{"title":"आदिवासी \/ मानवाधिकार","description":"","products":[{"product_id":"आदिवासी-तडवी-भील-रुढी-परंपरा-चालिरिती","title":"आदिवासी तडवी भील : रुढी, परंपरा, चालिरिती","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआदिवासी तडवी भिल्ल ही एक भिल्ल आदिम जमात आहे. तडवी ही एक शूर, युद्धात भाग घेणारे योद्धे म्हणूनही ही जमात ओळखली जाते. इ.स.पू. 300 ते 4000 पाषण युगापासून आदिवासीचे पुरावे हे संशोधकांना मिळाले आहेत. “भिल्ल” संस्कृती ही जगातील पहिली सभ्यता असावी असे काही जगातील संशोधकांचे मत आहे. आदिवासी तडवी हे हिंदू-मुस्लिम नाहीत. त्याची आपली संस्कृती आहे. स्वतंत्र अशी ‘तडवी’ भाषा आहे तसेच स्वतःची अशी संस्कृतीची गुप्त भाषा आहे. मुस्लिम हिंदू संस्कृती प्रमाणे कोणतेही साम्य आढळून येत नाही. पोशाख, पेहराव, खानपान, सामाजिक रीतिरिवाज, चालीरिती, रूढी परंपरा हे स्वतंत्र व अत्यंत भिन्न आहेत. गेल्या हजारो शतकानुशतके अशी आदिवासी संस्कृती, तडवी संस्कृती आपले आचरण, पालन करतांना दिसतात. आदिवासी हे निसर्ग व पूर्वजांना पूजतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआदिवासी संस्कृती व आदिवासी तडवी भील संस्कृतीचा शोध या पुस्तकात घेतला आहे. आजच्या 21 व्या शतकातील पिढीला हे सर्व ज्ञात व्हावे म्हणून हा लेखनप्रपंच!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48468291682533,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adiwasi-Tadvi-Bhill_Ajij-Tadvi_cnvt-1.jpg?v=1771926065"},{"product_id":"कोलाम-सामाजिक-सांस्कृतिक-मूल्ये-आणि-आर्थिक-विकास","title":"कोलाम : सामाजिक-सांस्कृतिक मूल्ये आणि आर्थिक विकास","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470297280741,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Kolam-Samajik-Sanskrutik-Mulye-Ani-Arthik-Vikas_cnvt-1.jpg?v=1771999285"},{"product_id":"भारतीय-सामाजिक-समस्या-1","title":"भारतीय सामाजिक समस्या","description":"\u003cp\u003eमानव समाजाच्या उत्पत्तीपासून तर आजपर्यंतचा समाजाचा कोणताही कालखंड घेतला तर असा कोणताच कालखंड नाही की ज्यात सामाजिक समस्या नव्हत्या. प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंत, आदीम समाजापासून तर 21 व्या शतकातल्या प्रगत समाजापर्यंत सामाजिक समस्या नेहमीच आढळून येतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमात्र सामाजिक समस्या सार्वत्रिक व सार्वकालीन असल्या तरी स्थळ व काळानुसार त्याचे स्वरुप बदलत जाते. आदिवासी समस्या प्रगत समाजाच्या समस्यापेक्षा वेगळ्या असतात. ग्रामीण समाजाच्या समस्या नागरी समाजाच्या समस्येपेक्षा भिन्न असतात भारतीय सामाजिक समस्यांची ओळख व्हावी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदरील पुस्तकात सामाजिक समस्या, कौटुंबिक समस्या, भारतातील लोकसंख्येची समस्या, ग्रामीण भारतातील समस्या, मद्यपानाच्या समस्या, भ्रष्टाचार, दहशतवादाची समस्या, भारतातील दुर्बल घटकांच्या समस्या, नागरीकरणाशी संबधित समस्या, असहिष्णुता दंगली आणि गुन्हे इ. घटकांची विद्यार्थ्यांना समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून ओळख व्हावी या दृष्टीने महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश करण्यात आला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474631733477,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiy-Samajik-Samasya_cnvt-1.jpg?v=1772105461"},{"product_id":"मेळघाटातील-कोरकूंची-लोकसंस्कृती","title":"मेळघाटातील कोरकूंची लोकसंस्कृती","description":"\u003cp\u003eप्रस्तुत लेखक दलित साहित्याचे गाढे अभ्यासक व संशोधक आहेत. दलित साहित्य हा मराठीतील प्रवाह अत्यंत ताकदवान असून त्याने एकूणच मराठी साहित्याला ढवळून काढले आहे. हे निर्विवाद सत्य आहे. प्रा.डॉ. विलास तायडे हे लेखक दलित साहित्याबरोबर आदिवासी साहित्याचाही अभ्यास करत आहेत. त्या अभ्यासातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली.   \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474866942181,"sku":null,"price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Melghatatil-Korkunchi-Loksanskruti_Dr-Vilas-Tayde-1.jpg?v=1772109712"},{"product_id":"प्रादेशिक-बोलींचे-भाषाविज्ञान","title":"प्रादेशिक बोलींचे भाषाविज्ञान","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eबोली आणि भाषा या देशाची विरासत आहे. भाषा हे समाजव्यवहाराचे महत्त्वाचे साधन आणि सामाजिक संस्था असल्याने बोली समाजव्यवहारात घट्ट रुतून बसल्या आहेत. मानव जातीच्या प्रगतीचा इतिहास बोलींमध्ये दडून बसला आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतरावजी चव्हाण यांनीही बोलींचे महत्त्व ओळखून ‘बोली या ज्ञानभाषा झाल्या पाहिजेत’ असे महत्त्वपूर्ण उद्गार काढले होते, आणि 11 जानेवारी 1965 ला ‘मराठी’ ही महाराष्ट्राची राजभाषा झाल्यानंतर, हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू। हिला बैसवू वैभवाच्या शिरी’ ही माधव ज्युलियनांची भविष्यवाणी खरी ठरविण्यासाठी राजकीय पातळीवरही पाऊले उचलली गेली होती. ज्या मराठी भाषेला वैभवाच्या शिरावर बसविण्याची शपथ घेतली होती, त्या मराठी राजभाषेची आणि तिला समृद्ध करणार्या तिच्या दीडशेहून अधिक बोलींची काय अवस्था आहे हे ही समजून घेतले पाहिजे. मराठीला 52 बोली आहेत असा दावा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव तयार करणार्या समितीने केला आहे. प्रत्यक्षात मराठीला 150 हून अधिक बोली आहेत. मराठी भाषेला समृद्ध करणार्या तिच्या बोली नष्ट झाल्या तर त्या बोलीतील शब्दांचे अर्थ आणि भावना नष्ट होतील. मराठी भाषा विविध अर्थ आणि भावनांविना लुळीपांगळी होऊन परकीय भाषा तिच्यावर आक्रमण करेल. आज महाराष्ट्रात मराठीवरील इंग्रजीचे आक्रमण वाढते आहे. ते रोखण्यासाठी, मराठीला अधिक समृद्ध करून ती जगाची ज्ञानभाषा होण्यासाठी तिच्या बोलींना जपणे व त्यांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. ‘प्रादेशिक बोलींचे भाषाविज्ञान’ हा महाराष्ट्रातील सत्तावीस प्रादेशिक बोलींचे भाषिक सौंदर्य, बोलींचे समाजशास्त्र, बोलीविज्ञान व व्याकरण व्यवस्था जपणारा आणि संवर्धन करणारा महत्त्वाचा ग्रंथ आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474931757285,"sku":null,"price":575.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Pradeshik-Bolinche-Bhashavidnyan_cnvt-1.jpg?v=1772111309"},{"product_id":"आदिवासींची-शैक्षणिक-स्थिती","title":"आदिवासींची शैक्षणिक स्थिती","description":"\u003cp\u003eसमाजकार्य अभ्यासक्रमात क्षेत्रकार्य हे समाजकार्य शिक्षणाचा आत्मा आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. क्षेत्रकार्याचे पर्यवेक्षण करित असतांना आदिवासी भागातील, डोंगरात वास्तव्य असणार्या अनेक गावातील परिस्थितीचा अभ्यास करतांना तेथील मुलांचे शिक्षणाचे तसेच त्या भागात साक्षरतेचे प्रमाण कमी असल्याचे लक्षात आले. त्या भागातील शिक्षणाच्या अशा परिस्थितीस कारणीभूत वरवर काही कारणे लक्षात जरी आली तरी त्या संदर्भातील वास्तविक कारणे काय असावित याची उत्सुकता निर्माण झाल्यामुळे त्या विषयी या आदिवासी शिक्षणाच्या स्थितीबाबतचे अध्ययन करण्यात आले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या स्थितीवर प्रकाश टाकण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना शिक्षण देणार्या शिक्षकाच्या माध्यमातून तसेच प्राथमिक शिक्षण घेणारे आदिवासी विद्यार्थी व आदिवासी आश्रमशाळांमधून शिक्षण घेवून विविध पदांवर कार्यरत असणार्या व्यष्टींच्या माध्यमातून तथ्य संकलीत करण्यात आले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAadivasinchi Shaikshanik Sthiti\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477703831781,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adivasinchi-Shaikshanik-Sthiti-1.jpg?v=1772185871"},{"product_id":"आदिवासींचे-शिक्षण-व-आरोग्य","title":"आदिवासींचे