Your cart is empty now.
अध्ययन विषयात ज्या संकल्पना, सिद्धांत व निष्कर्ष स्वीकृत झालेले आहेत त्यांचे प्रामाण्य पुःपुन्हा तपासून पाहणे हे त्या संशोधकाचे कार्य आहे व सिद्धांचाची नव्याने मांडणी करण्यासाठी संशोधनाची गरज पडते. अशा प्रकारे संशोधन हा सतत सत्याचा शोध घेण्याचा एक व्यवस्थित व संघटित प्रयत्न आहे.
सध्याच्या स्पर्धेच्या व तंत्रज्ञानाच्या युगात वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्रातील संशोधन पद्धतीला फार मोठे महत्व प्राप्त झाले आहे. वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्रातील माहितीचे वेगळे स्वरूप पाहता अशा बहुविध संशोधन पद्धतीची गरज या पुढे संशोधकाला भासणार आहे.
संशोधकासाठी तसेच विविध विद्यापीठांनी संशोधन पद्धतीविषयी केलेल्या अभ्यासक्रमातील सर्व घटकांच्या विवेचनाचा या पुस्तकात समावेश केला आहे. प्रस्तुत पुस्तकात संशोधन पद्धती, साहित्यिक अध्ययन, संशोधन प्रक्रिया, संशोधनातील नैतिकता, संशोधन आराखडा, नमुना आराखडा, माहिती व्यवस्थापन, तथ्य संकलन, अनुमापन तंत्र, गृहितकृत्ये परीक्षण, निर्वचन व अहवाल लेखन इत्यादी मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत.