{"title":"विचार आणि विचारवंत","description":"","products":[{"product_id":"पाश्चिमात्य-राजकीय-विचारवंत","title":"पाश्चिमात्य राजकीय विचारवंत","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराजकीय तत्वज्ञानाची पायाभरणी ही राजकीय विचारांच्या माध्यमातून होत असते. राज्यशास्त्रातील विविध घटकांमध्ये राजकीय विचारांच्या अभ्यासाला महत्वाचे स्थान असून आजही पाश्चिमात्य राजकीय तत्वज्ञानाची प्रेरणा जगभरातील विचारवंतांना, अभ्यासकांना आणि राष्ट्रांना नेहमीच मिळत राहील. पाश्चिमात्य देशातील राजकीय विचारांचा प्रारंभ हा प्राचीन ग्रीक तत्वज्ञानापासून झाल्याचे सर्वजण मान्य करतात. ग्रीक विचारवंत अॅरिस्टॉटल यांना राज्यशास्त्राचे जनक म्हटले जाते. युरोपियन देशातील राजकीय विचारांची प्राचीन परंपरा सॉक्रेटिसपासून सुरू झाली असून त्याचा प्रभाव प्लेटो, अॅरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतांवर तसेच युरोपीय देशातील राजकीय विचारांवरही दिसून येतो. म्हणूनच त्यांच्या विचारांचा, तत्वज्ञानाचा अभ्यास आजही आवश्यक व म्हणून महत्वपूर्ण आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात पाश्चिमात्य देशातील प्रगल्भ विचारवंत, तत्वज्ञानी असलेल्या प्लेटो, अॅरिस्टॉटल, मॅकॅव्हली, लॉक, रुसो, हेगेल, जॉन स्टुअर्ट मिल, कार्ल मार्क्स यांचा समावेश करण्यात आला असून त्यांचे विचार नेहमीच मार्गदर्शक ठरतील यात तीळमात्र शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451364749541,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Pachimatya-Rajkiya-Vicharvant-Nikumbh-Pune_cnvt-1.jpg?v=1771575567"},{"product_id":"भारतीय-राजकीय-विचारवंत","title":"भारतीय राजकीय विचारवंत","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराजकीय तत्वज्ञानाची पायाभरणी ही राजकीय विचारांच्या माध्यमातून होत असते. जगातील; विशेषत प्राचीन भारतातील सर्व प्राचीन धर्मग्रंथ अथवा अन्य ग्रंथसंपदा अभ्यासल्यास हे त्वरीत लक्षात येईल. आधुनिक भारताचा प्रारंभच मुळी भारतात ब्रिटीशांच्या आगमनानंतरचा आहे. ब्रिटीशांचे विचार अथवा सुधारणा ह्या भारतीयांसाठी अकल्पनीय अशा होत्या. परिणामी भारतीयांमध्ये विचारमंथनास सुरुवात झाली. राजा राममोहन रॉय यांनी त्यास वैचारिक आधार देऊन प्रबोधन काळाचा प्रारंभ केला. म. ज्योतीराव फुले, स्वामी दयानंद सरस्वती, ना. गोखले, आगरकर, न्या. रानडे, दादाभाई नौरोजी, लो. टिळक, म. गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. आंबेडकर, पं. नेहरू, अरविंद घोष, एम.एन. राय, मौलाना आझाद इत्यादी विचारवंतांनी भारतातील बदलत्या परिस्थितीला अनुरूप व भविष्यकालीन उपाय योजना म्हणून तत्कालीन आवश्यकतेतून व जतनेचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी – सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, राष्ट्रवादी, आंतरराष्ट्रवादी, शांतता, सहअस्तित्व, भारताचे स्वातंत्र्य इ. विविध विषयांवर चिंतन करून वैचारिक मांडणी केली. प्रस्तुत पुस्तकात या विविधांगी निवडक घडामोडींचा समावेश केलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48460553355493,"sku":null,"price":235.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Rajkiya-Vicharwant_Dr-Dilipsingh-Nikumbh_cnvt-1.jpg?v=1771917598"},{"product_id":"पाश्चिमात्य-राजकीय-विचारवंत-1","title":"पाश्चिमात्य राजकीय विचारवंत (Western Political Thinkers)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराजकीय तत्वज्ञानाची पायाभरणी ही राजकीय विचारांच्या माध्यमातून होत असते. राज्यशास्त्रातील विविध घटकांमध्ये राजकीय विचारांच्या अभ्यासाला महत्वाचे स्थान असून आजही पाश्चिमात्य राजकीय तत्वज्ञानाची प्रेरणा जगभरातील विचारवंतांना, अभ्यासकांना आणि राष्ट्रांना नेहमीच मिळत राहील. पाश्चिमात्य देशातील राजकीय विचारांचा प्रारंभ हा प्राचीन ग्रीक तत्वज्ञानापासून झाल्याचे सर्वजण मान्य करतात. ग्रीक विचारवंत अॅरिस्टॉटल यांना राज्यशास्त्राचे जनक म्हटले जाते. युरोपियन देशातील राजकीय विचारांची प्राचीन परंपरा सॉक्रेटिसपासून सुरू झाली असून त्याचा प्रभाव प्लेटो, अॅरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतांवर तसेच युरोपीय देशातील राजकीय विचारांवरही दिसून येतो. म्हणूनच त्यांच्या विचारांचा, तत्वज्ञानाचा अभ्यास आजही आवश्यक व म्हणून महत्वपूर्ण आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात पाश्चिमात्य देशातील प्रगल्भ विचारवंत, तत्वज्ञानी असलेल्या अॅरिस्टॉटल, मॅकॅव्हली, रुसो, जॉन स्टुअर्ट मिल, कार्ल मार्क्स, हॅराल्ड जे लास्की यांचा समावेश करण्यात आला असून आजही त्यांचे विचार नेहमीच मार्गदर्शक ठरतील यात तीळमात्र शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48461600555237,"sku":null,"price":235.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Pashchimatya-Rajkiya-Vicharwant_Dr-Dilipsingh-Nikumbh_cnvt-1.jpg?v=1771918900"},{"product_id":"लष्करी-विचारवंत","title":"लष्करी विचारवंत","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राकृतिक घटकांच्या अनुषंगाने ठरविलेले संरक्षणविषयक धोरणक्षेत्र विचार म्हणजेच सैनिकी विचार होत. सैनिकी शक्ती, सुरक्षेच्या हमी किंवा संरक्षणाच्या योग्य व्यवस्थेशिवाय राष्ट्रीय अस्तित्व टिकू शकत नाही. त्याचा मूलभूत स्त्रोत म्हणजे आपले विचारवंत होत. विचारवंत हे अर्थशास्त्रज्ञ, राजनीतीज्ञ, समाजसेवक, भूगोलतज्ञ, उद्योगपती किंवा लढवैय्ये योद्धा असतील, त्या सर्वांच्या सारासार विचारसरणीतून देशाचे भवितव्य साकारते. देशाची प्रगती, स्थैर्य, शांतता व स्वातंत्र्य अबाधित राहते. प्रस्तुत लिखाणात पाश्चात्य विचारवंताबरोबर पौर्वात्य विचारवंतही विचारात घेतले आहेत. शिवाय सर्व प्रमुख महान भारतीयांची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रामुख्याने कौटिल्य, श्री छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, मोहनदास गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, वि.दा. सावरकर, पं. नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, लालबहादूर शास्त्री, शहीद भगतसिंग, इंदिरा गांधी, श्री अटलबिहारी वाजपेयी, फील्ड मार्शल सॅम, माणेकशा, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यासारख्या देशहितवादी विचारवंतांच्या विचाराचा समावेश असून जनरल सन्त्जू, मॅकियाव्हेली निक्कोलो, गुस्तावस एडाल्फ पासून तर कॅप्टन सादत आणि इसाकू साटो पर्यंतच्या पाश्चात्य विचारवंतांचाही समावेश केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474232553701,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Lashkari-Vicharvant-1.jpg?v=1772093976"},{"product_id":"वर्तमान-परिस्थितीत-पंडित-नेहरुंच्या-विचारांची-आवश्यकता","title":"वर्तमान परिस्थितीत पंडित नेहरुंच्या विचारांची आवश्यकता","description":"\u003cp\u003eभारतामध्ये आणि जगामध्ये इतरत्र धर्मांच्या नावाखाली चाललेल्या गोष्टी पाहून मला धर्माबद्दल घृणा येते. धर्म नेहमी अंधविश्वास, मतांधता इत्यादी गोष्टींना आश्रय देतो अशी माझी समजुत आहे. धर्म नेहमी भविष्य, परलोक इत्यादी संबंधी चर्चा करतो. परंतु ज्या जगात मी जगतो त्याविषयी मला प्रेम व आदर असल्यामुळे पार लौकिक जीवनाविषयी मी विचारही करीत नाही व ते मला आवडतही नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eधर्मांमुळे जर राष्ट्रा-राष्ट्रात, व्यक्ती-व्यक्तीत संघर्ष निर्माण होणार असेल तर तो धर्म नसून धर्माचे भ्रष्ट स्वरुप आहे. धर्माचा विचार आणि मूल्यमापन हे नेहमी सामाजिक हिताच्या दृष्टीकोनातूनच व्हावयास पाहिजे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474253689061,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Pandit-Nehurs-1.jpg?v=1772094117"},{"product_id":"वर्तमान-परिस्थितीत-महात्मा-गांधीजींच्या-विचारांची-आवश्यकता","title":"वर्तमान परिस्थितीत महात्मा गांधीजींच्या विचारांची आवश्यकता","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474663190757,"sku":null,"price":535.