{"title":"संतसाहित्य \/ लोकसाहित्य","description":"","products":[{"product_id":"अहिरानी-लोकसाहित्य-दर्शन-खंड-तिसरा-‌-वानोया","title":"अहिरानी लोकसाहित्य दर्शन (खंड – तिसरा) ‌‘वानोया’","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eखान्देशातील महाराष्ट्राला परिचित असलेले, ख्यातनाम ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील ज्यांना ‘साहित्य अकादमी-2000′ पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. त्यांचा हा 84 वर्षांच्या काळातील तिसरा खंड. 1958 सालापासून सर्वप्रथम लोकसाहित्य संकलन व संशोधन करून, मराठी वाचकांना अहिराणी साहित्याची गोडी कळावी व एक आदर्श संस्कृतीशी परिचय व्हावा या उदात्त हेतूने प्रेरीत होवून महाराष्ट्रातील निरनिराळ्या दिवाळी अंक, दैनिकात विविध विषयांवर सुमारे 100 लेख प्रसिद्ध केले. त्यांचे अहिराणी लोकसाहित्य दर्शन खंड-1 (सण आणि उत्सव), खंड-2 (नाती-गोती) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई-32 ने प्रकाशित केले असून त्या ग्रंथांचा एम.ए.द्वितीय वर्षाला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव सह महाराष्ट्रातील इतर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे. खान्देशच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे विषय, जावय-आसरा-बोन, जलमदिन-पाँची-बारस, डाग-डागीना, प्रथा-रुढी-रितीरिवाज, इत्यादींचा ‘वानवळा’ वाटायला आता ते निघालेले आहेत. समस्त सुज्ञ मराठी वाचकांनी त्यांची चव अवश्य चाखावी!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48400143122661,"sku":null,"price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Ahirani-Loksahitya-Darshan_Vanoya_Krishna-Patil_cnvt-1-198x300.jpg?v=1770884263"},{"product_id":"परम-वैज्ञानिक-भगवान-महावीर","title":"परम वैज्ञानिक भगवान महावीर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजैन परिवार में जन्म और विज्ञान का विद्यार्थी होने पर भी 65 वर्ष की आयु में बहुत विलंब के पश्चात मेरा जैन दर्शन की वैज्ञानिकता से परिचय हुआ| इस सत्य का ज्ञान होने पर निर्मित अपराध-बोध से बड़ी ग्लानि हुई| इस दोष का प्रायश्चित्त करने हेतु जैन दर्शन के विज्ञान का अभ्यास करने का निश्चय किया| इस अध्ययन में उत्पन्न कठिनाइयों के समाधान ढूंढता रहा| कहीं-कहीं आवश्यक शोध-कार्य भी किया| विशेषतः विज्ञान के संबंध में ज्ञान प्राप्त करने में यह अनिवार्य ही था| शोध कार्य और मनन, चिंतन और मंथन से दृष्टि का विकास हुआ|\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eगत लगभग 500 से अधिक दिनों से प्रतिदिन एक संदेश ट्वीटर (Twitter) पर भेज रहा हूं| इस संदेश को बहुत अच्छा प्रतिसाद मिला है| अभी लगभग 1750 से अधिक सदस्य इस संदेश को नियमित रूप से पढ़ते हैं| कुछ पाठक शंकायें उपस्थित करते हैं, उनके समाधान भी ट्वीटर पर भेजता हूं| लगभग 1000 से अधिक व्हाट्सअप (WhatsApp) सदस्यों को प्रतिदिन एक संदेश भेज रहा हूं| इसमें पहले सामायिक साधना पर 201 संदेश प्रस्तुत किये| इन संदेशों द्वारा सामायिक साधना का सही अर्थ पाठक\/साधक समझें, इसमें उपयोजित विज्ञान वे जानें-समझें, साधना के वास्तविक लाभ किस प्रकार प्राप्त हो सकते हैं, इससे वे परिचित हो, इसका विश्लेषण दादा-दादी और पोता-पोती संवाद रूप में प्रस्तुत किया है| (यह पुस्तक स्वतंत्र रूप से प्रकाशित हो रही है|) उसके पश्चात प्रतिक्रमण ज्ञान-विज्ञान पर संदेश भेजने का क्रम निरंतर जारी