{"title":"संरक्षणशास्त्र","description":"","products":[{"product_id":"लष्करी-कायदा","title":"लष्करी कायदा","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399749578981,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Lashkari-Kayada_Prof-A-P-Chaudhari_cnvt-1-198x300.jpg?v=1770878018"},{"product_id":"युद्धनीती-विचारवंत-भाग-१-२","title":"युद्धनीती विचारवंत भाग १ – २","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48400033939685,"sku":null,"price":115.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Yuddhaniti-Vicharvant_-1-768x1157.jpg?v=1770883667"},{"product_id":"समग्र-संरक्षणशास्त्र-व-सामरिकशास्त्र","title":"समग्र संरक्षणशास्त्र व सामरिकशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकोविड-19 च्या वाढत्या प्रसारामुळे भविष्यातील विद्यापीठीय परीक्षा ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ वा बहुपर्यायी स्वरूपाचे असेल ही शक्यता गृहित धरून प्रस्तुत पुस्तकाची रचना करण्यात आली. नेट-सेट आणि स्पर्धा परीक्षेच्या परीक्षेतदेखील बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात म्हणून पुस्तकाची रचना करतांना महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील संरक्षणशास्त्र व सामरिकशास्त्र विषयाच्या पदवी आणि पदव्युतर वर्गाच्या अभ्यासक्रम, नेट\/सेट अभ्यासक्रम, संघ आणि राज्यलोकसेवा आयोग परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षेच्या राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमाचा विचार करण्यात आला. संरक्षणशास्त्र व सामरिकशास्त्र विषयावर विविध तज्ञांनी लिहिलेल्या संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणीत लक्षात घेऊन प्रस्तुत पुस्तकांची रचना वैशिष्ट्यपूर्णरित्या करण्यात आली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात पहिल्या भागात रणनीती विचारवंतांची माहिती तर दुसऱ्या भागात युद्ध, शांतता व सुरक्षा प्रश्न, आपत्ती व्यवस्थापन, जागतिक सुरक्षा प्रश्न, दहशतवाद व नक्षलवाद, राष्ट्रीय सुरक्षा, मानवाधिकार\/मानवी हक्क, राज्यशास्त्र व संरक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान व राष्ट्रीय सुरक्षा, आंतरराष्ट्रीय संबंध व संघर्ष, आण्विक, जैविक, रासायनिक युद्ध, संरक्षण अर्थशास्त्र, सायबर युद्ध इ. विविधांगी मुद्द्यांचा घटकनिहाय समावेश केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"My Store","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401823236325,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samagra-Saurakshan-V-Samrikshashra_-Prof-A-P-Chaudhari_cnvt-1-198x300.jpg?v=1770897132"},{"product_id":"संरक्षण-पत्रकारितेची-मूलतत्त्वे","title":"संरक्षण पत्रकारितेची मूलतत्त्वे","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48409440780517,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanvrakshan-Patrakritechi-Multatve_Dharmadhikari-1-768x1155.jpg?v=1770972219"},{"product_id":"सायबर-सुरक्षेची-मुलतत्वे","title":"सायबर सुरक्षेची मुलतत्वे (Basics of Cyber Security)","description":"\u003cp\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत संरक्षण आणि सामरिक शास्त्र अभ्यास मंडळांने द्वितीय वर्ष कला या वर्गासाठी 2020 च्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची पुनर्रचना केली. त्यात हा विषय अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांना व वाचकांना ज्ञानप्राप्तीसाठी उपयुक्त अशा विविध विषयांचा समावेश केला. त्यातील एक म्हणजे “सायबर सिक्युरिटी” विषय होय. सायबर सुरक्षेचे महत्त्व सर्वज्ञात आहे. सायबर सुरक्षा वाढत्या डिजिटल जगात व्यक्ती आणि संस्थांचे कामकाज, डेटा, बौद्धिक संपदा, ग्राहक माहितीचे संरक्षण आणि सेवा सुरक्षित ठेवण्यास मदत करते. सायबर सुरक्षा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रणालींचे संरक्षण करते. “सायबर सुरक्षेची मूलतत्त्वे” या पुस्तकात सायबर सुरक्षेचा अर्थ, महत्त्व, व्याप्ती, घटक याचबरोबर इंटरनेट, नेटवर्क, सॉफ्टवेअर, सायबर गुन्हे, सायबर धोके, सायबर हल्ले, सायबर सुरक्षा आणि डिजिटल युद्ध पद्धती तसेच लष्करी कार्यवाहीसाठी आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली - उदाहरणार्थ एआय सिस्टीम या संदर्भात विविध घटकांची अत्यंत सोप्या भाषेत मांडणी केली आहे. सायबर सुरक्षा संदर्भात मराठीत केलेला हा लेखन प्रयत्न प्राध्यापक, विद्यार्थी व वाचक यांना अभ्यासासाठी उपयुक्त ठरेल आणि त्यांना निश्चित आवडेल अशी खात्री आहे\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48409493962981,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Cyber-Suraksha_Dharmadhikari-1-768x1155.jpg?v=1770978649"},{"product_id":"भारताचे-अंतर्गत-सुरक्षेचे-धोके-भाग-१-व-२","title":"भारताचे अंतर्गत सुरक्षेचे धोके भाग १ व २","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48409683558629,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartache-Antrgat-Surksheche-dhoke-1-768x1154.jpg?v=1770981962"},{"product_id":"दक्षिण-आशिया-आणि-भारत-अमेरिका-संबंध","title":"दक्षिण आशिया आणि भारत-अमेरिका संबंध","description":"\u003cp\u003eराष्ट्रीय अखंडता, सार्वभौमत्व, नितीमूल्यांचे संरक्षण तसेच बाह्य आक्रमणांचा प्रभावी प्रतिकार, सर्व राष्ट्रांच्या सुरक्षा धोरणाचे मुख्य ध्येय असते. 20 व्या शतकाच्या शेवटच्या दशकात सोव्हिएत संघाचे विघटनामुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षा समिकरण तसेच जगातल्या शक्तीच्या राजकारणावर व्यापक असा प्रभाव पडला. अमेरिकी नेतृत्वात स्थापन झालेली एक ध्रुवीय जागतिक प्रणालीमुळे प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक परिवर्तन, अव्यवस्था तसेच असुरक्षेचे वातावरण निर्माण झाले. शीतयुद्धाच्या समाप्तीचे फलस्वरूप आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षेच्या समोर नविन आव्हाने निर्माण झाली. त्याचबरोबर प्रादेशिक संघर्षांनाही प्रोत्साहन मिळाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्लामिक कट्टरपंथियांचा उदय तसेच दहशतवादाचे ध्रुवीकरण एका शक्तीकेंद्राच्या रुपाने अमेरिकी प्रभुत्वास आव्हान देताना दिसत आहे. 