{"title":"BA I","description":"","products":[{"product_id":"आनंद-आणि-निरामय-स्वास्थ्याचे-मानसशास्त्र","title":"आनंद आणि निरामय स्वास्थ्याचे मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशोपन हॉवर सारख्या टोकाच्या निराशावादी तत्त्वज्ञानापासून ते अनेक वैश्विक तत्त्वज्ञानाचे सार दर्शविते की “दु:खम सर्वम्” अर्थात ‘संसार-जीवन दु:खमय आहे.’ सिग्मड फ्राईड या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाच्या मते, मानव सुख तत्त्वावर काम करतो. प्रत्येकाला जीवनात सुख-आनंद हवा असतो. दु:ख, दु:खाची कारण राहणारच, पण दु:खातही सुख शोधण्याची दृष्टी सकारात्मक मानसशास्त्रातून अभ्यासली जाते. स्थितीस्थापकत्त्व भाव अंगीकारुन फिनीक्स पक्षांसारखे उभे रहा! दुर्दम्य इच्छाशक्ती, आशावादी वृत्ती आणि कणखरपणाच्या बळावर व्याधीवर मात करा! धैर्य आणि चिकाटीच्या बळावर कठिणतम निर्धारित ध्येय साध्य करा. प्रामाणिकपणा, सामंजस्य, उच्च नैतिक मूल्य अंगिकारुन जीवनात यशस्वी व्हा! भावनिक बुद्धिमत्ता साकारुन स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि इतरांच्या भावना जाणून सहानुभूतीपूर्ण व्यवहार करा! कृतज्ञताभाव आणि क्षमाशील वृत्तीतून इतरांप्रतीचा राग, द्वेष भावना मनातून हद्दपार करा! विचारात नाविण्यपूर्णता, खुलेपणा आसू द्या! सौंदर्यदृष्टी दर्शवून फ्लो आणि सेव्हरिंग अनुभवातून जीवनात पुरेपूर आनंद मिळवा. जीवनात सकारात्मक भावनांचे प्राबल्य दिसू द्या. मनोसजगता सारख्या ध्यानतंत्राद्वारा कटू, दु:खद नकारात्मक विचारांकडे स्थितप्रज्ञवृत्तीने पाहण्यास शिकून मन:शांती मिळवा! यातूनच जीवन आनंदमय होईल आणि निरामय स्वास्थ्य लाभेल. हेच सकारात्मक मानसशास्त्राचे सार या आवृत्तीतून प्रस्तुत करण्याचा प्रयास आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसर्व लिखाण बामगार्डनर आणि मँरी क्रोथर्स च्या ‘सकारात्मक मानसशास्त्र’ तसेच स्नायडर आणि लोपेझचे ‘हँडबुक ऑफ पॉझिटिव्ह सायकालॉजी’ या पुस्तकांच्या आधारे केलेले आहे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386672689381,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Anand-Aani-Niramay-Swasthyache-Manasshastra_Dr-Chudaman-Badgujar_cnvt-1.jpg?v=1770718032"},{"product_id":"महाराष्ट्रातील-संत-आणि-समाजसुधारकांचा-इतिहास","title":"महाराष्ट्रातील संत आणि समाजसुधारकांचा इतिहास","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 नुसार Generic Open Elective Course सुरु केलेला आहे. यावर आधारित इतिहास विषयाअंतर्गत OE-1 विदर्भातील संत आणि समाजसुधारकांचा इतिहास, OE-2 महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारकांचा इतिहास हे कोर्स पदवीला प्रथम वर्षाकरीता तयार केलेले आहे. त्यानुसार मुख्यतः पदवीच्या (मानव्यविद्या, कॉमर्स, सायन्स इ. शाखा) प्रथम वर्षातील प्रथम सत्रामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता सदर पाठ्यपुस्तकाचे लेखन केले असले तरी प्रस्तुत विषय शिकविणाऱ्या प्राध्यापक बंधूंना, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच समाज परिवर्तनाचा इतिहास जाणून घेण्याची मनिषा असलेल्या अभ्यासकांना देखील प्रस्तुत पुस्तक उपयोगी ठरेल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदर पुस्तक संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित असले तरी महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठामध्ये समाजसुधारकांचा अभ्यासक्रम शिकविल्या जातो. त्यामुळे त्यांनाही हे पुस्तक उपयोगी ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386710307045,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Maharashtratil-and-Vidharbhatil-Samjsudharak_Prafull-Taley_cnvt-1.jpg?v=1770721010"},{"product_id":"अंतर्गत-सजावटीचे-आधुनिक-पैलू","title":"अंतर्गत सजावटीचे आधुनिक पैलू","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील नवीन अभ्यासक्रमानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) बी.ए. प्रथम वर्षाच्या वैकल्पिक गृहअर्थशास्त्र विषयाच्या द्वितीय सत्रा करिता असून प्रस्तुत पुस्तक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या अनुषंगाने या विषयांमध्ये अंतर्गत सजावटीची संकल्पना, परिभाषा, वर्तमान काळात अंतर्गत सजावटीची व्याप्ती, अंतर्गत सजावटीची मूलतत्त्वे, मूलभूत वैशिष्ट्ये, अंतर्गत सजावटीची क्षेत्र, घरगुती सजावट, संस्थात्मक सजावट, कार्यालय सजावट, बाजार सजावट या बऱ्याच विषयाचे अध्ययन समाविष्ट असून हा विषय मानवी जीवनाला परिपूर्ण करण्यासाठी फार उपयुक्त आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदर पुस्तकात अंतर्गत सजावटीचे आधुनिक पैलू याची सर्वांगाने चर्चा करण्यात आली आहे. यात अंतर्गत सजावटीचे घटक, फर्निचर, घरगुती कापड, सजावटीची साहित्य, उपकरणे, रंग, प्रकाश, नोकरीच्या संधी, व्यावसायिक अंतर्गत डिझाईनर, निवासी अंतर्गत डिझायनर, फर्निचर डिझाईनर, डिझाईनर सल्लागार इत्यादी विषयाची मांडणी सोप्या भाषेत मुद्देसूदरित्या करण्यात आलेली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386714992869,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Antargat-Sajavatiche-Aadhunik-Pailu_Dr-Jyoti-Hawre_cnvt-1.jpg?v=1770721260"},{"product_id":"प्राकृतिक-भूगोलाची-मूलतत्त्वे","title":"प्राकृतिक भूगोलाची मूलतत्त्वे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राकृतिक भूगोलाचा अभ्यास भूगोलशास्राच्या अध्ययनात अत्यंत महत्त्वाचा आहे. या विषयात समाविष्ट असलेल्या संकल्पना वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित असल्यामुळे, त्या समजून घेणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी भूगोलशास्त्राच्या इतर शाखांचा अभ्यास सोपा होण्यासाठी, प्राथमिक पातळीवर प्राकृतिक भूगोलाच्या संकल्पना समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच संकल्पनांची मांडणी सोप्या व सुसंगत पद्धतीने केली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविद्यार्थ्यांना प्राकृतिक भूगोलाचा सखोल अभ्यास करता यावा, म्हणून त्यात सूर्यकुल (सूर्यमाला), ग्रहण, पृथ्वीच्या गती, अक्षांश व रेखांश, वेळेचे मापन, चंद्र आणि चंद्रग्रहण यांसारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश केला आहे. तसेच विविध संकल्पनांचे स्पष्टीकरण आकृत्यांच्या सहाय्याने केले आहे, त्यामुळे संकल्पना अधिक स्पष्ट होतात. पुस्तकात एकूण 66 आकृत्या दिलेल्या आहेत, या पुस्तकाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रत्येक प्रकरणाच्या शेवटी वस्तुनिष्ठ व दीर्घोत्तरी प्रश्न दिले आहेत, ज्यामध्ये भौगोलिक संकल्पनांची उपयोजनेची गहनता दिसून येते. हे प्रश्न एम.