{"title":"आधुनिक","description":"","products":[{"product_id":"आधुनिक-महाराष्ट्राचा-इतिहास-1","title":"आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारताच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक जडणघडणीत महाराष्ट्राचे योगदान अनन्य साधारण आहे. भारतातील सामाजिक सुधारणा चळवळीचा पाया महाराष्ट्रामध्ये घातला गेला. देशांच्या बदलाचे नेतृत्व महाराष्ट्राने केलेले दिसून येते. इ.स. 1818 मध्ये पेशवाईचा शेवट झाला व महाराष्ट्रावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता स्थापन झाली. इ.स. 1818 नंतरची महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीचा आढावा प्रस्तुत संदर्भ ग्रंथात घेण्यात आलेला आहे. ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेच्या सुरुवातीच्या कालखंडातील वृत्तपत्रे, शिक्षण, प्रशासन, ख्रिस्ती मिशनऱ्यांचे कार्य याबद्दलचे विवेचन करण्यात आलेले आहे. देशाच्या सामाजिक सुधारणेत महत्त्वपूर्ण योगदान देणारे महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या कार्याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. टिळक युग, क्रांतिकारी चळवळ गांधीयुग व महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ यांचा ऊहापोह केलेला आहे. तसेच स्त्रीमुक्ती चळवळ, कामगार चळवळ, दलित चळवळ, आदिवासी चळवळ, शेतकरी चळवळ व संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचा विचार केलेला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत ग्रंथ महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करणारे संशोधक, एमपीएससी व युपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी व पदवी तसेच पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48453699305701,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aadhunik-Maharashtracha-Itihas_Navnath-Indalkar_cnvt-1_ef21b163-73fd-426e-a2e5-4a7eb4cba247.jpg?v=1771669307"},{"product_id":"आधुनिक-जगातील-घडामोडी","title":"आधुनिक जगातील घडामोडी","description":"\u003cp\u003eअमेरिका व फ्रेंच क्रांतीने सर्वप्रथम लोकशाहीचा पुरस्कार केला. औद्योगिक क्रांतीने मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला, तर रशियन क्रांतीने साम्यवादाचा पुरस्कार केला. एकोणिसाव्या शतकात युरोपात राष्ट्रवादी चळवळींना जोम आला. मॅझिनी, काव्हूर, गॅरिबाल्डी व व्हिक्टर इमॅन्युअल दुसरा यांच्या देशभक्तीमधून इटालीचे आणि बिस्मार्कच्या महत्त्वांकाक्षेतून जर्मनीचे एकीकरण पूर्ण झाले. बिस्मार्कने युरोपात गुप्त राजकारण व गटबाजीचे धोरण स्वीकारल्यामुळे युरोपियन देशांची दोन गटांत विभागणी झाली. त्याचे पर्यवसान पहिल्या महायुद्धात होऊन मानवी जीवनावर अत्यंत वाईट परिणाम झाले. आंतरराष्ट्रीय प्रश्न विचारविनिमय करून सामोपचाराने सोडवावेत आणि जगात शांतता राखावी म्हणून राष्ट्रसंघ स्थापन करण्यात आला; परंतु बड्या देशांनी राष्ट्रसंघाचा फायदा केवळ स्वार्थासाठीच करून घेतला. याशिवाय मुसोलिनी व हिटलर या हुकूमशहांनी राष्ट्रसंघावर आघात केला. त्यांच्या आक्रमक धोरणामुळे दुसरे महायुद्ध घडून आले. यानंतर जागतिक शांंततेसाठी पुन्हा संयुक्त राष्ट्रसंघटना अस्तित्वात आली. दुसर्या महायुद्धानंतर स्वातंत्र्य चळवळींना जोर आला.