Your cart is empty now.
सन 2020 पासून शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन होऊन नविन शैक्षणिक धोरणाचा शुभारंभ झालेला आहे. या नविन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, या विद्यापिठाने शैक्षणिक वर्ष 2025-2026 मध्ये व्दितीय वर्ष कला शाखेतील इतिहास विषयाचा अभ्यासक्रम पुनर्रचित करून तो लागू केलेला आहे. या नविन अभ्यासक्रमामध्ये ‘मराठा सत्तेचा उदय (इ.स. 1630-1707)’ हा विषय समाविष्ट केलेला आहे. प्रस्तुत ग्रथांचे
लिखाण त्याच अनुषंगाने करण्यात आलेले आहे. ‘मराठा सत्तेचा उदय (इ.स.1630-1707)’ या ग्रथांची मांडणी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून अगदी सोप्या, सुटसुटीत आणि मुद्देसूद भाषेत केलेली आहे. प्रस्तुत ग्रथांमध्ये महाराष्ट्रातील मराठा सत्तेच्या उदयापूर्वीची राजकीय, सामाजिक पाश्वर्भूमी, साहित्यिक आणि पुरातत्वीय साधने यांचा नव्याने अभ्यास करून मांडणी करण्यात आलेली आहे. प्रस्तुत ग्रथांत छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय, शाहाजी राजे भोसले, राजमाता जिजाबाई यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आलेला आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचे आदिलशाहीशी संघर्ष - जावळी प्रकरण, अफझलखानाचा वध, सिद्दी जोहरचा पन्हाळ्याला वेढा, छत्रपती शिवाजी महाराजांचा मोगलांशी संघर्ष - शाहिस्तेखानाची स्वारी, सुरतेची लुट, पुरंदरचा तह, आग्रा भेट आणि सुटका याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक, कर्नाटक मोहीम याचीही माहिती आलेली आहे. औरंगजेब बादशहाची दक्षिणेतील झंझावती स्वारी, त्याला अडविण्यासाठी छत्रपती संभाजी महारांजानी केलेले बलिदान त्यातुन सुरु झालेले ‘मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध; स्वातंत्र्ययुद्धातील महाराणी येशुबाई, छत्रपती राजाराम महाराज, रामचंद्रपंत अमात्य, महाराणी ताराबाई, संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्या भूमिका कामगिरीचा आढावा प्रस्तुत ग्रंथात घेण्यात आलेला आहे.