पी.एस्सी., यु.पी.एस्सी., नेट-सेट यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386717188325,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prakritik-Bhugolachi-Multattve_Dr-Shankar-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1770721478"},{"product_id":"प्राचीन-भारतातील-जैन-व-बौद्ध-धर्माचा-इतिहास","title":"प्राचीन भारतातील जैन व बौद्ध धर्माचा इतिहास","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजगामध्ये फ्रेंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती आणि रशियन क्रांती अशा काही क्रांत्या झाल्या आणि त्याने सारे जग ढवळून निघाले. हिंदुस्थानात मात्र या आधुनिक काळातील क्रांतीपेक्षा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण क्रांती इ.स. पूर्व 6 व्या शतकात भगवान महावीर आणि भगवान गौतमबुद्ध यांनी घडवून आणली. ज्या काळात वैदिक धर्माचे वर्चस्व होते. त्याकाळात या दोन महापुरूषांनी भारतीय संस्कृतीला नवा आयाम दिला. नवे आशेचे किरण दाखविले. जेथे हिंसा मोठ्या प्रमाणात होत होती तेथे त्यांनी सर्व प्राणीमात्र एकसमान आहेत. तेव्हा त्यांचा यज्ञात कां बळी देता? असा प्रश्न विचारला आणि या देशाची पशुद्वारे होणारी हिंसा थांबविली. त्यांनी पशुहत्येचा निषेध केला. राजे लोक अश्वमेधासारखे यज्ञ करीत. रंतीदेव या राजाने तर एवढा मोठा यज्ञ केला की, त्यांतून पशुंचे जे कातडे निघाले ते वाळविण्यासाठी त्याने नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर पसरविले. तेव्हा नदीचे दोन्ही किनारे या चर्मन म्हणजे कातड्याने भरुन गेले. अतएव ती नदी ‘चर्मण्वती’ या नावाने ओळखली जाऊ लागली. भगवान महावीर आणि भगवान गौतमबुद्धांनी या गोष्टींचा निषेध केला. परमेश्वराची भक्ती करण्यासाठी मध्यस्थ म्हणजे पुरोहिताची गरज नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. भगवान आदिनाथ यांच्या काळापासून चालत आलेल्या जैन धर्माचा भगवान महावीर यांनी उद्घोष केला. तर भगवान गौतमबुद्धांनी चार आर्यसत्ये आणि अष्टांगमार्गाद्वारे मानवी जीवन सुखी करण्याचा प्रयत्न केला. सदाचार आणि नीतीने वागणे हाच खरा धर्म आहे याची शिकवण वरील दोन्ही महापुरूषांनी दिल्याने भारतीय संस्कृती ही समृद्ध बनली. या दोन्ही महापुरूषांनी केलेल्या कार्याचा आणि त्यांनी उद्घोषित केलेल्या धर्माचा हा इतिहास म्हणजेच हा ग्रंथ होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391835418853,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Bharatatil-Jain-va-Bauddha-Dharmacha-Itihas-Dr-G-B-Shah_cnvt-1-1-198x300.jpg?v=1770797452"},{"product_id":"सूक्ष्म-अर्थशास्त्र-1","title":"सूक्ष्म अर्थशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रिय विद्यार्थी मित्र व प्राध्यापक बंधू डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांनी वर्ष 2024-25 पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार (NEP 2020) बी.ए. प्रथम सत्रासाठी जो अभ्यासक्रम निश्चित केला आहे त्यानुसार या पुस्तकाची मांडणी केली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदरील ‘सूक्ष्म अर्थशास्त्र’ या पुस्तकात विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल अशी सोपी व सुटसुटीत भाषा वापरलेली आहे. आवश्यक तेथे कोष्टके, आकृत्या, भरपूर मुद्दे व व्यावहारिक उदाहरणे दिलेली आहेत. त्यामुळे हा कठीण वाटणारा विषय विद्यार्थ्यांना सहजपणे समजेल व सोपा वाटेल अशी खात्री आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391858487525,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sukshm-Arthashastra_Dr-Tiwari_cnvt-1-198x300.jpg?v=1770797959"},{"product_id":"समाजशास्त्राची-मूलतत्त्वे","title":"समाजशास्त्राची मूलतत्त्वे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसमाजशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. समाजशास्त्र हे केवळ सैद्धांतिक शास्त्र नाही, तर उपयुक्ततावादी शास्त्र सुद्धा आहे. त्यामुळे समाजशास्त्राचे अभ्यासक विविध क्षेत्रांमध्ये रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घेऊ शकतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत ग्रंथात समाजशास्त्राचा अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती याबरोबरच समाजशास्त्रात वापरल्या जाणाऱ्या विविध संकल्पनांची ओळख करुन दिली आहे. यामध्ये समाजशास्त्राची उपयोगिता, समाजशास्त्र आणि सामाजिक परिवर्तन, संस्कृतीच्या व्याख्या, वैशिष्ट्ये, घटक आणि कार्य, तसेच सामाजिकरणाचे अर्थ, व्याख्या, मूलतत्त्वे, उद्दिष्टे, अवस्था, साधने आणि सिद्धांत यांची माहिती समाविष्ट आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयाशिवाय, सामाजिक स्तरीकरण आणि गतिशीलता, यांचे अर्थ, प्रकार, घटक, स्तरीकरणाची कार्ये, सामाजिक गतिशीलतेचे परिणाम आणि प्रोत्साहन करणारे घटक यावर सुद्धा चर्चा केली आहे. सामाजिक परिवर्तनाच्या व्याख्या, वैशिष्ट्ये, प्रकार आणि कारणे यांची सुद्धा माहिती या ग्रंथात