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकात प्रबोधनाचे युग, धार्मिक सुधारणा चळवळी, अमेरिकन व फ्रेंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती, इटाली व जर्मनीचे एकीकरण, मेईजी क्रांती, पहिले महायुद्ध व साम्यवादाचा उदय, विविध शांतता परिषदा, राष्ट्रसंघ, रशियन राज्यक्रांती, शीत युद्ध आणि सोव्हिएत रशियाचे विघटन इ. विविध मुद्द्यांचा सखोल विचारविमर्श केलेला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48458268639461,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhunik-Jagatil-Ghadamodi_Dr-Anil-Kathare_cnvt-1.jpg?v=1771844302"},{"product_id":"आधुनिक-युरोपचा-इतिहास-इ-स-1780-ते-1945","title":"आधुनिक युरोपचा इतिहास (इ.स. 1780 ते 1945)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमध्ययुगात युरोप हा धर्मगुरू व राजा यांच्या गुलामगिरीत वाढलेला. इंग्लंडने गुलामगिरीचे सर्वप्रथम उच्चाटन केले. फे्रंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्रवाद व राज्यघटनेचे महत्त्व विशद केले. वैज्ञानिक शोधांमुळे ‘औद्योगिक क्रांती’ युरोपमध्ये उदयास आली. वसाहतीच्या शोधामुळे युरोपमध्ये विनाशकारी साम्राज्यवादाचा उदय झाला. संपूर्ण जगाला विनाशाच्या गर्तेत फेकणार्या दोन्ही महायुद्धांना युरोप कारणीभूत ठरले. दोन्ही महायुद्धात प्रचंड प्रमाणात मनुष्यहानी, आर्थिकहानी झाली. मानवजातीचा समूळ विनाश करणार्या विध्वंसकारी अणुबॉम्बचा शोध याच काळात लागला. महायुद्धांतील संहारक अस्त्रांमुळे मानव जात स्तब्ध झाली. जगात पुन्हा महायुद्ध होऊ नये, विध्वंसकारी अणुबॉम्बच्या वापरास निर्बंध घालावा तसेच शांततापूर्ण सहकार्य यासाठी यूनो या जागतिक दर्जाच्या संघटनेची निर्मिती झाली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात इंग्लंडमधील लोकशाही, फे्रंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती, साम्राज्यवाद, राष्ट्रवाद, राष्ट्रसंघ व संयुक्त राष्ट्र संघटना यांची निर्मिती, रशियन राज्यक्रांती, फॅसिझम, नाझीझम, तुर्कस्थानचे आधुनिकीकरण इ. महत्त्वपूर्ण मुद्द्यांचे सविस्तर विवेचन केलेले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48466086723813,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhunik-Yuropcha-Itihas-AD-1780-to-1945_cnvt-1.jpg?v=1771920412"},{"product_id":"भारतवर्ष-खंड-1-2-3-अश्मयुग-ते-इसवी-2000","title":"भारतवर्ष खंड 1, 2, 3 (अश्मयुग ते इसवी 2000)","description":"\u003cp\u003eभारतवर्ष खंड 1 – अश्मयुग ते इसवी 1206\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* प्राचीन भारतीय इतिहास *\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e                ‘भारतवर्ष’, ‘आर्यवर्त’, ‘इंडिया’, ‘हिंद’, ‘हिंदुस्तान’, ‘जम्बुद्विप’ इ. विविध नावांनी आपला देश ओळखला जातो. ओरिसा-कलिंगच्या चेदी वंशातील खारवेलच्या प्रशस्तीपत्रात भूवनेश्वर जवळ असणार्या हाथीगुंफा शिलालेखात भारतवर्षाचा उल्लेख सर्वप्रथम लिखित स्वरूपात मिळतो. प्रस्तुत ग्रंथाची सुरुवात करताना आपण कोण? मानवाचा विकास आणि त्या विकासाच्या अवस्था, भारतातील मानवाच्या सहा वांशिक प्रजाती आणि चार भाषीक समुह यांची नोंद लेखकाने घेतली आहे. त्याचप्रमाणे प्राचीन भारताच्या अभ्यासाची साहित्यीक आणि पुरातत्वीय आणि विदेशी यात्रेकरूंचे वृत्तांत साधन म्हणून नोंदविले आहेत. भारतातील प्रागैतिहासिक काळ, आद्य इतिहासकाळ आणि ऐतिहासिक काळ यांचा वृत्तांत समर्पक शब्दात मांडला आहे. जगातील सर्वात मोठी संस्कृती सिंधु संस्कृतीची नोंद विविध अंगाने शब्दबद्ध केली आहे. पूर्व वैदिक आणि उत्तर वैदिक संस्कृतिची वैशिष्ट्ये, इ.पू. 