11 सप्टेंबर 2001 रोजी अल कायदाने अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय सुरक्षा समिकरणात बदल झाल्याचे दिसते. भारताने आतापर्यंत पाकिस्तानला चारवेळा पराभूत केले. 2017 मध्ये भारत आणि चीनमध्ये डोकलामवरून संबंध ताणले गेले तर दुसरीकडे बांग्लादेश, नेपाळ व श्रीलंकेबरोबर भारताचे द्विपक्षीय संबंध मैत्रीपूर्ण नाहीत. सद्य:स्थितीत भारताने आपल्या अलिप्ततावादी भूमिकेला तिलांजली दिलेली असून आज भारत महाशक्ती बनण्याकडे वाटचाल करीत असून महाशक्ती अमेरिकेने देखील भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. भविष्यात भारत-अमेरिका युती आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, यात आता शंका राहिलेली नाही.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48458284531941,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Dakshin-Aashiyache-Aani-Bharat-Amerika-Sambandha_Dr-N-Z-Patil_cnvt-1.jpg?v=1771847083"},{"product_id":"आंतरराष्ट्रीय-सुरक्षा-समस्या","title":"आंतरराष्ट्रीय सुरक्षा समस्या","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदुसर्या देशावर आक्रमण करुन त्याच्या जमिनीवर कब्जा करणे आता अशक्य आहे, या संभावित अंदाजाला आज चीनच्या आक्रमक व निष्ठूर धोरणाने तडा जावून युध्दाची प्रमेये बदल्याचा समज फोल ठरतो आहे. जगात संघर्षाचे स्वरुप बदलून त्यात विद्यूत गतीने फेरबदल होत आहेत. पारंपरिक युध्दांची जागा आता दहशतवाद, अराष्ट्रीय घटकांचा हिंसाचार व धार्मिक मूलतत्त्ववादाने घेतलेली आहे. शीतयुध्दानंतर जगातील संघर्ष कमी होतील; युध्द जवळपास नष्ट होऊन सर्वसमावेशक लोकशाहीची प्रस्थापना जगात सर्वदूर होईल या भाकीताला तडे गेले आहेत. एकीकडे अण्वस्त्र-अवकाश स्पर्धा, सायबर हल्ले, वैचारीक व मूलतत्त्ववादी संघर्ष, इस्लामी दहशतवाद्यांचे घृणास्पद अमानवीय कृत्ये, आर्थिक युध्दाचे वातावरण तर दुसरीकडे मानवी प्रमादांमुळेच निर्माण झालेले निसर्गाचे असंतुलन यामुळे मानवी अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालेला आहे. सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचे जीवघेणे आगमन हेदेखील अत्यंत चिंताजनक आहे. प्रस्तुत पुस्तकात या सर्व मुद्द्यांचा यथायोग्य आढावा घेण्यात आलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48466545967333,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Antarrashtriya-Surksha-Samasya_Dr-Devendra-Vispute_cnvt-1.jpg?v=1771920613"},{"product_id":"भारतीय-संरक्षण-यंत्रणा-आणि-संघटना","title":"भारतीय संरक्षण यंत्रणा आणि संघटना","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदेशाचे संरक्षण आणि सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी जशी सैन्यदलाची गरज असते. त्याचप्रमाणे सैन्याला दिशा देण्यासाठी संघटनेची गरज असते आणि ही संघटना उत्तम अशा प्रशासनाचा मूलभूत स्वरूपाचा पाया समजला जातो. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचे पद देशाची अंतर्गत व बाह्य सुरक्षा निश्चित करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभारताचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे आणि अंतर्गत कलहापासून राष्ट्रहित जोपासणे ही तिन्ही सेनादलांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यासाठी भूदल, नौदल आणि हवाई दल या तिघांचीही भूमिका स्वागतार्ह अशी आहे. यातील एकाही दलाचा निर्णय चुकल्यास राष्ट्राला फार मोठी किंमत मोजावी लागते. कुशलता आणि चातुर्य लाभलेल्या संरक्षक घटकास चांगल्या प्रकारे प्रशिक्षणही प्राप्त झालेले असते. भारताच्या तिन्ही दलांमध्ये चांगल्या लष्करी संघटनेसाठी उद्देश, सहकार्य, लवचिकता, समतोलपणा, काटकसर, विकेंद्रीकरण, प्रयत्नाची एकता आणि अचूकपणा या तत्त्व समरसून भरलेले आहे असल्यामुळे आज तिन्ही दले भारताची मान जगात उंचावताना दिसून येते. सावध भूमिका घेतानाच वेळप्रसंगी आक्रमकपणाचेही दर्शन तिन्ही दलांनी विविध प्रसंगी घेतलेल्या भूमिकांवरून दिसून येते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48467298746597,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Sanrkshan-Yantrana-Ani-Sanghatna_II_cnvt-1.jpg?v=1771920981"},{"product_id":"युद्ध-आणि-शांती-1945-पासून-इतिहास","title":"युद्ध आणि शांती (1945 पासून इतिहास)","description":"\u003cp\u003eयुद्धप्रवृत्ती सर्व प्राणीमात्रात निसर्गतःच जोपासली गेली आहे. आदिमानवापासून आतापर्यंत उत्क्रांतीमुळे बदलत्या मानवी जीवनातील युद्धाचे स्थान कधीही ढळले नाही; महत्व कमी झालेले नाही. मानवी सभ्यता आणि संस्कृतीचा विकास युद्धाशी संबंधित आहे. समाजाचे अस्तित्व आणि विकास युद्धामुळेच नियंत्रित होत आहे. दुसर्या महायुद्धानंतर उदयास आलेल्या अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन्ही महाशक्तींनी आपआपले अस्तित्व जोपासण्याचा प्रयत्न केला. दोन्ही महाशक्तींमध्ये संघर्ष तेवत राहिला तरी त्याचे रूपांतर प्रत्यक्ष युद्धात न होता शीतयुद्धात झाले. जागतिक राजकारणात अनेक स्थित्यंतरे दुसर्या महायुद्धानंतर झालीत.\u003cbr\u003eमहायुद्धानंतर सर्व देशात जागतिक स्तरावर, आर्थिक, सामाजिक, राजकीय व लष्करीशक्तीची नवीन मांडणी पुढे आली. त्या परिस्थितीत स्थानिक संघर्षानेही जोम धरला. शीतयुद्ध समाप्तीच्या उंबरठ्यावर असताना राजकीय घडामोडींना गतीमानता आली. महासत्तेचे केंद्र असलेल्या आशियाई खंडातील चीन, रशिया, भारत, जपान याच बरोबर इराणचे सत्ता वर्चस्व वाढीस लागले.