Welcome to Prashant Publications

Rs. 195.00 10% OFF
Availability: 10 left in stock

पालक बनणे हे व्यक्तीच्या जीवनात खूप आनंद देणारी बाब आहे, तरी पालकत्वाची जबाबदारी पार पाडणे तेवढीच कठीण आहे. आपल्या बालकाला वाढवणे, त्याच्या योग्य विकासाला दिशा देणे हे एक आव्हानात्मक कार्य...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

पालकत्व शिक्षण
- +

पालक बनणे हे व्यक्तीच्या जीवनात खूप आनंद देणारी बाब आहे, तरी पालकत्वाची जबाबदारी पार पाडणे तेवढीच कठीण आहे. आपल्या बालकाला वाढवणे, त्याच्या योग्य विकासाला दिशा देणे हे एक आव्हानात्मक कार्य आहे. आपल्या मुलांसोबत चांगला संवाद असणे आजच्या इंटरनेटच्या युगात दुरापास्त झाले आहे. पालक अशिक्षित असो वा सुशिक्षित, गरीब वा श्रीमंत सर्वांना आपापल्या बालकांविषयी काही ना काही समस्या, शंका जाणवतात. या शंका कशा दूर कराव्यात. समस्या कशा सोडवाव्यात हे कोणत्याही स्तरावरील शिक्षणात शिकवले जात नाही. कारण पालकत्व ही नैसर्गिक गोष्ट मानली जाते.

पालकत्वाचे शिक्षण ही संकल्पना भारतीयांसाठी नवीन आहे. पाश्चात्य देशात या शिक्षणाची मुळे रूजली आहेत. भारतात परंपरेने कुटुंबाकडून बालकाचे संगोपन, शिस्त, त्याचे भविष्य याविषयी निर्णय घेतले जातात. इथेच पिढीतील अंतराची ठिणगी पडते. बालहक्कांची घुसमट होते, हे सर्व होवू नये म्हणून पालकत्व शिक्षणाची रूजवात भारतात झाली.

प्रस्तुत पुस्तकात पालकत्व शिक्षण संकल्पना, अर्थ, गरज, महत्व, व्याप्ती, पालक शिक्षणाचे विविध दृष्टिकोन, विविध शास्त्रज्ञांनी मांडलेले उपागम, पालकांची भूमिका, जबाबदार्या यांचे तपशीलवार विवेचन केलेले आहे. भारतातील समाजात अस्तित्वात असलेल्या विविध कुटुंबातील आंतरक्रिया बालकांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग, भारतातील पालक शिक्षण, पालकत्व शैली, पालकांच्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीचा बालकावर होणारा परिणाम या बाबी नवीन नसल्या तरी त्यांची मांडणी पालक, शिक्षणाच्या दृष्टीने करण्यात आली आहे.

पालकत्व शिक्षण : 1.1. पालकत्व शिक्षणाचा अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती, 1.2. पालकत्व शिक्षणाची ध्येये, मूल्ये, उद्दिष्ट्ये, ध्येये परिभाषित करणे, 1.3. पालकत्व शिक्षणाचे सैध्दांतिक उपागम – ड्रेकर्स, स्किनर, गिनॉट, गॉर्डन, 1.4. पालकत्व शिक्षणाची गरज आणि महत्त्व
शाळेत पालक सहभागाची भूमिका : 2.1. वैयक्तिक पालकत्व शिक्षण, 2.2. पालकत्त्वात पालक आणि इतरांची भूमिका, 2.3. पालकत्वावर समवयस्क, शाळा आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा परिणाम, 2.4. भारतातील शिक्षक पालक संघटना, उद्दिष्टे व कार्ये
पालक भूमिका आणि जबाबदार्‍या/कर्तव्य : 3.1. एकविसाव्या शतकातील पालकांची भूमिका आणि जबाबदार्‍या, 3.2. भारतातील संयुक्त आणि विभक्त कुटुंबातील पालक बालक आंतरक्रिया, 3.3. पालकत्व शैली, 3.4. अपवादात्मक बालकांसाठी पालक शिक्षण
पालक शिक्षणातील नवप्रवाह : 4.1. बालक विकासात पालकांचा सहभाग, 4.2. पालकत्व शिक्षणासाठी कार्यनीती, 4.3. भारतातील पालकत्व शिक्षण, 4.4. बालक विकासावर पालकांच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक दर्जाचा होणारा परिणाम

💬

Chat with us