है|\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401101095141,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Param-Vaidnyanik-Bhagwan-Mahaveer_cnvt-1-198x300.jpg?v=1770890104"},{"product_id":"ग्रामीण-साहित्य-लोकसाहित्य-कला","title":"ग्रामीण साहित्य-लोकसाहित्य कला लोकल ते ग्लोबल","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401595597029,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Gramin-Sahitya-Loksahitya-Kala_Dr-Bapurao-Desai_cnvt-1-198x300.jpg?v=1770893702"},{"product_id":"संत-एकनाथांच्या-अभंगातील-लोकतत्व","title":"संत एकनाथांच्या अभंगातील लोकतत्व","description":"\u003cp\u003eडॉ. अपर्णा साबणे यांनी संत एकनाथांच्या व्यक्तित्वातील तसेच त्यांच्या अभंगातील हे वेगळेपण विचारात घेऊन संत एकनाथांच्या अभंगांचा लोकतत्त्वीय दृष्टीने अभ्यास करण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. संत एकनाथांच्या अभंगांचा लोकतत्त्वीय अभ्यास करताना त्यांनी काव्य म्हणून अभंगाकडे पाहण्याची रसिकता व वाङ्मयीन आस्वादाची दृष्टीही बाळगली ही विशेष. त्यामुळे त्यांचा अभ्यास रुक्ष न होता, नाथांच्या अभंगांचा काव्यात्म आस्वादाचा प्रत्यय देणारा झाला आहे. हे प्रथम सांगावेसे वाटते.\u003cbr\u003eडॉ. अपर्णा साबणे यांनी एकनाथांच्या स्फुटरचना, कथा काव्य, चरित्र काव्य, विविधस्वरुपी अभंग, भारुडे इत्यादींच्या स्वरुप-विशेषांची समीक्षा करून या रचनांतील लोकतत्वे उलगडून दाखविण्याचा या लोकतत्त्वांच्या स्वीकारातून अभंगांना प्राप्त झालेला वेगळेपणा, त्यांतील लोकपण इत्यादी वैशिष्ट्यांची सोदाहरण चर्चा केलेली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– प्रा. डॉ. शरद व्यवहारे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473715212517,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/santh-eknath-1.jpg?v=1772084085"},{"product_id":"भक्ती-शक्ती-गीते","title":"भक्ती शक्ती गीते","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473717997797,"sku":null,"price":50.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhakti-Shakti-Geete.jpg?v=1772084297"},{"product_id":"सुबोध-श्री-पंतगुरुचरित्र-पोथी","title":"सुबोध श्री पंतगुरुचरित्र पोथी","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473727992037,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Subodh-Shri-Pantgurucharitra-Pothi_Khemraj-Hari-Khadke_cnvt-1.jpg?v=1772084994"},{"product_id":"श्री-संत-एकनाथांच्या-अभंगातील-भक्ती","title":"श्री संत एकनाथांच्या अभंगातील भक्ती","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474258079973,"sku":null,"price":399.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shree-Sant-Ekanathanchya-Abhangatil-Bhakti_cnvt-1.jpg?v=1772094130"},{"product_id":"प्राचीन-मराठी-संत-कवयित्री","title":"प्राचीन मराठी संत कवयित्री","description":"\u003cp\u003eमध्ययुगीन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वाङ्मयीन परंपरेत संतांचे कार्य आणि संतांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. भारताची भूमी ही निर्मळ भावनेची आणि श्रद्धेची आहे. या निर्मळ भावनेतूनच भक्तीप्रवाह निर्माण झाला. या सात्विक प्रवाहाने भारताचे सांस्कृतिक जीवन समृद्ध केले. भक्तीच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचे कार्य या प्रवाहाने केले. महाराष्ट्राच्या भूमीत नवविचारांची बीजे पेरली गेली. समतेचे, बंधुत्वाचे पीक आले. समाजाच्या सर्व स्तरातील असंख्य स्त्रीपुरुष तेथे एकत्र आले. वर्णभेद, जातीयता, स्त्रीला कोणतेच स्थान नाही अशा परिस्थितीमध्ये कसलाही विचार न करता आत्मोन्नतीसाठी संत कवयित्रिंनी जी परमेश्वराची भक्ती केली ती अत्यंत महत्वाची आहे. त्यांना मनःशुद्धी महत्वाची वाटली म्हणून त्यांनी भक्तीमार्ग स्विकारला. या संत कवयित्रीच्या अभंगामधून प्रतिबिंबित होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eखाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या काळात संपूर्ण कुटूंबव्यवस्थेवर आघात होत आहेत ही व्यवस्थाच छिन्नभिन्न होत आहे. आत्महत्या, खून, मारामारी, आतंकवाद, भ्रष्टाचार याला उधाण आले आहे. दूरदर्शन विविध वाहिन्या, सोशल मिडीया यांच्या प्रचारामुळे व दुरुपयोगामुळे तरुण पिढी दिशाहीन होत आहे. सर्व दूर भीती आणि असुरक्षिततेमुळे तरुण पिढी संयम हरवून तणावग्रस्त झाली आहे. अशा असुरक्षित वातावरणातून तरुणांना सावरण्यासाठी मध्ययुगीन प्रबोधन परंपरेचे प्रभावी साधन म्हणून संत साहित्याची गरज भासते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंत कवयित्रींची अभंगवाणी अभंग, अक्षय, अविनाशी, अक्षरवाणी आहे. संत कवयित्रींची अभंगवाणी, ‘एक भक्तिकाव्य, भक्तिसाठी, भक्तितून, भक्तिकरिता, निर्माण झालेले अभंगकाव्य, अभंगवाणी अभंगगाथा होय.’\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477384966373,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Marath-Sahityatil-Sant-Kavyitri3-1.jpg?v=1772174020"},{"product_id":"निवडक-अभंग-ज्ञानेश्वर-ते-तुकाराम","title":"निवडक अभंग – ज्ञानेश्वर ते तुकाराम","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअभंग आणि ओवी या लोकाविष्काराचे माध्यम स्वीकारून संतकवींनी आपले अनुभव शब्दांकित केले. संतांचे साहित्य अध्यात्मपर, परमार्थपर असले तरी ते ज्या वास्तव जीवनातून बहरले, फुलले त्या वास्तव जीवनाचे रूप, रंग आणि गंध त्याला सहजच लाभले. सामाजिक वास्तवाचे भान त्यातूनच प्रकटले. विठ्ठलभक्तीबरोबरच दु:खमुक्ती आणि ऐहिक जीवनातील ताण-तणाव, संघर्ष यांचे चित्र त्यातून साकार झाले. यादव काळात महानुभाव आणि वारकरी असे दोन संप्रदाय उदयाला आले. वारकरी संप्रदाय अधिक खोलवर रुजला. संतवाङ्मयाच्या मागे वारकरी पंथाचे तत्त्वज्ञान होते. पंथीय प्रेरणा असूनही हे वाङ्मय केवळ प्रचारकी बनले नाही. ही चळवळ वाङ्मयीन बनली, जीवनस्पर्शी बनली. चळवळीचे साहित्य म्हणून त्याकडे पाहता येते. सभोवतालचे वास्तव, मध्ययुगीन गतिरुद्धता आणि भक्तीच्या निमित्ताने व्यक्तिस्वातंत्र्याचा केलेला पुकारा या सर्वांचा वाङ्मय निर्मितीवर काय परिणाम झाला हे तपासणे आज गरजेचे आहे. संत साहित्य केवळ अध्यात्मपर आहे, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. संतांच्या अभंगातील आकृतीसौंदर्य, रचना विशेष, गेयगुण यांच्या बरोबरच त्यातील आशयसंपन्नता, परिवर्तनवादी विचारशक्ती यांचाही परामर्ष घेणे मला आवश्यक वाटते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा अभ्यास आज दुर्लक्षित होत आहे. वारकरीपंथीय तत्त्वज्ञानातील परिवर्तनवादी विचार व संतसाहित्य यांचा परस्पर संबंध समजून घेतल्यास चळवळीतून साहित्यसृजन कसे होते व ते त्या चळवळीला व परंपरेला बळ देत देत पुढील साहित्य निर्मितीस कसे प्रेरक ठरू शकते, याचाही हिशेब मांडणे आजच्या संदर्भात शक्य होईल. विशिष्ट