{"title":"भाषा विज्ञान \/ मराठी व्याकरण","description":"","products":[{"product_id":"उपयोजित-मराठी-भाग-1","title":"उपयोजित मराठी (भाग-1)","description":"\u003cp\u003eभाषा व वाङ्मय हे सौंदर्य निर्मिती करत असतात, जीवनमूल्यांची शिकवण देत प्रगत जीवन जगण्यास प्रेरणा देतात. त्यातून वाचकाला आनंद प्राप्त होतो. हे सत्य असले तरी आजच्या या स्पर्धेच्या युगात सौंदर्यनिर्मितीच्या आनंदप्राप्तीबरोबरच व्यावहारिक जीवनात उदरनिर्वाह करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपजत गुणांना प्रोत्साहन देणेही गरजेचे आहे. म्हणूनच पोट भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी सक्रिय राहावे म्हणून ‘उपयोजित मराठी’ या अभ्यासक्रमाला विद्यापीठाने प्राधान्य दिले आहे.\u003cbr\u003eविद्यार्थ्यांनी भाषिक कौशल्ये, कार्यालयीन संज्ञापन कौशल्ये, कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, पत्रलेखन, दूरदर्शन संहिता लेखन, आपल्या लेखनात विरामचिन्हांचा वापर व लेखनाचे नियम ही कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करून त्यांचे व्यावहारिक जीवन सुकर करता येते. त्यावर आधारीत प्रस्तुत ग्रंथाची रचना आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला ही कौशल्ये उपयुक्त ठरणारी आहेत. डॉ. प्रभाकर जोशी व डॉ. वासुदेव वले यांनी परिश्रमपूर्वक वरील कौशल्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीतून या पुस्तकाचे संपादन केले आहे. त्यांचे अभिनंदन!\u003cbr\u003eमराठीच्या जिज्ञासू अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रस्तुत पुस्तक उपयुक्त व मार्गदर्शनपर ठरेल असा विश्वास आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– डॉ. केशव तुपे, सहसंचालक, उच्च शिक्षण अनुदान, जळगाव विभाग, जळगाव\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473721897189,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Upyojit-Marathi-_NMU-1.jpg?v=1772084533"},{"product_id":"लेखनकौशल्य-मुद्रितशोधन-व-सर्जनशील-लेखन","title":"लेखनकौशल्य मुद्रितशोधन व सर्जनशील लेखन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘लेखनकौशल्य – मुद्रितशोधन व सर्जनशील लेखन’ हा ग्रंथ अनेकांगांनी महत्त्वपूर्ण आहे. मुद्रितशोधन हे लेखन कौशल्याचे महत्त्वाचे अंग आहे. किंबहुना ती भाषासंवर्धन व संरक्षण करणारी महत्त्वाची भाषिक संस्था आहे. प्रस्तुत ग्रंथ यशस्वी, उत्तम मुद्रितशोधक घडविण्यासाठीच्या प्रयत्नांचा महाप्रयत्न आहे. मुद्रितशोधन कौशल्यासाठी आवश्यक ज्ञानाच्या बाजू म्हणजे मुद्रितशोधनाचे स्वरूप, मुद्रितशोधनाचा सातत्यपूर्ण सराव यांचा समावेश या ग्रंथात असल्याने मुद्रितशोधन कौशल्याबाबतचे अ ते ज्ञ म्हणजे हा ग्रंथ होय. मुद्रितशोधनाची प्रक्रिया, विरामचिन्हांचे मुद्रितशोधनातील महत्त्व, अचूक शब्दलेखन, लेखनातल्या चुकांमुळे होणारे अर्थबदल, प्रात्यक्षिकांसाठी भरपूर उतारे ही या ग्रंथाची केवळ जमेचीच बाजू नसून मुद्रितशोधनासंदर्भातला ग्रंथ कसा कमाल स्तरावर पूर्णत्व पावलेला असावा, याची साक्ष देणाराही आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसर्जनशील लेखनाचे स्वरूप, त्याची अंत: व पृष्ठ स्तरावरून सिद्ध होणारी वैशिष्ट्ये वाचक व अभ्यासकांस अवगत व्हावीत, कथालेखनाची, नाट्यलेखनाची निर्मितिप्रक्रिया नेमकी कशी घडून येते हे त्यांस आकलन व्हावे, या विशुद्ध सारस्वतीय भूमिकेतून या ग्रंथाचे लेखन झाले आहे. सर्जनशील लेखनामागील निर्मितिप्रक्रिया, प्रेरणा, याबद्दल फारशी माहिती उपलब्ध होत नाही, ही मोठी उणीव या ग्रंथाने भरून काढली आहे. सर्जनशील लेखनाची पृथगात्मता, सर्जनशीलतेसंदर्भातील संभावित पैलूंची मीमांसा, भाषेतील सर्जनशीलता, कलावंतांची सर्जनशीलता, विज्ञानातील सर्जनशीलता, साहित्यातील सर्जनशीलता, सर्जनशीलतेची वैशिष्ट्ये, सर्जनशीलतेची अभिव्यक्ती, सर्जनशील लेखन करताना येणार्या अडचणी असा बहुआयामी सर्जनविचार हा ग्रंथ मांडतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभाषा पदवीधरांना रोजगार मिळणे ही बाब भाषा अध्यापनाच्या अस्तित्वाशी निगडित आहे. त्यासाठी भाषिक कौशल्ये अवगत असणारा विद्यार्थी घडविणे हे सांस्कृतिक कर्तव्य आहे. हे कर्तव्य तत्परतेने पार पाडण्यासाठी डॉ. संदीप माळी आणि प्रा. समाधान पाटील लिखित ‘लेखनकौशल्य : मुद्रितशोधन व सर्जनशील लेखन’ या ग्रंथाचे स्वागत आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474924286181,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Lekhan-Kaushalya-Mudritshodhan-V-Sarjanshil-Lekhan_Dr-Sandip-Mali_cnvt-1-1.jpg?v=1772111009"},{"product_id":"प्रादेशिक-बोलींचे-भाषाविज्ञान","title":"प्रादेशिक बोलींचे भाषाविज्ञान","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eबोली आणि भाषा या देशाची विरासत आहे. भाषा हे समाजव्यवहाराचे महत्त्वाचे साधन आणि सामाजिक संस्था असल्याने बोली समाजव्यवहारात घट्ट रुतून बसल्या आहेत. मानव जातीच्या प्रगतीचा इतिहास बोलींमध्ये दडून बसला आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतरावजी चव्हाण यांनीही बोलींचे महत्त्व ओळखून ‘बोली या ज्ञानभाषा झाल्या पाहिजेत’ असे महत्त्वपूर्ण उद्गार काढले होते, आणि 11 जानेवारी 1965 ला ‘मराठी’ ही महाराष्ट्राची राजभाषा झाल्यानंतर, हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू। हिला बैसवू वैभवाच्या शिरी’ ही माधव ज्युलियनांची भविष्यवाणी खरी ठरविण्यासाठी राजकीय पातळीवरही पाऊले उचलली गेली होती. ज्या मराठी भाषेला वैभवाच्या शिरावर बसविण्याची शपथ घेतली होती, त्या मराठी राजभाषेची आणि तिला समृद्ध करणार्या तिच्या दीडशेहून अधिक बोलींची काय अवस्था आहे हे ही समजून घेतले पाहिजे. मराठीला 52 बोली आहेत असा दावा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव तयार करणार्या समितीने केला आहे. प्रत्यक्षात मराठीला 150 हून अधिक बोली आहेत. मराठी भाषेला समृद्ध करणार्या तिच्या बोली नष्ट झाल्या तर त्या बोलीतील शब्दांचे अर्थ आणि भावना नष्ट होतील. मराठी भाषा विविध अर्थ आणि भावनांविना लुळीपांगळी होऊन परकीय भाषा तिच्यावर आक्रमण करेल. आज महाराष्ट्रात मराठीवरील इंग्रजीचे आक्रमण वाढते आहे. ते रोखण्यासाठी, मराठीला अधिक समृद्ध करून ती जगाची ज्ञानभाषा होण्यासाठी तिच्या बोलींना जपणे व त्यांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. ‘प्रादेशिक बोलींचे भाषाविज्ञान’ हा महाराष्ट्रातील सत्तावीस प्रादेशिक बोलींचे भाषिक सौंदर्य, बोलींचे समाजशास्त्र, बोलीविज्ञान व व्याकरण व्यवस्था जपणारा आणि संवर्धन करणारा महत्त्वाचा ग्रंथ आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474931757285,"sku":null,"price":575.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Pradeshik-Bolinche-Bhashavidnyan_cnvt-1.jpg?v=1772111309"},{"product_id":"समाजभाषाविज्ञान","title":"समाजभाषाविज्ञान","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘समाजभाषाविज्ञान’ ही अलीकडच्या काळात विकसित झालेली भाषाविज्ञानाची एक अभ्यासशाखा आहे. भाषा ही सामाजिक निर्मिती असल्याने भाषिक अभ्यासाच्या कक्षा या सामाजिक अभ्यासाशी नाते सांगणार्या ठरल्या आहेत. अशा अभ्यासाचे स्वरूप, त्याची व्याप्ती याबाबत अधिकाधिक मांडणी करण्याची निकड आजही कायम आहे. किंबहुना भाषेचे समाज आणि संस्कृती यांच्याशी असलेले नाते स्पष्ट करण्यासाठी अशा अभ्यासदृष्टीची नितांत निकड आहे. यादृष्टीने डॉ. प्रभाकर जोशी यांचे हे पुस्तक लक्ष वेधून घेणारे आहे. समाजभाषाविज्ञान