{"title":"भारताचे संविधान \/ शासन आणि राजकारण","description":"","products":[{"product_id":"भारतीय-शासन-आणि-राजकारण-खंड-1-2","title":"भारतीय शासन आणि राजकारण (खंड 1 \u0026 2)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारताच्या राजकारणाचे गतिशील स्वरूप लक्षात घेवून भारताच्या घटनाक्रमात, घडामोडीत झालेल्या बदलाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण प्रस्तुत पुस्तकात करण्यात आले आहे. प्रस्तुत पुस्तकात भारतीय संविधानाच्या मुलभूत संरचनेला आधार मानून भारतीय राजकारणाचे व्यावहारिक अध्ययन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारताचा सांविधानिक इतिहास, भारतीय संविधानाची निर्मिती, प्रस्तावना, नीतिनिर्देशक तत्त्वे, मुलभूत अधिकार व कर्तव्ये, भारताची संघराज्यात्मक व्यवस्था केंद्र व राज्य संबंध व त्यांच्यातील तणावग्रस्त क्षेत्र, केंद्रीय कार्यकारीमंडळ, केंद्रीय विधिमंडळ, भारताची न्यायव्यवस्था व व सर्वोच्च न्यायालय, जनहितवाद व न्यायालयीन सक्रियतावाद, संविधान दुरुस्तीची प्रक्रिया, राज्याचे कार्यकारी मंडळ, राज्याचे विधिमंडळ, उच्च न्यायालय, भारतात संसदीय शासनव्यवस्थेचा इतिहास व गुणदोष, भारतातील पक्षव्यवस्था, प्रादेशिक पक्ष व्यवस्था, भारताच्या राजकारणात विरोधी पक्षाची भूमिका, भारतातील निर्वाचन व्यवस्था, निर्वाचन मंडळ, निर्वाचन व्यवस्थेचे दोष, निवडणूक सुधारणा, भारताच्या राजकारणात जातीयतेची, धर्माची, वर्गाची, सांप्रदायिकतेची व वांशिकतची भूमिका, भारताच्या राजकारणावर प्रादेशिकतेचा प्रभाव, भारतातील आरक्षणाचे राजकारण, भारतातील मागास वर्गाचे व भारतातील अल्पसंख्याकाचे राजकारण, भारतातील आतंकवादाचे राजकारण, भारतातील राजकीय गुन्हेगारीकरण, भारतातील पक्ष बदलाचे राजकारण, भारतातील आघाडीचे राजकारण, भारतातील लिंग भेदभावाचे राजकारण, भारतीय राजकारणातील भ्रष्टाचार, भारतातील दबावगट, भारतातील सामाजिक चळवळी, भारतातील नियोजित विकासाचे राजकारण, भारतातील विविध आयोग व संस्था, भारतातील पंचायतराज व्यवस्था व समस्या याचे अद्ययावत व सविस्तर विश्लेषण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतीय राजकारणाच्या स्वरूपाची अनुभवाधिष्ठित व्यावहारिक व सैद्धांतिक बाजू मांडण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48400038068453,"sku":null,"price":1499.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Shasan-Ani-Rajkaran_Dr-Arun-Wanarse_cnvt-1-198x300.jpg?v=1770883714"},{"product_id":"तुलनात्मक-शासन-आणि-राजकारण-ब्रिटन-अमेरिका-आणि-चीन","title":"तुलनात्मक शासन आणि राजकारण (ब्रिटन, अमेरिका आणि चीन)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eतुलनात्मक राज्यशास्त्राच्या अभ्यासामुळे आपल्या देशातील, देशाच्या बाहेरील तसेच आंतरराष्ट्रीय राजकारण व राजकीय व्यवहार या संदर्भातील माहिती प्राप्त होण्यास मदत होते. म्हणूनच आजपर्यंत सरकार आणि शासनसंस्थांच्या अभ्यासात तुलनांचा शोध केंद्र-बिंदू राहिला आहे, तसेच शासनाच्या शास्त्रीय आणि वैज्ञानिक अभ्यासाकरिता तुलनात्मक राज्यशास्त्र आधारस्तंभ आहे. तुलनात्मक राज्यशास्त्रीय अभ्यास राज्यशास्त्राला अधिक वैज्ञानिक बनविण्यास कारणीभूत ठरला आहे. प्रत्यक्षात राज्यशास्त्राला विज्ञानाच्या वर्गवारीत आणण्यासाठी तुलनात्मक अभ्यासच आधार ठरला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eब्रिटन, अमेरिका आणि चीन या देशातील ‘शासन आणि राजकारणाचा तुलनात्मक अभ्यास’ या पुस्तकात करण्यात आला आहे. या तीनही देशातील शासन आणि राजकारणाची अद्ययावत माहिती प्रस्तुत पुस्तकात देण्याचा प्रयत्न केला आहे. याआधारे ब्रिटन, अमेरिका आणि चीनच्या राजकारणाची दिशा अभ्यासकांच्या लक्षात येईल. नवीन अभ्यासक्रमानुसार एक दर्जेदार अद्ययावत क्रमिक पुस्तक अध्यापकांना आणि अध्ययनकर्त्यांना उपलब्ध करुन द्यावे, हेच हे पुस्तक लिहिण्याचे मुख्य प्रयोजन आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48400183656677,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Tulanatmak-Shasan-Ani-Rajkaran_Prof-Dr-Shriram-Yerankar_cnvt-1-198x300.jpg?v=1770884603"},{"product_id":"भारतीय-राज्यघटना-भाग-1","title":"भारतीय राज्यघटना (भाग 1)","description":"\u003cp\u003eभारतीय राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वी भारतात 100 – 125 वर्षे ब्रिटिशांचे अधिराज्य होते. सन 1857 च्या स्वातंत्र्य-युद्धापासून 1947 पर्यंत भारतीयांना ब्रिटिश सत्तेशी संघर्ष करावा लागला. या स्वातंत्र्य लढ्याची एक प्रदीर्घ परंपरा भारताला लाभलेली आहे. भारताची आज जी प्रचलित राज्यघटना आहे तिच्यावर ब्रिटिश राजवटीचा प्रभाव पडलेला दिसतो. ब्रिटिश राजवटीत जे विविध स्वरूपाचे कायदे, प्रशासकीय कायदे, योजना व सुधारणा निर्माण करण्यात आल्या त्यांचा प्रभाव भारतीय संविधानावर झालेला दिसतो. 26 नोहेंबर 1949 रोजी स्वतंत्र भारताच्या घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. या घटनेवरही भारताच्या आधुनिक इतिहासाचा परिणाम अपरिहार्यपणे घडून आला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुत ग्रंथ हा युजीसी पॅटर्नचा अवलंब करून तयार करण्यात आला. ग्रंथाची भाषा सहज समजेल अशी आहे. ग्रंथात अनेक मुद्यांचा उहापोह करण्यात आलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474894270693,"sku":null,"price":550.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiya-Rajghatna-1_cnvt-1.jpg?v=1772110368"},{"product_id":"भारतीय-राज्यघटना-भाग-2","title":"भारतीय राज्यघटना (भाग 2)","description":"\u003cp\u003eभारतीय राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वी भारतात 100 – 125 वर्षे ब्रिटिशांचे अधिराज्य होते. सन 1857 च्या स्वातंत्र्य-युद्धापासून 1947 पर्यंत भारतीयांना ब्रिटिश सत्तेशी संघर्ष करावा लागला. या स्वातंत्र्य लढ्याची एक प्रदीर्घ परंपरा भारताला लाभलेली आहे. भारताची आज जी प्रचलित राज्यघटना आहे तिच्यावर ब्रिटिश राजवटीचा प्रभाव पडलेला दिसतो. ब्रिटिश राजवटीत जे विविध स्वरूपाचे कायदे, प्रशासकीय कायदे, योजना व सुधारणा निर्माण करण्यात आल्या त्यांचा प्रभाव भारतीय संविधानावर झालेला दिसतो. 26 नोहेंबर 1949 रोजी स्वतंत्र भारताच्या घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. या घटनेवरही भारताच्या आधुनिक इतिहासाचा परिणाम अपरिहार्यपणे घडून आला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुत ग्रंथ हा युजीसी पॅटर्नचा अवलंब करून तयार करण्यात आला. ग्रंथाची भाषा सहज समजेल अशी आहे. ग्रंथात अनेक मुद्यांचा उहापोह करण्यात आलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474901709029,"sku":null,"price":550.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiya-Rajghatna-2_cnvt-1.jpg?v=1772110510"},{"product_id":"indian-government-and-politics","title":"Indian Government and Politics","description":"\u003cp\u003eThis foreword to the\u003cbr\u003eforthcoming book entitled “Indian Government And Politics”\u003cbr\u003ewritten by Dr. Lodhi Kaniz Fatma Niyaz Ahmed and Dr. Salma\u003cbr\u003eAb. Sattar. We offer congratulation to them for writing on this\u003cbr\u003esubject and helping the students to understand the immediate\u003cbr\u003epolitical reality around them. We have learnt that University\u003cbr\u003eof Pune has now prescribed a paper on Indian Government\u003cbr\u003eand Politics. There are many books which deal with the topics\u003cbr\u003erelated to the paper but the present volume has been written\u003cbr\u003ein keeping students in mind. The book is written in a very\u003cbr\u003esimple and lucid language especially for the students of Political\u003cbr\u003eScience but it will be useful and followed easily by the persons\u003cbr\u003ewho do not know about the theme and want to understand\u003cbr\u003eabout Indian Government and Politics. A reader can visualize\u003cbr\u003ethe foresight of the authors as one goes through the pages.