Welcome to Prashant Publications

Rs. 350.00 10% OFF
Availability: 10 left in stock

खानदेशची भौगोलिक ओळख, संदर्भ साधने, प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन मध्ये वसाहती अंतर्गत खानदेश, स्वातंत्र्याची चळवळ, सामाजिक चळवळीत सत्यशोधक समाज, दलित चळवळी बरोबरच खानदेशातील कृषी, व्यापार-औद्योगिक व शैक्षणिक प्रगतीचा देखील...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

खान्देशचा इतिहास (History of Khandesh)
- +

खानदेशची भौगोलिक ओळख, संदर्भ साधने, प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन मध्ये वसाहती अंतर्गत खानदेश, स्वातंत्र्याची चळवळ, सामाजिक चळवळीत सत्यशोधक समाज, दलित चळवळी बरोबरच खानदेशातील कृषी, व्यापार-औद्योगिक व शैक्षणिक प्रगतीचा देखील परामर्श त्यांच्या या अभ्यासपूर्ण व प्रदीर्घ ग्रंथात आहे. प्रदीर्घ लेखन करून अभ्यासक, संशोधक, अध्यापक व विद्यार्थी यांना खानदेशचा इतिहास समजून घेण्यासाठी उपयोगी पडेल असा ग्रंथ मेहनतीअंती साकारलेला आहे. त्यात उपयुक्त नकाशे, परिशिष्टे, प्रमुख घटना, सनावळ्या आणि चित्रे मोठ्या संख्येने वापरल्यामुळे सदर ग्रंथास भरीवपणा आलेला आहे.

वाचक, अभ्यासक, अध्यापक, विद्यार्थी, संशोधक हे 'खानदेशचा इतिहास' या डॉ. विलास पाटील लिखित ग्रंथाचे यथोचित स्वागत करतीलच. परिणामी भावी आयुष्यात अधिकाधिक ग्रंथ निर्मिती करण्यास लेखकाला नक्कीच प्रोत्साहन मिळेल यात शंका नाही.

सत्र पहिले
१. खानदेशचे स्रोत (Sources of Khandesh) ...... १५
प्रस्तावना
खानदेशचे स्रोत
अ) पुरातत्त्व: शिलालेख, किल्ले, नाणी, मंदिरे
ब) अभिलेखागार:
I) वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे
II) समर्थ वाग्देवता मंदिर, धुळे
III) गांधीतीर्थ संग्रहालय आणि पुराभिलेखागार, जळगाव
IV) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे संग्रहालय आणि अभिलेखागार, जळगाव
V) वसाहतकाळातील अहवाल
क) आत्मचरित्र, चरित्रे, वर्तमानपत्रे, जनगणना अहवाल
ड) मौखिक स्रोत

२. खानदेश : प्राचीन काळ (Khandesh : Ancient Period) ...... ५२
प्रस्तावना
अ) वसाहतपूर्व शेती आणि समाज
ब) राजवंश आणि राज्यव्यवस्था
क) कला आणि वास्तुकला
ड) व्यापार आणि वाणिज्य मार्ग

सत्र दुसरे
३. फारुकी आणि मुघलांच्या अंतर्गत मध्ययुगीन खानदेश ...... ७९
(Medieval Khandesh Under the Faruqi & Mughals)
प्रस्तावना
अ) फारुकी आणि मुघल सम्राट
ब) शासन आणि प्रशासन
क) सामाजिक आणि आर्थिक स्थिती
ड) कला आणि वास्तुकला

४. मराठा साम्राज्याच्या काळात मध्ययुगीन खानदेश ...... १४५
(Medieval Khandesh During the Maratha Empire)
प्रस्तावना
अ) छत्रपती शिवाजी महाराज (शिवकाळ)
ब) छत्रपती शाहू महाराज
क) पेशवाईचा काळ
ड) राजा आणि प्रशासन

५. वसाहतींतर्गत खानदेश (Khandesh under the Colonial Rule) ...... १७४
प्रस्तावना
अ) खानदेश वसाहतवादी राजवटीत
ब) खानदेशात १८५७ चा उठाव
क) आदिवासी आणि शेतकरी चळवळी
ड) राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ - फैजपूर अधिवेशन (१९३६), भारत छोडो आंदोलन १९४२ (थोडक्यात), सशस्त्र संघर्ष

६. सामाजिक चळवळ आणि आधुनिकीकरण ...... २२१
(Social Movement and Modernization)
प्रस्तावना
अ) सामाजिक चळवळ - सत्यशोधक व दलित चळवळ
ब) कृषी व औद्योगिक विकास
क) शैक्षणिक प्रगती
ड) सुवर्णनगरी म्हणून जळगावचा उदय

संदर्भग्रंथ सूची ...... २६७

💬

Chat with us