Your cart is empty now.
नाटक हा वाड्ःमयप्रकार सादरीकरणाचा एक प्रकार आहे. नाटक वाचुन त्याचा आस्वाद आपल्याला घेता येतो. नाटक हा वाड्ःमय प्रकार सादरीकरणाच्या प्रक्रियेमुळे कथा, कविता, कादंबरी इ. अनेक वाड्ःमय प्रकारापेक्षा वेगळा ठरतो. सादरीकरण हेच नाटकाचे अनन्य साधारण वैशिष्ट्ये आहे.
एम.ए.ला शिकत असतांनाच समीक्षा हा पेपर अभ्यासतांना मनात विचार होता की आपण एखाद्या साहित्य कृतीचे परीक्षण करावे त्या साहित्यकृतीची सर्वांगीण समीक्षा करावी. हाच विचार करून “अधांतर” या नाट्यकृतीचे आकलन केले. व अभ्यासक्रमाच्या दृष्टीने आकलन करून विद्यार्थ्यांसाठी तो उपयुक्त व्हावा यासाठीच हा अट्टाहास.
संशोधन ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे व या संशोधनासाठी सतत प्रोत्साहित करणारे माझे गुरू प्रा.डॉ.शिरीष पाटील यांनी प्रेरणा देऊन हे पुस्तक माझ्याकडून लिहून घेतले.