{"title":"Administration","description":"","products":[{"product_id":"महाराष्ट्रातील-संत-आणि-समाजसुधारकांचा-इतिहास","title":"महाराष्ट्रातील संत आणि समाजसुधारकांचा इतिहास","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 नुसार Generic Open Elective Course सुरु केलेला आहे. यावर आधारित इतिहास विषयाअंतर्गत OE-1 विदर्भातील संत आणि समाजसुधारकांचा इतिहास, OE-2 महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारकांचा इतिहास हे कोर्स पदवीला प्रथम वर्षाकरीता तयार केलेले आहे. त्यानुसार मुख्यतः पदवीच्या (मानव्यविद्या, कॉमर्स, सायन्स इ. शाखा) प्रथम वर्षातील प्रथम सत्रामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता सदर पाठ्यपुस्तकाचे लेखन केले असले तरी प्रस्तुत विषय शिकविणाऱ्या प्राध्यापक बंधूंना, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच समाज परिवर्तनाचा इतिहास जाणून घेण्याची मनिषा असलेल्या अभ्यासकांना देखील प्रस्तुत पुस्तक उपयोगी ठरेल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदर पुस्तक संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित असले तरी महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठामध्ये समाजसुधारकांचा अभ्यासक्रम शिकविल्या जातो. त्यामुळे त्यांनाही हे पुस्तक उपयोगी ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386710307045,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Maharashtratil-and-Vidharbhatil-Samjsudharak_Prafull-Taley_cnvt-1.jpg?v=1770721010"},{"product_id":"ग्रामीण-समाज-व-विकास","title":"ग्रामीण समाज व विकास","description":"\u003cp\u003eमानव हा समाजशील प्राणी आहे. मानवाला स्वतःच्या विकासासाठी समाजावरच अवलंबून रहावे लागते. भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार करुन ग्रामीण भागातील शेवटच्या घटकाचाही निर्णय प्रक्रियेत समावेश केला आहे. वैदिक काळापासून ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामीण जनतेचा प्रत्यक्ष ग्रामविकासात सहभाग असल्याचे दिसते. स्वातंत्र्योत्तर काळात खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी ग्रामस्वराज्याची संकल्पना महात्मा गांधीजींनी मांडली. त्यातूनच पुढे त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था अस्तित्वात आली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eग्रामीण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी बिगर सरकारी संस्था, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना मोलाच्या ठरल्या आहेत. कृषीप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या भारतातील ग्रामीण जनतेच्या विकासात आर्थिक घटकही महत्त्वाचा ठरतो. त्यादृष्टीने त्यांचा अभ्यास व्हावा यासाठी पंचायतराज, बिगर सरकारी संस्था, विविध शासकीय योजना, ग्रामीण अर्थव्यवस्था या ग्रामीण विकासासाठी आवश्यक असलेल्या घटकांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470895395045,"sku":null,"price":475.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Gramin-Samaj-v-vikas-_1.jpg?v=1772020338"},{"product_id":"महाराष्ट्र-प्रशासन","title":"महाराष्ट्र प्रशासन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474166722789,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Maharashtra-Prashasan-1-1.jpg?v=1772092867"},{"product_id":"राजकीय-भूगोल-2","title":"राजकीय भूगोल","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eएखाद्या राज्यातील किंवा राष्ट्रातील मानवी जीवन, आंतरराष्ट्रीय संबंध, आर्थिक विकास, आर्थिक क्रिया, त्या राज्याची किंवा राष्ट्राची समृध्दता, संपन्नता भौगालिक वातावरणाद्वारे प्रभावित, नियंत्रित व निर्धारित होत असते. राजकीय भूगोलाचा अभ्यास प्राचिन काळापासुन केला