\u003cbr\u003eThe chapters are analytical, descriptive, explorative and\u003cbr\u003ecomparative.\u003cbr\u003eThe Book will serve more than ever an indispensable\u003cbr\u003etool for the students, teachers, professionals, analyst and policy\u003cbr\u003e–makers. It has been systematically structured and updated in\u003cbr\u003ethe accessible down-to-earth style that will make it popular\u003cbr\u003eamong the readers. We extend our warm wishes for the huge\u003cbr\u003eresponse of the readers for this meaningful and useful book.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474907345125,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Indian-Government-and-Politics-1.jpg?v=1772110645"},{"product_id":"भारतीय-संविधानाची-ओळख","title":"भारतीय संविधानाची ओळख","description":"\u003cp\u003eभारतीय राज्यघटनेत ‘भारत हा राज्यांचा संघ असेल’ असा उल्लेख आहे. संघराज्यपद्धती ही केवळ संरचनात्मक व्यवस्था नसते; तर तिच्यात विविध लोकगट व त्यांच्या संस्था आपापली वैशिष्ट्ये कायम ठेवून समान उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी एकत्र येवून शाश्वत व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. भारतीय राज्यघटनेत उदारमतवाद, मिश्र अर्थव्यवस्था, सत्तेचे विकेंद्रीकरण, कायदेशीर वा कार्यालयीन भाषेची तरतूद, स्वतंत्र निर्वाचन आयोग इत्यादींची तरतूद आढळते. परिणामी भारतीय राज्यघटना ही सर्वसमावेशक ठरते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुत ग्रंथात भारतीय संविधानाची निर्मिती, मूलभूत हक्क, कर्तव्ये, मार्गदर्शक तत्वे, भारतीय संघराज्यवाद, कायदेमंडळ, संविधानिक दुरुस्त्या, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि निवडणूक व्यवस्था अशा मूलभूत व राज्यघटनेची ओळख होण्यासाठी आवश्यक घटकांचा समावेश करण्यात आलेला असल्याने भारतीय राज्यघटनेची ओळख करून घेतानाच लोकशाही प्रक्रियेचाही अभ्यास होणार आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी कोणकोणत्या आवश्यक बाबी आहेत यांचाही उहापोह सदरील ग्रंथात आहे. भारतीय राज्यघटनेची ओळख होण्याच्या दृष्टीने सोपी, सुटसुटीत अशी ग्रंथरचनेची मांडणी करण्यात आली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477936582885,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Sanvidhanachi-Olkha_Dr-Suvarna-Gudge_cnvt-1-1.jpg?v=1772195032"},{"product_id":"भारतीय-राज्यघटनेची-तोंडओळख","title":"भारतीय राज्यघटनेची तोंडओळख","description":"\u003cp\u003eभारताची राज्यघटना म्हणजे देशाचा मुलभूत व सर्वोच्च असा कायदा होय. राज्याच्या शासनाची मुलभूत बैठक निश्चित करणारी, शासनाचे अधिकार व जनतेचे हक्क स्पष्ट करणारी एक सुत्रबद्ध नियमावली म्हणून राज्यघटनेकडे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेत मुलभूत हक्क, मुलभूत कर्तव्ये व राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे यांचा समावेश असून ब्रिटीश राजवटीतील विविध कायदे, प्रशासकीय रचना व नियमावली यांचा प्रभाव भारतीय राज्यघटनेवर पडलेला दिसतो. म्हणूनच प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ प्रो. ग्रॅनव्हिले ऑस्टिन यांनी भारतीय राज्यघटनेला ‘महत्त्वपूर्ण असा सामाजिक दस्ताऐवज’ म्हटले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकात राज्यघटनेच्या निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, घटनासमिती, राज्यघटनेचा सरनामा, राज्यघटनेची वैशिष्ट्ये, राज्यघटनेची मुलभूत