शिक्षण व आरोग्य","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारताची एक ‘वैशिष्ट्यपूर्ण देश’ म्हणून जागतिक पातळीवर ओळख आहे ती विभिन्न पैलूतून. भारतात राहणारे विभिन्न जातीधर्माचे लोक हा त्यापैकीच महत्त्वपूर्ण असा पैलू होय. आदिवासी जमात हीसुद्धा प्रमुख जमात आहे. एकूण लोकसंख्येपैकी त्यांचे प्रमाण 8.5% असून डोंगर-दर्यात, जंगलात राहून आपली संस्कृती त्यांनी आजतागायत टिकवून ठेवलेली आहे. आदिवासी समूह हा आर्थिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिकदृष्ट्या अत्यंत मागासलेला असून त्यांच्या विभिन्न समस्यासुद्धा आजही कायम आहे. शासन स्तरावरून आदिवासी मुलांना शिक्षण प्रवाहात समाविष्ट करून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालूच आहे. सदरील पुस्तकात आश्रमशाळा व आदिवासी हा प्रमुख घटक असून आहार, आरोग्य, स्वास्थ्य, उपाययोजना इत्यादींचे सखोल अध्ययन शास्त्रशुद्धरित्या मुद्देसूदपणे मांडण्यात आले आहे. याचा वाचक, संशोधक तसेच अभ्यासूंना नक्कीच फायदा होईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477735518437,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aadiwasinche-Shikshan-and-Aarogya_cnvt-1.jpg?v=1772187687"},{"product_id":"आवास-योजना-आणि-अनुसूचीत-जाती-व-जमातींचा-विकास","title":"आवास योजना आणि अनुसूचीत जाती व जमातींचा विकास","description":"\u003cp\u003e‘आवास योजना आणि अनुसूचीत जाती व जमातींचा विकास’ या पुस्तक शासनाची एखादी योजना अभ्यासणे, योजनेचा लाभार्थ्यांवर झालेला सर्वांगीण परिणामांचा अभ्यास करणे ही खरोखरच भूषणावह बाब असून इतर संशोधकही शासकीय योजनांचे सर्वंकष मुल्यमापन करतील ही अपेक्षा. इंदिरा आवास योजनेचे सर्वाधिक लाभार्थी हे ग्रामीण भागात राहणारे दारिद्य्र रेषेखाली जीवन जगणारे अनुसूचीत जाती\/जमाती समुदायातील लोक आहेत. या योजनेमुळे या समुदायातील लाभार्थ्यांवर काय परिणाम झाला? ह्या योजनेचे सर्वाधिक लाभार्थी असणारे अनुसूचीत जाती\/जमाती समुदायातील लाभार्थ्यांचे वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, आरोग्य विषयक, शैक्षणिक जीवनात घरकुल योजनेमुळे कश्या पध्दतीने परिवर्तन घडून आले याबाबतची माहिती पुस्तकात दिलेली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइंदिरा आवास योजनेबाबतची लाभार्थ्यांची मते, योजना अधिक पारदर्शक बनविण्यासाठी लाभार्थ्यांनी सांगितलेल्या सुचना, आवास योजनेचा लाभ मिळवतांना आलेल्या अडचणी आणि आवास योजना अधिक पारदर्शक आणि सक्षम बनविण्यासाठी लाभार्थ्यांनी मांडलेली मते तसेच अनुसुचित जाती\/जमातीची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक समस्या, वैशिष्ट्ये याबाबतीत केलेला सविस्तर विश्लेषणात्मक अभ्यास, आवास योजनेचे महत्त्व, आवश्यकता यांचादेखील यथायोग्य समावेश केला आहे. या योजनेमुळे अनेक कुटुंबांचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक परिणामी आर्थिक विकास झालेला दिसून येत आहे. तरीदेखील आवास योजनेचा प्रचार, प्रसार आणि योजनेची पारदर्शकपणे अंमलबजावणी, आवश्यकता असल्याचे दिसून येते. विविध संशोधक, विविध अहवाल, संदर्भग्रंथ यांची आवास योजनेबद्दलची मते संदर्भ साहित्य म्हणून देण्यात आलेली आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477778444517,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Awas-Yojana-Aani-Anusuchit-Jati-v-Jamatincha-Vikas_FNL-1.jpg?v=1772190236"},{"product_id":"आदिवासी-शिक्षणातील-शासकीय-योजना","title":"आदिवासी शिक्षणातील शासकीय योजना","description":"\u003cp\u003e21 व्या शतकातही आदिवासी समाज हा अज्ञान, अंधश्रध्दा व दारिद्रयाने बऱ्याच प्रमाणात ग्रासलेला आहे. अज्ञान व गरीबीमुळे शिक्षणापासून वंचित असून मागासलेला आहे. आदिवासी समाज अतीदुर्गम भागात, डोंगरदऱ्यात राहणारा व शहरी जीवनापासून वेगळा राहणारा, स्वत:ची