Your cart is empty now.
भारतीय समाज सुधारक या पाठ्यपुस्तकाच्या निर्मितीमागील उद्देश विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञानपरंपरेची ओळख करून देणे आणि भारताच्या जडणघडणीत समाजसुधारकांचे योगदान समजावून सांगणे हा आहे. राजा राममोहन रॉय, स्वामी दयानंद सरस्वती, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, महर्षी धोंडो केशव कर्वे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान विचारवंतांच्या जीवनकार्याचा अभ्यास करून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक सुधारणा समजून घेण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे.
या समाजसुधारकांनी समाजातील अन्याय, अंधश्रद्धा आणि विषमता दूर करून समता, शिक्षण आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या कार्याचा भारतीय समाजाच्या प्रगतीवर झालेला प्रभाव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे.