Your cart is empty now.
राज्यशास्त्रातील आणि राजकारणातील नेतृत्व, आरक्षण, राष्ट्रवाद, जमातवाद आणि दहशतवाद या आधुनिक संकल्पनांची मांडणी तसेच राज्य, लोकशाही, राष्ट्रवाद, समाजवाद आणि सार्वभौमत्व या संकल्पनाविषयी पाश्चात्य तसेच भारतीय राजकिय विचारवंताचे विचार यांची सुसंगत आणि वस्तुनिष्ठ स्वरूपात मांडणी करण्याचा प्रयत्न सदरील पुस्तकात केला आहे. यासोबतच नेतृत्व, आरक्षण, राष्ट्रवाद, जमातवाद, दहशतवाद, राज्य, लोकशाही, राष्ट्रवाद, समाजवाद आणि सार्वभौमत्व या आधुनिक संकल्पनांच्या विविध विचारवंतांनी केलेल्या व्याख्या, अर्थ, स्वरूप, विविध घटक, गुणवैशिष्ट्ये, प्रकार, फायदे व तोटे, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि यथायोग्य ठिकाणी विविध उदाहरणांसह स्पष्टीकरण केलेले असून पुस्तकाची भाषा अत्यंत साधी व सोपी असून सर्वांना सहज समजेल अशी असल्याने प्रस्तुत पुस्तक विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक यासोबतच सर्वांना लाभदायक ठरेल यात शंका नाही.