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/gandhi-1-1.jpg?v=1772106353"},{"product_id":"पंडीत-जवाहरलाल-नेहरुंचे-राजकिय-तत्वज्ञान","title":"पंडीत जवाहरलाल नेहरुंचे राजकिय तत्वज्ञान","description":"\u003cp\u003eभारतामध्ये आणि जगामध्ये इतरत्र धर्माच्या नावाखाली चाललेल्या गोष्टी पाहून मला धर्माबद्दल घृणा येते. धणर्म नेहमी अंधविश्वास, मतांदता इत्यादी गोष्टींना आश्रय देतो अशी माझी समजुत आहे. धर्म नेहमी भविष्य, परलोक इत्यादी संबंधी चर्चा करतो. परंतु ज्या जगात मी जगतो त्याविष्यी मी विचारही करीत नाही व ते मला आवडतही नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eधर्मामुळे जर शब्दा-शब्दात, व्यक्ती-व्यक्तीत संघर्ष निर्माण होणार असेल तर तो धर्म नसून धर्माचे भ्रष्ट स्वरुप आहे. धर्माचा विचार आणि मूल्यमापन हे नेहमी सामाजिक हिताच्या दृष्टीकोनातूनच व्हावयास पाहिजे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474672431333,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Pant-Nehuru-final-1.jpg?v=1772106746"},{"product_id":"समकालिन-राजकिय-मुद्दे","title":"समकालिन राजकिय मुद्दे (Contemporary Political Issues)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारतीय राजकारणात समकालीन राजकीय मुद्दे म्हणून जे सामोरे आलेले आहेत त्यात मुख्यत्तेव मानवाधिकार, माहितीचा अधिकार, नक्षलवाद, नवे आर्थिक धोरण या अनुषंगाने जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण तसेच भ्रष्टाचार, दहशतवाद, शेतकरी आत्महत्या यांचा सर्वंकष उहापोह या संदर्भग्रंथातून करण्यात आलेला आहे. नव्वदीच्या दशकात आलेल्या जागतिकीकरणाच्या धोरणाने अर्थव्यवस्था ढवळून निघाली. सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात आलेली स्थित्यंतरे टिपून त्याची चिकित्सा सद्यस्थितीत होणे गरजेचे होते. भारत जागतीक महासत्ता म्हणून पुढे येऊ पहात आहे. या पार्श्वभूमीवर येथील मुख्य राजकीय मुद्दयांची चिकित्सा होऊन उपयुक्त तोडगा निघणे अत्यंत निकडीचे आहे. या ग्रंथातील विभिन्न मुद्दयांना हाताळतांना त्या संदर्भातील झालेली मांडणी महत्त्वपूर्ण आहे. मानवाधिकाराचे क्षेत्र अधिक विस्तारू लागले आहे. त्याच्या कक्षाही रूंदावल्यात, त्यामुळे या मुद्दयांकडे पाहण्याची अभ्यासकांची दृष्टी कशी असावी याचे साधार विवेचन यामध्ये आहे. जागतिकीकरणाचा प्रभाव व परिणाम केवळ आर्थिक व्यवस्थेपर्यंत मर्यादीत राहिलेला नसून त्याने मानवाधिकार, नक्षलवाद, भ्रष्टाचार, दहशतवाद, शेतकरी आत्महत्या या प्रश्नांना व्यापून टाकलेले आहे. सरकारी पातळीवर घडत असलेला भ्रष्टाचार करोडो, अब्जो रूपयामध्ये परावर्तीत झालेला असून राजकीय व्यवस्थेच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू पहात आहे. खुल्या बाजारपेठीय धोरणांचा परिणाम कृषी क्षेत्रावर मोठया प्रमाणावर पडला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील धान्य कृषी अवजारे शेतीत घ्यावयाची उत्पादने व किटकनाशके याबाबत एकाधिकारशाही निर्माण झाल्याने त्याचा परिणाम शेतकर्यांच्या आत्महत्यांवर झालेला आहे. यासंदर्भातील तर्कशुद्ध मांडणी आकडेवारी सादर करून त्या प्रश्नांचे गांभीर्य ठसठसीतपणे अधोरेखित केलेले आहे. नक्षलवादाचा प्रश्न आता केवळ अंतर्गत व्यवस्थेला धोका इथपर्यंत मर्यादीत राहिलेला नाही. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी जवळीक व शस्त्रास्त्रांची आयात यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान मिळोलेले आहे. नक्षलवाद, वैचारिकता, त्याची कारणमीमांसा, नियोजनातील अर्थशुन्यता तसेच राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील प्रश्नाबाबतची संवेदनशिलता याची चिकित्सा सदर प्रकरणातून लेखकाने केलेली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474719682789,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samkalin-Rajkiya-Mudde_Bhange-1.jpg?v=1772108047"},{"product_id":"आधुनिक-राजकीय-विश्लेषण","title":"आधुनिक राजकीय विश्लेषण (Modern Political Analysis)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474722369765,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhunik-Rajkya-Vishaleshan-1.jpg?v=1772108170"},{"product_id":"प्राचीन-व-आधुनिक-भारतीय-राजकीय-विचारवंत-भाग-1","title":"प्राचीन व आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत (भाग 1)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474728136933,"sku":null,"price":475.