दिली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात अभ्यासक्रमानुसार साध्या आणि सोप्या भाषेत मांडणी करण्यात आली आहे. हे पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक आणि जिज्ञासू अभ्यासकांसाठी निश्चित उपयुक्त ठरेल\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391872741605,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samajshastrachi-Multattve_Dr-B-H-Kirdak_cnvt-1-198x300.jpg?v=1770798197"},{"product_id":"राज्यशास्त्र-आणि-भारतीय-राजकीय-व्यवस्था","title":"राज्यशास्त्र आणि भारतीय राजकीय व्यवस्था","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराज्यशास्त्र संविधान, कायदे, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये याबद्दल सखोल ज्ञान प्रदान करते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eराज्यशास्त्र शासनयंत्रणा, कामकाज, नागरिक-शासन संबंध, विविध संस्थांची रचना, विधिनियम, न्यायपालिका, आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय संघटना यांचा अभ्यास करते. ॲरिस्टॉटलच्या म्हणण्यानुसार, राज्यशास्त्र आदर्श नागरिक घडविते, हे विधान राज्यशास्त्राचे महत्व सिद्ध करते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसंघ लोकसेवा आयोगा द्वारे आयोजित करण्यात येत असलेल्या नागरी सेवा परीक्षेत राज्यशास्त्र हा विषय प्रथम प्राधान्य क्रमाने निवडला जातो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eराज्यशास्त्र हे जगातले प्राचीन शास्त्र आहे. राज्यशास्त्राचा जनक ॲरिस्टॉटलने राज्यशास्त्राला इतर सर्व शास्त्रे आणि व्यवहार यांचे नियमन करणारे म्हणून प्रधानशास्त्र (चरीींशी डलळशपलश) म्हटले आहे. प्रस्तुत पुस्तकात राज्यशास्त्राचा परिचय, राजकीय मूल्ये, लोकशाही, संविधान, उद्देशपत्रिका आणि भारतीय राजकीय व्यवस्थेचे स्वरुप याविषयी सविस्तर माहितीचे विवेचन केले आहे. पुस्तकाची साध्या, सोप्या भाषेत व सुलभ पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. प्रस्तुत ग्रंथ विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक यांना निश्चितच उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391882866917,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajyashastra-Aani-Bharatiya-Vyavastha_Dr-Shriram-Yerankar_cnvt-1-198x300.jpg?v=1770798413"},{"product_id":"परिचयात्मक-अर्थशास्त्र","title":"परिचयात्मक अर्थशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसदरील ‘परिचयात्मक अर्थशास्त्र’ या पुस्तकात विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल अशी सोपी व सुटसुटीत भाषा वापरलेली आहे. आवश्यक तेथे कोष्टके, आकृत्या, भरपूर मुद्दे व व्यावहारिक उदाहरणे दिलेली आहेत. त्यामुळे हा कठीण वाटणारा विषय विद्यार्थ्यांना सहजपणे समजेल व सोपा वाटेल अशी खात्री आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48392658911461,"sku":null,"price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Parichayatmak-Arthashastra_Dr-Harihar-Tiwari_cnvt-1-198x300.jpg?v=1770803714"},{"product_id":"मानसशास्त्र-परिचय","title":"मानसशास्त्र परिचय","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eनवीन अभ्यासक्रम आला की, पहिल्या वर्षी विद्यार्थ्याची तारांबळ उडते. कारण नव्या अभ्यासक्रमात काळानुरूप नव्या बाबी बहुतेक करुन समाविष्ट झालेल्या असतात. त्यामुळे त्याचे अवलोकन व अभ्यास करतांना अनेक पुस्तके व संदर्भ ग्रंथाचा आधार घ्यावा लागतो. कोणताही एक घटक हा एका पुस्तकातून पूर्ण होत नाही. त्यातून वेळ, पैसा व श्रम हे जास्तीचे खर्च होतात. ही अडचण लक्षात घेता अभ्यासक्रमावर आधारीत विद्यार्थ्याची ज्ञानाची गरज पूर्ण व्हावी, या हेतूने या पुस्तकाचे प्रयोजन आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘मानसशास्त्र’ हा विषय आता बंदिस्त राहिलेला नाही. याची व्याप्तीही दिवसेंदिवस वाढत आहे. या विषयाबाबतची कुतूहलता, विद्यार्थी, शिक्षक व व्यक्ती या सर्वांचीच वाढत आहे. सद्यस्थितीत फार मोठ्या प्रमाणात ताणतणाव, चिंता, भिती, आसक्ती वाढत आहे, त्यामुळे सुख, समाधान, मानवी मनापासून दुरावल्या गेले आहे. मानसिक समस्या वाढत आहे. त्यातून शारीरीक समस्या उद्भवत आहे. व्यक्तीची जसजसी दमछाक व कोंडी होत आहे. तसतसा व्यक्ती केंद्रित होत आहे. त्यातून सुटण्याचे अनेक मार्ग व्यक्ती चोखाळतांना दिसतो आहे. म्हणूनच सामान्य व्यक्तीलाही ‘मानसशास्त्र’ विषय वरदानच ठरत आहे. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणामध्ये प्रत्येक घटक हा व्यवस्थित व साजेश्या, सोप्या पद्धतीने मांडण्याचा, उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यातून विद्यार्थ्यांना व सामान्य व्यक्तीला सुद्धा या पुस्तकातील सर्वच संकल्पना स्पष्ट होतील व जीवन उपयोगी ठरतीलच.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48392670773477,"sku":null,"price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manasshastra-Parichay_Dr-D-R-Jaronde_cnvt-1-198x300.jpg?v=1770803983"},{"product_id":"गृहअर्थशास्त्र-आणि-रोजगार-संधी","title":"गृहअर्थशास्त्र आणि रोजगार संधी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बीए प्रथम वर्षाच्या गृहअर्थशास्त्र विषयाच्या प्रथम व द्वितीय सत्र अभ्यासक्रमामध्ये विद्यापीठाने नेऊन दिल्यानुसार प्रस्तुत ‘गृहअर्थशास्त्र व रोजगार संधी’ या पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे. प्रस्तुत पुस्तक हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) नुसार तयार केलेले असून यामध्ये गृहअर्थशास्त्राचा इतिहास, गृहअर्थशास्त्र परिभाषा, गृहअर्थशास्त्र शिक्षण हे जीवन शिक्षण, गृहअर्थशास्त्रात नोकरीच्या संधी, गृहअर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा, कौटुंबिक संसाधने, घर आणि कार्यक्रम