या विषयाचे स्वरूप व व्याप्ती या मुद्यांपासून सुरू होणारे हे पुस्तक या विषयातील मूलभूत संकल्पनांची विस्ताराने मांडणी करणारी आहे. समाजभाषा व संस्कृती, समाज-संस्कृती स्तरांवरील भाषाभेद, पाश्चात्य भाषावैज्ञानिकांचे प्रमुख सिध्दांत, भाषानिर्मितीचे सिध्दांत या तात्विक मुद्यांसंबंधीची विस्ताराने केलेली मांडणी हे या पुस्तकाचे एक प्रधान वैशिष्ट्य आहे. त्यानंतर भाषिक प्रश्न आणि लिपी या दोन निराळ्या मुद्यांसंबंधी विवेचन आलेले आहे. सातत्याने या अभ्यासविषयासंबंधी चिंतन-अभ्यास करणार्या डॉ. जोशी यांनी अध्यापक-विद्यार्थी यांच्यासाठी सुलभपणे केलेली मांडणी हे या पुस्तकाला संदर्भमूल्य प्राप्त करून देणारी आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477275128037,"sku":null,"price":165.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samaj-Bhasha-Vidnyan_cnvt-1.jpg?v=1772170235"},{"product_id":"सुलभ-भाषाविज्ञान-व-मराठी-व्याकरण","title":"सुलभ भाषाविज्ञान व मराठी व्याकरण","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसुलभ भाषाविज्ञान आणि मराठी व्याकरण हा ग्रंथ महाराष्ट्रातल्या सर्वच विद्यापीठातल्या भाषाविज्ञानाच्या अभ्यासकाला आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारा आहे. भाषेच्या, भाषाविज्ञानातील विविध संकल्पना लक्षात घेण्यासाठी हा ग्रंथ उपयोगी पडणारा आहे. भाषानिर्मिती प्रक्रिया, स्वनांचे वर्गीकरण, स्वन-स्वनिम्-स्वानांतर, रुपिका-रुपिम-रुपिकांतर, वाक्य विश्लेषण, अर्थप्रक्रिया, शब्दअर्थ संबंध, जागतिक भाषांचे वर्गीकरणाची तत्वे, कुल संकल्पना, आंतर बर्हिवर्तुळ सिद्धांत, भाषिकभेद, मराठी उत्पत्तीचे सिद्धांत, उत्पत्ती विषयक वाद, भाषाविज्ञानातील विविध शाखा, प्रवाह, आंतरविद्याक्षेत्र, स्वरुप या सर्व संकल्पनाची सुटसुटीत व्यवस्थित व सुबोध मांडणी करणारा ग्रंथ आहे. सर्व संकल्पना परिचय करुन घेण्यासाठी उपयुक्त ठरणारा हा ग्रंथ आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्याचप्रमाणे मराठी व्याकरणातील मूलभूत संकल्पना विशद करणारा, वर्ण, शब्द, शब्दांच्या जाती, विभक्ती प्रत्यय साधक प्रत्यय, विकारी अविकारी, आरकांत प्रत्यय, त्या संदर्भातील विविध वाद त्याचे स्वरुप, वाक्य, वाक्याचे प्रकार, वाक्य संश्लेषण, वाक्य विश्लेषण, समास, प्रयोग व्यवस्था, काळ-अर्थ यांच्या अनुषंगाने होणारे वाक्याचे प्रकार, भाषावैभव प्राप्त करुन देणारे वाक्प्रचार, म्हणी वगैरे घटकांची सविस्तर व सुलभ परिचय करुन देणारा हा ग्रंथ पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देणार्यांना अत्यंत उपयुक्त ठरेल यात शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477307207909,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/bhasha-vidnyan_cnvt-1.jpg?v=1772170829"},{"product_id":"वर्णनात्मक-भाषाविज्ञान","title":"वर्णनात्मक भाषाविज्ञान","description":"\u003cp\u003eप्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. प्रभाकर ज. जोशी हे भाषाविज्ञानाचे अभ्यासक आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मराठी विषयांच्या अभ्यासक्रम पुर्नरचनेत त्यांचा सक्रीय सहभाग असतो. ‘भाषाविज्ञान’ हे त्यांचे अभ्यासक्षेत्र! प्रस्तूत ग्रंथात पदवी व पदव्युत्तर स्तरावर सर्वच विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेले भाषेचे स्वरुप व लक्षणे, स्वनविन्यास, रुपिमविन्यास, वाक्यविन्यास, अर्थविन्यास इत्यादी वर्णनात्मक भाषाविज्ञानाशी संबंधित विविध घटकांचे अभ्यासपूर्ण विवेचन आहे. डॉ. जोशी यांच्या प्रदीर्घ अध्यापनातील अनुभवांवर आधारित अशी भाषाविज्ञानाची ही नाविन्यपूर्ण मांडणी अभ्यासकांना मार्गदर्शन ठरणारी आहे. एवढेच नव्हे तर स्पर्धा परीक्षा, नेट-सेट परीक्षा यासाठीही प्रस्तूत ग्रंथाची उपयुक्तता आहे. मराठी विषयातील अभ्यासकांना ‘वर्णनात्मक भाषाविज्ञान’ हा अभ्यासपूर्ण संदर्भ ग्रंथ प्रा. डॉ. प्रभाकर जोशी यांनी उपलब्ध करुन दिला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! भाषाविज्ञानाचे अभ्यासक त्यांच्या वा ग्रंथाचे स्वागत करतीलच!