6 व्या शतकातील जैन आणि बौद्ध धर्म पंथांचा उदय आणि घडलेली प्रबोधनाची चळवळ वाचनीय आहे. संगम साहित्यात लेखक-कवि-रचनाकारांचे योगदान, प्राचीन भारतातील पहिले केंद्रीय साम्राज्य मौर्य सत्ताचा उदय-विस्तार आणि अस्त यांची माहिती एकत्रित वाचकाला मिळते. मौर्योत्तर काळात झालेले बदल गुप्त काळात निर्माण स्थैर्य आणि विकास, कला-साहित्य-स्थापत्य-निर्मिती वैभवशाली राहिली. गुप्तोत्तरकाळात प्रांतीय सत्तांचा झालेला उदय, दक्षिण भारतात आणि उत्तर भारतात झालेले त्रिपक्षीय संघर्ष तसेच पूर्व व आग्नेय आशियाच्या भागात भारतीय संस्कृतीचा झालेला प्रसार आणि प्रचार याची नोंदही जाणीवपूर्वक लेखकाने सिद्धहस्तपणे घेतली आहे. परिशिष्ठात लेखकाने प्राचीन भारतीय सामंतशाही, चित्र आणि मूर्तीकला, विद्याकेंद्रे, संस्कारांची यादी, लिपी, महत्त्वपूर्ण विधाने, राज्य आणि राजधानी, राजवंश, शहरे, शब्दार्थ, घटनाक्रम इ. ची नोंद केली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात प्रकाशित होणारा त्रिखंडात्मक ‘भारतवर्ष’चा इतिहास हा इतिहासाचा विद्यार्थी, स्पर्धा परीक्षातून करिअरचा मार्ग चोखळणार्या अभ्यासकाला निश्चितच दिशा देणारा ग्रंथ आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतवर्ष खंड 2 – इसवी 1206 ते 1818\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* मध्ययुगीन भारतीय इतिहास *\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e                रवींद्रनाथ टागोर ‘भारतवर्ष’ ही एक संपूर्ण भौगोलिक मूर्ती आहे असे मानतात. ओरिसा-कलिंगच्या चेदी वंशातील खारवेलच्या प्रशस्तीपत्रात भूवनेश्वर जवळ असणार्या हाथीगुंफा शिलालेखात भारतवर्षाचा उल्लेख सर्वप्रथम लिखित स्वरूपात मिळतो. प्रस्तुत ग्रंथाची सुरुवात करताना इ.स. 1206-1818 या 612 वर्षाच्या कालखंडाची मांडणी लेखकाने इस्लाम धर्माचा उदय आणि तुर्क आक्रमणे नोंदवून केली आहे. सुलतानशाही आणि मोगल सत्ता यांनी मध्ययुगीन कालखंडात भाषा, साहित्य, कला, स्थापत्य, संस्कृति, प्रशासन, आहारविहार यांना नवीन आयाम दिले. मध्यकाळात सुफी आणि भक्तिचळवळीच्या झालेल्या उदयाने संस्कृति समन्वयच नव्हे तर भारतवर्षाच्या सर्व धर्म, पंथ, जात, व्यवहार यांना एकसंघत्वाच्या विचाराने पूढे जाण्याचा मार्ग दाखविला. मध्ययुगीन कालखंडात दिल्ली-मध्य भारत हे सत्तेचे केंद्र राहिले. अल्लाउद्दीन खिलजीचे दक्षिणेतील आक्रमण आणि मुहम्मद तुघलकाद्वारा देवगिरी हे बनलेले राजधानी केंद्र या दोन घटकांतूनच दक्षिणेच्या मध्ययुगीन कालखंडाची सुरुवात झाली. बहामनी आणि विजयनगर साम्राज्याचा झालेला उदय याचीच परिनीति आहे. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, बरिदशाही आणि ईमादशाही यांच्या परस्परांच्या संघर्षात मराठा सरदारांचा-घराण्यांचा सर्वात मोठा सहभाग होता. नव्हे तर या सत्ता म्हणजेच मराठा सरदार आणि घराण्यांचे कार्य आणि कर्तृत्व होय. मुघलांच्या सत्तांचा काळ हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि ताराराणी यांचा समकालीन काळ होता. याच काळात पाश्चिमात्यांचे भारतात आगमन झाले. मराठा सत्तेचा शेवट केल्यानंतर ब्रिटिशांनी भारत ताब्यात घेतला. मध्ययुगीन काळातील शब्दांचे अर्थ परिशिष्ठात दिले आहेत. सचित्र मांडणी, बल्बन, अल्लाउद्दीन खिलजी, फिरोज तुघलक, शेरशाह सुरी आणि सम्राट अकबराच्या काळातील लेखकाने नोंदविलेल्या सुधारणा आणि योग्य ठिकाणी केलेली तुलनात्मक मांडणी हे ग्रंथाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात नवोदित लेखकाकडून प्रकाशित होणारा त्रिखंडात्मक ‘भारतवर्ष’चा इतिहास इतिहासाचा विद्यार्थी, स्पर्धा परीक्षातून करिअरचा मार्ग चोखळणार्या