Welcome to Prashant Publications

Rs. 425.00
Availability: 10 left in stock

आज भारताला स्वातंत्र्य मिळून 67 वर्षे पुर्ण झालीत. परंतू आज भारतीय स्त्रीच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, आरोग्यविष्यक, शैक्षणिक स्थितीचा आढावा घेताना धक्कादायक चित्र समोर येते. भारतीय महिला आजही मानवी हक्काच्या समान...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

महिला आणि मानवी हक्क
- +

आज भारताला स्वातंत्र्य मिळून 67 वर्षे पुर्ण झालीत. परंतू आज भारतीय स्त्रीच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, आरोग्यविष्यक, शैक्षणिक स्थितीचा आढावा घेताना धक्कादायक चित्र समोर येते. भारतीय महिला आजही मानवी हक्काच्या समान हक्कांसंदर्भात पिछाडीवर आहेत हे कटू वास्तव डोळ्याआढ करता येवू शकत नाही. आपल्या अधिकाराप्रती महिलांना अधिक संघर्ष करावा लागत आहे. संवैधिानिक तरतूदी आणि कायदे असून सुद्धा महिलांचे शोषण आणि अत्याचाराच्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढच होत आहे.

भारतात एकीकडे महिलांच्या समान हक्कांच्या, विकासाच्या दृष्टीने कायदे केल्या जात आहेत, योजना आखल्या जात आहेत. तर दुसरीकडे महिलांवरील होणार्या विविध अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. बलात्कार, अपहरण, लैंगिक शोषण, कौटुंबिक हिंसाचार, शारिरिक मानसिक अत्याचार अशा विविध अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे. या अत्याचारांपासून स्त्रियांचे संरक्षण करणारे कायदे आहेत परंतू त्यांच्यातील त्रुटीमुळे अपराध्यांना कठोर शिक्षा होत नाही. त्यामुळे गुन्हेगारांना कायद्याची भितीच वाटत नाही.