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e-डॉ. शिरीष पाटील\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477311729893,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Varnnatmak-Bhashavigyan-1.jpg?v=1772171225"},{"product_id":"उपयोजित-मराठी-भाग-1-sgbau","title":"उपयोजित मराठी (भाग – 1)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभाषा व वाङ्मय हे सौंदर्य निर्मिती करत असतात, जीवनमूल्यांची शिकवण देत प्रगत जीवन जगण्यास प्रेरणा देतात. त्यातून वाचकाला आनंद प्राप्त होतो. हे सत्य असले तरी आजच्या या स्पर्धेच्या युगात सौंदर्यनिर्मितीच्या आनंदप्राप्तीबरोबरच व्यावहारिक जीवनात उदरनिर्वाह करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपजत गुणांना प्रोत्साहन देणेही गरजेचे आहे. म्हणूनच पोट भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी सक्रिय राहावे म्हणून ‘उपयोजित मराठी’ या अभ्यासक्रमाला विद्यापीठाने प्राधान्य दिले आहे. आजच्या जागतिकीकरणात प्रादेशिक भाषा अस्तित्वासाठी संघर्ष करीत असतानाच्या काळात हा अभ्यासक्रम अधिक उपयुक्त आणि गरजेचा आहे. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना भाषिक – लेखन कौशल्ये आत्मसात करून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास साधता येतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविद्यार्थ्यांनी लेखनात विरामचिन्हांचा वापर व लेखनाचे नियम, मुद्रितशोधन, कार्यालयीन संज्ञापन व पत्रव्यवहार, अर्ज लेखन – नोकरीसाठी अर्ज, स्वपरिचय पत्र, भाषिक कौशल्ये, पत्रलेखन कौशल्य व नोकरीसाठी अर्जलेखन ही कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करून त्यांचे व्यावहारिक जीवन सुकर करता येते. त्यावर आधारीत प्रस्तुत ग्रंथाची रचना आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला ही कौशल्ये उपयुक्त ठरणारी आहेत. डॉ. प्रभाकर जोशी यांनी परिश्रमपूर्वक वरील कौशल्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीतून या पुस्तकाचे संपादन केले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमराठीच्या जिज्ञासू अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रस्तुत पुस्तक उपयुक्त व मार्गदर्शनपर ठरेल असा विश्वास आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477313401061,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Upyojit-Marathi-_AMRVATI-front-1.jpg?v=1772171339"},{"product_id":"उपयोजित-मराठी-भाग-2-sgbau","title":"उपयोजित मराठी (भाग 2) (SGBAU)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eविचारपूर्वक बोलता येणे व आपले विचार समर्पकपणे लिखित स्वरुपात मांडता येणे हे आज आवश्यक झाले आहे. ही क्षमता विकसित करण्यासाठी ‘वक्तृत्व’ स्पर्धामध्ये आपणास सहभाग घेता यावा, विविध उपक्रमांत ‘सूत्रसंचन’ करुन आपली नवी ओळख निर्माण करता यावी म्हणून पहिल्या दोन प्रकरणातून या कौशल्याची ओळख करुन दिली आहे. वक्तृत्व म्हणजे काय? उत्तम वक्ता होण्यासाठी कोणते प्रयत्न करावे? वक्तृत्व आणि भाषण यातील साम्यभेद कोणते? सूत्रसंचालनाचे तंत्र कसे आत्मसात करावे इत्यादी संदर्भातील माहिती आपणास या घटकाच्या अभ्यासातून मिळणार आहे. व्यावहारिक स्तरावर निमंत्रण पत्रिका-कार्यक्रम पत्रिका-विविध प्रकारची माहितीपत्रके यांचा परिचय आपणास असतोच. तिसरे व चवथे प्रकरणातून त्यासंदर्भातील माहिती समजून