Your cart is empty now.
विपणन हे व्यवसायाचे एक कार्य आहे. प्रत्येक व्यवसायाला विपणन हे कार्य करावे लागते. विक्री आणि विपणन या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. उत्पादित वस्तू आणि सेवा अंतिम ग्राहक किंवा उपभोक्त्यापर्यंत पोहचविण्यासाठी अनेक व्यावसायिक कार्ये (खरेदी, एकत्रिकरण, वाहतूक, साठवण, जाहिरात व प्रसिध्दी, विक्री इ.) करावी लागतात; यांचा समावेश विपणनात केला जातो. औद्योगिक क्रांतीनंतर कारखान्यात यंत्राच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर मागणीपूर्व उत्पादन केले जाते. बाजारपेठेतील स्पर्धा, ग्राहक संख्येत होणारी वाढ या अनेक कारणांमुळे विपणनाची विविध कार्ये करावी लागतात. त्यामुळे विपणन संकल्पनेमध्ये बदल होत आहे. विपणन संकल्पनेचा उदय, पणन, विपणी अशा क्रमाने बदल झालेला दिसून येतो.
सदरील पुस्तकात विपणनाची ओळख, बाजारपेठ विभागीकरण आणि खरेदीदार वर्तन, विपणन मिश्र, वस्तु जीवन चक्र, विपणन रणनिती, सेवा विपणन आणि माहिती तंत्रज्ञानावर आधारीत विपणन व्यूहरचनाची ओळख या घटकांवर सविस्तर चर्चा अत्यंत सोप्या शब्दात केलेली आहे.