कालखंडाचा साहित्यावर प्रभाव व त्या साहित्यातून निर्माण झालेल्या विचारांचा कालखंडावर परिणाम असे परस्पर संबंधाचे स्वरूपही यातून पाहता येईल. साहित्य आणि समाजजीवन यांचे नाते तपासणे व साहित्य निर्मितीमागील प्रेरक शक्ती समजावून घेणे एवढे जरी भान या निमित्ताने आले तरी पुरेसे आहे. अभ्यासक, विद्यार्थी, रसिक या प्रयत्नाचे स्वागत करतील असा विश्वास वाटतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477443850469,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Nivdak-Abhang_Cnvt-1.jpg?v=1772176153"},{"product_id":"संत-चोखामेळा-आणि-मी-एक-समीक्षा","title":"संत चोखामेळा आणि मी एक समीक्षा","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमहाराष्ट्राच्या वैचारिक जडण-घडणीमध्ये मध्ययुगीन कालखंडाचे आणि संत चळवळीचे महत्त्वपूर्ण योगदान रहिले आहे. सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया या काळामध्ये अधिक गतिमान झाली. कारण विविध जाती-धर्मातील संतांचा प्रवर्ताचा विचार यासाठी कारणीभूत ठरला. चातुर्वर्ण्य व्यवस्थेने गलितगात्र झालेला भारतीय समाज या चळवळीने थरारुन उठला. नामदेवापासून तुकाराम महाराजांपर्यंतच्या सर्व संतांनी समाजाच्या दंभावर प्रहार केला. या सर्व संतांमध्ये तत्कालीन परिस्थितीचा विचार करु जाता शुद्रातीशुद्रामधून आलेल्या संत चोखामेळ्याचे कार्य ठळकपणे नजरेत भरणारे आहे. मात्र चोखोबांच्या या वेगळ्या भूमिकेचा शोध महाराष्ट्राने घेतलाच नाही. या पार्श्वभूमीवर ‘संत चोखामेळा आणि मीः एक समीक्षा’ या समीक्षा ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित होण्यासारखे आहे.’\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477454696677,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sant-Chokhamela-Aani-Mi-Ek-Samiksha-1.jpg?v=1772176492"},{"product_id":"संत-साहित्य-संशोधन-काही-आयाम","title":"संत साहित्य संशोधन काही आयाम","description":"\u003cp\u003eसंत साहित्याचे विविध आयाम संशोधनदृष्ट्या तपासतांना समाजसमूहासाठीचे विविधांगी उद्बोधन नजरेसमोर येते. या उद्बोधन परंपरेतून समाजप्रबोधनाच्या दिशा दृश्यमान होतांना दिसतात. दृश्यमान होणार्या या दिशा प्रकाशमान सत्याला स्पर्श करीत राहातात. डॉ. भाऊसाहेब गमे आणि प्रा. धनराज धनगर यांच्या संपादनातून प्रकाशमान दिशांचे स्पष्ट होणे अधिकाधिक अधोरेखित होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– प्रा. डॉ. म. सु. पगारे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"My Store","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477461414117,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sant-Sahitya-Sanshodhan-Kahi-Aayam-1.jpg?v=1772176754"},{"product_id":"श्री-एकनाथ-महाराजांची-निवडक-भारुडे","title":"श्री एकनाथ महाराजांची निवडक भारुडे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंतसाहित्याची चिकित्सा स्वातंत्र्यपूर्ण काळापासून आजतागायत चालू आहे. समाजशास्त्रीय दृष्टीने संतसाहित्याचे अवलोकन करताना नाथवाड्ःमयातील भारुड रचनेचा आवर्जून उल्लेख केला जातो. नाथांसारख्या व्युत्पन्न कवीची ही रचना सर्वसामान्यांना आकलन होण्याच्या दृष्टीने लिहिलेली आहे. समाजाच्या विविध स्तरातील सामान्य माणसे नाथांनी आपल्या कवितेत उभी केली. त्यांची दुःखे, त्यांची वेदना, त्यांचे मन भारुडामधून व्यक्त झाले. दुसर्या बाजूने विचार केला तर समकालीन सामान्य जनांचा एक पट