Your cart is empty now.
एनसीटीईच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्व विद्यापीठातील बी.एड. छात्राध्यापक आपल्या प्रशिक्षणाचा एक मोठा कालावधी शाळांमध्ये कार्यरत राहणार आहे. या कालावधीत त्यांनी कोणकोणती कामे करावीत, काय काय उपक्रम राबवावेत, शाळेशी संबंधित घटकांशी आंतरक्रिया करणे, शाळेचे दप्तर विविध नोंदी, मूल्यमापन, शासन व अन्य घटकांशी पत्रव्यवहार अशा सर्व बाबींचा परिचय छात्राध्यापकाला व्हावा असा छात्रसेवाकालाचा हेतू आहे. हा हेतू लक्षात घेवून प्रस्तुत पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे.
प्रस्तुत पुस्तकात छात्रसेवाकालाचा अर्थ, संकल्पना, वैशिष्ट्ये, नियोजन व अंमलबजावणी, शाळेचा परिचय, कार्ये, विविध उपक्रम, शाळा व समुदाय, मुख्याध्यापकाची भूमिका, शिक्षकाची भूमिका, शैक्षणिक संशोधन, छात्रसेवाकालचे अहवाललेखन अशा सर्व मुद्द्यांचा उहापोह केलेला आहे.