Your cart is empty now.
प्रस्तुत अभ्यास विषय हा राज्यशास्त्र विषयाचे अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांसह अन्य विद्याशाखेचे विद्यार्थी सुद्धा या विषयाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. आंतरविद्या व बहुविद्याशाखीय विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणावर स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतात. अशावेळी त्यांना वैकल्पिक विषय म्हणून तसेच सामान्य अध्ययन-१, सामान्य अध्ययन-२ पेपरच्या तयारीसाठी राज्यशास्त्र विषय हा उपयुक्त ठरतो. UPSC, MPSC व तत्सम स्पर्धा परीक्षेत राज्यशास्त्रांतर्गत संविधान, राज्यव्यवस्था, चालू घडामोडी, पक्षपद्धती, तरतुदी यास अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. म्हणून Political Science, Public Administration विषय घेऊन असंख्य विद्यार्थी यश संपादन करताना आढळतात. या दोन्ही विषयांइतकेच अन्य मानव्यविद्याशाखेतील विषयांची सुद्धा उपयुक्तता आहे.