Welcome to Prashant Publications

Rs. 160.00 10% OFF
Availability: 10 left in stock

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सन 2024 पासून प्रथम वर्ष कला द्वितीय सत्रासाठी लागू केलेल्या सुधारित राष्ट्रीय शिक्षण धोरण अभ्यासक्रमानुसार भूगोल विषयासाठी ‘मानवी भूगोलाचा परिचय’ हे पाठ्यपुस्तक सादर करताना मला...

  • Name : मानवी भूगोलाचा परिचय (Introduction to Human Geography)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : FYBA | Sem - II
  • Barcode : 9789393727596

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

मानवी भूगोलाचा परिचय (Introduction to Human Geography)
- +

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सन 2024 पासून प्रथम वर्ष कला द्वितीय सत्रासाठी लागू केलेल्या सुधारित राष्ट्रीय शिक्षण धोरण अभ्यासक्रमानुसार भूगोल विषयासाठी ‘मानवी भूगोलाचा परिचय’ हे पाठ्यपुस्तक सादर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. मानवी भूगोल हा मानव आणि पर्यावरण यांच्यातील परस्परसंबंधांचा अभ्यास करणारा महत्त्वपूर्ण विषय असून या पुस्तकात मानवी भूगोलाचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती, शाखा व महत्त्व यांची सुसंगत व सोपी मांडणी करण्यात आली आहे. तसेच
लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक, भारतीय लोकसंख्येची रचना, लोकसंख्यात्मक संक्रमण सिद्धांत, ग्रामीण वस्तीचे प्रकार व प्रारूपे, तसेच कृषीचे प्रकार, भारतीय कृषीवरील परिणामकारक घटक व समस्यांचा अभ्यासक्रमानुरूप समावेश करण्यात आलेला आहे.
हे पुस्तक विद्यार्थीकेंद्रित, संकल्पनात्मक स्पष्टता देणारे आणि परीक्षाभिमुख स्वरूपाचे आहे. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना विषय सहज समजावा, भौगोलिक विचारांची तार्किक मांडणी करता यावी आणि आधुनिक शिक्षण पद्धतीनुसार विश्लेषणात्मक दृष्टिकोन विकसित व्हावा, हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक साध्या, शास्त्रशुद्ध व प्रवाही भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला असून आकृतीबंध, उदाहरणे आणि स्पष्टीकरणात्मक पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.   

प्रकरण 1. मानवी भूगालाची ओळख......................................5
अ. मानवी भूगोलाचा अर्थ व व्याख्या
ब. मानवी भूगोलाचे स्वरुप व व्याप्ती
क. मानवी भूगोलाच्या शाखा व महत्त्व

प्रकरण 2. लोकसंख्या व वस्ती...................................41
अ. लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक
ब. भारतीय लोकसंख्येची रचना: लिंग व साक्षरता
क. लोकसंख्यात्मक संक्रमणाचा सिद्धांत
ड. ग्रामीण वस्तीचे प्रकार व प्रारूपे (आकृतीबंध)

प्रकरण 3. कृषी भूगोल................................................85
अ. कृषीचे प्रकार (सखोल शेती, उपजीविकेची शेती)
ब. भारतीय कृषीवर परिणाम करणारे घटक
क. भारतीय कृषीसमोरील समस्या

💬

Chat with us