अभ्यासकाला निश्चितच दिशा देणारा ग्रंथ आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतवर्ष खंड 3 – इसवी 1818 ते 2000\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* आधुनिक भारतीय इतिहास *\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e                रॉबर्ट क्लाईव्हच्या प्रशासकीय व्यवस्था ते मराठा साम्राज्याचा अस्त हा कालखंड कंपनीच्या वर्चस्वासाठी सर्वात महत्त्वाचा होता. ब्रिटिशांच्या धोरणाचा हस्त, लघु आणि कृषीउद्योग यावर विपरीत परिणाम झाला. भारतीय जनता आणि संस्थानिक शासक यांची कंपनीच्या विरोधातील सार्वत्रिक प्रतिक्रिया म्हणजे 1857 चा स्वातंत्र्यलढा. 1857 च्या तदपूर्वी बहुभागात आदिवासी, कृषक इ. चे लढे अत्यंत महत्त्वूपर्ण राहिले. भारतात लागू नियमित कायदा, पीट्स अॅक्टचा प्रयत्न, 1793 ते 1853 पर्यंतचे 4 चार्टर अॅक्ट्स, 1858 ते 1935 पर्यंतच्या संघराज्य कायद्याची समर्पक संवैधानिक शब्दात मांडणी लिखाणात आहे. समाज प्रबोधन आणि प्रबोधनकार यांचे प्रयत्न, स्थानिक सत्ताधिशांनी कंपनी सरकार आणि ब्रिटिश सरकारचे झालेले संघर्ष, शेजारी राष्ट्रांशी असणारी ब्रिटिशांची धोरणे यांचे एकच सुत्र होते ते म्हणजे व्यापारवादातून साम्राज्यवाद. भारतातील वृत्तपत्रे, शिक्षण, प्रशासन, कायदे, गव्हर्नर जनरल आणि व्हाईसराय यांची नोंददेखील या ग्रंथात आहे. स्वातंत्र्य चळवळीतील संघटना, संस्था, व्यक्ति, पक्ष-मवाळ-जहाल, म. गांधीवादी आणि क्रांतीकारक विचारधाराद्वारा घडलेला घटनाक्रम हा संघर्षशील होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संस्थानिकांचे प्रश्न, जातीय दंगली-हिंसा, राज्यघटनेची निर्मिती, भाषावार प्रांतरचना, गोवा मुक्तिलढा, सार्वत्रिक निवडणूका या घटनांतून भारतीय लोकशाहीचा विकास घडत गेला. राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी बहुसांस्कृतिक भारतीय लोकशाहीला समृद्ध केले. उदयमुख भारताने केलेली शिक्षण, व्यवसाय, क्रीडा, मनोरंजन, इतिहास, साहित्य इ. क्षेत्रातील प्रगतीचाही उल्लेख प्रस्तुत ग्र्रंथात सविस्तररित्या नोंदविला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात नवोदित लेखकाकडून प्रकाशित होणारा त्रिखंडात्मक ‘भारतवर्ष’चा इतिहास हा इतिहासाचा विद्यार्थी, स्पर्धा परीक्षातून करिअरचा मार्ग चोखळणार्या अभ्यासकाला निश्चितच दिशा देणारा ग्रंथ आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470346531045,"sku":null,"price":1515.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatavarsha-Khand-1-2-3_Prof-Shivaraj-Chavhan-1.jpg?v=1772002006"},{"product_id":"आधुनिक-भारताचा-इतिहास-1857-ते-1950","title":"आधुनिक भारताचा इतिहास (1857 ते 1950)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारताच्या घटनात्मक विकासाला ब्रिटिश काळातच सुरूवात झाली होती. ब्रिटिशांनी क्रमाक्रमाने भारतीयांना राजकीय हक्क बहाल केले. त्याची सुरूवात 1990 च्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याने आधीच झाली होती. या कायद्यांना राजकीय सुधारणांचे हप्ते असेही म्हटले जाते. मोर्लेे-मिंटो कायद्यानंतरचा टप्पा म्हणजे 1919 चा माँटेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा होय. भारतातील ब्रिटिश राजवटीच्या प्रस्थापनेबरोबर भारतीयांच्या आर्थिक शोषणाला प्रारंभ झाला. भारतीय समाजसुधारकांनी भारतीयांमध्ये विवेकवाद, वैज्ञानिकता, उदारमतवाद, व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही या आधुनिक कल्पना रुजविण्यास प्रारंभ केला. 