Welcome to Prashant Publications

Rs. 295.00 10% OFF
Availability: 10 left in stock

मानवाच्या अतिहव्यासापोटी मानवाने पर्यावरणात प्रचंड हस्तक्षेप केला आहे, परिणामी त्यामुळे पर्यावरण व पर्यावरणाच्या संदर्भात निर्माण झालेल्या समस्या हा जागतिक पातळीवर चर्चेचा एक मुख्य विषय आहे. स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय व...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

पर्यावरण शिक्षण
- +

मानवाच्या अतिहव्यासापोटी मानवाने पर्यावरणात प्रचंड हस्तक्षेप केला आहे, परिणामी त्यामुळे पर्यावरण व पर्यावरणाच्या संदर्भात निर्माण झालेल्या समस्या हा जागतिक पातळीवर चर्चेचा एक मुख्य विषय आहे. स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय व जागतिक पातळीवर पर्यावरणामुळे निर्माण झालेले विघातक बदल विविध परिसंस्थांना मारक ठरत आहेत. पर्यावरण प्रदूषण, प्रदूषणांचे प्रकार, त्यांची कारणे, प्रदूषण नियंत्रणाचे उपाय, जैवविविधतेवरील संकटे, जैवविविधतेच्या संरक्षणाच्या पद्धती, याबाबतीतला आढावा पर्यावरण शिक्षण या क्रमिक पुस्तकात घेतलेला आहे. इतकेच नव्हे तर मानव-पर्यावरण संवाद, पर्यावरणवादाचा उदय, नैसर्गिक संसाधने, शाश्वत विकास, पर्यावरणीय समस्या आणि प्रमाणे, जमिनीचा वापर आणि जमिनीचे आच्छादन बदल, जागतिक बदल, इत्यादी पर्यावरण संदर्भातील बाबींचा वेध या संदर्भ ग्रंथातून घेतलेला आहे. पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला या पुस्तकाच्या माध्यमातून निश्चितच चालना मिळेल व पर्यावरण समतोलाची पुनर्स्थापना होवून शाश्वत विकासाला गती प्राप्त होईल अशी आशा आहे.

प्रकरण 1............................................................. 9
मानव आणि पर्यावरण
मानव-पर्यावरण संवाद
1. शिकार व वनसंकलन करणारा मानव
2. आगीवर नियंत्रण
3. कृषीचा उगम
4. नगर-राज्यांचा उदय
5. महान प्राचीन संस्कृती आणि पर्यावरण
6. मध्ययुग आणि पुनर्जागरण काळ
7. औद्योगिक क्रांती आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम
8. लोकसंख्या वाढ आणि नैसर्गिक संसाधनांचे अतिवापर
9. जागतिक पर्यावरणीय बदल

पर्यावरणवादाचा उदय
1. मानव आणि पर्यावरणकेंद्री दृष्टीकोन (मुख्य विचारवंत)
2. द क्लब ऑफ रो- वाढीस मर्यादा
3. 1972 ची मानवी पर्यावरण यावरील संयुक्त राष्ट्रसंघ परिषद
4. जागतिक पर्यावरण व विकास आयोग आणि शाश्वत विकासाची संकल्पना
5. रिओ शिखर परिषद आणि त्यानंतरचे आंतरराष्ट्रीय प्रयत्न

प्रकरण 2............................................................ 50
नैसर्गिक संसाधने आणि शाश्वत विकास
नैसर्गिक संसाधनांचे अवलोकन
1. संसाधनाची व्याख्या
2. नैसर्गिक संसाधनांचे वर्गीकरण- जैविक आणि अजैविक, पुनर्नविकरणीय व अपुनर्नविकरणीय

जैविक साधनसंपदा
1. जैविक साधनसंपदांचे प्रमुख प्रकार - जंगल, गवताळ प्रदेश, आर्द्र प्रदेश, वन्यजीव आणि जलचर (गोड पाणी आणि सागरी जल)
2. सूक्ष्मजीव एक साधनसंपदा
3. जैविक साधनसंपदास्थिती आणि आव्हाने