घेऊन त्याचे ‘लेखन कौशल्य तंत्र’ विकसित करता येईल. अभ्यासक्रमाशी संबंधित घटकांची सोदाहरण दिलेली माहिती नीट समजून देण्याचा प्रयत्न आहे. त्या आधारावर आपणास आपल्या ठिकाणी या कौशल्य अंगाचा विकास साधून आपले व्यक्तिमत्वाचा विकास साधता येईल. या हेतूनेच अभ्यासक्रमातील घटकनिहाय विवेचन प्रस्तुत पुस्तकात अभ्यासपूर्ण पद्धतीने देण्याचा प्रयत्न आहे. त्याचे स्वागत विद्यापीठाच्या परिसरातील अध्यापक, विद्यार्थीवर्ग करतील अशी आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477316448485,"sku":null,"price":95.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Upyojit-Marathi_cnvt-1_8df16796-9529-4b47-98a0-061e522e11bc.jpg?v=1772172028"},{"product_id":"उपयोजित-मराठी-भाग-3","title":"उपयोजित मराठी (भाग 3)","description":"\u003cp\u003eकोणतीही भाषा मौखिक आणि लिखित स्वरुपात अस्तित्वात असते. भाषण – संभाषण – सूत्रसंचालन, निवेदन, परिसंवाद इ. मौखिक माध्यमातून तर वृत्तपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन या प्रसार माध्यमासाठी त्याचा स्वीकार आपण करतोच. विविध कार्यालयांसाठी व संगणक – इंटरनेट इ. सेवासुविधांसाठी भाषा लेखन ही नित्याची गरज ठरली आहे. या परिक्षेत्रात ‘संपादन कौशल्यांचा परिचय’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक संवाद साधने’ इ. घटकांच्या अभ्यासामुळे मराठीतून दैनंदिन व्यवहार अधिक सुकर होतो.\u003cbr\u003eवाङ्मय हे जीवनातील नैतिकता, सत्य आणि सौंदर्यासाठी आवश्यक आहे. हीच नैतिकता आणि सत्य वस्तुनिष्ठ स्वरुपात व्यक्त होण्यासाठी ‘संपादन कौशल्ये’ आत्मसात करणे गरजेचे आहे. तसेच आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स संवाद माध्यमांचे तंत्र समजून घेऊन गतिमान जीवनाला शिस्त निर्माण करणे आवश्यक आहे. ‘उपयोजित मराठी’ या अभ्यासक्रमात या घटकांचा समावेश असतो. प्रा. डॉ. प्रभाकर जोशी व प्रा. डॉ. किशोर पाटील यांनी परिश्रमपूर्वक या पुस्तकांचे संपादन केले आहे, त्यांचे अभिनंदन!\u003cbr\u003eमराठीच्या जिज्ञासू अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रस्तुत पुस्तक उपयुक्त व मार्गदर्शनपर ठरेल असा विश्वास आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– डॉ. शिरीष पाटील\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477320970469,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Upoyojit-Marathi-Bhag-3-1.jpg?v=1772171662"},{"product_id":"उपयोजित-मराठी-f-y-b-com","title":"उपयोजित मराठी","description":"\u003cp\u003eविद्यापीठाच्या नव्या अभ्यासक्रमाच्या रचनेनूसार प्रथम सत्रात मराठी (ऐच्छिक) विषयासाठी ललित वाङ्मयाचा अभ्यास करणार्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी दुसर्या सत्रासाठी पत्रलेखन, संवाद लेखन, वृत्तपत्रीय लेखन, पारिभाषिक संज्ञा इत्यादी घटक अभ्यासक्रमाचे घटक निश्चित करण्यात आले आहेत. वाङ्मयाची आवड असलेल्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना या पुस्तकामुळे व्यावसायिक संज्ञापनाची जाणीव अधिक वृद्धींगत होईल अशी अशा आहे.\u003cbr\u003eवाङ्मयातून जीवन जाणीवाच्या वृद्धीसोबत व्यापक संस्कृतीचे आकलन होते. व्यावसायिक गरजेतून भाषिक कौशल्यांचा अभ्यास केल्याने नोकरी-व्यवसायाच्या नव्या संधी प्राप्त होतात. शैक्षणिक सन्ननिहाय कालावधीत इतर अवधानांसोबत मराठीचा अभ्यासक्रम अधिक आकलन सुलभ व्हावा यासोबतच नोकरी व्यवसायासाठी भाषिक संज्ञापन कौशल्यांच्या परिचयातून विद्यार्थ्यांना मौखिक आणि लिखित स्वरुपातील परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाऊन जीवनात यशस्वी कसे होत होईल, याचे आत्मभान देणारे हे पुस्तक प्रथम वर्ष वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा परीक्षेत मराठी ऐच्छिक विषय घेणार्यांनाही दिशादर्शक ठरेल, यात शंका नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– प्रा. एल. जी. सोनवणे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477350232293,"sku":null,"price":95.