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Adhunik-Rajkiya-Vicharvant-1-1.jpg?v=1772108423"},{"product_id":"आधुनिक-भारतीय-राजकीय-विचारवंत-भाग-2","title":"आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत (भाग 2) (Modern Indian Political Thought)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474740326629,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhunik-Bhartiya-Rajkiya-Vicharvant-2-1.jpg?v=1772108642"},{"product_id":"स्वातंत्र्योत्तर-भारतीय-राजकीय-विचारवंत-भाग-3","title":"स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकीय विचारवंत (भाग 3)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474773684453,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Swantyothar-Bhartiya-Rajkiya-Vichar-3-1.jpg?v=1772108887"},{"product_id":"पाश्चिमात्य-राजकीय-विचारवंत-2","title":"पाश्चिमात्य राजकीय विचारवंत (Western Political Thought)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपाश्चिमात्य देशामध्ये प्रामुख्याने युरोपीयन देशातील राजकीय विचारांची प्राचीन परंपरा राहिलेली आहे. पश्चिमी विचार हे सॉक्रेटीस पासून सुरु झाल्याचे मानले जाते. त्यांचा प्रभाव प्लेटो, अॅरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतावर दिसून येतो. प्लेटोपासून ही परंपरा सुरु होऊन हॅराल्ड लास्की व त्यानंतरही सुरु आहे. या विचारपंरपरेची फार मोठी शृंखला आहे. त्या सर्व विचारवंताचा परामर्श मार्यादित स्वरुपाच्या ग्रंथात मांडणे अशक्य आहे. म्हणून त्या त्या काळातील प्रतिनिधी म्हणून निवडक विचारवंत घेऊन मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. पाश्चिमात्य विचारवंतांचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व विचारवंत समाजाच्या सर्व घटक अंगांना स्पर्श करतात. त्यामुळे त्यांनी मांडलेल्या सर्व स्पर्शी विचारांचा परामर्श घेणे आवश्यक असले तरी ग्रंथाच्या मार्यादेमुळे ते अशक्य आहे. म्हणून प्रतिनिधिक विचारवंत आणि त्यांचे निवडक विचार यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्राचीन ग्रीक परंपरेतील प्लेटो, अॅरिस्टॉटल, मध्ययुगाचा प्रतिनिधी म्हणून मॅकियान्हॅली, सामाजिक करार सिद्धांत मांडणार्या हॉब्ज, लॉक, रुसो उपयोगितावादी विचारवंत म्हणून जे. एस. मिल, आदर्शवादी विचारवंत टी.एच. ग्रीन, समाजवादी विचारवंत म्हणून कार्ल मार्क्स आणि 20 व्या शतकांचा प्रतिनिधी म्हणजे हॅरॉल्ड लास्की यांचा समावेश या ग्रंथात करुन त्यांचे महत्त्वपूर्ण असणारे विचार यांची ओळख प्रस्तुत ग्रंथात करण्याचा हा प्रयत्न केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474792820965,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Western-Political-Thought-1.jpg?v=1772109019"},{"product_id":"महात्मा-गांधीजींचे-तत्वज्ञान","title":"महात्मा गांधीजींचे तत्वज्ञान","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eवैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड़ पराई जाणे रे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपरदुःखे उपकार करे तोये, मन अभिमान ने आणे रे ।\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसकल लोकमां सहुने वंदे, निन्दा न करे केनी रे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवाच, काछ, मन निश्छल राखे, धन-धन जननी तेनी रे।\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसमदृष्टि ने तृष्णा त्यागी, पर स्त्री जेने मात रे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजिह्वा थकी असत्य न बोले, परधन नव झाले हाथ रे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमोह माया व्यापे नहिं जेनें, दृढ वैराग्य जेना मनमां रे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eरामनाम शुं ताली लागी, सकल तीरथ तेना तनमां रे,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवणलोभी ने कपटरहित छे, काम-क्रोध निवार्या रे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभणे नरसैंयों तेनुं दरसन करतां कुल एकोतेर तार्या रे ।\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474811990245,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mt1.