{"title":"काव्यसंग्रह","description":"","products":[{"product_id":"घर-वावर","title":"घर वावर","description":"\u003cp\u003e‘घरवावर’ना हाऊ बहर फक्त महाराष्ट्रनी मातीम्हा दरवळी आसं नहीसे, तर आहिरानी भाषाना मानूस जगम्हा जठे कोठे व्हई तठे-तठे हाऊ आस्सल मातीना सुगंध दरवळनार से. कवी\/साहित्यिक आनी आहिरानी भाषाना सेवक कार्यकर्ता म्हनीसन मी प्रा.डॉ.सदाशिव सुर्यवंशी यास्नाकडे देखस. सुर्यवंशी सुर्यना वंशज शेतस तं जगभर उजेड पडीन ना!\u003cbr\u003eगाव शिवनी कथा सांगस सदाभाऊ\u003cbr\u003eघर वावरनं दु:ख मांडस सदाभाऊ\u003cbr\u003eकवी सदाशिव सुर्यवंशी येस्ले कवितास्नं पूर्न भान से. त्यास्ना जगाम्हाच एक न्यारी धून से, तिले लय से, ताल से आनी पक्का सूर से. कवितास्ना विविधांगी प्रकारले त्यास्नी असा काही तऱ्हे बांधेल से जसा पैठनीना कसदार कलावंत पैठनीमा आपली कला उतरावस आसं वाटत ऱ्हास की, त्या पैठनीमधला मोर आपला घरना ओटावरच नाची ऱ्हायनात. कवी.सदाशिव सुर्यवंशी यास्नी ‘घर वावरनी’ हायी कविता काळीजमा नाचस आनी डोयामा साचस. मना लाडका धाकला भाऊ सदाले काळीजभर शुभेच्छा देस आनी संपूर्न संस्कृतीना पट लिखाबद्दल विनम्र सलाम करस!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– लोककवी प्रशांत मोरे\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eमुंबई\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477955817701,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Ghar-Vavar_Dr-Sadashiv-Suryawanshi_cnvt-1.jpg?v=1772196465"},{"product_id":"गावांजली","title":"गावांजली","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रा. डॉ. ज्ञानेेश्वर शिवाजी सूर्यवंशी (1 जून 1969) मूळचे मुडी प्र डा., ता.अमळनेर, जि.जळगांव, महाराष्ट्र येथील रहिवासी असून सध्या ते विद्यावर्धिनी महाविद्यालयात भूगोलशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा 24 वर्षे शिकविण्याचा, 20 वर्षे संशोधनाचा, 17 वर्षे प्रशासकीय अनुभव आहे. त्यांनी 2002 मध्ये क.ब.चौ.उ.म.वि., जळगांव कडून आदिवासींचे आरोग्य भूगोलशास्त्र विषयात पीएच.डी. प्राप्त केली. नोव्हेंबर 2016 ते ऑगस्ट 2019 पर्यंत ते विद्यावर्धिनी महाविद्यालयात प्राचार्य पदावर कार्यरत होते. त्यापूर्वी डिसेंबर 2015 ते ऑक्टोबर 2016 पर्यंत ते क.ब.चौ.उ.म.वि., जळगांवच्या आजीवन शिक्षण मंडळाचे संचालक होते. त्यांना भारतीय प्रगत अध्ययन संस्था, शिमला कडून 2009-11 ची शिष्यवृत्ती प्राप्त होती. तसेच भारतीय दूरस्थ संवेदन संस्था, डेहराडून मध्ये 2006 ला त्यांनी प्रशिक्षण घेतले. आतापर्यंत त्यांनी 10 संशोधन प्रकल्प विविध संस्थांना सादर केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली 17 विद्यार्थीनी पीएच.डी. व एम.फील. पूर्ण केले आहे. लेखन व संपादनात त्यांनी 187 पेक्षा अधिक संदर्भ ग्रंथ, संपादित पुस्तके व नियतकालिके, पुस्तके, संशोधनात्मक लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध केले आहेत. सुमारे 16 पेक्षा अधिक परिषदा, चर्चासत्र, कार्यशाळाचे आयोजन त्यांनी केले आहे. द.कोरिया, मलेशिया, श्रीलंका येथील परिषदांमध्ये त्यांनी सादरीकरण केले आहे. डॉ. सूर्यवंशी हे क.ब.चौ.उ.म.वि. च्या अधिसभा व व्यवस्थापन परिषद सदस्य (2016-19) होते. तसेच ते भूगोल अभ्यास मंडळ व विज्ञान विद्याशाखा सदस्य म्हणून 10 वर्षे कार्यरत होते. त्यांना दिव्य मराठीचा ‘आदर्श शिक्षक’ (2020), क.ब.चौ.उ.म.वि. चा ‘उत्कृष्ट प्राचार्य’ (2017), अमेरिकन विज्ञान संस्थेकडून ‘प्रवास अनुदान’ (2013), म.भू.प., पुणेचा ‘तरुण भूगोलतज्ज्ञ’ (2012), भारतीय सामाजिक संस्था, नवी दिल्ली कडून ‘तरुण सामाजिक शास्त्रज्ञ’ (2011), क.ब.चौ.उ.म.वि. कडून उत्कृष्ट ‘रासेयो कार्यक्रम अधिकारी’ (2008) यासारखे पुरस्कार प्राप्त आहेत. ते अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय भूगोल संस्थाचे आजीव सभासद असून कार्यकारिणी सदस्य आहेत.शोशत विकास, अधिवासीचे आरोग्य व भूऔषधशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय असून सामाजिक चळवळीत त्यांनी दायित्व दिले आहे. अलीकडे त्यांनी ‘काव्यांजली’ व ‘निसर्गावली’ हे काव्यसंग्रह प्रकाशित केले आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479736037605,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Gavajali-Kavyasangrah_Dr-Dnyaneshwar-Suryawanshi_cnvt-1.jpg?v=1772261074"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b9.oembed","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}