नाथांनी भारुडांमधून चित्रित केला. नाथकालीन समाजचित्रण या दिशेनेही भारुडांचा विचार करता येईल. भारुड या वाड्ःमय प्रकाराचे एक अंग लिखित संहितेचे असले तरी दुसरे अंग सादरीकरणाचे आहे. नृत्यनाट्याच्या माध्यमातून भारुडे सादर करणारी परंपरा महाराष्ट्राने सांभाळली. लोकसूहाचे प्रबोधन करणे, लोकसमूहाला दिशा देणे, सामान्य जनांना विचार प्रवृत्त करणे असाही विचार नाथांच्या भारुडांमध्ये बघता येतो. नाथांनी जेवढे विविध रचनाबंध काव्य लेखनासाठी हाताळले, तेवढे क्वचितच दुसर्या कवीने हाताळलेले आढळतील. महाराष्ट्रात बहुरुढ झालेल्या भारुडाने महाराष्ट्राची बहुजिनसी संस्कृती आपल्या डोळ्यासमोर उभी केली. अध्यात्म आणि समाजदर्शन या दोन्ही अंगानी महाराष्ट्राची सत्त्वशील परंपरा जनत करण्याचे काम भारुड वाड्ःमयाने केले आहे. केवळ मनोरंजन हे नाथांच्या भारुडाचे प्रयोजन कधीच नव्हते. नाथकालीन प्रबोधनाच्या कल्पना समजावून घेण्याच्या दृष्टीने ही भारुडांचा अभ्यास महत्वाचा ठरावा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477469212901,"sku":null,"price":70.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shri-Eknath-Maharajanchi-Nivdak-Bharude-1.jpg?v=1772177179"},{"product_id":"संतांची-अभंगवाणी-मध्ययुगीन-निवडक-संत","title":"संतांची अभंगवाणी मध्ययुगीन निवडक संत","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमहाराष्ट्राच धार्मिक जीवनात विठ्ठल हा एक परवलीचा शब्द आहे. अकराव्या शतकापूर्वी कृषी जीवन जगताना नदीच्या वाळूत विठ्ठल नामाचा गजर करीत समतेची हाक देत मानवतेच्या शाळेची मुहूर्तमेढ रोवली गेली. तुळशीचा हार, कपाळी गंध, हातात टाळ एवढ्या गणवेशातील काही समाजधुरीनांनी ही शाळा सुरु केली. आणि पाहता पाहता ही शाळा मानवतेचे विद्यापीठ बनले. माणूस, माणूसकी, मानवता हे अभ्यासक्रमातील घटक अर्भयासण्यासाठी आषाढी कार्तिकीला शेतीची कामे आटपून संसारी माणसे मानवतेची पताका घेऊन दिंडी दिंडीने या शाळेत येऊ लागलेत. या वारीत सहभागी होणारे वारकरी अठरा पगड जातीधर्माचे होते. मानवतेच्या विद्यापीठाचे वारकरी म्हणून पंढरीची वाट चालू लागले. विठू नामाच्या शाळैचे ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांच्या सोबतीला गोरोबा, विसोबा, मुक्ताई, जनाई, सोयरा असे अनेक मान्यवर होते. त्यांनी वारकरी संप्रदाय विकसीत केला. व माणसाला माणूसकीची शिकवण दिली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआज महाराष्ट्रात पंढरीरायाचे दर्शन घेणारे सर्व भाविक मानवतेचा व शांततेचा वसा घेऊन वारी करतात. वारीला धार्मिक अर्थ असला तरी सामाजिक दृष्ट्या ही एक चळवळ आहे. मानवतेचा तो एक लाँगमार्च आहे. एक इव्हेंट आहे. हे तत्त्वज्ञान अखंडपणे संस्कारीत व्हावे म्हणून समाजभाषेतून लिहिणार्या कवींना संत म्हणून समाज गौरवाने मिरवितो. प्राणीमात्रा विषयी अपार करुणा, दया, प्रेम असलेल्या या संतांचे कार्य व तत्त्वज्ञान काव्यरुपाने अभ्यासतांना भाषा, समाज, संस्कृती यांची शिकवण मिळते. हे कार्य तुकडोजी महाराज, गाडगेबाबांच्या रुपाने अंखडपणे सुरु राहिले कारण संतांचे हे काव्यच मुळी अभंग आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477472817381,"sku":null,"price":55.