-Gandhi-Cover-Page-final-1.jpg?v=1772109147"},{"product_id":"वर्तमान-परिस्थितीत-डॉ-बाबासाहेब-आंबेडकरांच्या-विचारांची-आवश्यकता","title":"वर्तमान परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आवश्यकता","description":"\u003cp\u003e‘जनतेचे सरकार, जनतेसाठी सरकार व सरकार जनतेचे’ हा सिद्धांत आपण टिकविण्यासाठी निर्धार केला पाहिजे. त्यासाठी आपल्या मार्गात येणार्या वाईट गोष्टी, अडथळे ओळखण्यात वेळ दवडता कामा नये. जेणेकरुन आपण आपल्या लोकांना जनतेसाठी सरकार ऐवजी जनतेचे सरकार ही भूमिका स्वीकारायला भाग पाडू. अयोग्य सरकारे हलविण्यात आपण दुबळे राहणार नाही. हाच एक देशसेवा करण्याचा मार्ग आहे. यापेक्षा चांगला मार्ग मला माहीत नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e26 जानेवारी 1950 रोजी भारत एक लोकशाहीवादी देश होईल. याचा अर्थ, या दिवसापासून भारतात लेकांचे सरकार असेल, लोकांनी चालविलेले सरकार असेल, व लोकांसाठी सरकार असेल. पुन्हा तोच विचार माझ्या मनात घोळत राहतो, भारताच्या लोकशाहीवादी घटनेचे काय होईल…? भारतीय लोक ही घटना अबाधित ठेवतील काधधध? का ही घटना नष्ट होईल…? हा विचार माझ्या मनात येतो तेव्हा मी खूप चिंताग्रस्त होतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– डॉ. बी. आर. आंबेडकर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474828931301,"sku":null,"price":650.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Dr-Ambedkar-1.jpg?v=1772109269"},{"product_id":"राजकारणातील-आधुनिक-संकल्पना-आणि-विचार","title":"राजकारणातील आधुनिक संकल्पना आणि विचार","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराज्यशास्त्रातील आणि राजकारणातील नेतृत्व, आरक्षण, राष्ट्रवाद, जमातवाद आणि दहशतवाद या आधुनिक संकल्पनांची मांडणी तसेच राज्य, लोकशाही, राष्ट्रवाद, समाजवाद आणि सार्वभौमत्व या संकल्पनाविषयी पाश्चात्य तसेच भारतीय राजकिय विचारवंताचे विचार यांची सुसंगत आणि वस्तुनिष्ठ स्वरूपात मांडणी करण्याचा प्रयत्न सदरील पुस्तकात केला आहे. यासोबतच नेतृत्व, आरक्षण, राष्ट्रवाद, जमातवाद, दहशतवाद, राज्य, लोकशाही, राष्ट्रवाद, समाजवाद आणि सार्वभौमत्व या आधुनिक संकल्पनांच्या विविध विचारवंतांनी केलेल्या व्याख्या, अर्थ, स्वरूप, विविध घटक, गुणवैशिष्ट्ये, प्रकार, फायदे व तोटे, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि यथायोग्य ठिकाणी विविध उदाहरणांसह स्पष्टीकरण केलेले असून पुस्तकाची भाषा अत्यंत साधी व सोपी असून सर्वांना सहज समजेल अशी असल्याने प्रस्तुत पुस्तक विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक यासोबतच सर्वांना लाभदायक ठरेल यात शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477815144677,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aadhunik-Rajkiy-Sankalpna-Aani-Vichar_Dr-Shriram-Yerankar_cnvt-1.jpg?v=1772191081"},{"product_id":"डॉ-बाबासाहेब-आंबेडकर-यांचे-राष्ट्र-उभारणीत-योगदान","title":"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्र उभारणीत योगदान","description":"\u003cp\u003eप्रज्ञासुर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार होणे ही मानव कल्याणाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. बाबासाहेबांनी मानवी जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारे लेखन व प्रबोधन केले आहे. त्यांच्या विचारांचा अनुनय हा समाजामध्ये मानवी मुल्य, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय यांची रुजवात करण्यास सदैव मार्गदर्शक राहील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे उद्धारकच नव्हेत तर तळागाळातील धार्मिक रूढी-परंपरा यांना छेद देऊन राष्ट्र उभारणीमध्ये संपूर्ण भारतातील दलित आणि दलितेतर, सवर्ण समाजातील कर्मठ विचार व अनिष्ठ रूढींपासून सुटका करून जनजागृती आणि सामाजिक चळवळीच्या माध्यमांतून राष्ट्र उभारणीमध्ये योगदान देण्याबाबत प्रयत्नशील होते. डॉ.बाबासाहेबांनी कठोर परिश्रम, अथक प्रयत्न, असामान्य तडफ आणि जाज्वल्य निष्ठा याद्वारे भारतातील व विदेशातील शक्य ते उच्च शिक्षण घेतले. आणि विद्वान पंडीत, चतुरस्त्र लेखक, स्वतंत्र वृत्तीचे आणि निर्भीड विचारवंत म्हणून नावलौकिक मिळविला. सामाजिक न्याय प्रस्थापित करणारा अलौकिक सेनानी व राष्ट्राला राज्यघटना दिल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जनमानसात स्थान अढळ राहील.