसंवाद साधण्यात आला आहे, जेणेकरून वाचकांना या विषयाचे सर्वांगीण आकलन होईल.
प्रकरण १. मानवी विकास: जन्मपूर्व, शैशव आणि बाल्यवस्था .................... ९
(Human Development: Prenatal, Infancy and Babyhood)
१.१ मानवी विकासाची संकल्पना: व्याख्या, विकासाचे टप्पे, विकासाचा अभ्यास करण्यासाठीच्या पद्धती : कालानुक्रमिक (Longitudinal), छेदात्मक (Cross-Sectional), अनुक्रमिक (Sequential).
१.२ विकासाचे सिद्धांत: फ्रॉइडचा मनोविश्लेषणात्मक (Psychoanalytical), एरिक्सनचा मानसिक-सामाजिक (Psychosocial), पियाजेचा संज्ञानात्मक विकास (Cognitive Development).
१.3 जन्मपूर्व विकास आणि जन्म: जीवनाची सुरुवात, गर्भधारणेचे महत्त्व, जन्मापूर्वीच्या विकासाचे टप्पे, जन्माचे प्रकार आणि एकापेक्षा अधिक जन्म (जुळी, तिळी).
१.४ शैशवावस्था (Infancy): शारीरिक विकास, शैशवावस्थेतील प्रमुख समायोजन - तापमानातील बदल, श्वास घेणे, चोखणे आणि गिळणे, उत्सर्जन.
१.५ बाल्यावस्था (Babyhood): शारीरिक, भाषिक, भावनिक, सामाजिक आणि संज्ञानात्मक विकास.
प्रकरण २. पूर्व आणि मध्यम बाल्यावस्था ...................................... ५९
(Early and Middle Childhood)
२.१ बाल्यावस्थेचे स्वरूप: शारीरिक विकास - शरीराची वाढ आणि बदल, पोषण, झोपण्याची पद्धत, आरोग्य आणि सुरक्षितता.
२.२ पालकत्व शैली आणि मुलांच्या विकासावर होणारे परिणाम: अधिकारवादी (Authoritative), हुकूमशाही (Authoritarian), उदारमतवादी (Permissive), दुर्लक्षित (Neglectful).
२.३ स्व-ची (Self) वाढ: स्व-संकल्पना, भावना समजून घेणे, आत्म-सन्मान.
२.४ मुलांचे मानसिक आरोग्य आणि उपचार पद्धती: शाळा भीती (School Phobia) आणि इतर चिंता विकार, बालपणातील नैराश्य.
२.५ बालपणातील वर्तन समस्या: अंगठा चोखणे, बिछान्यात लघवी करणे, राग उद्रेक (Temper Tantrum), हट्टीपणा, चोरी करणे.
प्रकरण ३. किशोरावस्था आणि प्रारंभिक प्रौढावस्थेतील विकास ............. १३०
(Development in Adolescence and Early Adulthood)
३.१ पौगंडावस्थेतील शारीरिक बदल: शारीरिक वाढ, लैंगिक परिपक्वता, प्राथमिक आणि दुय्यम लैंगिक वैशिष्ट्ये, पौगंडावस्थेतील बदलांवरील प्रतिक्रिया, लवकर विरुद्ध उशिरा येणारी परिपक्वता.
३.२ किशोरावस्थेतील आरोग्यविषयक समस्या: पोषणाची गरज, आहाराशी संबंधित विकार, लैंगिक क्रियाकलाप, लैंगिक संसर्गजन्य आजार (STD), किशोरवयीन गर्भधारणा.
३.३ किशोरावस्थेतील सामाजिक बदल: सहकाऱ्यांच्या समूहाचा प्रभाव, सामाजिक वर्तनातील बदल, नवीन सामाजिक गटांची निर्मिती, मित्रांच्या निवडीतील नवीन मूल्ये.
३.४ प्रारंभिक प्रौढावस्थेतील वैयक्तिक आवडी: देखावा, कपडे, यश, स्वातंत्र्य, पैसा, शिक्षण, व्यवसाय आणि प्रतिष्ठेची प्रतीके.
३.५ प्रारंभिक प्रौढावस्थेतील व्यावसायिक आणि वैवाहिक समायोजन: व्यवसायाची निवड, व्यवसाय निवडीवर परिणाम करणारे घटक, जोडीदाराशी समायोजन, लैंगिक समायोजन, पालकत्वाशी समायोजन.
प्रकरण ४. मध्यम आणि उत्तर प्रौढावस्थेतील विकास ........................ १७५
(Development in Middle and Late Adulthood)
४.१ मध्यम वयातील आरोग्य आणि तंदुरुस्ती: लैंगिकता, आजारपण, राग व शत्रुत्व, शारीरिक आव्हानांना जुळवून घेणे, तणाव व्यवस्थापन, व्यायाम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे.
४.२ मध्यम वयातील जीवनशैली: एकल जीवन (Singlehood), ऑनलाईन डेटिंग, विवाह, घटस्फोटानंतरचे डेटिंग, आजोबा-आजी होणे (Grandparenthood), मित्रत्वाचे नाते.
४.३ उत्तर प्रौढावस्था: स्वरूप, शारीरिक बदल, आरोग्य, तंदुरुस्ती आणि अपंगत्व.
४.४ सेवानिवृत्तीशी समायोजन: नवीन जीवनशैली स्वीकारणे, स्वतःची ओळख पुन्हा निश्चित करणे, आर्थिक नियोजन, आरोग्य व्यवस्थापन, सामाजिक आधार, नवीन कौशल्ये शिकणे, कुटुंब आणि मित्रांशी संबंध राखणे.
४.५ वृद्धापकाळातील लवचिकता (Resilience): अडचणींना सामोरे जाण्याची क्षमता, सकारात्मक दृष्टिकोन राखणे, स्वतःबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे, अनुकूलता आणि लवचिकता.
संदर्भ ग्रंथसूची .............................................................. २४३