1942 च्या चले जाव चळवळीने भारतीयांमध्ये मोठे चैतन्य निर्माण केले. सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या अचाट कार्याने ब्रिटिशांच्या भारतातील सत्तेला सुरुंग लागला. पिंरणामी संपूर्ण स्वातंत्र्याकडे भारताची वेगाने वाटचाल सुरु झाली. स्वातंत्र्यानंतर भारताची फाळणी आणि पाकिस्तानचा जन्म ही भारतीय राजकारणातील क्लेशदायी आणि विवादास्पद घटना ठरली.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473849528549,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhunik-Bhartacha-Itihas-N-1.jpg?v=1772087631"},{"product_id":"आधुनिक-भारताचा-इतिहास-सन-1757-ते-1857","title":"आधुनिक भारताचा इतिहास (सन 1757 ते 1857)","description":"\u003cp\u003eआधुनिक भारताचा हा कालखंड अनेक स्थित्यंतरे व प्रचंड उलथापालथीचा होता. या कालखंडात राजकीय, सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय, सांस्कृतिक, वैचारिक बदल घडून आलेत या बदलाचे भारताच्या राजकीय पटलावर जे परिणाम झालेत ते दूरगामी स्वरुपाचे दिसून येतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअठराव्या शतकाच्या मध्यापासून ते 1857 पर्यंत भारतात इंग्रजी सत्तेची पायाभरणी झाली. ही परकीय राजसत्ता कशी प्रस्थापित झाली व कशी दृढमूल झाली याची माहिती घेण्याच्या दृष्टीने आवश्यक ते इंग्रजी शासनाचा तपशील दिला आहे. या कालावधीत एकीकडे इंग्रज साम्राज्यवादी सत्तेची मुठ हिंदुस्थान भोवती आवळत गेले, तर दुसरीकडे भारतात आधुनिक मूल्ये रुजू लागली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसन 1757 ते 1857 हा काळ आधुनिक भारताच्या इतिहासात महत्त्वपूर्ण आहे. भारतीयांचा परकीयांशी आलेला संबंध त्यांनी केलेले आर्थिक शोषण, त्याच बरोबर भारतात प्रबोधनाच्या दृष्टीने आधुनिक पर्वास झालेला प्रारंभ याचा या ग्रंथात साकल्याने विचार केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473870598373,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhunik-Bhartach-Itihas-1757-to-1857K-1.jpg?v=1772087982"},{"product_id":"आधुनिक-भारताचा-इतिहास","title":"आधुनिक भारताचा इतिहास (History of Modern India)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473880101093,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/ADHUNIK-BHARTACHA-ITIHAS-1.jpg?v=1772088174"},{"product_id":"आधुनिक-भारताचा-इतिहास-1858-1947","title":"आधुनिक भारताचा इतिहास (1858 – 1947) (History of Modern India (1858 - 1947))","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात व्यापाराच्या निमित्ताने प्रवेश केला असला तरी येथील अराजकतेचा फायदा घेऊन कंपनीने आपले राज्य स्थापन केले. कंपनीने भारत देशाचे आर्थिक शोषण सुरु केले. परंतु पुढे भारतीय लोकांमध्ये सामाजिक, राजकीय व आर्थिक जागृती झाली. यामधुनच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाली. यापूर्वीच इ.स. 1858 मध्ये भारतावरील कंपनीची सत्ता संपुष्टात येऊन व येथे ब्रिटनची सत्ता स्थापन झाली होती. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सरकारच्या विरोधात आंदोलन केले. याच आंदोनालात क्रांतिकारक व स्त्रियानीही महत्त्वाचे योगदान दिले. शेतकरी व आदिवासी लोकांनी केलेले उठाव व केलेल्या चळवळी सुद्धा महत्त्वाच्या ठरतात. संस्थानातील जनतेनेही प्रतिगामी राजवटींच्या विरोधात चळवळी केलया होत्या. राष्ट्रीय चळवळीपासून मुस्लिम लीग दूर राहीली. यामधूनच पुढे पाकिस्तान या स्वतंत्र देशाची निर्मिती झाली. इ.