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअनिती, अन्याय, अत्याचार व शोषणाच्या विरोधातील प्रखर लढ्याच्या उत्तुंग मानदंड असणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन काळात मांडलेले विचार आजही खूप मार्गदर्शक व संयुक्तीक वाटतात. तथागत गौतम बुद्धांची शांती, छत्रपती शिवरायांची क्रांती व संत कबिरांची व महात्मा फुलेंची माणूसकी इ. सुंदर मिश्रण होवून त्यांचे विचार व कृती माणसाला प्रगतीच्या, प्रकाशाच्या दिशेने घेवून जातात. तसेच स्वाभिमानाने जीवन जगायला शिकवतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनकार्य, त्यांचे कृतीशील तत्वज्ञान, त्यांची विचारधारा समस्त भारतीयांसाठी दिपस्तंभ आहेत. त्यातूनच आम्ही उद्याच्या शांतीचा संदेश देणार्या व प्रसंगी क्रांतीसाठी तयार असणार्या समृद्ध, सशक्त व स्वाभिमानी भारताची निर्मिती करू शकतो.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477839425765,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Contributions-of-Dr.-Babasaheb-Ambedkar-in-Nation-Building2_cnvt-1.jpg?v=1772191987"},{"product_id":"नाशिक-जिल्ह्यातील-संसद-सदस्य-जीवन-व-कार्य","title":"नाशिक जिल्ह्यातील संसद सदस्य (जीवन व कार्य)","description":"\u003cp\u003eस्वातंत्र्यपुर्व व स्वातंत्र्योतर काळात भारतीय राजकारणात नाशिक जिल्ह्यातील विविध राजकीय नेत्यांनी भारताच्या व महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. प्रस्तुत पुस्तकात त्या त्या काळातील सामाजिक-राजकीय व्यवस्थेचे विवेचनासोबतच जिल्ह्यातील बदलत गेलेले राजकारणाचाही समावेश होतो. नाशिक लोकसभा मतदारसंघ अत्यंत जागरुक व संवेदनशील असल्याचे जनतेने वेळोवेळी दाखवून दिले आहे. गेल्या 70 वर्षातील लोकसभेच्या उमेदवारांची माहिती, जिल्ह्यातील राजकीय पक्ष, चिन्ह, विविध नेते, निवडणुकीतील विजयी व पराभूत उमेदवारांना मिळालेली मते तसेच त्या वेळेच्या निवडणुकीतील वातावरण यांचाही यथायोग्य समाचार लेखकाने प्रस्तुत पुस्तकात घेतला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनाशिक जिल्ह्यातील लोकसभा आणि राज्यसभा यांचा अभ्यासपूर्ण लेखाजोखा राज्यशास्त्राचे प्राध्यापक प्रदीप देशपांडे यांनी प्रस्तुत लिखाणातून घेतला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदरील ग्रंथ नाशिक, मालेगांव, धुळे या जिल्ह्यातील राजकीय नेते, कार्यकर्ते सामाजिक, राजकीय कार्याचे अभ्यासक, विद्यार्थी, प्राध्यापक तसेच पत्रकार, राज्यशास्त्राचे अभ्यासक आणि जिज्ञासूंकरीता उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477850861797,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Nashik-Jilhyatil-Sansad-Sadsya_Dr-Pradip-Deshpande_cnvt-1.jpg?v=1772192074"},{"product_id":"भारतीयांच्या-हृदयातले-सरदार-वल्लभभाई-पटेल","title":"भारतीयांच्या हृदयातले सरदार वल्लभभाई पटेल","description":"\u003cp\u003eवयाच्या तब्बल चाळीस वर्षापर्यंत स्वातंत्र्यलढ्यापासून अलिप्त राहिलेल्या सरदारांनी स्वातंत्र्यलढ्यात प्रवेश केल्यावर त्यास मिळालेली ऊर्जा, गती, दिशा व अनुषंगाने बदललेली लढ्याची सर्वसमावेशक दशा याचे समग्र, सादयंत शब्दचित्रण लेखिकेने प्रभावीपणे, समर्थपणे चित्तारले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहात्माजींच्या अहिंसेचा सार्थ अर्थ आणि हेतू सरदारांमुळे सिद्ध होतो. शारीरिक मानसिकदृष्ट्या समर्थ असूनही अहिंसेने ‘लढा देऊन’ संघटनशक्तीने विघटनशक्तीचे उच्चाटन करण्याचा पराक्रम ‘सरदारच’ करू जाणे या सर्वांचा शब्दवेल्हाळ परिचय करण्यात लेखिका यशस्वी झालेली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘अहिंसेचे जनकत्व’ जसे बापूंकडे जाते तसे भारताच्या अखंडतेचे मातृत्व सरदारांकडे जाते. अखंड, एकसंघ, एकात्म भारतीय संघराज्याच्या निर्माणाचा पुरूषार्थ घडवितांनाच्या घटना, प्रसंग घ्यावे लागलेले कठोर निर्णय याचे समग्र विवेचन परिणामकारकरित्या या पुस्तकात समर्पक व सहज सुलभ शब्दात आपल्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतीयांच्या हृदयातले ‘सरदार’ वल्लभभाई पटेल हे चरित्र्यपुष्प सरदारांच्या अनेकविध लोकदुर्लभ गुणवैशिष्ट्यांचा अजरामर कस्तुरीसुगंध भारतीय वाचकांपर्यंत खचितच पोहचविणार आहे यात शंका नाही.