जातो. ग्रीक व रोमन कालखंडात राज्य भौगोलिक वातावरणाशी संबंधित असल्याचे मानले जात असे. पृथ्वीतलावरील भौगोलिक भिन्नतेचा तत्कालीन राज्यांशी घनिष्ठ संबंध असतो याची ग्रीक व रोमन राज्यकर्त्यांना व विचारवंतांना जाणीव होती. पहिल्या व दुसर्या महायुद्धाच्या काळात राजकीय विचार व डावपेच, लष्करी व संरक्षण विषयक धोरण, युध्दनिती, इत्यादी निश्चित करतांना भौगोलिक पर्यावरणाचा अभ्यास केला गेला. तेव्हांपासुन राजकीय भूगोलाच्या विकासाला चालना मिळाली. राजकीय भूगोल ही भूगोलाची महत्वपुर्ण व विकसित आणि स्वतंत्र शाखा म्हणून अभ्यासला जातो. राजकीय भूगोल हा विस्तृत व बहुविध पैलु असलेला विषय आहे. मानवाच्या विविध प्रकारच्या राजनीतीचा व राजपध्दतीचा स्थळ व क्षेत्र या संदर्भातील आविष्कार राजकीय भूगोलात अभ्यासला जातो. पृथ्वीवर निरनिराळया प्रदेशातील भौगोलिक स्थिती व पर्यावरण वेगवेगळे आहे. साहजिकच निरनिराळ्या भौगोलिक प्रदेशातील राजकीय पध्दती, शासन प्रणाली, राजनिती वेगवेगळया प्रकारची आढळते. यामुळेच विविध राजकीय प्रदेश निर्माण झालेत. अशा विभिन्न राजकीय प्रदेशांचा राजकीय दृष्टीकोनातुन भौगोलिक घटकांच्या संदर्भातील अभ्यास राजकीय भूगोलात केला जातो. थोडक्यात, घटक व राजकारण यांच्यातील परस्परसंबंधांचा अभ्यास म्हणजे राजकीय भूगोल होय. राजकीय भूगोलात राजनीती व भौगोलिक पर्यावरण यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास केला जातो. राज्यशास्त्रापेक्षा राजकीय भूगोल भिन्न असल्याचे प्रमुख कारण, म्हणजे राष्ट्रातील ‘क्षेत्रीय विभिन्नता’ हा घटक आहे. जगात ज्या विविध राज्यसंस्था निर्माण झाल्या आहेत त्यांची राजनीती, शासनपध्दती, राजकीय विचार, राजकीय पक्ष, राजकीय धोरण, राजकीय प्रणाली, परराष्ट्रीय धोरण वेगवेगळी आहे. कारण या सर्वांवर त्या त्या राज्यसंस्थेच्या भूप्रदेशातील विविध भौगोलिक घटकांचा जसे राज्यसंस्थेचे स्थान, विस्तार, भू रचना, हवामान, लोकसंख्या, जलसंपत्ती, वनस्पती, प्राणीसंपत्ती, मृदा, खनिज संपत्ती इत्यादींचा परिणाम होतो. ह्या सर्व भौगोलिक घटकांमध्ये प्रदेशपरत्वे भिन्नता आढळते. म्हणूनच वेगवेगळया राज्यसंस्थांची निर्मिती झाली आहे. ह्या सर्वांचा अभ्यास राजकीय भूगोलात केला जातो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474476937445,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajkiya-bhugol_1.jpg?v=1772101011"},{"product_id":"लोकसंख्याशास्त्र-1","title":"लोकसंख्याशास्त्र","description":"\u003cp\u003eलोकसंख्याशास्त्र या पुस्तकाची विभागणी पाच घटकांमध्ये करण्यात आलेली आहे. पहिल्या घटकामध्ये लोकसंख्याशास्त्राचा परिचय, दुसर्या घटकामध्ये प्रजनन क्षमता आणि मृत्यू व तत्संबधी मापन पद्धती, तिसर्या घटकांमध्ये लोकसंख्येचे स्थलांतर, चौथ्या घटकामध्ये लोकसंख्येचे नागरीकरण तर शेवटच्या पाचव्या घटकामध्ये लोकसंख्या आणि विकास व भारतातील पंचवार्षिक योजना काळातील लोकसंख्या धोरणाबाबत माहिती देण्यात आली आहे. पुस्तकाची घटकनिहाय मांडणी करतांना भारतातील लोकसंख्येच्या संदर्भात अद्ययावत आकडेवारी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येक घटकाच्या शेवटी अभ्यासासाठी प्रश्नसंच देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करतांना या प्रश्नसंचाचा निश्चितच उपयोग होईल. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अर्थशास्त्र विषयांतर्गत भारताच्या लोकसंख्या संदर्भांतील घटकाची तयारी करतांना या पुस्तकातील माहिती उपयुक्त ठरणार आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474730070245,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/LoksankhayaShashra_Mahesh-Rithe-1-1.jpg?v=1772108577"},{"product_id":"राजकीय-समाजशास्त्र","title":"राजकीय समाजशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजगातील अनेक देशांमध्ये विज्ञान युग आणि त्यासोबत आलेल्या