व्यवस्थापन, कुटुंबनिवास, फर्निचर, अंतर्गत सजावट, पुष्परचना याविषयीचे शास्त्रशुद्ध ज्ञान देऊन त्यामध्ये आवड निर्माण होऊन हा विषय सोपा करण्याचा या पुस्तकामध्ये प्रयत्न करण्यात आला आहे. हे पुस्तक विद्यार्थिनी व अध्यापकांच्या पसंतीला उतरेल अशी अपेक्षा आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eगृहअर्थशास्त्र आणि अंतर्गत सजावट याचा एकंदरीत विचार करता, गृहअर्थशास्त्र म्हणजे काय ते प्रथम पाहायला हवे गृह आणि अर्थ याचा शास्त्रीयदृष्ट्या योग्य तो ताळमेळ बसवणारे शास्त्र म्हणजे गृहअर्थशास्त्र होय. गृहअर्थशास्त्राचा प्रारंभ हा बऱ्याच कालावधीपासून झालेला असून विकास प्रक्रियेचा प्रारंभ हा आणखी विस्तारित होत आहे. मानवाचा विकास ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, यामध्ये मानवाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टी येणाऱ्या सर्व प्रक्रियेचा अंतर्भाव गृहअर्थशास्त्र विषयांमध्ये होत असतो. मानवाचा विकास व्हावा याकरिता मानवी जीवनामध्ये अनेकविध घटक असतात. त्यापैकी गृहव्यवस्थापन, अन्न व आरोग्यशास्त्र, वस्त्रशास्त्र, निर्णय प्रक्रिया, गृहव्यवस्थापन प्रक्रिया, जलसंधारणाची गरज, कचरा विल्हेवाटेची गरज, अंतर्गत सजावटीची संकल्पना, घरगुती पोशाख निवड व काळजी, पुष्परचनेचे विविध प्रकार या सर्वांचे अध्ययन यामध्ये अंतर्भूत असल्याने हा विषय गृहिणीबरोबर विद्यार्थिनी, अध्यापक वर्ग व सर्वसामान्य पातळीवर सर्व स्त्रियांसाठी उपयुक्त ठरणारा आहे. या अनुषंगाने या विषयाची मांडणी केलेली असून ही पुस्तिका सामान्य वाचकांना सुद्धा उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48392691581157,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Gruha-Arthashastra-and-Career-Sandhi_Dr-Jyoti-Haware_cnvt-1-198x300.jpg?v=1770804259"},{"product_id":"अर्थशास्त्राची-ओळख","title":"अर्थशास्त्राची ओळख","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारतीय अर्थव्यवस्थेतील बदलांची सुरुवात 1991 पासून सुरु झाली व भारतीय अर्थव्यवस्था बाजाराभिमुख होत गेली. अनेक नवीन संस्थात्मक बदल करणे अपरिहार्य झाले. जलद आर्थिक विकासासाठी संपूर्ण जगाने खासगीकरणाचा मार्ग पत्करला आहे. वेगवेगळ्या देशात त्याचे बरे-वाईट परिणाम जाणवायला लागले आहेत. भारतही या बदलांना सकारात्मक प्रतिसाद देत आहे. त्यात पुरवठ्याच्या अर्थशास्त्राकडे वाढत जाणारा कल, नियोजन आयोगाऐवजी निती आयोग, विद्यापीठ अनुदान आयोगाऐवजी भारतीय उच्चशिक्षण आयोग, विदेशी गुंतवणूकीसाठी सकारात्मक धोरणे, पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याची व्युहरचना, जुन्या भारतीय दंडसंहितेऐवजी नवीन भारतीय न्यायसंहिता आणि शिक्षण क्षेत्रासाठी “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020” ज्याची अंमलबजावणी आपल्या विद्यापीठ परीक्षेत्रात शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून करण्यात येत आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eराष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे उद्दिष्टे व चांगले परिणामाधारीत आहेत. (Objectives \u0026amp; Outcomes Base) हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आपले खाजगी व सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम बनवेल व त्यातून एक जबाबदार नागरिक बनू शकेल, असे गृहीत मानले आहे. हाच दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवून विद्यापीठाच्या अभ्यासमंडळाने छोट्या-छोट्या सैद्धांतिक संकल्पनाच्या आधारावर अभ्यासक्रमाची रचना करुन ही गृहीतके व उद्दिष्टे साध्य करण्याचा संकल्प केला आहे. प्रत्येक सत्रात विद्यार्थ्यास 3 क्रेडीट प्राप्त करायचे आहे. बहि:स्थ परीक्षा 60 गुणांची असेल व अंतर्गत परीक्षा 40 गुणांची असेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48392699904229,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Arthashastrachi-Olkha_Dr-M-J-Gaikawad_cnvt-1-198x300.jpg?v=1770804557"},{"product_id":"मुलींचे-शिक्षण-व-महिला-सक्षमीकरण","title":"मुलींचे शिक्षण व महिला सक्षमीकरण","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eस्त्री ही आपल्या कुटूंबाचा आधारस्तंभ असते. एका स्त्रीला शिक्षित केल्याने तिचे संपूर्ण कुटूंब शिक्षित होते. ती आईच्या रूपात आपल्या मुलांवर योग्य ते संस्कार करते. देशाची सामाजिक आणि आर्थिक प्रगती साधावयाची असेल तर पुरूषांसोबत स्त्रियांनाही शिक्षित करायला हवे. स्त्री शिक्षणाचे अनेक फायदे आहेत. शिक्षण प्राप्त करुन स्त्रीमध्ये आत्मसन्मान निर्माण होतो. त्याचबरोबर आपल्या कुटूंबाला त्याचे फायदे होतात. मुलींच्या शिक्षणासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असून त्यांचा उपयोग करून घेणे आवश्यक आहे. स्त्रीशिक्षणामुळे समाजात विविधांगी दृष्टीने प्रगती घडून येते. शिक्षणामुळे मुली व महिलांमध्ये स्वयंनिर्णयशक्ती प्राप्त होते. देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी स्त्रियांचे शिक्षण अतिशय महत्त्वाची बाब आहे, मात्र आजही एकविसाव्या शतकात महिलांना पूर्ण स्वातंत्र्य हव्या त्या प्रमाणात मिळालेले नाही. परिपूर्ण देश तेव्हाच घडेल ज्यावेळेस स्त्रीस पूर्ण स्वातंत्र्य मिळेल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eराजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी, रमाबाई आंबेडकर, इंदिरा गांधी, कल्पना चावला, मेरी कोम, लता मंगेशकर, भिकाईजी कामा यासारख्या लोकोत्तर व्यक्तिमत्त्वांना या साहित्यकृतीतून प्रस्तुत केेले आहे. राष्ट्रनिर्मितीसाठी, समाजसुधारणीसाठी, महिला शिक्षण व महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे साहित्यलेखन प्रेरकशक्ती ठरतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तक हे विशेषकरून विद्यालयीन, महाविद्यालयीन मुली, महिला व त्यांच्या पालकवर्गासाठी उपयुक्त आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48414086430949,"sku":null,"price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mulinche-Shikshan-va-Mahila-Sakshamikaran_Sau-Pratibha-Patil_cnvt-1-198x300.jpg?v=1771056115"},{"product_id":"कार्यक्रम-व्यवस्थापन-आणि-योजना-प्रणाली","title":"कार्यक्रम व्यवस्थापन आणि योजना प्रणाली","description":"\u003cp\u003eगृहअर्थशास्त्र या विषयाअंतर्गत विचार करता हा विषय मानवी जीवन सुबद्ध करण्यास फार उपयुक्त ठरतो. या अनुषंगाने या विषयांमध्ये मानवी जीवनात येणाऱ्या बऱ्याचशा घटकांचे अध्ययन केले जात असते. त्यापैकी कार्यक्रम व्यवस्थापन, कार्यक्रमाची गरज, महत्व, कार्यक्रम व्यवस्थापनाचा आधुनिक काळातील कल, कार्यक्रम व्यवस्थापनाचे प्रकार यामध्ये सार्वजनिक कार्यक्रम, वैयक्तिक कार्यक्रम, सहकारयुक्त कार्यक्रम, व्यावसायिक कार्यक्रम, कार्यक्रम व्यवस्थापनाची तत्वे, कार्यक्रमाचा आराखडा, कार्यक्रम व्यवस्थापनाचे औद्योगिक स्थान, कार्यक्रम व्यवस्थापन नियोजन प्रक्रिया, कार्यक्रम व्यवस्थापनाद्वारे नोकरीचे मार्ग, नोकरीचे आवश्यक मार्गदर्शन, कार्यक्रम व्यवस्थापनाची जाळे या बऱ्याच विषयाचे अध्ययन समाविष्ट असून हा विषय मानवी जीवनाला परिपूर्ण करण्यासाठी फार उपयुक्त आहे.\u003cbr\u003eसदर पुस्तकात कार्यक्रम संघ, कार्यक्रम प्रशिक्षण, व्यवसाय आणि कल, शैक्षणिक, राजकीय, वैज्ञानिक कार्यक्रम, समिती, त्याची रचना, कार्य, जबाबदारी, कार्यक्रम व्यवस्थापकाचे गुण, कार्यक्रम व्यवस्थापन प्रणालीचा विकास, कार्यक्रम नियोजनाचे मूल्यांकन आदि विषयाची मांडणी सोप्या भाषेत मुद्देसूदरित्या करण्यात आली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील नवीन अभ्यासक्रमानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणनुसार (NEP) बी.ए. प्रथम वर्षाच्या वैकल्पिक गृहअर्थशास्त्र विषयांतर्गत कार्यक्रम व्यवस्थापन आणि योजना प्रणाली हे प्रथम व द्वितीय सत्राकरिता असून प्रस्तुत पुस्तक विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451307634917,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Karyakram-Vyavasthapan_Dr-Jyoti-Hawre_cnvt-1.jpg?v=1771570525"},{"product_id":"हिंदी-व्याकरण-एवं-अभिव्यक्ति-कौशल","title":"हिंदी व्याकरण एवं अभिव्यक्ति कौशल","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमनुष्य जीवन में स्थित विचार, अनुभव, भावना, कल्पना आदि को व्यक्त करने के लिए भाषा आवश्यक होती है। व्याकरण को भाषा की आधारशिला माना जाता है। शुद्ध लिखना, बोलना, पढना और व्यवहार करना भाषा के व्याकरण से ही सीखा जा सकता है। मनुष्य का भावनिक विकास, चिंतनशीलता और कलात्मकता में भाषा की शिक्षा समन्वय की भूमिका निभाती है। शिक्षा और ज्ञान-विज्ञान के प्रसार के साथ उसमें अनेक परिवर्तन होने लगे। इंटरनेट ने तो मानो जैसे सारी दुनिया ही घर में लाकर बसा दी हो। साक्षात्कार लेखन, वक्तृत्व, वाद-विवाद, संक्षेपण, पल्लवन, जनसंपर्क, सूत्र संचालन, अनुवाद, प्रामाणिक आलेखन, टिप्पन लेखन आदि ऐसे अनेकानेक क्षेत्रों में हिंदी भाषा को अच्छी तरह से जानने-समझने वाले मानव संसाधन की बडी आवश्यकता है। इस क्षेत्र में प्राप्त की निपुणता रोजगार का साधन उपलब्ध कराने में बहुत सक्षम है। व्यावहारिक हिंदी भाषा आज अत्यंत आवश्यक है। आधुनिक काल में विभिन्न प्रयोजनों के लिए, नये-विकसित होते अनेकानेक क्षेत्रों में हिंदी भाषा का यथायोग्य उपयोग एक चुनौती है। और भाषा उपयोग के कौशल को आत्मसात किए बिना इस चुनौती से पार पाना संभव नहीं है।\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451353739493,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Hindi-Vyakaran-Evam-Abhivyakti-Kaushal_Dr-Sunil-Panpatil_cnvt-1.jpg?v=1771573634"},{"product_id":"भारताचा-इतिहास-इ-स-701-ते-1525","title":"भारताचा इतिहास (इ.स. 701 ते 1525)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राचीन काळापासून भारतावर शक, हूण, कुशाण, ग्रीक, अरबांनी आक्रमणे केली. अरबांचे आक्रमण इस्लाम धर्माचा प्रचार करण्यासाठीच असल्यामुळे तुर्की व मोगल आक्रमकांकरिता मार्गदर्शक ठरले. मुस्लिम आक्रमकांना तत्कालिन भारतीय सत्ताधिशांनी वीरतेने तोंड दिले, पण गझनी, घोरी, ऐबक, खिलजी, तुघलक यासारख्यां आक्रमकांच्या कपटनीतीला ते बळी पडले. तत्कालिन भारतीयांमध्ये एकतेचा, दूरदर्शीपणाचा प्रचंड अभाव होता. हिंदूंचा वारंवार पराभव का होतो आहे याचे योग्य विश्लेषण ते करू शकले नाही. आपापसातील भाऊबंदकी, सत्तासंघर्ष, हेवेदावे यातच भारतीयांची प्रचंड शक्ती खर्च झाली. मुस्लिम आक्रमणामुळे सामान्य जनता कंगाल झाली. भयभीत झाली. त्यांच्या धर्मप्रसार, राजकीय हेवेदावे, सततचा रक्तरंजीत संघर्षामुळे सामान्यांना कोणीही वाली राहिला नाही. स्त्रियांची अवस्था आणखीनच भयावह झाली. आक्रमकांसोबतच आलेल्या स्थापत्य, कला, उद्योगधंदे, आर्थिकता व तांत्रिकता, समाजमान्य पद्ध्ातींचा भारतीय संस्कृतीबरोबर सरमिसळ झाली.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48453520359653,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatacha-Itihas-AD-701-to-1525_Dr-G-B-Shaha_cnvt-1.jpg?v=1771658781"},{"product_id":"मानसशास्त्राची-मूलतत्त्वे","title":"मानसशास्त्राची मूलतत्त्वे","description":"\u003cp\u003eसद्य:स्थितीत फार मोठ्या प्रमाणात ताणतणाव, चिंता, भीती, आसक्ती वाढत आहे. त्यामुळे सुख, समाधान मानवी मनापासून दुरावल्या गेले आहे, मानसिक समस्या वाढत आहे त्यामुळे शारीरीक समस्या निर्माण होत आहे. व्यक्तीची जसजसी दमछाक व कोंडी होत आहे तसतसा व्यक्ती केंद्रित होत आहे. त्यातून सुटण्याचे अनेक मार्ग व्यक्ती चोखाळतांना दिसतो, यासाठी सामान्य व्यक्तीलाही ‘मानसशास्त्र’ हा विषय सद्यास्थितीत महत्वाचा, वरदानच ठरत आहे. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणांमध्ये प्रत्येक घटक हा व्यवस्थित व साजेश्या सोप्या पद्धतीने मांडण्याचा, उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यातून विद्यार्थ्यांना व सामान्य व्यक्तीला सुद्धा या पुस्तकातील सर्वच संकल्पना स्पष्ट होतील व जीवन उपयोगी ठरतीलच.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eManasshastrachi Multattve\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48468382515429,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Marathi-Cover-Page_cnvt-1_e9d13383-f515-4107-a808-3950615fe085.jpg?v=1771931344"},{"product_id":"मानवी-भूगोल-व-प्रात्यक्षिके","title":"मानवी भूगोल व प्रात्यक्षिके","description":"\u003cp\u003eमानवी भूगोल म्हणजे मानवाच्या आणि त्याच्या पर्यावरणाच्या आंतरसंबंधांचा अभ्यास. या शाखेचे मुख्य उद्दिष्ट मानव आणि निसर्ग यांच्यातील परस्पर संबंध समजून घेणे आहे, जेणेकरून मानवी विकास आणि जीवनशैलीवर त्याचा कसा प्रभाव पडतो हे स्पष्ट होईल.\u003cbr\u003eमानवी भूगोलाचा अभ्यास करताना, मानव व निसर्ग यांच्यातील विविध घटकांची समज घेतली जाते. मानवी जीवनशैली, रोजगार, समाजव्यवस्था आणि संस्कृती यामध्ये जैविक, भौगोलिक आणि सामाजिक घटकांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. पर्यावरणाशी मानवी समायोजनामुळे पृथ्वीवर मानवी अस्तित्व टिकून राहिले आहे, तसेच विविध प्रकारच्या पर्यावरणामुळे मानवाचा जीवनशैलीत विविधता येते.\u003cbr\u003eमानवी भूगोल पृथ्वीवरील विविध प्रदेशांतील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि भौगोलिक भिन्नता समजून घेते. यामध्ये शारीरिक ठेवण, पोषाख, चालीरिती, रूढी, परंपरा आणि मानवाच्या जीवनशैलीच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास केला जातो. पर्यावरणीय घटकांच्या प्रभावामुळे मानवाची जीवनशैली आणि संस्कृती विकसित होतात, ज्यामुळे विविधतेला महत्त्व दिले जाते.\u003cbr\u003eमानवी भूगोलाचा अभ्यास केल्याने आपल्याला मानव आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद समजून घेता येतो, जो मानवाच्या अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470827925733,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manvi-Bhugol-V-Pratyakshike_Dr-Babasaheb-Wani_cnvt-1_fda819a7-d008-4119-8787-ad0f18175b72.jpg?v=1772015403"},{"product_id":"जागतिक-पर्यावरण-समस्या-आव्हाने-व-उपाय","title":"जागतिक पर्यावरण : समस्या, आव्हाने व उपाय","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालची परिस्थिती असे सामान्यपणे म्हटले जाते. आपल्या सभोवतालचे वृक्ष, पक्षी, प्राणी, मानव, पाणी, हवा, डोंगर इत्यादी घटक या सर्वाचे एकत्रीत स्वरुप म्हणजे पर्यावरण होय. पर्यावरणाच्या असमतोलमुुळे त्याचा मानवी आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. त्याचबरोबर सजिव सृष्टीलाही धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणाचा हव्यासापोटी केलेला वापर मानवाच्याच जीवावर उठलेला आहे. शिकारी ते शेतकरी अशा क्रमाने मानवाचा विकास होत गेला. जीवन अधिकाधिक सुखी व समृध्द करण्यासाठी आधुनिक कौशल्यांचा वापर करायला सुरुवात केली. त्यातूनचं मानवी उत्क्रांती व विकास याचा इतिहास घडत गेला. वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी मानवाने औद्योगिक क्रांतीचा आधार घेतला आणि निसर्गाचे मूळ रुपच बदलायला लागले. नैसर्गिक साधनसंपत्तीचा बेसुमार वापरामुळे मानवी हव्यासापोटी पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्हास होऊ लागला. याचाच परिणाम सजीवसृष्टीवर होण्यास सुरुवात झाली. या सर्व समस्यांचा शोध घेण्यासाठी या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजागतिक समस्यांच्या गुंतागुंतीचे स्वरुप समाजापुढे यावे तसेच निसर्गाविषयीची संवेदनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यांच्या समन्वय साधणारे लेख या पुस्तकात आहेत. पर्यावरणाची आजवरची वाटचाल, विविध प्रश्न आणि सर्वसामान्य माणसाची भूमिका याचा वेध घेणारे हे पुस्तक उत्तम संदर्भग्रंथ ठरु शकेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474109280485,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Global-Environment-Issues-Challenges-and-Solutions_cnvt-1.jpg?v=1772091715"},{"product_id":"संपूर्ण-पर्यावरणशास्त्र","title":"संपूर्ण पर्यावरणशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eविनाशाच्या पायरीवर उभ्या असलेल्या मानवाने पर्यावरण संदर्भात केलेल्या चुका सुधारण्यासाठी अत्यंत अत्यल्प वेळ बाकी आहे. पृथ्वीवरील तापमान वाढते आहे अन् धृवावरील बर्फ वितळू लागले आहे; समुद्री पाण्यातील तापमान बदलून प्रवाळ नष्ट होवू लागली आहेत, ओझोन छत्रीची घडी विस्कटली आहे, आपल्या सुखोपभोगात पर्यावरण संतुलनाकडे पाठ फिरवणार्या मानवाने पर्यावरण प्रदुषण वाढवून स्वतःच्या आणि अन्य सजीवसृष्टीच्या जीवाला धोका पोहचविलेला आहे. जैव विविधतेतील नष्ट होणार्या जाती-जमाती आणि त्यांचा मानवी जीवनावर होणारा प्रतिकूल परिणाम अभ्यासण्यासाठीच संपूर्ण पर्यावरण! जलसंपत्ती, वनसंपदा, प्राणीजीवन आणि परिसरातील आशावादी जीवनाची सुखद वाट जाणून घेण्यासाठीच संपूर्ण पर्यावरण… पर्यावरणशास्त्रातील परीक्षेत घवघवीत यश संपादनासाठीच संपूर्ण पर्यावरण….\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474441285861,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Total-Environmental-1.jpg?v=1772099698"},{"product_id":"प्राकृतिक-भूगोल-शिलावरण-वातावरण-व-जलावरण","title":"प्राकृतिक भूगोल (शिलावरण, वातावरण व जलावरण)","description":"\u003cp\u003eसूर्य, चंद्र, तारे, ग्रह हे अवघे विश्व कसे निर्माण झाले, ते कोणी निर्माण केले, विश्वाची व्याप्ती किती आहे आदींसारखे अनेक प्रश्न मानवाला सुरुवातीपासून भेडसावत होते. त्याअनुषंगाने प्राचीन काळापासून ते आजतागायत पुष्कळशा परिकल्पना मांडल्या गेल्या आहेत. अठराव्या शतकापासून पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करण्यास सुरुवात झाली. पृथ्वीचे अंतरंग हे निसर्गातील सर्वात मोठे गुढ आहे. भूकवचात बदल घडवून आणण्याचे कार्य सातत्याने काही शक्ती अथवा प्रेरणा करीत असतात हे स्पष्ट होते.