\u003cbr\u003eया पुस्तकाच्या अनुषंगाने सरदारांवरील मराठी वाङ्मयात नक्कीच भर पडली आहे. सदर पुस्तक हे समस्त भारतीयांना सरदारांच्या विषयी असलेल्या जिज्ञासेला नक्कीच पूर्ण करेल.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477897982181,"sku":null,"price":399.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiyancha-Hrudyatle-Sardar-Vallabhabhai-Patel_cnvt-1.jpg?v=1772193306"},{"product_id":"आधुनिक-भारतीय-राजकीय-विचारवंत","title":"आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत","description":"\u003cp\u003eआधुनिक भारताचा प्रारंभच मुळात ब्रिटिशांच्या आगमनानंतरचा आहे. ब्रिटिशांनी सोबत आणलेली नवीन पुष्ये व नवीन विचार भारतीयांसाठी नवीन होते. त्यातून सामाजिक आर्थिक, धार्मिक सुधारणांना प्रारंभ झाला व या नवीन बदलाचे पडसाद एकूण भारतीय जीवनावर पडले व त्यामुळे विचारमंथनालाही चालना मिळाली. राजा राम मोहन रॉय यांनी त्यास वैचारिक आधार देऊन प्रबोधनकालाचा प्रारंभ केला. महात्मा जोतिराव फुले, स्वामी दयानंद सरस्वती, नामदार गोखले, आगरकर, न्यायमूर्ती रानडे, दादाभाई नवरोजी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरु, अरविंद घोष, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, एम. एन. रॉय, मौलाना आझाद, राम मनोहर लोहिया इत्यादी विचारवंतांनी भारतातील बदलत्या परिस्थितीला अनुरुप व भविष्यकालीन उपाययोजना म्हणून तत्कालीन आवश्यकतेतून व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या विषयांवर चिंतन करुन वैचारिक मांडणी केली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआधुनिक भारतीय विचारवंतांनी भारताचे स्वातंत्र्य, भारताचा राजवाद, आंतराष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, भारतातील आर्थिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय प्रश्न त्यासाठी करावयाची उपाययोजना, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा भारत, शासनाचे परराष्ट्र धोरण, अंतर्गत योजना, राज्यघटना शासन पद्धत इत्यादी संदर्भात वेळोवेळी व्यक्त करण्यात आलेले राजकीय विचार हाच भारताचा राजकीय विचाराचा वारसा आहे व त्याचा आधार घेऊन या देशाची राजकीय जडण-घडण संपन्न झाली असून, भारताचा राजकीय विकास होत आहे. म्हणूनच आधुनिक भारतीय राजकीय विचारांचा अभ्यास हा आवश्यक ठरतो.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477932323045,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhunik-Bharitya-Rajkiya-Vicharvant_cnvt-1.jpg?v=1772194687"},{"product_id":"सद्यस्थितीत-महात्मा-गांधी-पंडीत-नेहरु-आणि-डॉ-बाबासाहेब-आंबेडकरांच्या-विचारांची-गरज","title":"सद्यस्थितीत महात्मा गांधी, पंडीत नेहरु आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची गरज","description":"\u003cp\u003eभारतावर ब्रिटीशांचे सुमारे दिडशे वर्ष राज्य होते, भारत पारतंत्र्यात होता. या पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करुन सामाजिक स्वातंत्र्य, मानवी स्वातंत्र्य मिळण्यासाठी राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, लाला लजपतराय, बिपीन चंद्रपाल, उमेशचंद्र बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, नामदार गोखले, फिरोज शहा मेहता आदिंनी मोठे योगदान दिले. 1920 नतरंच्या काळात भारतीय स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधींकडे नेतृत्व आले. त्यांनी सत्य, अहिंसा, प्रेम, असहकार, हरताळ, उपोषण, स्वदेशी, परदेशी मालावर बहिष्कार, मिठाचा सत्याग्रह अशा विविध अंगांनी महात्मा गांधींनी जनतेचं वैचारिक प्रबोधनाबरोबर कृतीयुक्त सहभाग करुन घेतला त्यामुळे राजकीय चळवळीत अधिकाधिक जनता सामिल होऊन आंदोलने तीव्र झालीत व ब्रिटीश राजवटीच्या चळवळीला शह दिला. पुढे अनेकांच्या प्रयत्नातून देशास 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. महात्मा गांधींवर ‘रस्कीन’च्या ‘Un to the Last’ या पुस्तकातील विचारांचा प्रभाव होता. तसेच टॉलस्टायच्या “तुमच्या हृदयात परमेश्वराचा