औद्योगिक क्रांतीमुळे अनेक बदल घडुन आले. आर्थिक, सामाजिक आणि परिणामतः राजकीय क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात परिवर्तनाची लाट आली. सामाजिक बदल हा प्रामुख्याने आर्थिक चळवळी आणि राजकीय जनजागृती या क्षेत्रातुन प्रगट होत गेला. राष्ट्रभावना प्रखर होत गेली. प्रस्थापित साम्राज्यवादी सत्ता त्यांची वसाहतवादी राज्ये, यांच्यात वाद निर्माण होऊन महायुद्धे उद्भवली. प्रथमतः पहिल्या महायुद्धानंतर युरोपचा राजकीय आणि आर्थिक नकाशाच बदलुन गेला. दुसर्या महायुद्धानंतर आफ्रिका व आशिया खंडातील नवोदीत राष्ट्रांना राजकीय स्वातंत्र्य मिळाले. प्रस्थापित किंवा परंपरागत राजकीय संकल्पना आणि व्यवस्था या क्षेत्रात संपुर्ण क्रांती झाली. नवोदीत, नवनिर्माण राज्यांनी जरी परंपरागत राजकीय संकल्पना किंवा व्यवस्था यातील काही बाबी कमी-जास्त प्रमाणात स्विकारल्या तरी त्यांच्या समाजातील सांस्कृतीकरणाची तसेच सामाजीकरणाची अवस्था, आर्थिक स्थिती आणि समस्या व त्यांच्या राजकीय समाजाच्या, राज्याच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा व ध्येये यानुसार त्यांच्या राजकीय आचारविचारांची जडणघडण होऊ लागली.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477806559461,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajkiya-Samajshastra-1.jpg?v=1772190902"},{"product_id":"राजकीय-समाजशास्त्र-1","title":"राजकीय समाजशास्त्र","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477814751461,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajkiya-Samajshastra_Mahendra_cnvt-1.jpg?v=1772190971"},{"product_id":"स्थानिक-स्वराज्य-संस्था-1","title":"स्थानिक स्वराज्य संस्था","description":"\u003cp\u003eभारतात स्थानिक स्वराज्य संस्था अतिप्राचिन काळापासून अस्तित्वात असलेल्या दिसून येतात; त्यात कालानुक्रमे, दिवसेंदिवस बदल व परिवर्तन होत गेले. त्यामुळे त्यांचा विकास होत गेला. तसेच ब्रिटीश काळातही बरेचसे परिवर्तन झाल्याचे दिसून येते. लॉर्ड रिपन भारतात गव्हर्नर जनरल म्हणून आल्यानंतर त्यांनी स्थानिक संस्थांबाबतीत जनतेच्या कल्याणाचे अनेक निर्णय घेऊन त्यात आमुलाग्र बदल घडवून आणले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया ग्रंथात एकूण 20 प्रकरणांचा आढावा घेण्यात आलेला आहे; त्यात प्रामुख्याने भारतातील स्थानिक स्वराज्य, स्वशासनाची उत्क्रांती, उगम-विकास इतिहास, महाराष्ट्रातील नागरी स्वशासन, स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास, स्थानिक स्वशासन, लोकशाही विकेंद्रीकरण, नागरीकरण, स्थानिक स्वशासनाची वैशिष्ट्ये, घटनात्मक, सामूहिक विकास, महानगरपालिका, नगर परिषदा, नगरपालिका, नगर पंचायत, प्रशासकिय अधिकारी आणि राजकीय अधिकारी यांच्यातील फरक, स्थानिक स्वशासनातील दोष, नगरपालिकांच्या निवडणूका, वित्तिय व्यवस्था, नियंत्रण समस्या, भारतातील शहरीकरण आणि त्यांच्या समस्या, भारतातील प्रमुख महानगरपालिका व मूल्यमापन या प्रकरणांचा मुद्देसूद आढावा घेण्यात आलेला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदरहू ग्रंथ युजीसी पॅटर्नप्रमाणे असून एमपीएससी, युपीएससी व इतर स्पर्धा परिक्षांना अत्यंत उपयोगी आहे. तेव्हा प्राध्यापकवर्ग व विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त असा ग्रंथ आहे.