चौकट, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व निवडणूक पद्धती तसेच राज्यघटनेतील विविध कलमे, भाग व परिशिष्ट्ये यांची अद्ययावत व अचूक माहिती देण्यात आली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477936910565,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Rajyaghatnechi-Tondolkha_cnvt-1.jpg?v=1772195113"},{"product_id":"भारतीय-संविधानातील-तरतूदी-आणि-स्थानिक-स्वराज्य-संस्था","title":"भारतीय संविधानातील तरतूदी आणि स्थानिक स्वराज्य संस्था","description":"\u003cdiv class=\"exad-advance-tab-content exad-tab-image-has-no exad-tab-image-left active\"\u003e\n\u003cdiv class=\"exad-advance-tab-content-element\"\u003e\n\u003cdiv data-elementor-type=\"section\" data-elementor-id=\"22834\" class=\"elementor elementor-22834 elementor-location-single\" data-elementor-post-type=\"elementor_library\"\u003e\n\u003cdiv class=\"has_eae_slider elementor-section elementor-top-section elementor-element elementor-element-699ff59e elementor-section-full_width elementor-hidden-tablet elementor-hidden-mobile_extra elementor-hidden-mobile elementor-section-height-default elementor-section-height-default exad-glass-effect-no exad-sticky-section-no\" data-eae-slider=\"66258\" data-id=\"699ff59e\" data-element_type=\"section\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-container elementor-column-gap-no\"\u003e\n\u003cdiv class=\"has_eae_slider elementor-column elementor-col-100 elementor-top-column elementor-element elementor-element-444cebe5 exad-glass-effect-no exad-sticky-section-no\" data-eae-slider=\"41762\" data-id=\"444cebe5\" data-element_type=\"column\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-widget-wrap elementor-element-populated\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-element elementor-element-20adbf0 exad-sticky-section-no exad-glass-effect-no elementor-widget elementor-widget-wl-single-product-short-description\" data-id=\"20adbf0\" data-element_type=\"widget\" data-widget_type=\"wl-single-product-short-description.default\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-widget-container\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description\"\u003e\n\u003cp\u003eकोणत्याही देशाच्या संविधानाच्या स्वरुपावर त्या देशातील भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक तथा आर्थिक या सारख्या विविध घटकांचा प्रभाव पडतो. देशाअंतर्गत या घटकाप्रमाणेच अन्य देशातील काही घडामोडी, विचारप्रणाली, अस्तित्त्वात असलेली संविधाने इत्यादी घटकांचाही प्रभाव पडतो. भारताचे संविधान घटना समितीद्वारा निश्चित काळात तयार केले गेले. भारतीय संविधानाचे स्वरुप 395 कलमे, 22 प्रकरणे व 08 परिशिष्ट्ये मिळून लिखित स्वरुपात तयार करण्यात आले. भारतीय संविधानाचा विचार करता संविधान दुरुस्तीसाठी वेगवेगळ्या 3 पद्धतीचा उल्लेख केला आहे. संविधानकर्त्यांनी निश्चित केलेली उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी राज्याचे धोरण अत्यंत महत्त्वाचे असते. राज्यकारभाराच्या धोरणाची आखणी व अंमलबजावणी करणे हे राज्यकर्त्यांचे महत्त्वपूर्ण कार्य असते. भारतीय राजकीय व्यवस्थेत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच लोकसभा व राज्यसभा यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकात भारतीय संविधान, उद्देशपत्रिका, राज्य नितीची मार्गदर्शक तत्त्वे, घटनात्मक पदे व त्यांची विविध कार्ये, लोकसभा, राज्यसभा, संसद सदस्य, न्यायालय, निवडणूक आयोग, निवडणूक सुधारणा, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, घटकराज्याचे विधिमंडळ, कायदा निर्मितीची प्रक्रिया, पंचायतराज, केंद्र शासनाशी संबंधित समित्या, मूल्यमापन समित्या, ग्रामसभा व महिलांचा सहभाग, संयुक्त महाराष्ट्र व नागपूर करार, माहितीचा अधिकार इ. बाबींचे अभ्यासपूर्ण व तपशीलवार विश्लेषण करण्यात आले आहे.