निवास आहे” या विचारांचा प्रभाव होता. या तत्वज्ञानातच मानवतावाद आपणांस दिसतो. महात्मा गांधींनाही मानवतेचे पुजारी संबेधले जाते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसर्वच जगाने दुसज्या महायुध्दाचे भिषण परिणाम अनुभवलेले आहेत. विज्ञान व तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीचा उपयोग केवळ मानवी कल्याणासाठीच व्हावा, विनाशासाठी नाही असे पंडित जवाहरलाल नेहरुंचे धोरण होते. म्हणून त्यांनी जागतिक शांततावाद, अलिप्ततावाद स्विकारुन पंचशिल तत्व जगासमोर ठेवलीत व साम्राज्यवादाला विरोध केला. यातून पंडित नेहरुंचे वैश्विक शांततेचं धोरण समाजाला त्यांच्यातील मानवतावाद लक्षात येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटनेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, प्रेम, न्याय व हक्क ही तत्वे सर्वांना दिलीत. त्यांनी सर्व धर्म, पंथं व जात यासाठी न्याय राज्यघटना बहाल केली. यातून त्यांची मानवतावादी दृष्टी लक्षात येते.\u003cbr\u003eमहात्मा गांधी, पंडित नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तिनही व्यक्ती मानवतावादी होत्या. मानवहित हेच त्यांचे जीवन होते. आज सर्व जगाला दहशतवादाने जेरीस आणले आहे. भारतात दहशतवादा बरोबरच नक्षलवादानेही तोंड वरती काढले आहे. तेव्हा सर्वच राष्ट्रांनी अशा विघातक शक्ती घालविण्यासाठी प्रयत्नशील राहून शांततामय जीवन जगणे आवश्यक आहे. म्हणून संयुक्त राष्ट्र संघाच्या (णछज) जबाबदारी बरोबर प्रत्येक राष्ट्राचीही मोठी जबाबदारी आहे. सर्वच राष्ट्रांनी सत्य, अहिंसा, प्रेम व मानवतावाद याचा अवलंब केला तरच जागतिक शांतता स्थापित होईल, अन्यथा अखिल मानवजात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या अयोग्य, अविचारी वापराने धोक्यात येईल. म्हणून महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन चरित्र व कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी, विद्यार्थी व सुजाण नागरिक घडविण्यासाठी ते अभ्यासून अधिकाधिक कृतीत येणे गरजेचे वाटते.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477935370469,"sku":null,"price":475.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Gandhi-Nehru-Ambedkar_Processding_cnvt-1.jpg?v=1772194866"},{"product_id":"पाश्चिमात्य-राजकीय-विचारवंत-3","title":"पाश्चिमात्य राजकीय विचारवंत","description":"\u003cp\u003eतर्कशास्त्र व वैज्ञानिक क्षेत्रातील प्रगतीचा आधार घेवून विचारवंत समाजात निर्माण होणाऱ्या विविध पेचांचे समाधान शोधतो व त्याद्वारे नवा विचार, नवीन जीवनपद्धतीचा जन्म होतो. त्याद्वारे सामाजिक, धार्मिक, आर्थिक व राजकीय संरचनेत वेगवेगळे प्रयोग सिद्ध होतात व त्याद्वारे समाजपरिवर्तन घडून येते. याच वैचारिक अधिक्याचा आधार घेवून समाजात वेगवेगळ्या चळवळी उभ्या राहतात. विचारवंतांच्या नवीन मांडणीतून अपूर्णतेची जाणीव होऊन नवा विचार, नवे भान आणि नवीन ज्ञानाची प्रक्रिया जन्मास असते. म्हणून तत्वचिंतक हे आधुनिकतेचे वाहक ठरतात. त्याच्या आधारावर समाजातील विविध संस्था, राज्य, धर्म इत्यादीचे स्वरूप बदलत असते. सर्व संस्थेतील प्राचीन परंपरा, विचार, श्रद्धा, मिथके आणि अमुलाग्र परिवर्तने घडवू आणण्यात विचारवंताचे योगदान खूप मोलाचे ठरते.\u003cbr\u003eप्रस्तुत ग्रंथात प्लेटो, ॲरीस्टॉटल, निकोलो मॅकेव्हली, थॉमस हॉब्ज, जॉन लॉक, जीन जेक्स रूसो, जेरेमी बेंथम, जॉन स्टुअर्ट मिल, जॉर्ज विल्हेम हेगेल, थॉमस हील ग्रीन, कार्ल मार्क्स, हेरॉल्ड लास्की या विचारवंतांच्या तत्वज्ञान, राज्य, युद्ध, स्वातंत्र्य, नागरी समाज, शासन, आदर्श, स्त्रीस्वातंत्र्य, हक्क व अधिकार, शिक्षण, क्रांती, सामाजिक परिवर्तन, समानता, विश्वबंधुत्व इत्यादी विविधांगी मुद्द्यांचे सविस्तर विवेचन केले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePashchimatya Rajkiya \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48480012271845,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Pachimatya-Rajkiya-Vicharvant_Dr-Arun-Wanarase_cnvt-1.jpg?v=1772278274"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%a4.oembed?page=2","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}