Welcome to Prashant Publications

Rs. 120.00 10% OFF
Availability: 10 left in stock

भारतीय समाजाच्या विकासाचा विचार करताना महिलांची भूमिका आणि त्यांची सामाजिक स्थिती हा अत्यंत महत्त्वाचा विषय ठरतो. भारताची संस्कृती, परंपरा आणि सामाजिक रचना यामध्ये महिलांना कधी “गृहलक्ष्मी”, “जननी” आणि “शक्तीचे प्रतीक”...

  • Name : भारतीय महिलांची सामाजिक स्थिती आणि समस्या
  • Vendor : Prashant Publication
  • Type : SYBA
  • Manufacturing : March 2026
  • Barcode : 9789377765149

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतीय महिलांची सामाजिक स्थिती आणि समस्या
- +

भारतीय समाजाच्या विकासाचा विचार करताना महिलांची भूमिका आणि त्यांची सामाजिक स्थिती हा अत्यंत महत्त्वाचा विषय ठरतो. भारताची संस्कृती, परंपरा आणि सामाजिक रचना यामध्ये महिलांना कधी “गृहलक्ष्मी”, “जननी” आणि “शक्तीचे प्रतीक” म्हणून गौरवण्यात आले, तर काही काळात त्यांना दुय्यम स्थानही दिले गेले. त्यामुळे भारतीय महिलांची स्थिती समजून घेताना पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून तिचा विचार करणे आवश्यक ठरते. या पुस्तकामध्ये भारतीय महिलांची पारंपरिक आणि आधुनिक स्थिती, त्यांच्या भूमिका, सामाजिक प्रश्न, आरोग्यविषयक समस्या, कामाच्या ठिकाणच्या अडचणी, उपेक्षित महिलांचे प्रश्न आणि महिला सक्षमीकरणाचे विविध पैलू यांचा सविस्तर आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. या विषयांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि समाजातील सर्व घटकांना महिलांच्या समस्यांची जाणीव होऊन त्यावर सकारात्मक उपाययोजना करण्याची प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महिलांचा सन्मान, समानता आणि सशक्त सहभाग अत्यावश्यक आहे. “महिला सशक्त तर समाज सशक्त” ही जाणीव प्रत्येकाने मनात ठेवून अधिक समतावादी आणि प्रगत समाज घडविण्याचा प्रयत्न करणे.

प्रकरण 1........................................................................7
भारतीय महिलांची स्थिती
अ) भारतीय महिलांची पारंपरिक आणि आधुनिक स्थिती आणि भूमिका.
ब) परित्यक्ता महिला - अर्थ, प्रकार आणि परित्यक्ता महिलांच्या समस्या.

प्रकरण 2......................................................................17
महिलांचे सामाजिक प्रश्न
अ) सामाजिक आणि धार्मिक भेदभाव-कारणे आणि महिलांवरील परिणाम
ब) महिलांच्या मालमत्तेच्या हक्काचा प्रश्न आणि कायदा.

प्रकरण 3......................................................................22
महिलांच्या आरोग्याच्या समस्या
अ) 'महिलांच्या आरोग्याच्या समस्याःआहारातील भेदभाव', स्वच्छता आणि प्रसूतीदरम्यान मृत्यू
ब) एकल पालक कुटुंबातील मुलींचे प्रश्न आणि अविवाहित मातांच्या समस्या.

प्रकरण 4......................................................................34
महिलांच्या कामाच्या ठिकाणच्या समस्या
अ) कामाच्या ठिकाणी होणारा छळ-अर्थ, प्रकार आणि महिलांवरील परिणाम
ब) स्त्री भ्रूणहत्या-अर्थ, कारणे आणि परिणाम.

प्रकरण 5......................................................................49
उपेक्षित महिला
अ) उपेक्षित महिलांची स्थिती-दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक महिला
ब) विधवांच्या समस्या-विधवांचा अर्थ आणि समस्या.

प्रकरण 6......................................................................64
महिला सक्षमीकरणाचे मुद्दे
अ) महिला सक्षमीकरण - अर्थ आणि महिला सक्षमीकरणातील आव्हाने
ब) महिलांविरुद्ध शैक्षणिक भेदभाव - कारणे आणि महिलांवरील परिणाम.

💬

Chat with us