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकात युद्ध संकल्पना, युद्धाची कारणे, युद्ध प्रकार, अणुयुद्ध, रासायनिक व जैविक युद्ध, जागतिक पुनर्रचनेची निर्मिती, शीत युद्ध, युद्ध आणि अर्थव्यवस्था, आधुनिक युद्ध सामरिकी, विविध करार, संघटना, सत्ता संतुलन, अलिप्ततावादी चळवळ वगैरे मुद्द्यांचा सर्वंकष विचारविमर्श केलेला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eYudha and Shanti\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48468452049125,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Yudha-ani-Shantata_Prof-A-P-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1771938357"},{"product_id":"युद्धाचे-वैचारिक-पैलू-युद्धाचे-संकल्पनात्मक-पैलू-भाग-2","title":"युद्धाचे वैचारिक पैलू (युद्धाचे संकल्पनात्मक पैलू) भाग 2 |Conceptual aspects of war - Part II","description":"\u003cp\u003eयुद्ध हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे प्रत्येक राष्ट्र संरक्षणाची काळजी घेत असते. देशाची सर्वंकष सुरक्षा ही काही केवळ सैन्याचीच जबाबदारी नसून ती देशाच्या सर्व नागरिकांची प्राथमिक जबाबदारी आणि मूलभूत कर्तव्य आहे. मानसशास्त्रीय व आर्थिक युद्धामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या शत्रूच्या लढण्याच्या क्षमतेचे खच्चीकरण करावयाचे असते. तर आण्विक-रासायनिक आणि जैविक युद्धामध्ये संपूर्ण मानवी संस्कृती नष्ट होण्याची क्षमता असून हे अत्यंत अमानवीय असे आहे. भारतीयांचे राष्ट्रीय एकता, अखंडता, स्वातंत्र्य आणि संरक्षण व सुरक्षा याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सर्व भारतीयांनी देशाच्या संरक्षणविषयी जागरूक असणे खूप गरजेचे असून विद्यार्थ्यांनी युद्ध, संघर्षांची कारणे आणि परिणामांचे मूल्यमापन, युद्धाच्या प्रगत सैद्धांतिक संकल्पनांचे अध्ययन केल्याने त्यांना युद्धांचे गंभीरपणे विश्लेषण आणि मूल्यांकन करणे सोपे जाईल.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470322053349,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Yuddhach-Vaicharik-Pail-II_Prof-A-P-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1772000834"},{"product_id":"भारतीय-लष्करी-इतिहास-भाग-2","title":"भारतीय लष्करी इतिहास (भाग 2)","description":"\u003cp\u003e\u003cspan style=\"text-decoration: underline;\"\u003eमुघल आक्रमक बाबरने तोफांचा वापर केल्याने त्याला भारतात विजय मिळवून मुघल साम्राज्य स्थापन करता आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने मुघल व आदिलशहा यांना आव्हान मिळाले. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत आधुनिक युद्धतंत्राचा उपयोग करण्याचा मराठ्यांनी अयशस्वी प्रयत्न केला. एकोणिसाव्या शतकात महाराजा रणजीतसिग यांनी शिख सेनेच्या रूपाने ब्रिटिशांसमोर मोठे आव्हान उभे केले. ईस्ट इंडिया कंपनीने भारतात स्थापन केलेले सैन्य हे आजच्या आधुनिक सेनादलांचे प्रारंभिक स्वरूप मानावे लागेल. भारतात आलेल्या एका व्यापारी कंपनीने ऐतदेशीय लोकांचेच सैन्य स्थापन केले. या सैनिकांनीच इंग्रजांना हा देश जिंकून दिला… म्हणूनच विद्यार्थ्यांनी भारताचा लष्करी इतिहासाचे अध्ययन केल्याने ते राष्ट्रीय संरक्षणाबद्दल जागरूक होतील. कारण इतिहासाची पुनरावृत्ती होते, हे ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. भारतीय लोकांनी दीर्घकाळ सीमांच्या संरक्षणाकडे व एकूणच देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केलेले आहे. परिणामी त्यांना परकीयांची गुलामगिरी करावी लागली. त्यामुळे त्यांना देशाच्या सुरक्षाविषयक प्रश्नांची जाणीव करून देणे आवश्यक ठरते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470556803301,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Lashkari-Itihas_Prof-A-P-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1772004147"},{"product_id":"युद्धाचे-वैचारिक-पैलू-युद्धाचे-संकल्पनात्मक-पैलू","title":"युद्धाचे वैचारिक पैलू (युद्धाचे संकल्पनात्मक पैलू)","description":"\u003cp\u003eयुद्ध हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. युद्ध राष्ट्राच्या अस्तित्व, स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वासाठी आवश्यक बाब असल्याने प्रत्येक राष्ट्र स्व-संरक्षणाची काळजी घेत असते. देशाची सर्वंकष सुरक्षेची जबाबदारी ही सर्व नागरिकांची असते. प्राचीन काळापासून भारतीयांचे राष्ट्रीय एकता, अखंडता, स्वातंत्र्य, संरक्षण व सुरक्षा याकडे दुर्लक्ष झाल्याने परकियांची सातत्याने आक्रमणे झाली. अनेक मोक्यांच्या वेळी भारतीयांना परकीयांविरुद्ध पराभव पत्करावा लागला. भारत हा जगातील नैसर्गिक-स्वाभाविक दृष्टीने सुरक्षित असूनही सीमेच्या रक्षणाकडे दुर्लक्ष केल्याने, आक्रमकांविरूद्ध योग्य उपाययोजना न केल्याने आपल्याला वारंवार पारतंत्र्यात जावे लागले. प्रस्तुत ग्रंथात युद्ध, संघर्षांची कारणे, परिणामांचे मूल्यमापन, युद्धाच्या प्रगत सैद्धांतिक संकल्पना, युद्धोत्तर निराकरण आणि संघर्षोत्तर शांतता निर्माण करण्यासाठीची धोरणे वगैरे विविधांगी मुद्द्यांचा विश्लेषणात्मक उहापोह केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470967353573,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Yuddhach-Vaicharik-Pail_Prof-A-P-Chaudhari_cnvt-1-800x1209.jpg?v=1772024435"},{"product_id":"आण्विक-शस्त्रास्त्रे-विरोधी-चळवळी-व-राजकारण","title":"आण्विक शस्त्रास्त्रे विरोधी चळवळी व राजकारण","description":"\u003cp\u003eअण्विक शस्त्रांस्त्रांचे अस्तित्व मानवी समाजासमोरील गंभीर समस्या बनली आहे. आण्विक शस्त्राच्या निर्मितीमुळे आंतरराष्ट्रीय शांततेला आणि सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. दुसर्या महायुध्दानंतर जागतिक राजकारणात आपले नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका आणि रशिया यांच्यात शस्त्रास्त्रे निर्मितीची स्पर्धा सुरु झाली. त्यासाठी भूतलात, अंतराळात, समुद्रात, अणूचाचण्या केल्या गेल्या. अणूबाँबनंतर हायड्रोजन बाँबची, रासायनिक, जैविक शस्त्रास्त्राची निर्मीती केली गेली. शस्त्रास्त्र स्पधेंतून अणूबाँबसारख्या विध्वंसक शस्त्रांची निर्मिती झाली. आण्विक शस्त्रास्त्रांमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ करण्यासाठी अमेरिका व रशिया या महासत्तामध्ये स्पर्धा सुरु