\u003cbr\u003eप्रस्तुत ग्रंथात काल्पनिक रेषा व पृथ्वीची गती, पृथ्वीच्या उत्पत्तीचा परिचय, पृथ्वीचे अंतरंग, खंड व महासागर यांच्या वितरणाविषयीचे सिद्धांत, खडक आणि विदारण, नदीचे कार्य, वाऱ्याचे कार्य, वातावरण आणि सौरशक्ती, वायुभार आणि वारे, आर्द्रता आणि वृष्टी, सागरतळ, समुद्रप्रवाह इ. विविध मुद्यांचा परामर्ष घेतलेला असून साध्या-सुलभ भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePrakurtik Bhugol (Shilavaran, Vatavaran V Jalavaran)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477490872549,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prakrutik-Bhugol-Bhag-I-II_Dr-Uttam-Nile_cnvt-1.jpg?v=1772177811"},{"product_id":"प्राकृतिक-भूगोल-2","title":"प्राकृतिक भूगोल","description":"\u003cp\u003eप्राकृतिक भूगोलात भू-शास्राच्या अध्ययन व अध्यापनात अत्यंत मुलभूत स्वरूपाचा आहे. कारण या विषयातील संकल्पना वैज्ञानिक तत्वांवर आधारित असतात. प्राकृतिक भूगोलातील संकल्पना समजल्यावर भूशास्रातील इतर शाखांचा अभ्यास करणे अतिशय सोपे होते. म्हणून या संकल्पनांचे विद्यार्थ्यांना ज्ञान व्हावे या दृष्टीने प्रस्तुत पुस्तकात विषयाची मांडणी केली आहे. सदर पुस्तकातील मुद्द्यांची मांडणी अशाप्रकारे करण्यात आली आहे की, विद्यार्थ्यांना ती सहज अवगत होईल. शक्यतो ठिकठिकाणी स्थानिक व देशातील उदाहरणे देवून विद्यार्थ्यांमधील विषयाची गोडी वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी सर्व प्रकारचे वस्तुनिष्ठ व दीर्घोत्तरी प्रश्न दिले आहेत. प्रश्नांची काठीण्य पातळी अत्यंत उच्च दर्जाची आहे. जवळजवळ सर्व वस्तुनिष्ठ प्रश्न प्राकृतिक भूगोलाच्या मुलभूत संकल्पनेच्या उपयोजनेवर आधारित आहेत. प्राकृतिक भूगोलाचे ज्ञान विद्यार्थ्यांना होण्याच्या दृष्टीने प्रत्येक संकल्पना आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट केली आहे. संपूर्ण पुस्तकात एकूण 225 आकृत्या काढल्या आहेत. हे या पुस्तकाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. पुस्तकातील मुबलक प्रश्नांमुळे अभ्यासकांना स्वयंअध्ययन करणे सोपे होणार आहे.\u003cbr\u003eप्राकृतिक भूगोल हा विषय महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये विविध पातळींवर शिकविला जातो. तसेच महाराष्ट्र लोकसेवा व केंद्रीय सेवा आयोग स्पर्धा परीक्षा, नेट व सेट या सारख्या परीक्षांच्या अभ्यासकांना हे पुस्तक अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने तयार केलेल्या नमुना अभ्यासक्रमाचा बहुतेक सर्व भाग प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. प्राकृतिक भूगोलातील मराठीतील या पुस्तकामुळे अभ्यासकांना इंग्रजीतील झकधडखउअङ ॠएजॠठअझकध हा समजायला क्लिष्ट असा विषय सहज समजायला सोपा होईल असा आम्हाला विश्वास आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePrakurtik Bhugol\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477501817061,"sku":null,"price":595.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prakrutik-Bhugol_Dr-Shankar-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1772178222"},{"product_id":"सांख्यिकीय-पद्धती","title":"सांख्यिकीय पद्धती","description":"\u003cp\u003eआजच्या वेगवान युगात मानवाचे जीवन खूपच व्यापक व गुंतागुंतीचे होत चालले आहे. त्यामुळे सांख्यिकीचे क्षेत्रही खूपच विस्तारीत होत चालले आहे. आज शेती, उद्योग, व्यापार, वाहतूक या सारख्या सर्वच क्षेत्राच्या अध्यापनासाठी सांख्यिकीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोणत्याही शास्त्रात सांख्यिकीचे महत्त्व हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सांख्यिकीमध्ये अंकाच्या स्वरूपात असलेली माहिती विशिष्ट पद्धतीने मांडली जाते व त्या माहितीच्या आधारे निष्कर्ष काढले जातात. आधुनिक काळात सरकारने कल्याणकारी राज्याची कल्पना स्वीकारल्यामुळे सरकारला आपल्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी सांख्यिकीशिवाय पर्याय नाही. सांख्यिकी हे सर्व शास्त्रात संशोधनासाठी प्रभावी साधन असल्यामुळे संख्याशास्त्राचा उपयोग हा बहुतेक सर्व शास्त्रांत केला जातो. सांख्यिकीची व्याप्ती ही विशाल स्वरूपाची आहे. विविध शास्त्राच्या अभ्यासात सांख्यिकीचा अभ्यास केला जातो. सांख्यिकीच्या सहाय्याने मूळ सिद्धांताचा अभ्यास केला जातो. नवीन सिद्धांताची मांडणी करण्यासाठी सांख्यिकीच्या सहाय्याने संग्रहीत सामग्रीचे वर्गीकरण, श्रेणीयन, सारणीयन आणि विश्लेषण करण्यात येते. याचप्रमाणे व्यवहारिक जीवनात ही सांख्यिकीची उपयुक्तता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477545300197,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sankhikiya-Padhati_cnvt-1.jpg?v=1772180252"},{"product_id":"भारताचा-इतिहास-प्रारंभापासून-ते-इ-स-700-पर्यंत","title":"भारताचा इतिहास (प्रारंभापासून ते इ.स. 700 पर्यंत)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राचीन काळी भारत सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. त्याचा व्यापार दूरदूरच्या देशांबरोबर चालत असे. त्याच्या संस्कृतीची किर्ती संपूर्ण जगात पसरली होती. कलाकौशल्य, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि व्यापार यांच्या बाबतीत हा देश जगाला मार्गदर्शक होता. इ.स.