जल संपदा
1. जल साधनसंपदांचे प्रकार -
गोड्या आणि खऱ्या पाण्यातील साधनसंपदा
2. जल संसाधनांची उपलब्धता आणि वापर
3. पाण्याच्या अति वापराचे पर्यावरणीय परिणाम
4. पाण्याची कमतरता आणि ताण
5. पाण्यावरून होणारे संघर्ष

मृदा आणि खनिजसंपदा
1. महत्त्वपूर्ण खनिजे
2. खनिजांचे अतिउत्खनन
3. खनिजांच्या उत्खनन आणि वापरामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्या
4. मृदा एक साधन संपत्ती व तिची ऱ्हास

ऊर्जा संसाधने
1. ऊर्जा स्रोत आणि त्यांचे वर्गीकरण, पुनर्नविकरणीय आणि अपुनर्नविकरणीय ऊर्जा संसाधने
2. पारंपरिक ऊर्जा संसाधने - कोळसा, तेल, नैसर्गिक वायू, अणुऊर्जा
3. अपारंपरिक ऊर्जा संसाधने - सौर, पवन, भरतीची, जलविद्युत, सागरी
लाटा, भूऔष्णिक, जैववस्तूमानीय ऊर्जा, हायड्रोजन आणि इंधन सेल्स
4. ऊर्जा वापराचे पर्यावरणावर परिणाम

शाश्वत विकासाची ओळख
1. शाश्वत विकास ध्येये - उद्दिष्टे आणि निर्देशक, शाश्वत विकासाची
आव्हाने आणि धोरणे

प्रकरण 3.......................................................... 104
पर्यावरणीय समस्या : स्थानिक, प्रादेशिक आणि जागतिक

पर्यावरणीय समस्या आणि प्रमाण
1. सूक्ष्म,मध्यम, मोठे आणि ग्रहीय प्रमाण संकल्पना
2. स्थानिक, प्रादेशिक, आणि जागतिक घटनांचा काळानुरूप आणि भौगोलिक विस्तार

प्रदूषण
1. क्षेत्रीय प्रक्रियांचा पर्यावरणावर होणारा परिणाम, प्रदूषणाचे प्रकार - हवा, ध्वनी, जल, मृदा, नागरी घनकचरा, धोकादायक कचरा
2. सिमाबाह्य हवेचे प्रदूषण
1. आम्ल पर्जन्य
2. धुके

भूमीचा वापर आणि भूमी उपयोजनातील बदल
1. जमिनीचा ऱ्हास, निर्वनीकरण, वाळवंटीकरण, शहरीकरण
2. जैवविविधतेचा ऱ्हास: भूतकाळातील आणि वर्तानातील बदल, परिणाम

जागतिक बदल
1. ओझोन क्षय
2. हवामानातील बदल

प्रकरण 4.......................................................... 169
जैवविविधता व परीसंस्थांचे संवर्धन

जैवविविधता आणि तिचे वितरण
1. जैवविविधता एक नैसर्गिक साधन संपदा

2. जैवविविधतेच्या पातळ्या आणि प्रकार
3. भारतातील व जगातील जैवविविधता
4. जैवविविधता समृद्ध स्थळे
5. प्रजाती आणि परिसंस्था धोक्याच्या श्रेण्या

परिसंस्था आणि परिसंस्था सेवा
1. भारतातील प्रमुख परिसंस्था प्रकार आणि त्यांची मूलभूत वैशिष्ट्ये
2. परिसंस्था सेवा: वर्गीकरण आणि त्यांचे महत्त्व

जैवविविधता आणि परिसंस्थांना धोके
1. भूी उपयोग आणि भूी वापरातील बदल
2. व्यावसायिक शोषण
3. आक्रमक प्रजाती
4. आग
5. आपत्ती
6. हवामान बदल

प्रमुख संवर्धन धोरणे
1. स्वस्थानी व अन्यस्थानी संवर्धन
2. प्रमुख संरक्षित क्षेत्रे
3. जैवविविधता संवर्धनासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील
उपाययोजना
4. पारंपारिक ज्ञानाची संवर्धनातील भूमिका
5. समुदाय आधारित संवर्धन
6. लिंगरचना आणि संवर्धन

संदर्भ ग्रंथसूची..................................................... 223

💬

Chat with us