झाली. या दोन महासत्ताबरोबर आण्विक शस्त्रास्त्र निर्मितीत तंत्रज्ञान जगात इतरत्रही पसरत गेले. या शस्त्रास्त्र स्पर्धेतून अणूयुध्दाचा धोका वाढला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदुसर्या महायुध्दात जपानमधील हिरोशीमा आणि नागासाकी या शहरावर अमेरिकन अणुबाँब टाकून कल्पनेपलीकडचा विध्वंस घडवून आणला. या दोन हल्ल्यामुळे अणूबाँबची भितीच जगाला बसली. त्यानंतरच्या कित्येक पिढयांना हे बाँब हल्ल्याचे परिणाम भोगावे लागले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअलीकडच्या काळात उत्तर कोरिया, इराण या देशांनी अणूबाँब निर्मीतीच्या कार्यक्रमात जोरदार प्रगती केल्यामुळे सगळे जग चिंताग्रस्त झाले आहे. जगाला सुरक्षित व भयमूक्त जीवनाची प्राप्ती व्हावी या भूमिकेतून अण्वस्त्र मूक्त जग हा या चळवळीचा प्रधान हेतू आहेत. आज ज्याप्रमाणे जागतिक पातळीवर आण्विक शस्त्रास्त्र विरोधी चळवळी कार्यरत आहेत. त्याचबरोबर प्रत्येक देशता अण्वस्त्र निर्मीतीला विरोध करणार्या चळवळीही कार्यरत आहेत. अलीकडेच 2010 सालच्या एप्रिल महिन्यात अमेरिका व रशिया यांच्यात अण्वस्त्रांविषयाची चर्चा होऊन त्यांच्याकडील अण्वस्त्रात कपात करण्याच ठरवल. जगात उपलब्ध आण्विक शस्त्रांपैकी 98% शस्त्रास्त्रे या दोन देशांकडे असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470982230245,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Anti-Nuclear-Weapons-Movement-and-Politics-Cover-Page-1.jpg?v=1772024919"},{"product_id":"भारताची-अंतर्गत-सुरक्षा","title":"भारताची अंतर्गत सुरक्षा","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470992421093,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Indias-Internal-Security-1.jpg?v=1772025032"},{"product_id":"जागतिक-सुरक्षा","title":"जागतिक सुरक्षा","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470993010917,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Jagtik-Suraksha-1.jpg?v=1772025120"},{"product_id":"राष्ट्रीय-सुरक्षा-जागतिक-दृष्टीकोन","title":"राष्ट्रीय सुरक्षा (जागतिक दृष्टीकोन)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473859031269,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rashtriy-Surksha-Jagatik-Drushtikon-1.jpg?v=1772087740"},{"product_id":"सायबर-युद्ध","title":"सायबर युद्ध","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eडिजीटल युग म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान विकासाची एक देणगी आहे. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील होणार्या गतीशील वेगाने मानवी समाजजीवन ढवळून निघाले आहे. माहिती तंत्रज्ञानाचे क्षेत्र अत्यंत जलदगतीने विस्तारीत आणि विकसीत होवून आयुष्याची ती मूलभूत गरज भासणार अशी स्थिती निर्माण झालेली आहे. मोबाईल किंवा इंटरनेटशिवाय कोणतेही कार्य सहजतेने पार पडणे अशक्य होणार आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eडिजिटल युगातील युद्धाची कार्यवाही ‘नेट’शी संबंधित आहे आणि यापुढेही राहणार आहे. माहिती तंत्रज्ञान आणि संगणकीय प्रणालीद्वारे घडविलेली अचानक विध्वंसक कार्यवाही हाच सायबर युद्धाचा उद्देश्य आणि योजना असते. यामुळे सामाजिक, आर्थिक, आर्थिक, मानसिक, बौद्धिक वगैरे सर्वच स्तरावर गोंधळ माजून समाजाची अथवा देशाची घडीदेखील विस्कळीत होते. जागतिक क्षेत्रात दररोज कोठे न कोठे सायबर हल्ले, सायबर गुन्हे होत आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबरच सायबर गुन्ह्यामध्येदेखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474014253285,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Cyber-Yuddha_cnvt-1.jpg?v=1772090055"},{"product_id":"भारताची-राष्ट्रीय-सुरक्षा","title":"भारताची राष्ट्रीय सुरक्षा","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474104004837,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/bhartachi-rashtriya-surkasha-1.jpg?v=1772091509"},{"product_id":"लष्करी-विचारवंत","title":"लष्करी विचारवंत","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राकृतिक घटकांच्या अनुषंगाने ठरविलेले संरक्षणविषयक धोरणक्षेत्र विचार म्हणजेच सैनिकी विचार होत. सैनिकी शक्ती, सुरक्षेच्या हमी किंवा संरक्षणाच्या योग्य व्यवस्थेशिवाय राष्ट्रीय अस्तित्व टिकू शकत नाही. त्याचा मूलभूत स्त्रोत म्हणजे आपले विचारवंत होत. विचारवंत हे अर्थशास्त्रज्ञ, राजनीतीज्ञ, समाजसेवक, भूगोलतज्ञ, उद्योगपती किंवा लढवैय्ये योद्धा असतील, त्या सर्वांच्या सारासार विचारसरणीतून देशाचे भवितव्य साकारते. देशाची प्रगती, स्थैर्य, शांतता व स्वातंत्र्य अबाधित राहते. प्रस्तुत लिखाणात पाश्चात्य विचारवंताबरोबर पौर्वात्य विचारवंतही विचारात घेतले आहेत. शिवाय सर्व प्रमुख महान भारतीयांची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रामुख्याने कौटिल्य, श्री छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, मोहनदास गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, वि.दा. सावरकर, पं. नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, लालबहादूर शास्त्री, शहीद भगतसिंग, इंदिरा गांधी, श्री अटलबिहारी वाजपेयी, फील्ड मार्शल सॅम, माणेकशा, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यासारख्या देशहितवादी विचारवंतांच्या विचाराचा समावेश असून जनरल सन्त्जू, मॅकियाव्हेली निक्कोलो, गुस्तावस एडाल्फ पासून तर कॅप्टन सादत आणि इसाकू साटो पर्यंतच्या पाश्चात्य विचारवंतांचाही समावेश केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474232553701,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Lashkari-Vicharvant-1.jpg?v=1772093976"},{"product_id":"भारतीय-युद्ध-तंत्राची-उत्क्रांती","title":"भारतीय युद्ध तंत्राची उत्क्रांती","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474256539877,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Yuddha-Tantra-1.jpg?v=1772094138"},{"product_id":"भारतीय-युद्ध-तंत्राची-उत्क्रांती-1","title":"भारतीय युद्ध तंत्राची उत्क्रांती","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474299564261,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Yuddha-Tantra-1_1.jpg?v=1772094630"},{"product_id":"युद्ध-आणि-भारताच्या-संरक्षणाची-रुपरेषा-भाग-2","title":"युद्ध आणि भारताच्या संरक्षणाची रुपरेषा (भाग 2)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474435256549,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/War-2-1.jpg?v=1772099474"},{"product_id":"युद्ध-आणि-भारताच्या-संरक्षणाची-रुपरेषा-भाग-1","title":"युद्ध आणि भारताच्या संरक्षणाची रुपरेषा (भाग 1)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474442039525,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/War-1-1.jpg?v=1772099814"},{"product_id":"आधुनिक-भारताची-लष्करी-व्यवस्था-1947-पर्यंत","title":"आधुनिक भारताची लष्करी व्यवस्था (1947 पर्यंत)","description":"\u003cp\u003eभारतातील ‘क्षात्र वृत्ती’ हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. मौर्य, गुप्त, चौल अशा असंख्य राजवटींनी भारताबाहेरही आपली सत्ता प्रस्थापित केल्याचे इतिहासात पदोपदी उल्लेख आढळतात. राजपूत, शीख, जाट, गोरखा मराठा, डोगरा, गढवाली व दक्षिणेतील नायर-कुर्ग, आग्नेय भारतातील नागा व मिझो जमाती शौर्याबद्दल प्रसिद्धच आहेत. भारतीयांच्या एकतेअभावी परकियांना या देशावर राज्य निर्माण करणे शक्य झाले. समुद्रमार्गे आलेल्या पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रज यांच्या सागरी शक्तींकडे भारतीय राजांनी खूप दुर्लक्ष केले. अपवाद फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा. महाराजांनी मोठ्या महत्प्रयासाने, दूरदृष्टिने उभारलेले मराठी आरमार पेशव्यांनी बुडविल्याने इंग्रजांना प्रतिकार करणारी सागरी सत्ताच उरली नाही. 1857 च्या सशस्त्र क्रांतीनंतर भारतातील कंपनी कारभाराला खीळ पोहचली. शिस्तबद्ध, आक्रमक, अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त अशा ब्रिटीशांनी स्थानिक लोकांचेच सैन्य उभारून भारतीय सत्तांचा पराभव करीत देशाला गुलामगिरीकडे ढकलले. 20 व्या शतकातील जागतिक महायुद्धांमध्ये भारतीय सैनिकांनी निर्णायक भूमिका बजावून आपले कर्तृत्व सिद्ध केले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAadhunik Bharatachi Lashakri Vyavsatha (1947 Paryant)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477482877157,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aadhunik-Bharatachi-Lashkari-Vyavastha_Dr-Devendra-Vispute_cnvt-1.jpg?v=1772177636"},{"product_id":"भारताची-राष्ट्रीय-सुरक्षितता","title":"भारताची राष्ट्रीय सुरक्षितता","description":"\u003cp\u003eराष्ट्रीय सुरक्षा याचा अर्थ राज्याचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्त्व, सुरक्षितता व अखंडतेचे रक्षण असा होतो. राष्ट्रीय सुरक्षा हे राष्ट्रहिताचे प्राथमिक व मूलभूत उद्दिष्ट मानले जाते. प्रत्येक राष्ट्राची राष्ट्रीय हिताची कल्पना ही वेगवेगळी असते. आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक राष्ट्रांचा राष्ट्रीय सुरक्षितता हा प्रश्न राष्ट्रीय जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. राष्ट्रीय हिताचे पर्यायाने राष्ट्रीय सुरक्षेचे संरक्षण करण्याची जबाबदारी जशी सेनादलाची असते तशीच ती देशातील कर्तव्यदक्ष आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांचीसुद्धा असते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचा विचार केल्यास, 1947 सालापासून पाकिस्तान, 1962 पासून चीन या दोन्हीही बहिर्गत शत्रूपासून भारताच्या राष्ट्रीय सुरक्षिततेला वेळोवेळी आव्हान दिले गेले. त्याचप्रमाणे दहशतवाद, विप्लववाद, नक्षलवाद, आर्थिक विषमता, बेरोजगारी, सामाजिक व आर्थिक परिस्थिती हे ही घटक भारताच्या अंतर्गत सुरक्षिततेपुढे केंव्हाही धोका निर्माण करू शकतात.\u003cbr\u003eआंतरराष्ट्रीय संबंधात सुरक्षेचे महत्त्व मोठ्या प्रमाणात आहे. ज्याप्रमाणे सत्ता, न्याय, शांतता, समानता, स्वातंत्र्य या शब्दाचे स्वतःचे अस्तित्व आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय सुरक्षेचेही अस्तित्व आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477759308005,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartachi-Rashtriya-Surkshatata_Pune_Dr-B-D-Todkar_cnvt-1.jpg?v=1772189473"},{"product_id":"संरक्षण-अर्थशास्त्र","title":"संरक्षण अर्थशास्त्र","description":"\u003cp\u003e‘संरक्षण अर्थशास्त्र’ राष्ट्रीय विकासाच्या पायातील महत्त्वाचा भाग असून त्याचा संबंध नागरिकांच्या सुरक्षेशी आणि जीवनमानाच्या, राहणीमानाच्या स्तराशी आहे. अर्थशास्त्राच्या सर्व योजनामध्ये प्रथमतः संरक्षण खर्चाचा विचार होणे अत्यावश्यक असते. संरक्षण खर्च अनुत्पादीत आहे का आवश्यक आहे. या विचारापलिकडे जावून राष्ट्राची अस्मिता सांभाळणे गरजेचे आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंरक्षण आणि सामरिकशास्त्राच्या अभ्यासकांच्या अत्यावश्यक गरजेतील महत्त्वाची गरज ‘संरक्षणावर होणारा योग्य खर्च’ आहे. भूतकालीन खर्चाच्या आढाव्यातून, अनुभवातून, भविष्यकालीन सुखावह, स्थिर मार्ग निश्चित करता येतो. संरक्षण अर्थशास्त्रावर जी काही माहिती उपलब्ध आहे ती बहुतांशी इंग्रजी भाषेतून असून काही अंशी हिन्दी भाषेतून प्राप्त होते. मराठी भाषेत मात्र या विषयावर सविस्तर लिखाण झालेले नाही. महाराष्ट्रातील अभ्यासकांना मराठा रेजिमेंटच्या शूटशिपाई, अधिकारी आणि योद्ध्यांना संरक्षण अर्थशास्त्राची जाणीव व्हावी, त्याची दिशा निश्चित करता यावी यासाठी या लेखनाचा प्रयत्न झालेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477760749797,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanrkshan-Arthashastra_cnvt-1.jpg?v=1772189532"},{"product_id":"संरक्षण-व-सामरिकशास्त्र-मुलभूत-संकल्पना-आणि-भारत","title":"संरक्षण व सामरिकशास्त्र : मुलभूत संकल्पना आणि भारत","description":"\u003cp\u003eसंरक्षण या विषयाचा विचार करताना, मानवाला संरक्षण ही संकल्पना कधी व का सुचली असावी, असा प्रश्न पडतो. त्याच्या आदिम किंवा प्राथमिक अवस्थेत स्वसंरक्षणासाठी त्यास निसर्गाशी व जंगली श्वापदांशी सतत झगडावे लागत असे. कालांतराने तो प्रगत झाला. मानव प्राणी मनुष्य या संज्ञेला जेव्हापासून पात्र झाला व मानव संस्कृतीचाही विकास झाला तेव्हापासून तो संरक्षणाचा अधिक विचार करू लागला. त्यामधून संरक्षण या संकल्पनेचा विकास झाला. आज तर मानव व मानवी संस्कृतीचा खूपच विकास झालेला आहे. त्याच्या वैज्ञानिक संशोधनातून त्याने प्रत्येक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे. परंतु संरक्षणाचे विचार त्याच्या मनाने आजही हद्दपार तर केले नाहीतच, उलट तो संरक्षणाच्या तरतुदींमध्ये अधिकाधिक गुंतत चालला आहे. स्वसंरक्षणासाठी त्यास पर्यावरण संरक्षण व पर्यावरण संतुलन देखील तितकेच महत्त्वाचे आहे. पर्यावरण संरक्षण हे मानवी संसरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. याच दृष्टिकोनातून संरक्षण संकल्पनेचा परीघ विस्तृत झाला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘संरक्षण व सामरिकशास्त्र : मूलभूत संकल्पना आणि भारत’ हा नाविण्यपुर्ण माहितीने नटलेला ग्रंथ आपल्याकडे सोपवताना अतिशय आनंद होत आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर वर्गातील संरक्षण व सामरिकशास्त्र, राज्यशास्त्र, तसेच नेट व सेट राज्यशास्त्र, संरक्षण व सामरिकशास्त्र यांचा अभ्यास करण्यासाठी हा ग्रंथ उपयुक्त पडेल.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477767041253,"sku":null,"price":695.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanrkshan-and-Samarikshastra_cnvt-1.jpg?v=1772189794"},{"product_id":"दहशतवाद-आणि-नक्षलवाद","title":"दहशतवाद आणि नक्षलवाद","description":"\u003cp\u003eविनाशकाले विपरीत बुद्धी जोपासणार्या नराधमांनी संपूर्ण जगात दहशतवादी कारवाया सुरु करुन स्थैर्य नष्ट केलेले आहे. दहशतवादींना जोपासणार्या भेकड राष्ट्रांचे भवितव्य अंधारात असून ते इतरांनाही अंधाराच्या गर्तेत ओढत आहेत. दहशतवादी परिस्थितीवर नियंत्रण आणण्यसाठी सर्वांची एकजूट आणि सहकार्य अपेक्षित आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपाकिस्तानने भारतामध्ये दहशतवाद पसरवून अनेक निष्पाप जीवांचे बळी घेतले असून जगभरात थैमान घालणार्या दहशतवादाचे मूळ पाकिस्तानातच आहे. पाकिस्तान हे धर्मांध राष्ट्र असून जागतिक दहशतवादाचा अड्डा बनलेला असून वेळीच आवर घालणे गरजेचे आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदरील पुस्तकात दहशतवादाचे प्रकार, अणुदहशतवाद, भारत-पाक दहशतवादी संघटना, दहशतवादी हल्ले, 7\/9 व 26\/11 चे हल्ले, भारत-अफगाण व दहशतवाद, प्रमुख दहशतवादी संघटना, भारतावरील हल्ले, पाकिस्तान दहशतवाद, नक्षलवाद, इतिहास, नक्षलवादी भारतीय समस्या, गंभीर स्वरुप, दहशतवाद-नक्षलवाद आणि सुरक्षा, दहशतवाद प्रतिबंध (नियंत्रण) वगैरे माहितीचा समावेश केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराष्ट्राचे भवितव्य घडविणार्या तरुण आधारस्तंभांनी दहशतवादाबद्दल सखोलता, वास्तविकता जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून भारताच्या तसेच जगाच्या विकासासाठी ते साहाय्यभूत ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477769760997,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Dahashatwad-and-Nakshalawad_cnvt-1.jpg?v=1772189867"},{"product_id":"भारताची-राष्ट्रीय-सुरक्षा-1","title":"भारताची राष्ट्रीय सुरक्षा","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eउपग्रहवेधी क्षेपणास्त्राची चाचणी, आक्रमक व शत्रुला विस्मयाचा धक्का देणार्या सर्जिकल स्ट्राईक्स, बालाकोट एअरस्ट्राईक आणि डोकलाम विवादात घेतलेल्या ठाम व कणखर भूमिकेमुळे चीनी सैन्याला घ्यावी लागलेली माघार या प्रासंगिकतेतून भारताने आज आक्रमक व वास्तववादी सुरक्षा धोरणाचा अंगिकार केल्याचे स्पष्ट होते. परिणामी ‘सॉफ्ट स्टेट’ ही भारताची आजवरची प्रतिमा पुसून टाकण्यात आपण बर्यापैकी यशस्वी झालो आहोत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eराष्ट्रीय सुरक्षा ही देशासाठी प्राधान्यक्रमाची बाब असून कोणतीही आर्थिक, औद्योगिक प्रगती किंवा विकास हा पुरेशा सुरक्षेशिवाय निरर्थक आहे. प्रादेशिक समस्यांमध्ये भाषा, सामाजिक, राजकीय, भौगोलिक, धार्मिक व आर्थिक समस्या तसेच सांप्रदायिकता, स्थलांतर, निरक्षरता, लिंगभेद, नव्याने प्रस्थापित झालेली समाज माध्यमे व त्यापासून होणारे दुष्परिणाम, आरोग्य, पर्यावरण, माओवादी चळवळी, शेजारील राष्ट्रांचा अमानुष दहशतवाद, सायबर गुन्हेगारी आणि भारताच्या सीमा समस्या व सुरक्षा या सर्व समस्या आणि नव्याने उभ्या ठाकलेल्या आव्हानांचा यथायोग्य परामर्श ‘भारताची राष्ट्रीय सुरक्षा’ या ग्रंथात घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रशक्तीवर विविध समस्यांचा परिणाम होऊन देश दुबळा कसा बनतो व त्याचबरोबर करावयाच्या उपाययोजनाही सूचविण्यात आलेल्या आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477771956453,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatachi-Rashtriy-Surksha_cnvt-1.jpg?v=1772189928"},{"product_id":"भारतीय-युद्धकला","title":"भारतीय युद्धकला","description":"\u003cp\u003eजगातील कोणत्याही राष्ट्राचा लष्करी इतिहास पाहिला तर असे दिसून येते की संघर्ष जिंकण्यासाठी प्रत्येक राष्ट्र विशाल युद्धनीती, युद्धापूर्वीची युद्धनीती व युद्धातील युद्धनीती किंवा डावपेच या संकल्पनांचा वापर करताना दिसतात. भारतीय लष्करी इतिहासही याला अपवाद नाही. लढाई व युद्धाचा संबंध हा फक्त रणक्षेत्रापुरताच मर्यादित नसून त्याचा मानवाच्या सर्वांगिण घडामोडींशी संबंध आहे. कारण मानवनिर्मित सर्वच क्षेत्रांवर लढाईचे व युद्धाचे परिणाम होतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारताच्या लष्करी इतिहासात प्राचीन कालावधीपासून ते आजपर्यंत अनेक लाहन-मोठ्या स्वरुपाच्या लढाया झाल्या. यात