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Santanchi-Abhangwani-1.jpg?v=1772177332"},{"product_id":"घुमान-मधील-बाबा-नामदेवजी","title":"‘घुमान’ मधील बाबा नामदेवजी","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477529604325,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Ghuman-madhil-baba-namdev-1.jpg?v=1772179692"},{"product_id":"प्रबोधनकार-संत-तुकाराम","title":"प्रबोधनकार संत तुकाराम","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eईश्वरनिष्ठा, जनहिताचा कळवळा, सत्यनिष्ठा, विवेकनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, सूत्रमयता, आक्रमकता, निर्भीडता, विद्रोह, नित्यनूतनता, शाश्वतता, स्पष्टवक्तेपणा रोखठोकपणा, अर्थनिर्णयनस्वातंत्र्य, अनुभवाचे अधिष्ठान ही तुकोबांच्या प्रबोधनाची वैशिष्ट्ये हीच या ग्रंथाचीही वैशिष्ट्ये आहेत. 'देहीं देव', 'जनीं जनार्दन', 'भूतीं भगवंत', 'जगी जगदीश्वर', 'विश्वी विश्वंभर' हे तुकोबांचे अध्यात्मिक प्रबोधन वाचकाला आत्मदर्शन, ईश्वरदर्शन घडवते. 'नाम' हे भक्तीचे सोपे साधन त्यांनी सांगितले. 'माणुसकी' हे तुकोबांच्या धार्मिक प्रबोधनाचे सार होय. माणूस हाच 'विश्वात्मक देव'. त्याची सेवा हीच भक्ती. समाजात कसे वागावे, कसे वागू नये, हे त्यांचे सामाजिक प्रबोधन होय. स्वयंघोषित परमपूज्य हे दांभिक, ढोंगी, धर्मठक होत. त्यांचा भ्रांत ईश्वरवाद हे पाखंड आहे. देवाला, धर्माला, समाजाला श्रद्धाळू माणसांना साधन म्हणून वापरणारे, देवालाच बंदी बनवून स्वतःचे 'देव' म्हणून प्रोजेक्शन करणारे, भावसमर्पण, भावपुष्प अशा गोंडस नावांनी आर्थिक शोषण करणारे, 'दादागिरी' करणारे हे 'मुलाम्याचे नाणे। तुका म्हणे नव्हे सोने ।। खरे संत व संतांची सोंगे सत्य असत्याशी मन ग्वाही करून तपासून पाहावे. पाखंड खंडण हेही धर्माचेच काम आहे, हे तुकोबांच्या प्रबोधनाचे सारसूत्र होय. प्रा. सु.का जोशी प्रबोधनकार संत तुकाराम प्रा.डॉ. प्रकाश सपकाळे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477717332197,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Saint-Tukaram-1.jpg?v=1772186464"},{"product_id":"श्रीरामभक्त-हनुमान","title":"श्रीरामभक्त हनुमान","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477718806757,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shrirambhaktta-Hanuman-1.jpg?v=1772186689"},{"product_id":"सुवर्ण-संतरत्न-चरित्र-संग्रह","title":"सुवर्ण संतरत्न (चरित्र संग्रह)","description":"\u003cp\u003eआनंदाच्या डोही आनंद तरंग सहजता सुलभता आणि उत्कटतेंच्या त्रिवेणी संगमावर सुनिल सोनार भक्तीरसात समरस होवुन जेव्हा 'सुवर्णरत्न संत' चरित्र लिहीतात. तेव्हा ते मन बुध्दी हृदय स्थिर करुन 'संतमय' होवून जातात... आणि ह्या आंतरीच्या तळमळीमुळेच ते संताच्या मांदीयाळीतले संतश्रेष्ठ शिरोमणी नरहरी महाराज, सद्गुरु साईबाबांना 'आवो साई' नामकरण करणारे संत म्हाळसापती यांचे चरीत्र लिहिण्यात कमालीचे यशस्वी झालेले दिसून येतात.\u003cbr\u003eअवघाची संसार सुखाचा करुन 'त्रिभुवनात आनंद पेरण्याची ही 'सुनिल सोनार' यांची वहीवाट यशस्वी होवो की साईचरणी प्रार्थना.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477725851877,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Suvarna-Santratna-Narhari-Sonar-1.jpg?v=1772187198"},{"product_id":"संतांचे-शब्दामृत","title":"संतांचे शब्दामृत","description":"\u003cp\u003eप्रस्तुत ग्रंथात ‘श्रीतुकाराम गाथा’ मधून निवडक अभंग घेऊन त्यावर भाष्य करण्यात आले आहे. क्षणोक्षणी हाचि करावा विचार, सुख पाहता जवापाडे, म्हणऊनि शरण जावे, कन्या सासुऱ्याशी जाये, बोल बोलता वाटे सोपे, बळियाचे अंकित, मढे झाकुनिया करिती पेरणी, असो खळ ऐसे फार हे निवडक व जीवनविद्या शिकविणारे अभंग घेतलेले आहेत. सर्वच अभंग जीवनाला योग्य वळण देणारे आहेत. म्हणून संतसंगतीची तातडी जीवनात करावी. कारण की आयुष्य हे क्षणभंगुर आहे. केव्हा काय होईल सांगता येत नाही. जीवनाची क्षणभंगुरता लक्षात घेऊन तातडीने संतसमागम करावा. म्हणजे पुढील विघ्ने टळतील. मनाला शांतता लाभेल. आपल्या हातून वाईट कार्य घडणार नाही.