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Upoyajit-Marathi-bcom-1.jpg?v=1772172152"},{"product_id":"उपयोजित-मराठी-भाग-2","title":"उपयोजित मराठी (भाग – 2)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477365076197,"sku":null,"price":80.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Upoyojit-marathi-Bhag-2-1.jpg?v=1772172427"},{"product_id":"fybcom-semester-ii","title":"भाषा आणि कौशल्य विकास","description":"\u003cp\u003e21 व्या शतकात प्रगत कौशल्ये विकसित होत आहेत. तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे आपल्या सर्वांच्या व्यावहारिक जीवनातही दिवसेंदिवस अमूलाग्र बदल होत आहेत. संपूर्ण जीवनच जणू आधुनिक तंत्रज्ञानाने व्यापलेले आहे. असे असताना आपला मराठी विषय आणि भाषा त्यास अपवाद कशी असेल? या जाणिवेने डॉ. संदीप कडू माळी यांच्या अथक प्रयत्नांतून प्रस्तुत ग्रंथ साकारला गेला. वाङ्मयीन मराठीसह काळाची गरज ओळखून महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठे आणि शैक्षणिक परिघामध्ये सध्या व्यावहारिक आणि उपयोजित मराठीचे प्रस्थ वाढलेले आहे, याचे आपण सर्वांनीच स्वागत केले पाहिजे. भाषेच्या संदर्भातील प्रगत कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्यासाठी प्रस्तुत ग्रंथ प्रेरणादायी ठरेल. याशिवाय प्रशासकीय आणि विविध भाषिक कौशल्ये समजून घेण्यासाठी व उपयोजनासाठी विद्यार्थांना आकलन सुलभ होईल अशा पध्दतीने केलेले हे लेखन भाषा आणि कौशल्ये विकासाच्या संदर्भात दिशादर्शक ठरेल, अशी खात्री आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477370482917,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhasha-aani-Kaushalya-Vikas_Dr-Sandip-Mali_cnvt-1.jpg?v=1772173065"},{"product_id":"मराठी-व्याकरण-व-लेखन","title":"मराठी व्याकरण व लेखन","description":"\u003cp\u003eमराठी साहित्याच्या अभ्यास – संशोधन क्षेत्रात भाषिक अभ्यासाचे प्रमाण सातत्याने अल्पच आहे. मराठीचा अभ्यास म्हणजे केवळ मराठी साहित्याचा अभ्यास अशी दृढ होत गेलेली वृत्ती यास कारणीभूत आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या अभ्यासाचे विस्तृत क्षेत्र नेहमीच परिघावर राहिलेले दिसते. अभ्यासक्रमातही भाषिक दृष्टीने केल्या जाणार्या अभ्यासांना फारशी जागा नसते, ही वस्तुस्थिती आहे. त्यात पुन्हा भाषेचे लिखित रूप ज्या व्यवस्थेवर भक्कमपणे उभे असते त्या व्याकरणाचा गांभीर्यपूर्वक केल्या जाणार्या अभ्यासाचे दुर्भिक्ष भयानक स्वरूपाचे आहे. शालेय पातळीवर निर्माण होणारी मराठी व्याकरणाची नावड आणि पदवी पातळीवरील अभ्यासात त्याकडे केलेले दुर्लक्ष आज प्रकर्षाने जाणवत आहे. मराठी व्याकरण हा विषय आता केवळ स्पर्धा परीक्षांपुरता उरला आहे की काय? अशी शंका मनात यावी अशी एकंदर परिस्थिती आहे. याबद्दल दिलासा देणारी बाब सदर पुस्तकामुळे घडत आहे, ही अत्यंत स्वागतार्ह घटना आहे. नव्या पिढीतील एका अभ्यासकाने मराठी भाषेचे मर्म जाणून घेण्याच्या भूमिकेतून घेतलेला व्याकरणाच्या आकलनाचा आणि प्राप्त आकलनातून व्याकरणविषयक मर्मदृष्टी रुजविण्याचा घेतलेला ध्यास वाखाणण्याजोगा आहे. व्याकरणिक संकल्पना, समर्पक उदाहरणांसह त्यांचे स्पष्टीकरण आणि आकलनाची पडताळणी करून घेण्यासाठी लगेच दिलेले प्रश्र या मांडणीतून मराठी व्याकरण सुकर व नेटक्या पद्धतीने समजावून सांगणारे हे पुस्तक आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477371891941,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Marathi-Vyakaran-V-Lekhan_Prof-Samadhan-Patil_cnvt-1.jpg?v=1772173239"},{"product_id":"संवाद-आणि-लेखन-कौशल्ये","title":"संवाद आणि लेखन कौशल्ये","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमानवाच्या उत्क्रांतीत संवाद आणि लेखन या मानवी कौशल्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. ही कौशल्ये मानवाला सहजपणे हस्तगत होत नाहीत तर प्रयत्नपूर्वक शिकावी लागतात. माहिती तंत्रज्ञानाच्या या कालखंडात संवाद आणि लेखन कौशल्यांमध्ये आमुलाग्र बदल झालेला आहे. करिअरीस्ट असणार्या विद्यार्थ्यांसाठी ही दोन्ही कौशल्ये हस्तगत करणे आवश्यक आहे. ही कौशल्ये कशी हस्तगत करावी?, संवाद कसा करावा?, लेखन कसे करावे? याचा उहापोह ‘संवाद आणि लेखन कौशल्ये’ या ग्रंथात केलेला आहे. नव्याने लेखन करणार्यांसाठी आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477375201509,"sku":null,"price":95.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanvad-and-Lekhan-Kaushalya_cnvt-1.jpg?v=1772173396"},{"product_id":"माध्यमांसाठी-लेखन-व-संवाद-कौशल्य","title":"माध्यमांसाठी लेखन व संवाद कौशल्य","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारतात वृत्तपत्र, आकाशवाणी, दूरचित्रवाणी इ. माध्यमं ही प्रभावी प्रसारमाध्यमं म्हणून ओळखली जातात. या तिनही प्रसारमाध्यमांचा विचार केला तर जागतिकीकरणाच्या या कालखंडात मुद्रित आणि श्राव्य माध्यमांमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. यात वृत्तपत्र हे मुद्रित प्रसारमाध्यम आहे तर आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी हे अनुक्रमे श्राव्य व दृकश्राव्य प्रसारमाध्यमं आहेत. विशेषतः आकाशवाणी व दूरचित्रवाणी यांचा विचार केला तर चोवीस तास चालणार्या या माध्यमांनी चकचकीतपणा, आकर्षक मांडणी, व तांत्रिकतेमुळे सर्वसामान्यांवर भुरळ पाडली. या माध्यमांचा आवाका व वेग इतका प्रचंड आहे की, त्यांच्या स्पर्धेत वृत्तपत्र हे मुद्रित प्रसारमाध्यम टिकणार नाही अशी एक भीती निर्माण झालेली होती. परंतु ही भीती फोल ठरली. वृत्तपत्रांनी ऑनलाईन रूप धारण केलेले आहे तर श्राव्य माध्यमे ही चोवीस तास याप्रमाणे प्रसारित होत आहे. म्हणजेच या माध्यमांमधून व्यवसायाची मोठी संधी निर्माण झालेली दिसते. परंतु या माध्यमामध्ये काम करावयाचे असेल तर या माध्यमांसाठी आवश्यक असणारे लेखन कौशल्य हस्तगत करणे गरजेचे आहे. या माध्यमांसाठी लेखन कसे करायचे? या लेखनाचा आकृतिबंध कसा आहे? त्यासाठी कोणते तंत्र? व कोणती पथ्य पाळायची? यासाठी सदर पुस्तक मार्गदर्शकाची भूमिका बजावेल यात शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477379625189,"sku":null,"price":95.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Madhymasanthi-Lekhan-and-Sanvad-Kaushalya_cnvt-1.jpg?v=1772173603"},{"product_id":"मराठी-भाषा-आणि-भाषाविज्ञान","title":"मराठी भाषा आणि भाषाविज्ञान","description":"\u003cp\u003e पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात भाषाविज्ञान हा विषय आज प्राधान्याने शिकविला जातो आहे. प्रारंभी नवीन असणारा हा विषय आता कोणत्याही भाषेचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांसाठी अपरिहार्य झालेला आहे. वर्णनात्मक भाषा विज्ञानाचा पाया घालणाऱ्या फेर्दिनां द स्योसुर या भाषाअभ्यासकापासून आजपावेतो भाषाविज्ञानाने अनेक क्षेत्रामध्ये शिरकाव केलेला दिसतो. संगणक विज्ञान, भाषा नियोजन, कोष विज्ञान आदिसारख्या संपूर्ण मानवी जीवनाला व्यापून टाकणाऱ्या या विषयाचे स्वरूप आज आंतर-अभ्यासक्षेत्रीय झालेले आहे. सर्वच भाषेच्या अभ्यासाच्या दृष्टीने पायाभूत ठरणारा हा विषय असल्याने आज तो आवश्यक ठरलेला आहे. सदर