झेलमची लढाई,ख पानिपतची पहिली व तिसरी लढाई, इंग्रज-मराठा यांच्यात झालेली असईची लढाई, स्वतंत्र काश्मीरचे युद्ध, भारत-चीनमधील 1962 मध्ये झालेले युद्ध, 1965 व 1971 मध्ये भारत-पाकिस्तानात झालेली युद्धे इ. या सर्व लढायात किंवा युद्धात उभय बाजूकडील तुलनात्मक सैन्यशक्ती, त्यांच्या युद्धयोजना, लढाईचे परिणाम, प्रत्यक्ष युद्धकार्यवाही व लढाईपासून मिळालेले लष्करी धडे या सर्व मुद्यांचा सविस्तर ऊहापोह करण्याचा प्रयत्न केलेला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतावर प्राचीन काळापासून जेवढी परकीय आक्रमणे झाली त्यांचा भारतीय संस्कृतीशी संबंध आला. त्या आक्रमणांमुळे भारतीय समाज व इतिहास बदलला. एवढेच नाही तर या लढायांनी किंवा युद्धांनी भारतीय लष्करी इतिहासाला नवे बळण मिळवून दिले. म्हणूनच ङ्गभारतीय युद्धकलाफ या ग्रंथामध्ये सर्वांचा सखोलपणे विचार केलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477773824229,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/bharatiya-Yuddhkala-1.jpg?v=1772190013"},{"product_id":"भारतीय-राष्ट्रीय-सुरक्षितता","title":"भारतीय राष्ट्रीय सुरक्षितता","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477778477285,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatachi-Rashtriy-Surksha_cnvt-3.jpg?v=1772190225"},{"product_id":"आंतरराष्ट्रीय-संबंध-1","title":"आंतरराष्ट्रीय संबंध","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआंतरराष्ट्रीय संबंध हा अभ्यासाचा नवीन व स्वतंत्र विषय आहे. प्राचीन ग्रीक व रोमन काळातील आंतरराष्ट्रीय संबंधाहून या विषयाचे स्वरूप वेगळे आहे. प्राचीन काळातील संबंध मुख्यत्वे राजकीय स्वरूपाचे होते. परंतु आज राज्याचे परस्परांत राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक असे विभिन्न संबंध प्रस्थापित झालेले आहेत. सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय शब्दाचा वापर अठराव्या शतकाच्या शेवटी जेरेमी बेथंमद्वारा केला गेला होता.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपात वेगवेगळ्या कालखंडात परिवर्तन झालेले आहे. आज विज्ञानयुगात दळणवळणाच्या साधनांत झालेल्या प्रचंड प्रगतीमुळे राज्याराज्यातील अंतर कमी झाले आहे. तद्वतच आज राष्ट्रांच्या गरजा वाढल्यामुळे त्यांना परस्परांवर अवलंबून राहावे लागते. प्राचीन काळातील राज्ये स्वावलंबी होती. परंतु आज ती परस्परावलंबी बनली आहेत. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय संबंधाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. प्रत्येक राष्ट्र, राज्य हे सार्वभौम आहे. प्रत्येक राज्यसंबंधांवर राष्ट्र आपले धोरण ठरविण्यास स्वतंत्र आहे. अशा स्वतंत्र, सार्वभौम व सत्तासंपन्न राज्यांच्या आपसांतील संबंधास आंतरराष्ट्रीय संबंध म्हणतात. सार्वभौम राज्ये आपले हित साध्य करीत असतांना परस्परांशी संघर्ष करतात. या संघर्षात सत्तेचा अधिक उपयोग केला जातो. म्हणूनच आंतरराष्ट्रीय राजकारणाला सार्वभौम राज्यांच्या परस्परातील क्रिया व प्रतिक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र मानले जाते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवर्तमानकाळात शीतयुद्धाची व्यापकता, टेक्नॉलॉजीचा विकास, वरील वादांचे निर्मूलन, तसेच नवीन राष्ट्रांचा उदय इत्यादी कारणांमुळे आंतरराष्ट्रीय अध्ययनाचे क्षेत्र अधिकच व्यापक झाले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477780902117,"sku":null,"price":575.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aantrastriya-Sambandh_V-B-Patil_cnvt-1.jpg?v=1772190320"},{"product_id":"भारताची-संरक्षण-संघटना-आणि-राष्ट्रीय-सुरक्षितता","title":"भारताची संरक्षण संघटना आणि राष्ट्रीय सुरक्षितता","description":"\u003cp\u003e1947 मध्ये परकीयांचे जोखंड दूर करून भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर काही समस्या निर्माण झाल्या त्या दूर करण्याच्या हेतूने भारताने प्रयत्न करायला सुरूवात केली. भारताच्या उत्तरेला चीन, पश्चिमेला पाकिस्तान, पूर्वेच्या अंतर्गत भागात असलेला बांगला देश व बाहय भागात असलेला म्यानमार या सर्वच देशाबरोबरचे भारताचे संबंध म्हणावे तेवढे चांगले नाहीत त्याचप्रमाणे भारताच्या तिन्ही बाजूला सागरी संपदा लाभलेली आहे. आजच्या परिस्थितीमध्ये राष्ट्राची सुरक्षितता हा प्रश्न राष्ट्रीय जीवनाशी अविभाज्य घटक बनला आहे. राष्ट्राच्या राष्ट्रीय सुरक्षिततेचा ज्यावेळी आपण विचार करतो, त्यावेळी सर्वप्रथम आपल्यासमोर संबंधीत राष्ट्राचे राष्ट्रीय हित येते. राष्ट्रीय हिताच्या पर्यायाने राष्ट्रीय सुरक्षिततेच्या संरक्षणाची जबाबदारी फक्त सशस्त्र सेनेवरच नाही तर देशातील सर्व कर्तव्यदक्ष आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांची सुद्धा आहे.कोणत्याही देशाची राष्ट्रीय सुरक्षितता किंवा सुरक्षा संबंधित देशाच्या सामाजिक व आर्थिक घटकावर ही अवलंबून असते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदर पुस्तकात 1947 नंतरचे भारतीय सशस्त्र दलांचे पुनर्निर्माण, भारतीय उच्चस्तरीय संरक्षण संघटना, सशस्त्र दलाची संरक्षण यंत्रणा\/यांत्रीकीकरण, गुप्तचर संघटना, सुरक्षेपुढील पारंपरिक व अपारंपरिक आव्हाने, हिंदी महासागराविषयीचे भारताचे धोरण वगैरे विविध मुद्दयांचा उहापोह केलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477796892901,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatachi-Savrankshan-Sanghatna-Ani-Rashtriya-Surkshitata_Dr-B-D-Todkar_cnvt-1.jpg?v=1772190769"},{"product_id":"समकालीन-युद्धपद्धती","title":"समकालीन युद्धपद्धती","description":"\u003cp\u003eमानवी संस्कृतीच्या क्रमविकासात वेगवेगळ्या स्वरूपात टिकून राहिलेली अत्यंत महत्त्वाची आणि व्यापक परिणाम करणारी संस्था म्हणजे युद्ध होय. संरक्षणव्यवस्था हा कोणत्याही सार्वभौम राज्यसंस्थेचा अंगभूत विभाग असतो. दोन व्यक्ती किंवा राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक विचार वा तत्त्वप्रणाली यांनी संघटित झालेले दोन अथवा अधिक