स. 1858 पासून इ.स. 1947 पर्यंतचा भारताचा इतिहास प्रस्तुत ग्रंथात दिला असून हा ग्रंथ विविध स्पर्धा परिक्षा, एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी. व विविध विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ ठरणार आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474268172517,"sku":null,"price":475.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhunik-bhartacha-itihas-1857-1947-1.jpg?v=1772094235"},{"product_id":"आधुनिक-भारताचा-इतिहास-1757-ते-1857","title":"आधुनिक भारताचा इतिहास (1757 ते 1857)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपूर्वेकडील राष्ट्रांशी व्यापार करण्यासाठी इ.स. 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. त्यामुळे त्याचवर्षी व्यापाराच्या निमित्ताने ईस्ट इंडिया कंपनीने भारतात प्रवेश केला आणि व्यापाराच्या क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण केले. या काळात भारतात अनेक लहान-लहान राजवटी होत्या. त्यांच्यात परस्परात नेहमी संघर्ष होत असत. यामधूनच राजकीय अस्थिरता निर्माण झाली. याच अस्थिरतेचा फायदा घेऊन कंपनीने भारतात इ.स. 1757 मध्ये सत्ता स्थापन केली. इ.स. 1858 पर्यंत कंपनीने भारतावर राज्य केले. याच वर्षी कंपनीची भारतातील सत्ता संपुष्टात येऊन ती ब्रिटिश राजसत्तेच्या ताब्यात गेली. प्रस्तुत ग्रंथात कंपनीच्या राजवटीच्या काळातील भारताचा राजकीय, सामाजिक, धार्मिक व प्रशासकीय इतिहास देण्यात आला आहे. त्यामुळे हा ग्रंथ विद्यापीठ पातळीवरील परीक्षा, सेट, नेट, MPSC, UPSC व सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474288947429,"sku":null,"price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aadhunik-Bharati-Ithihas-1757-1857-1.jpg?v=1772094441"},{"product_id":"भारताचा-इतिहास-इ-स-1757-ते-1947","title":"भारताचा इतिहास (इ.स. 1757 ते 1947) (History of India (1757 A.D. - 1947 A.D.))","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने इ.स.1757 मध्ये प्रथम बंगाल प्रांतात सत्तेचा पाया घातला. पुढे हळूहळू संपूर्ण भारत देशावर आपली सत्ता स्थापन केली. इ.स.1857 मध्ये भारतीयांनी कंपनी सरकारच्या विरोधात उठाव केला. त्यामुळे भारतात कंपनीची सत्ता संपुष्टात आली व त्याठिकाणी ब्रिटिश सम्राटाची सत्ता आली. ब्रिटिश सरकारने इ.स. 1947 पर्यंत भारतावर राज्य केले. या कालखंडात भारताची भौतिक प्रगती झाली असली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषणही झाले. परिणामी क्रांतिकारकांनी क्रांतिकारी चळवळ करून आणि जनतेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढा देऊन भारत देशाला ब्रिटनच्या राजकीय वर्चस्वातून मुक्त केले. याच काळात भारतात सामाजिक व धार्मिक चळवळीही झाल्या. या सर्व घटकांचा इतिहास या ग्रंथात दिला असून हा ग्रंथ विद्यापीठ स्तरावरील परिक्षा, नेट, सेट व तत्सम स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479682265317,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartacha-Itihas-1757-1947_cnvt-1.jpg?v=1772253612"},{"product_id":"भारताचा-इतिहास-इ-स-1857-इ-स-1950","title":"भारताचा इतिहास (इ. स. 1857 – इ. स. 1950)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसन 1857 ते 1950 या कालखंडातील भारताचा इतिहास हा राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीबरोबरच सामाजिक, धार्मिक सुधारणा चळवळी आणि अनेक घटकांच्या अस्तित्वाच्या