पुस्तकात भाषेची उत्पत्ती, भाषेचे स्वरूप, वैशिष्ट्ये आणि कार्य, स्वनिम व रूपिम विचार, वाक्यविचार, मराठीची वर्णमाला, मराठीचे ध्वनीपरिवर्तन, मराठीचे अर्थपरिवर्तन, प्रमाण मराठी भाषा आणि बोली या घटकांची विस्तृत माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या व शिकविणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे भाषाविज्ञान सुलभ पद्धतीने शिकता यावे, यादृष्टीने या पुस्तकाची मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479749701861,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Marathi-Bhasha-Aani-Bhashavidnyan_Dr-Chandrakantt-Kadam_cnvt-1.jpg?v=1772262494"},{"product_id":"भाषेची-प्रगत-कौशल्य-bhashechi-pragat-kaushale","title":"भाषेची प्रगत कौशल्य (Bhashechi Pragat Kaushale)","description":"\u003cp\u003eअर्थात आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये भाषेची ही प्रगत कौशल्य भाषेचे अभ्यासक म्हणून प्रत्येकाने आत्मसात करणे गरजेचे आहे. हाच व्यापक दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवून पुणे विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या अभ्यासमंडळाने सदर घटकांची निवड केलेली असून विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्याचा विकास करत असताना त्यातील काही प्रगत कौशल्य देखील विकसित करण्याच्या विचार करून या घटकांचा समावेश केलेला आहे. त्याचप्रमाणे समाजमाध्यमे आणि नवमाध्यमे यावरीलही काही कौशल्यांचा यात समावेश केलेला आहे. अर्थात\u003cbr\u003eते विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी अधिक पूरक ठरणारे आहे. त्यामुळे भाषा प्रगल्भ होण्यास देखील मदत होते. या विविध कौशल्यांचा विकास करत असताना त्यांना स्वतःमध्ये देखील आवश्यक ते बदल करून घ्यावे लागतात आणि नकळतपणे त्यांचा दृष्टिकोन व्यापक होण्यास मदत होते. \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48667242266853,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BhashechePragatKaoushalye-1.jpg?v=1775118632"},{"product_id":"भाषेची-प्रगत-कौशल्ये","title":"भाषेची प्रगत कौशल्ये","description":"\u003cp\u003eआजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये भाषेची ही प्रगत कौशल्य भाषेचे अभ्यासक म्हणून प्रत्येकाने आत्मसात करणे गरजेचे आहे. हाच व्यापक दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवून पुणे विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या अभ्यासमंडळाने सदर घटकांची निवड केलेली असून विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्याचा विकास करत असताना त्यातील काही प्रगत कौशल्य देखील विकसित करण्याच्या विचार  करून या घटकांचा समावेश केलेला आहे. त्याचप्रमाणे समाजमाध्यमे आणि नवमाध्यमे यावरीलही काही कौशल्यांचा यात समावेश केलेला आहे. अर्थात ते विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी अधिक पूरक ठरणारे आहे. त्यामुळे भाषा प्रगल्भ होण्यास देखील मदत होते. या विविध कौशल्यांचा विकास करत असताना त्यांना स्वतःमध्ये देखील आवश्यक ते बदल करून घ्यावे लागतात आणि नकळतपणे त्यांचा दृष्टिकोन व्यापक होण्यास मदत होते. कल्पनाशक्तीचा विस्तार होतो. या कौशल्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास यामुळे हातभारच लागणार आहे.      \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48777556918501,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BhashechePragatKaoushalye-1_37a13c2b-5625-43d8-ac02-97dc8656a478.jpg?v=1776075125"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3.oembed","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}