वेगळी अशी संस्कृती टिकविणारा समाज आहे. औद्योगिकीकरण व दळणवळणाच्या साधनांमुळे तसेच शहरी समाजाच्या सानिध्यात आल्यामुळे आदिवासी काही प्रमाणात आपली करु शकला. तसेच सर्वांसाठी शिक्षण उपलब्ध झाले पाहिजे याकरीता स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर अनेक समाजसुधारकांनी विविधांगी प्रयत्न केले. आदिवासी समाजाने राष्ट्राच्या आर्थिक विकासातील शिक्षणाचे महत्व ओळखले. सद्य:स्थितीत आदिवासी समाजाच्या प्रगतीकरीता सरकारी व खासगी संस्थांच्या माध्यमातुन विविध स्तरावर प्रयत्न होत आहेत. आदिवासींच्या शिक्षणाकरीता विविध प्रयत्न होत असूनही त्यांची शिक्षणाची प्रगती इतर समाजाच्या तुलनेत फारच अल्प असल्याचे निराशाजनक चित्र आजही दिसते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAadiwasi Shikshanatil Shaskiyta Yojana\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477834641637,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adiwasi-Shikshantil-Shaskiya-Yojna_Dr-Vinod-Raipure_cnvt-1.jpg?v=1772191597"},{"product_id":"आदिवासी-तडवी-भील","title":"आदिवासी तडवी भील","description":"\u003cp\u003eजगातील तसेच भारतातील पहिली सभ्यता म्हणुन आदिवासी भिल्लांचा उल्लेख करावा लागेल. तडवी हे भिल्लांचे वंशज आहेत. आदिवासी तडवींची मातृभाषा ही ‘तडवी’ म्हणुन ओळखली जाते. आदिवासी बोलीभाषा या मुक्त, नैसर्गिक स्वभाव गुणसंपन्न असतात. त्यांच्यात एक प्रकारची सहजता दिसते. आदिवासी तडवी भाषा ही नैसर्गिकपणे ध्वनी, उच्चार, गोडवा, सहजता, ताल, लय, माधुरता या गुणांमुळे हजारो वर्षांपासून फक्त मौखिक परंपरेने एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपावेतो हस्तांतरीत व सहजच चालत आलेली आहे. काळाच्या ओघात ती लोप पावली नाही. आदिवासी जमातीच्या रूढी, परंपरा, चालीरिती, चालचलन, जीवन व्यवहार, रीतीरिवाज, खानपान, सांस्कृतिक, सामाजिक, जीवन पद्धती, वाङ्मय, लोककथा, साहित्य संपदा या बाबी मौखिक स्वरूपात एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपावेतो हस्तांतरीत होत आलेल्या आहेत. तडवी लिपीच्या वापराने अख्खी विश्वजात, विश्वसाहित्य, विश्वलोकवाङ्मय व विश्वलोकाभिमुखता सामावून घेण्याची ताकद निश्चितच आहे, असे म्हटल्यास आश्चर्य वाटू नये.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48478005821669,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adiwasi-Tadvi-Bhil-Bhasha_Ajij-Tadvi_cnvt-1.jpg?v=1772197108"},{"product_id":"आदिवासी-समाज-अस्तित्व-आणि-अस्मिता-खंड-२","title":"आदिवासी समाज अस्तित्व आणि अस्मिता (खंड – २)","description":"\u003cp\u003eआदिवासी समाज प्राचीन काल से जंगलो में निवास करता आया है| जंगलो, पहाडों और प्राकृतिक परिवेश में इन्हीं लोगों का वास्तव्य दिखाई देता है| आदिवासी लोग नगरीय संस्कृति से भिन्न लोग कहलाए जाते हैं| आदिवासीयों का अस्तित्व नगरीय संस्कृति से पूर्णत: भिन्न दिखाई देता है| आज भी अधिकांश आदिवासी समूह घने जंगलों, पर्वतीय क्षेत्रों या दूरस्थ गाँवों मेेंं झोपडियों में रहने वाला समूह है| स्थूल रुप से उनके वास्तविक निवास स्थान का अवलोकन किया जाए तो, शहरों से दूर देहात के लोग रहते हैं, और गॉव-देहातों से भी दूर आदिवासी लोग रहते हैं इसलिए शहरी जन-जीवन के विकसित रूप से कोसों दूर आदिवासी समाज का अस्तित्व दिखाई देता है| उनका रहन-सहन, खानपान, अस्तित्व और अस्मिता की सीमा-रेखाए औरों से अत्यधिक भिन्न दिखाई देती है|\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479840043237,"sku":null,"price":510.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adivasi-Samaj-Astitva-Aani-Asmita-khand-1_c-1-800x1207.jpg?v=1772271006"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/%e0%a4%86%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0.oembed?page=2","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}