जागृतीचा, प्रतिउत्तराने व्यापलेला इतिहास आहे. भारतातील सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळीचा प्रारंभ होऊन विविध धार्मिक सामाजिक चळवळीत विविध संघटनांचा उदय झाला. राष्ट्रीय सभेच्या आत्मभानातून स्वदेशी चळवळीने राजकिय, आर्थिक भूमिका बजावली. स्वातंत्र्याच्या लढ्यात सशस्त्र क्रांतीकारी आंदोलनाची लाट ब्रिटीशांच्या धोरणास प्रतिउत्तर देण्यास उदयास आली. इंडियन नॅशनल आर्मीच्या लढ्याने ब्रिटीश प्रशासनास हादरा बसला. भारताच्या इतिहासात अतिजहाल सांप्रदायिकतेची विचार प्रणाली उदयास आली. त्यामुळे मुस्लिम लीग, हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका इतिहासात नोंद करुन गेली. फाळणीच्या दु:खाबरोबरच भारतीयांना स्वातंत्र्याची प्राप्ती झाली. त्या स्वातंत्र्यास अबाधित ठेवण्याच्या प्रयत्नातील भारतीय संविधानाची निर्मिती इत्यादींचीही माहितीसोबतच याची जाणीवही विद्यार्थ्यांस व्हावी त्यासाठीच हे ग्रंथलेखन.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479682396389,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatacha-Etihas-1857-1950_Aananda-Kalbhande_cnvt-1.jpg?v=1772253718"},{"product_id":"भारताचा-इतिहास-1857-ते-1950","title":"भारताचा इतिहास (1857 ते 1950) (History of India (1857 to 1950))","description":"\u003cp\u003eहिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेक घटकांचे योगदान होते. स्वातंत्र्य चळवळ निर्माण करण्याची पार्श्वभूमी अनेकांच्या प्रयत्नातून निर्माण झाली. अनेक व्यक्ती आणि संस्था यांचे योगदान ही पार्श्वभूमी तयार करण्यासाठी कारणीभूत झाले. या दृष्टीने एकोणिसावे शतक हे महत्त्वाचे मानतात. या शतकात भारतात सामाजिक आणि धार्मिक चळवळी झाल्या. या दृष्टीने भारताच्या इतिहासातील एकोणिसावे शतक हे प्रबोधनाचे शतक मानले जाते. या काळात भारतात मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि बौद्धिक जागृती घडून आली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदरील पुस्तकात सामाजिक व धार्मिक चळवळी, भारतीय राष्ट्रवाद, राष्ट्रवाद आणि सामाजिक गट अंर्तप्रवाह, कामगार संघटना, प्रांतीय स्वायत्तता, जमातवादाचा उदय आणि विकास, स्वातंत्र्य आणि भारताची फाळणी या सर्व घटकांची विस्तृत व सविस्तर माहिती देण्याच्या प्रयत्न केला आहे.c\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479682658533,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatacha-Itihas-1857-to-1950.jpg?v=1772253795"},{"product_id":"भारतीय-स्वातंत्र्य-आंदोलन-आणि-सामाजिक-परिवर्तनाचा-इतिहास","title":"भारतीय स्वातंत्र्य आंदोलन आणि सामाजिक परिवर्तनाचा इतिहास","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राचीन काळी आशिया व युरोप यांच्यातील व्यापार प्रामुख्याने भूार्गे चालत असे. हिंदुस्थानवर सर्वात प्रथम आक्रमण पर्शियन साम्राज्याचे झाले. बलुचिस्तान, वायव्य सरहद्द प्रांत, सिंध, पंजाबचा काही भाग हे पर्शियन साम्राज्यात समाविष्ट झाले होते. त्यानंतर अलेक्झांडरने आक्रमण करून हिंदुस्थानचा काही भाग आपल्या साम्राज्याला जोडला. पुढे शक, हुण, कुशाण, तुर्क आणि मोगल अशा अनेकांची आक्रमणे येथे झाली. 15 व्या शतकात युरोपमध्ये प्रबोधनास प्रारंभ झाला. प्रबोधनामुळे धर्मसत्तेचे जोखड झुगारून देण्याची प्रक्रिया सुरू झाली. मुक्त समाजव्यवस्था निर्माण झाली. सर्वप्रथम वास्को-द-गामा हा पोर्तुगीज खलाशी इ.