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477938516197,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Sanvidhanatil-Tartudi_cnvt-1.jpg?v=1772195384"},{"product_id":"भारतीय-संविधानाची-ओळख-1","title":"भारतीय संविधानाची ओळख","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंविधान अथवा राज्यघटना ही संज्ञा प्राचीन स्वरूपाची असून विशेषत: भारत स्वतंत्र होण्यापूर्वी ज्या काही नवोदित राष्ट्रांनी स्वातंत्र्य प्राप्त केले. त्यानंतर त्यांनी आपल्या राष्ट्रीय, सामाजिक, राजकीय व इतर व्यवहार पूर्ण करण्यासाठी नियमावलीची निर्मिती करण्यावर भर दिलेला दिसतो. प्रामुख्याने यामध्ये युरोपातील राष्ट्रे, आशिया खंडातील राष्ट्रे यांचा समावेश करता येईल. ग्रीक नगर राज्यात अॅरिस्टॉटलच्या अध्ययन पद्धतीत अनेक देशांचा अभ्यास करून जी नियमावली तयार करण्यात आली ती तुलनात्मक राज्यशास्त्रात महत्त्वपूर्ण मानली जाते. त्याचप्रमाणे अनेक स्वरूपाच्या राजदरबारात सुद्धा आपल्या नगरराज्याच्या हितासाठी, प्रजेच्या सुरक्षेसाठी ज्या काही नियमावलींची निर्मिती करण्यात आली ती एकाप्रकारे भविष्यकालीन नियमांच्या बांधणीसाठी अथवा विशिष्ट कायद्याची चौकट तयार करण्यासाठी उपयुक्त ठरली. भारताच्या संदर्भात म्हणावयाचे झाल्यास सन 1935 च्या भारत प्रशासन विषयक कायद्यातून निश्चित स्वरूपाची एक दिशा भारतीय संविधानाच्या चौकटीकरिता उपयुक्त ठरली असे म्हणावे लागेल. भारतीय संविधानाच्या निर्मितीची प्रक्रिया ही घटना समिती व मसुदा समितीच्या माध्यमातून संपन्न झाल्याचे निदर्शनास येते. विशेषत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक देशांचे तुलनात्मक अध्ययन करून 2 वर्षे, 11 महिने, 17 दिवस अखंड व सातत्यपूर्ण अभ्यासातून भारतीय संविधानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेत भरीव स्वरूपाचे योगदान दिले. त्यांनी संविधानातील अनेक लहान-मोठ्या तरतूदी व संकल्पनेवर संविधान सभेत व्यापक विचारमंथन केले. परिणामस्वरूप स्वतंत्र भारताला सामाजिक न्याय मिळवून देण्याकरिता, देशाचे नाव जागतिक पातळीवर महासत्ता म्हणून नोंदविण्यासाठी भारतीय संविधान एक दस्तऐवज, मूलभूत ग्रंथ आहे असे आपणास म्हणता येईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477939007717,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiy-Sanvidhanachi-Olakh_Tunte2_cnvt-1.jpg?v=1772195445"},{"product_id":"भारतीय-संविधान-1","title":"भारतीय संविधान","description":"\u003col\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eभारतीय संविधान (राज्यघटना)\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e: भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया, पार्श्वभूमी, उद्देशपत्रिका, उद्देशपत्रिकेची मूल्ये, त्याची वैशिष्ट्ये, भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eभारतीय संघराज्य\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e: स्वरुप आणि कार्यपद्धती : भारतीय संघराज्याचे उद्दिष्ट्ये, स्वरुप, प्रास्ताविक, संघराज्याची वैशिष्ट्ये, केंद्र सरकार व घटकराज्य सरकार यांचे संंबंध, वित्त आयोग – सत्ता, अधिकार – कार्ये\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eअधिकार व कर्तव्य\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e: अ) मुलभूत अधिकार, ब) मुलभूत कर्तव्य, क) मार्गदर्शक तत्त्वे, प्रास्ताविक- मुलभूत अधिकार- वैशिष्ट्ये, मुलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्त्वे वा नितिदर्शक तत्वेबाबत राज्यांचे धोरण, नितिनिर्देशक तत्त्वे, आणि मुलभूत अधिकारांचा संबंध\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eअधिकार, हक्क