Your cart is empty now.
सद्यस्थितीत प्रत्येक क्षेत्रातच फार मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी मिळेल अशी शाश्वती देता येत नाही. पर्यायाने विद्यार्थ्यांना नोकरीविना तसेच व्यवसायाशिवाय राहावे लागते. यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये ताणतणाव, चिंता व नैराश्य निर्माण होते. याचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये ‘करिअर’ संदर्भात असणाऱ्या माहितीचा अभाव होय. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ‘करिअर’ संदर्भात माहिती देणारे कोणतेही पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध नाही.
म्हणूनच मानसशास्त्र या विषयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्या क्षेत्रात करिअर करावे? नोकरीसाठी कोणते क्षेत्र निवडावे? या प्रश्नाचे निराकरण व्हावे या दृष्टीने मानसशास्त्रामधील करिअर व संधी या पुस्तकाचे लेखन केलेले आहे. या पुस्तकामध्ये मानसशास्त्रामधील व्यवसाय मार्ग, क्षेत्रे, शिक्षण देणाऱ्या संस्था, पदवी, पदव्युत्तर पदवीचे शिक्षण व करिअर संधी, नोकरी उपलब्ध असणाऱ्या संस्था इत्यादीची इत्थंभूत माहिती दिलेली आहे.
‘मानसशास्त्रातील करिअर आणि संधी’ हे पुस्तक पालकांना तर उपयोगी ठरेलच सोबतच मानसशास्त्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या व संधी शोधणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचा मार्गस्त्रोत ठरेल.