स. 1498 मध्ये भारतात आला. त्यापाठोपाठ पाश्चात्य प्रवासी व व्यापार्याकरीता व्यापारी कंपन्यांचा ओघ सुरू झाला. या प्रयत्नात पोर्तुगाल,स्पेन, स्वीडन, फ्रान्स, इंग्लंड, हॉलंड इ. राष्ट्रे आघाडीवर होती. भारतातील गोंधळाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन सत्ता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात अखेर इंग्रजांना यश आले. इंग्रजांची राजवट अन्यायी, अत्याचारी, जुलूमी होती. इंग्रजांनी राज्य करण्यासाठी त्यांच्या हितासाठी अनेक सोयीसुविधा निर्माण केल्यात. इंग्रजी शिक्षणाचे द्वार भारतीयांना खुले केले. परिणामी भारतीयांना पाश्चात्य ज्ञान मिळून भारत पारतंत्र्यात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. भारतीयांनी आपापल्या परिने स्वातंत्र्यलढा सुरू केला. सामाजिक व राजकीय लढे देखील सुरू झाले. सरतेशेवटी ब्रिटीशांच्या जुलूमी सत्तेचा शेवट होऊन भारत स्वतंत्र झाला.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479682822373,"sku":null,"price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiy-Swatantrya-Andolan-ani-Samajik-Privartanacha-Ithihas_cnvt-1.jpg?v=1772253876"},{"product_id":"भारतीय-स्वातंत्र्य-चळवळीचा-इतिहास-इ-स-1857-ते-1951","title":"भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (इ.स. 1857 ते 1950) (History of Indian Independence Movement (1857 to 1950))","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e15 व्या शतकात युरोपमध्ये प्रबोधनास प्रारंभ झाला. वास्को-द-गामा याने नव्या जलमार्गाचा शोध लावल्याने अनेक पाश्चात्त्य राष्ट्रांनी भारताशी व्यापारी संबंध निर्माण केले. तद्नंतर ते सत्तास्पर्धेत उतरले; यात इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, डचांचा समावेश होता. ब्रिटीशांनी कट कारस्थान करुन प्लासीची लढाई जिंकून ब्रिटीश सत्तेची पायाभरणी केली. 1857 मध्ये भारतीयांनी बंडाचे निशाण फडकावून अन्यायी, अत्याचारी ब्रिटीशांविरुद्ध स्वातंत्र्य युद्ध पुकारले. इंग्रजांनी फोडा आणि झोडा या अनितीचा अवलंब केला. राजा राममोहन रॉय, महात्मा फुले यांनी अनेक सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक सुधारणा केल्या. 1905 ते 1920 या कालखंडात काँग्रेसमधील जहाल गटाचे नेतृत्व लाल, बाल व पाल या त्रिमूर्तींनी केले. टिळकयुगानंतर महात्मा गांधींकडे काँग्रेसचे नेतृत्व आले. भगतसिंग, सुखदेव व राजगुरु या देशभक्तांना फाशी दिल्याने तरुणवर्ग असंतुष्ट झाला. अनेक क्रांतिकारकांनी प्राणाहुती दिली. दुसर्या जागतिक महायुद्धास सुरुवात झाली. सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद फौज स्वातंत्र्यासाठी त्वेषाने लढू लागली. म. गांधींनी चले जाव चळवळीस प्रारंभ केला. जागतिक महासत्ता म्हणून अमरिकेचा उदय, प्रतिकूल जागतिक जनमत, इंग्लंडची खालावलेली परिस्थिती, आझाद हिंद फौज, चले जाव चळवळ व भारतीयांचे राष्ट्रप्रेम यामुळे ब्रिटीशांना भारत सोडणे भाग पडले. खंडित भारताची निर्मिती करतांना अखंड भारतास ग्रहण लावले. सरदार पटेलांनी संस्थानिकांचा प्रश्न सोडवून तर डॉ. आंबेडकरांनी राज्यघटना लिहून स्वतंत्र व प्रगतीशील भारताचा प्रवास सुकर केला.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479683150053,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Swatantrya-Chalwalicha-Itihas-1.jpg?v=1772253970"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/%e0%a4%86%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95.oembed?page=2","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}