\u003c\/p\u003e","brand":"My Store","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477906403557,"sku":null,"price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/SthanikSwarajyaSanstha-1.jpg?v=1775302184"},{"product_id":"महाराष्ट्र-प्रशासन-1","title":"महाराष्ट्र प्रशासन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसदर ग्रंथात महाराष्ट्राची सामाजिक आणि राजकीय स्थिती, महाराष्ट्र राज्याची निर्मिती, आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी, महाराष्ट्र राज्य प्रशासनाची वैशिष्ट्ये, घटकराज्यांचे विधिमंडळ, न्याय व्यवस्था, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, संविधानात्मक व वैधानिक मंडळे, कल्याणकारी प्रशासन, राज्य नियोजन, जिल्हा प्रशासन, महाराष्ट्रातील राजकीय पक्ष, दबाव गट, पंचायत राज, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय चळवळी. त्यात महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, शेतकरी चळवळ, कामगार चळवळ, महिला चळवळ, सहकार चळवळ, विद्यार्थी चळवळ, दलित चळवळ, आदिवासी चळवळ आदी असून त्यांचा परामर्श घेतला आहे. तसेच महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष, त्यांचे संघटन, कार्य याचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र निर्मितीपूर्वीच्या सामाजिक, राजकीय स्थितीचा मागोवा घेऊन अद्ययावत स्थितीची सविस्तर माहिती यथायोग्य देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच सध्याच्या स्थितीतील महाराष्ट्र शासन, त्याचे संघटन व कार्य यांचा तपशील देण्यात आला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477920952549,"sku":null,"price":695.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Maharashtra-Prashasan-1.jpg?v=1772194236"},{"product_id":"संशोधन-पद्धती","title":"संशोधन पद्धती","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंशोधनाचा एकंदरीत विचार करता, संशोधन म्हणजे काय ते प्रथम पाहायला हवे. माणसामध्ये एक उपजत कुतूहल प्रवृत्ती असते. आपल्या भोवतालच्या जगातील माणसे, वस्तू आणि घटना यांचे अस्तित्व माणसाला जेव्हापासून जाणवायला लागते, तेव्हापासून हे काय आहे, कसे आहे हे आपल्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग करुन जाणून घेण्याची त्याची खटपट सुरु होते आणि हे जाणून घेणे म्हणजे संशोधन होय. संशोधनाला इंग्रजीत ’ठशीशरीलह’ म्हटले जाते. हा इंग्रजी प्रतिशब्द योग्यच आहे. ’ठशीशरीलह’ म्हणजे ‘पुन्हा शोध घेणे.’ थोडक्यात कोणत्याही ज्ञानशाखेत नवीन तत्त्वे अथवा तथ्ये शोधण्यासाठी आणि जुनी तथ्ये व तत्त्वे परीक्षणासाठी केलेला चिकित्सक व पध्दतशीर अभ्यास म्हणजे संशोधन होय. माणूस गोष्टींच्या संपर्कात यायला लागतो, नवीन माहिती मिळवायला लागतो, तसतसा तो नवीन माहितीची आधीच्या माहितीशी सांगड घालायला लागतो. मग त्याला त्याच्यात काही संबंध दिसायला लागतात. तो तुलना करु लागतो. नव्या व जुन्या गोष्टींत त्याला काही समान गुणधर्म आढळतात. तेव्हा तो त्यांना एका वर्गात घालतो. म्हणजे त्यांचे वर्गीकरण करतो. आणखी पुढे जाऊन त्याला असे आढळते की, भोवताली घडणार्या घटना काही क्रमाने घडतात. तसेच एखादी घटना घडली तरच पुढची घटना घडते. म्हणजे आधी घडलेली घटना कारण आहे तर नंतर घडलेली घटना तिचा परिणाम आहे हे कळते. कार्यकारण संबंध निश्चित करण्यासाठी तो अनेक वेळा तशीच निरीक्षणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी करतो, मगच त्याच्या मनात कारण-परिणाम संबंध प्रस्थापित होतो. म्हणजेच नव्याने उजेडात आलेल्या तथ्यांच्या आधारे प्रस्थापित, स्वीकृत निष्कर्ष व सिध्दांतांचे पुनर्परीक्षण करण्याच्या हेतूने चिकित्सक व सखोल चौकशी वा प्रयोगास संशोधन म्हणता येईल. सदरील ग्रंथात संशोधनाची सर्वांगाने चर्चा करण्यात आली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदरील ग्रंथ हा पदवी, पदव्युत्तर, एम.फील., पीएच.डी., एमपीएससी, यूपीएससी व सेट इत्यादी परीक्षांचे अध्ययन करणार्या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477931634917,"sku":null,"price":675.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanshodhan-Paddhati-2022_Dr-V-B-Patil_cnvt-1.jpg?v=1772194609"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/administration.oembed","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}