व त्यातील आधुनिक बदल\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e: अ) माहितीचा अधिकार- इतिहास, वैशिष्ट्ये, माहिती अधिकार अधिनियम 2005, व्याप्ती, माहिती आयुक्ते, केंद्र व राज्य माहिती आयोग-अधिकार व कार्य, ब) भारतातील मानवी अधिकार- मानवी अधिकार अर्थ, स्वरुप, व्याप्ती, मानवी हक्कांची वैश्विकता-जाहिरनामा-भारतीय समाज व राज्यव्यवस्थेतील मानवाधिकार-भारतीय संविधान आणि मानवाधिकार-महिलांचे मानवी अधिकार-बालकांचे मानवी हक्क-भारतातील मानवी हक्कांच्या संरक्षणासाठीची व्यवस्था-मानवाधिकार आयोग (राष्ट्रीय व राज्य पातळीवर), मानवी हक्क न्यायालय, मानवी हक्क कायदे.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eकार्यकारी मंडळ\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e: केंद्रीय आणि घटकराज्यांचे कार्यकारी, मंडळ, सत्ता, अधिकार आणि कार्य.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eकायदेमंडळ\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e: केंद्रीय आणि घटकराज्यांचे कायदेमंडळ, सत्ता, अधिकार अणि कार्य, भारतातील कायदे निर्मितीची प्रक्रिया\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eन्यायमंडळ\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, सत्ता, अधिकार आणि कार्य, न्यायालयीन सक्रियता, लोकहित, लोकपाल.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eभारतातील नागरी सेवा\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e: नागरी सेवेचे महत्त्व, नागरी सेवेतील भरती पद्धती, केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग, सत्ता आणि अधिकार\u003c\/li\u003e\n\u003c\/ol\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477939171557,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Sanvidhan2-1.jpg?v=1772195542"},{"product_id":"भारतातील-घटनात्मक-आणि-राजकीय-प्रक्रिया","title":"भारतातील घटनात्मक आणि राजकीय प्रक्रिया","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eस्वतंत्र भारताच्या राज्यघटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरु केली. केवळ स्वातंत्र्य मिळाल्याने सर्व प्रश्न सुटले नव्हते तर पुढील काळामध्ये राष्ट्राचे ऐक्य टिकविण्याचे आणि त्याचबरोबर स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि न्याय या तत्त्वावर आधारित नवा समाज निर्माण करावयाचा होता. सामाजिक व आर्थिक मागासलेपणा दूर करुन लोकशाहीच्या मार्गाने नवसमाज निर्माण करण्याची व त्याचबरोबर धार्मिक, भाषिक, वांशिक, सांस्कृतिक विविधतेतून एकता साध्य करण्याची म्हणजेच राष्ट्रीय ऐक्य बळकट करण्याची भारतीय लोकांची आकांक्षा होती. भारतीय राज्यघटना हे त्याचेच प्रतिक आहे. ज्या तत्त्वांच्या आधारे देशात सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडवून आणायचे आणि विविधतेतून राष्ट्राची एकता साध्य करायची ती आधारभूत तत्त्वे घटनेने ठरवून दिलेली आहेत. देशातील शासनव्यवस्थेचे स्वरुप राज्यघटनेने केलेल्या नियमानुसार ठरते. कोणत्याही देशाची राज्यघटना जनतेच्या व्यक्त वा अव्यक्त संमतीवर आधारलेली असते. जनतेची मान्यता हा तिचा खरा अधिकार असतो. राज्यघटनेने तयार केलेले नियम म्हणजे राजकीय व्यवस्थेचा एक आराखडा असतो; त्यात सहभागी होणार्या लोकांमुळे तिला जीवंतपणा प्राप्त होतो. राजकीय व्यवस्थेमध्ये विविध पदांवर कार्य करणार्या व्यक्तींची उद्दिष्टे, धोरणे, त्यांचे हितसंबंध तसेच समाजातील विविध गटांचे हितसंबंध या सर्वांचा परिणाम होऊन देशातील घटनात्मक आणि राजकीय प्रक्रिया चालू राहत असते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477943693541,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatatil-Ghatanatmak-Ani-Rajkiy-Prakiya_cnvt-1.jpg?v=1772195677"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a3.oembed?page=2","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}