संपूर्ण विश्वालाच या संत विचारांची गरज आजही आहे. हा संत वारसा आपण सर्वांनी चालविण्याची गरज आहे. त्या दृष्टीने केलेले कार्य उत्कृष्ट आहे. सर्वांनी मनापासून वाचावा, जीवनाचे मोल समजून घ्यावे व भविष्याकडे योग्य वाटचाल करावी. प्रस्तुत ‘संतांचे शब्दामृत’ हा ग्रंथ जगत्मान्य-वाचकप्रिय होईल, यात शंकाच नाही.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477906108645,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Santanche-Shabdamrut_Dr-Aananda-Varangane_cnvt-1.jpg?v=1772193558"},{"product_id":"गुर्जरी-लोकगीते-काव्यसौष्ठव-भावदर्शन-व-मूल्यमापन","title":"गुर्जरी लोकगीते : काव्यसौष्ठव, भावदर्शन व मूल्यमापन","description":"\u003cp\u003eगुर्जरी लोकगीतांचे काव्यसौष्ठव, भावदर्शन व मूल्यमापन या संदर्भ ग्रंथात गुर्जरी बोलीभाषेतील लोकगीतांच्या माध्यमातून भाषाशास्त्रीय दृष्ट्या व्याकरण तपासले असून गुजरी लोकगीतांत अलंकार आल्याने भाषेतील सौंदर्यस्थळं शोधता आले. गुर्जरी लोकसाहित्यातील लोकगीत या प्रकारात समाजाच्या चालीरीती, राहणीमान, विधी-विधान यांचे वर्णन असून ठिकठिकाणी विविध भाव-भावनांचेही दर्शन होताना आढळून येते. त्या अनुषंगाने गुर्जरी लोकगीतांतील काव्यसौष्ठव, भावदर्शन व त्यांचे मूल्यमापन करून गुर्जरी बोलीभाषेच्या अभ्यासाचे महत्त्व सदर ग्रंथाद्वारे पटवून दिले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479730565349,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Gurjari-Lokgitanche-Kavyasauthav-Bhavdarshan-v-Mulyamapan_Dr-Savita-Patel_cnvt-1.jpg?v=1772260173"},{"product_id":"संतप्रबोधन","title":"संतप्रबोधन","description":"\u003cp\u003eसंत आणि महाराष्ट्र हे नातं अतूट आहे. वारकरी संप्रदायाच्या आचारविचारांनी अखिल मराठी जगताचं जगणं समृद्ध अन् सुगंधित केलं. संत विचार कालातीत आहेत. प्रत्येक काळात त्यांनी सकारात्मक मार्ग दाखविला. भेदाभेदाला तिलांजली देत माणसाला माणूसपण दिलं. कीर्तन परंपरेनं तर संत विचारांची पताका कायम फडकवत ठेवली. संतनगरी शेगाव येथील निवासी ह.भ.प. डॉ. श्री. हरिदास आखरे यांनी केवळ उक्तीच नव्हे, तर कृती आणि लेखणीतूनही सद्विचार मांडला. त्यांच्या दैनंदिन जगण्यातून वारकरी जीवनपद्धतीला प्रकट केलं. वारकरी तत्त्वज्ञान त्यांनी अतिशय तन्मयतेनं प्रस्तुत केलं. जगण्याचा भाग बनविलं.\u003cbr\u003eविविध माध्यमांमध्ये वेळोवेळी लेखणीतून पसरलेला हा सुगंध या पुस्तक रूपात एकत्र आला आहे. अतिशय सुलभ व लाघवी भाषालंकारानं नटलेला हा संग्रह एक विचारकस्तूरी आहे!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e– संदीप भारंबे,\u003cbr\u003eकार्यकारी संपादक, सकाळ, विदर्भ\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479852167397,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Santprabodhan_Dr-Haridas-Akhare_cnvt-1.jpg?v=1772272972"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af.oembed?page=2","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}