Welcome to Prashant Publications

Rs. 180.00 10% OFF
Availability: 10 left in stock

भारतीय करार कायदा हा व्यापार, उद्योग, तसेच दैनंदिन जीवनातील व्यवहारांचा एक अत्यंत महत्त्वाचा पाया आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती जाणून किंवा नकळत करारांच्या चौकटीत कार्य करत असते. अशा परिस्थितीत, भारतीय करार कायद्याचे सखोल व...

  • Name : भारतीय करार (प्रसंविदा) कायदा (Indian Contract Act)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : FYBCom
  • Barcode : 9789377761837

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतीय करार (प्रसंविदा) कायदा (Indian Contract Act)
- +

भारतीय करार कायदा हा व्यापार, उद्योग, तसेच दैनंदिन जीवनातील व्यवहारांचा एक अत्यंत महत्त्वाचा पाया आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती जाणून किंवा नकळत करारांच्या चौकटीत कार्य करत असते. अशा परिस्थितीत, भारतीय करार कायद्याचे सखोल व सोप्या भाषेत आकलन होणे अत्यावश्यक आहे, या जाणीवेतून या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार, तसेच कायद्याची प्राथमिक माहिती घेऊ इच्छिणारे वाचक यांना लक्षात घेऊन या पुस्तकाची मांडणी करण्यात आलेली आहे. या पुस्तकात भारतीय करार कायद्याच्या प्रमुख संकल्पना, तत्त्वे, कलमे, तसेच न्यायालयीन निर्णयांचा संदर्भ देऊन विषय अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. कठीण वाटणारा कायदा सोप्या, सुबोध आणि मराठी भाषेत समजावून
सांगण्याचा प्रयत्न हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे. या पुस्तकाच्या लेखन प्रक्रियेत अनेक संदर्भग्रंथ, कायद्याच्या मूळ कलमांचा अभ्यास, तसेच विविध तज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. 

युनिट -1........................................9
कायद्याचा मूलभूत परिचय
1.1 कायद्याचा मूलभूत परिचय
1.2 प्रसंविदा/करार कायदा: परिचय
1.3 कराराचे मुलभूत तत्वे
1.4 वैध कराराची निर्मिती

युनिट -2.......................................15
करार कायद्याची मुलभूत संकल्पना
2.1 संविदा व प्रसंविदा (कराराची) व्याख्या
2.2 संविदया व प्रसंविदयाचे (कराराचे) वर्गीकरण
2.3 प्रस्ताव व स्वीकृती
2.4 प्रस्तावाचे संवहन, स्वीकृती आणि उन्मोचन
2.5 प्रस्ताव व स्वीकृती मागे घेण्याची प्रक्रिया

युनिट -3....................................26
कराराची वैधता
3.1 कराराचे उद्दिष्ट व प्रतिफलाची वैधता
3.2 करार करण्याची पात्रता
3.3 संमती व मुक्त संमती
3.4 शून्यार्थक करार
3.5 शून्य आणि संभाव्य करार

युनिट -4............................................53
कराराची अंमलबजावणी
4.1 कराराची पुर्ती अथवा समाप्ती व देयकांचे विनियोग
4.2 आभासी प्रसंविदा, ई-करार
4.3 कराराची पूर्तता किंवा निष्पादन
4.4 प्रसंविदा भंगाचे (करारभंगाचे) - परिणाम व उपाय

युनिट -5.........................................77
नुकसानभरपाई व हमी कायदा
5.1 परिचय: नुकसानभरपाई व हमी कायदा
5.2 नुकसानभरपाईचा करार
5.3 परिभाषा - आवश्यक घटक
5.4 नुकसानभरपाई मागणाऱ्याचे हक्क
5.5 नुकसानभरपाई देणाऱ्याचे हक्क

युनिट -6.........................................84
हमीचा करार
6.1 परिभाषा, हमीच्या करारातील प्रतिफळ
6.2 हमीच्या कराराची आवश्यक तत्त्वे
6.3 बँक हमीविषयक कायदा
6.4 नुकसानभरपाईचा करार व हमीचा करार यांतील फरक
6.5 विमा करार, हमी आणि नुकसानभरपाई - तुलना
6.6 भिन्नता - सतत हमी, सतत हमीची रद्दबातल
6.7 हमीदार कधी मुक्त होत नाही
6.8 अपवाद - अवैध हमी
6.9 हमीदाराचे हक्क, सह-हमीदारांबाबत कायदा
6.10 हमीदाराचे सह-हमीदारांविरुद्ध हक्क

युनिट -7...................................................98
जामीन व तारण
7.1 जामीन: परिभाषा
7.2 आवश्यक तत्त्वे, जामीनीचे प्रकार,
7.3 देणेकऱ्याचे हक्क, कर्तव्ये व जबाबदाऱ्या
7.4 जामीनदाराचे हक्क, कर्तव्ये व जबाबदाऱ्या
7.5 'तारणहक्क' म्हणजे काय? सामान्य तारणहक्क, विशेष किंवा विशिष्ट
तारणहक्क.
7.6. विशेष तारणहक्क व सामान्य तारणहक्क यांतील फरक
7.7 सापडलेल्या वस्तूंचा शोध लावणारा
7.8 तारण: परिभाषा, आवश्यक तत्त्वे, तारण व हक्क मधील फरक
7.9 तारण व जामीन यांतील फरक
7.10 तारणदाराचे हक्क
7.11 तारणदाराच्या जबाबदाऱ्या व तारण देणाऱ्याचे हक्क
7.12 खरी मालकी नसलेल्या व्यक्तीकडून तारण

युनिट -8 ...........................................109
प्रतिनिधी कायदा
8.1 प्रतिनिधीची नियुक्ती
8.2 प्रतिनिधी व मुख्य कोण?
8.3 कोण प्रतिनिधी नेमू शकतो?
8.4 कोण प्रतिनिधी ठेवू शकतो? एजन्सीची कसोटी
8.5 एजन्सी कशी तयार होते? अनुोदन, अनुोदनाची
नियमावली
8.6 प्रतिनिधींचे वर्गीकरण, उप-प्रतिनिधी
8.7 मुख्य, प्रतिनिधी व उप-प्रतिनिधी यांच्यातील नाते
8.8 प्रतिनिधीचे अधिकार, अनुमानित अधिकार, अधिकाराचा परिणाम
8.9 अधिकाराची रद्दबातल व प्रतिनिधीचे राजीनामे, मुख्य व प्रतिनिधीचे
हक्क-कर्तव्ये-जबाबदाऱ्या
8.10 एजन्सीची समाप्ती किंवा निर्धारण. समाप्तीचे परिणाम

💬

Chat with us