Your cart is empty now.
राज्यशास्त्र संविधान, कायदे, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये याबद्दल सखोल ज्ञान प्रदान करते.
राज्यशास्त्र शासनयंत्रणा, कामकाज, नागरिक-शासन संबंध, विविध संस्थांची रचना, विधिनियम, न्यायपालिका, आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय संघटना यांचा अभ्यास करते. ॲरिस्टॉटलच्या म्हणण्यानुसार, राज्यशास्त्र आदर्श नागरिक घडविते, हे विधान राज्यशास्त्राचे महत्व सिद्ध करते.
संघ लोकसेवा आयोगा द्वारे आयोजित करण्यात येत असलेल्या नागरी सेवा परीक्षेत राज्यशास्त्र हा विषय प्रथम प्राधान्य क्रमाने निवडला जातो.
राज्यशास्त्र हे जगातले प्राचीन शास्त्र आहे. राज्यशास्त्राचा जनक ॲरिस्टॉटलने राज्यशास्त्राला इतर सर्व शास्त्रे आणि व्यवहार यांचे नियमन करणारे म्हणून प्रधानशास्त्र (चरीींशी डलळशपलश) म्हटले आहे. प्रस्तुत पुस्तकात राज्यशास्त्राचा परिचय, राजकीय मूल्ये, लोकशाही, संविधान, उद्देशपत्रिका आणि भारतीय राजकीय व्यवस्थेचे स्वरुप याविषयी सविस्तर माहितीचे विवेचन केले आहे. पुस्तकाची साध्या, सोप्या भाषेत व सुलभ पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. प्रस्तुत ग्रंथ विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक यांना निश्चितच उपयुक्त ठरेल.