गट, समाजातील भांडवलदार व कामगार यांसारखे किंवा स्त्री आणि पुरुष यांसारखे वर्ग, अथवा माणसाच्या मनातीलच दोन परस्परविरोधी प्रवृत्ती यांच्यातील संघर्षालाही युद्ध या संज्ञेने संबोधण्यात येते. जीवसृष्टीतील अस्तित्वाचा झगडा हा युद्धाचा मूलभूत प्रकार होय. युद्ध ही संकल्पना अत्यंत गुंतागुंतीची असून या संकल्पनेकडे पाहण्याचे तात्त्विक, राजकीय, आर्थिक, तंत्रविज्ञानात्मक, कायदेशीर, समाजशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय असे विविध प्रकारचे दृष्टिकोन असून त्यांनुसार मानवी समाजातील या सनातन संस्थेचे विविध अंगांनी विश्लेषण करण्यात येते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकात अभ्यासक्रमात समाविष्ट सर्व मुख्य आणि उपमुद्यांची विस्तृत, सखोल आणि मुद्देसुद मांडणी केलेली असून विद्यार्थी, शिक्षक व अभ्यासक तसेच सर्वांना सदरील पुस्तक उपयोगी ठरेल यात शंका नाही.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477800595685,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samkalin-Yuddhapaddhati_Prof-K-D-Dharmadhikari_cnvt-1.jpg?v=1772190833"},{"product_id":"भारतीय-लष्करी-इतिहास","title":"भारतीय लष्करी इतिहास","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआधुनिक संरक्षणशास्त्राचा विकास होण्यासाठी लष्करी इतिहासाचा संशोधनात्मक अभ्यास उपयुक्त ठरतो. युद्धकलेच्या अभ्यासाने, संशोधनाने ज्ञान समृद्ध होते. तसेच आत्मविश्वास वाढतो; त्याच कारणाने भारतीय युद्धकला अभ्यासक्रम अभ्यासासाठी निश्चित केलेला आहे. भारतीय युद्धकला अत्यंत समृद्ध असून ती अती प्राचीन आहे. प्राचीन भारतीय इतिहास हा भारतीय संस्कृतीच्या प्रगल्भतेच्या खुणा जपणारा आहे. मानवी उत्क्रांतीच्या बरोबर संस्कृतीचा जसजसा विकास होत गेला तसतशी मानवनिर्मित सर्वच तंत्राची, विज्ञानाची व कलांची प्रगती झालेली दिसते. वेद, पुराणशास्त्रे आणि उपनिषदे इत्यादी साहित्यातून आणि लोकपरंपरातून आजच्या विकसीत मानवी जीवनाच्या खाणाखुणा अभ्यासताना वैश्विक विकासाची दिशा स्पष्ट होते. प्राचीन लढायातून युद्धकला स्पष्ट होते. प्राचीन भारतातील युद्धनीती, डावपेच, युद्धयोजना सैनिक, शस्त्रास्त्रे इत्यादी संदर्भातील माहिती सर्वच प्रकारच्या लष्करासाठी उपयुक्त आहे. संबंधित अभ्यासक्रमातील निरनिराळे घटक विचारात घेवून विद्यार्थ्यांच्या दृष्टीने लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभ्यासकांना हा ग्रंथ उपयुक्त ठरेल अशीच आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48478012571877,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiya-Lashkari-Ithihas-AP_cnvt-1.jpg?v=1772197639"},{"product_id":"आपत्ती-व्यवस्थापन-1","title":"आपत्ती व्यवस्थापन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479715229925,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aapatti-Vyavathapan-1.jpg?v=1772258774"},{"product_id":"रशिया-आणि-युक्रेन-युद्ध","title":"रशिया आणि युक्रेन युद्ध","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479986483429,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Russia-and-Ukraine-War_Prof-A-P-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1772277634"},{"product_id":"संरक्षण-व-समारिकशास्त्रात-डिजिटललायझेशनचा-उपयोग-use-of-digitalization-in-defence-and-strategic-studies","title":"संरक्षण व समारिकशास्त्रात डिजिटललायझेशनचा उपयोग (Use of Digitalization in Defence and Strategic Studies)","description":"\u003cp\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत संरक्षण व सामरिक शास्त्र विषयाचा छएझ 2020 नुसार अभ्यासक्रम तयार करण्यात आला. अभ्यासक्रमा अंतर्गत ‘संरक्षण व सामरिक शास्त्रात डिजिटलायझेशन चा उपयोग’ या पुस्तकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीमुळे आधुनिक जगात अनेक क्षेत्रांमध्ये घडलेले बदल नमूद केले आहेत. युद्धपद्धती आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या संकल्पनांमध्येही या बदलांचा स्पष्टपणे परिणाम दिसून येतो. पारंपरिक युद्धाबरोबरच आता सायबर अवकाश, डिजिटल तंत्रज्ञान आणि माहिती प्रणाली या नव्या घटकांनी युद्धाचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे केले आहे.\u003cbr\u003eआजच्या काळात सायबर सुरक्षा ही केवळ तांत्रिक बाब नसून ती राष्ट्रीय सुरक्षेचा अत्यंत महत्त्वाचा भाग बनली आहे. माहितीचे संरक्षण, डिजिटल नेटवर्कची सुरक्षितता आणि तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर यांवर राष्ट्रांची क्षमता आणि सुरक्षितता मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.\u003cbr\u003eया पार्श्वभूमीवर सायबर सुरक्षा आणि डिजिटल युद्धपद्धती या विषयांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते. या विषयातील मूलभूत संकल्पना विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे.\u003cbr\u003eया पुस्तकात सायबर युद्धपद्धतीचा उदय, त्याचे राष्ट्रीय सुरक्षेवरील परिणाम, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा लष्करी कार्यवाहीमध्ये होणारा वापर यांचा सुसंगत आढावा मांडण्यात आला आहे. ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल प्रणाली आणि युद्धनियोजनातील तांत्रिक साधनांचा उपयोग यांचाही विचार येथे समाविष्ट केला आहे. या पुस्तकाचा उद्देश केवळ माहिती देणे नसून वाचकांना आधुनिक युद्धपद्धती आणि तंत्रज्ञानाच्या बदलत्या स्वरूपाबद्दल जागरूक करणे हा आहे. विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा आहे. वाचकांनी या पुस्तकाचे स्वागत करून त्यातील विचारांचा अभ्यास करावा.   \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48885488779493,"sku":null,"price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/SanrakshanVSamrikshastratDigitalizationchaupyog_Dharmadhikari-1.jpg?v=1776947865"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0.oembed?page=2","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}