पू. सहावे शतक हे भारताच्या इतिहासात धार्मिक क्रांतीचे युग म्हणून ओळखले जाते. मौर्य काळात भारतात एकछत्री साम्राज्य निर्माण झाले. शक, हूण, कुषाण यांची आक्रमणे झालीत. पण ते भारतीय संस्कृतीतच विलीन झाले. इस्लामची आक्रमणे मात्र केवळ राजकीयच नव्हती तर ती भारतीय संस्कृतीवर आक्रमण करणारी होती. दक्षिणेत राष्ट्रकूट, चालुक्य, चोल व पांड्य यांची राज्ये निर्माण होवून शिल्पकलेला नवा आयाम मिळाला. शेकडो सुंदर देवालयांची निर्मिती झाली. सदरील पुस्तकात प्राचीन भारतीय इतिहास साधने, सिंधू संस्कृती, पूर्व वैदिक काळ व उत्तर वैदिक काळ, परकियांची आक्रमणे, मौर्यकाल व मौर्येात्तर कालखंड, गुप्त साम्राज्य, वर्धन साम्राज्य, दक्षिणेकडील महत्त्वाची घराणी तसेच प्राचीन भारतातील शिक्षण पद्धती, स्त्रीयांचे जीवन, न्यायपद्धती, सामाजिक, धार्मिक व राजकीय परिस्थितीचा समावेश आहे. सदरील ग्रंथ इतिहास वाचकांसाठी तसेच पदवी, पदव्युत्तर, नेट\/सेट आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477759209701,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatacha-Itihas-Praranbhapasun-Te-C.E.-700-Paryant_Dr-G-B-Shaha_cnvt-1.jpg?v=1772189334"},{"product_id":"भारताचा-शोध","title":"भारताचा शोध","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारतवर्ष भारतीय संस्कृतीच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. भारतवर्षाची संकल्पना, वेद उपनिषदे, हिंदू, जैन, बौद्ध साहित्य, भारताची ज्ञानपरंपरा कला आणि संस्कृतीत हडप्पा, सिंधु संस्कृतीमधील स्थापत्यकला, शिल्पकला, मुर्तीकला, चित्रकला तसेच निरनिराळ्या कालावधीमधील कलासंस्कृती विकासाचा समावेश केला आहे. भारतीय ज्ञानपरंपरेत प्राचीन विद्यापीठे, तक्षशिला विद्यापीठ, मदुरा विद्यापीठ, वल्लभी विद्यापीठ आणि नालंदा विद्यापीठाचा परिचय देऊन भारतीय शिक्षणपद्धती स्पष्ट करण्यात आलेली आहे. भारतीय धर्म, तत्त्वज्ञान आणि ग्रामीण संस्कृती विकासातील सर्वधर्मीय विचार, विस्तार, जनपद, ग्रामस्वराज्याबद्दल माहितीचे संकलन केलेले आहे. प्राचीन भारतातील विज्ञान, पर्यावरण आणि औषधीशास्त्राची माहिती देताना पर्यावरण जाणीव जागृती, आयुर्वेद, योग विपश्यना आणि निसर्गोपचारांची ओळख करून दिलेली आहे. भारतीय आर्थिक परंपरा आणि ज्योतिषशास्त्र विकासात भारतीय व्यवसाय, उद्योग समुद्री व्यापार तसेच अर्थतज्ज्ञांच्या आर्थिक विचारांचा समावेश केलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477761077477,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatacha-Shodha_Prof-A-P-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1772189500"},{"product_id":"भारतीय-राजकीय-व्यवस्था","title":"भारतीय राजकीय व्यवस्था","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रत्येक देशाला स्वतःचे संविधान असणे आवश्यक आहे. या संविधानात त्या देशाच्या शासनकारभारविषयक बाबींची तरतूद असते. पण त्याबरोबरच त्या देशातील जनतेच्या आशाआकांक्षेचे व त्या देशाने स्वीकारलेल्या ध्येयाचे निदर्शनही असते. स्वतंत्र राष्ट्रातील नागरिकांना स्वतःचे संविधान निर्माण करण्याचा अधिकार असतो व ते, तो अधिकार संविधानसभा नेमून बजावतात. संविधानसभेत जनतेचे प्रतिनिधी चर्चा करुन संविधान तयार करतात व अशा संविधानानुसार त्या देशाचा शासनकारभार चालतो. जनतेच्या प्रतिनिधींनी संविधानसभेत एकत्र तयार केलेले संविधान म्हणजे त्या राष्ट्राच्या राज्यकारभाराविषयीचा वेदग्रंथ होय. त्याचे प्रामाण्य सर्वश्रेष्ठ असते. संविधान हा मूलभूत कायदा असतो. त्याचे मांगल्य व पावित्र्य कायम राखण्याची जबाबदारी त्या देशातील सर्व नागरिकांवर असते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदर ग्रंथात भारतीय संविधान निर्मितीची संक्षिप्त माहिती, नागरिकांचे मूलभूत अधिकार व कर्तव्ये, संविधानाचा सरनामा, कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि न्यायमंडळ, निर्वाचन आयोग या संदर्भातील संविधानात्मक तरतुदींची अभ्यासपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477767074021,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Rajkiya-Vyavastha_Dr-Shriram-Yerankar_cnvt-1.jpg?v=1772189762"},{"product_id":"कौटुंबिक-संसाधनांचे-व्यवस्थापन-आणि-आंतरिक-सजावट","title":"कौटुंबिक संसाधनांचे व्यवस्थापन आणि आंतरिक सजावट","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eगृहव्यवस्थापन आणि अंतर्गत सजावट करतांना महिलांना अनेक प्रश्न पडतात. अशा वेळी महाविद्यालयीन स्तरापासूनच विद्यार्थिनींना व भावी गृहिणींना तसेच स्वतः व्यवसाय उभारणाऱ्या गृहिणीना सहकार्य करण्याच्या उद्देशाने लिखित हि पुस्तिका असून यामध्ये गृहअर्थशास्त्राचे महत्व, विविध शाखा, कौटूंबिक साधन संपत्ती व्यवस्थापन, निर्णय प्रक्रिया, रंग व रंग योजना, पुष्परचना, कार्यक्रमाचे व्यवस्थापन, कार्यसरलीकरणाचे महत्त्व, घरगुती कामात कार्यसरलीकरणाचे तंत्र, फर्निचर मांडणी, फर्निचर निवड व त्याची काळजी, जलसंधारण सांडपाण्याचे निष्कासन, कचऱ्याची विल्हेवाट, स्वयंरोजगार, गृहअर्थशास्त्रातील रोजगार संधी, महिला सक्षमीकरणात जिल्हा उद्योग केंद्र, स्वसहाय्यता गटाचे योगदान, महिला आर्थिक विकास मंडळाची भूमिका ब्लॉकचा परिचय, ब्लॉक प्रिंटींग तयार करणे, स्कार्फ, उशी, टेबल क्लॉथ हे सर्व प्रात्यक्षिक या सर्वभागाचा या पुस्तकात समावेश केला आहे. याचा उपयोग करुन उत्सुक महिला आवडीप्रमाणे व्यवसाय सुरु करुन आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करु शकतील. सदर पुस्तक हे विद्यार्थिनी, गृहिणी तसेच अध्यापकाकरिता उपयुक्त ठरणार आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477774938341,"sku":null,"price":525.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Kautunbik-Sadhansanpattiche-Vyavasthapan-v-Antarsajavat_Dr-Jyoti-Haware_cnvt-1.jpg?v=1772189995"},{"product_id":"महाराष्ट्राची-अर्थव्यवस्था-1","title":"महाराष्ट्राची अर्थव्यवस्था","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमहाराष्ट्राची अर्थव्यवस्था या पुस्तकाची पाच घटकांमध्ये विभागणी करण्यात आली असून यात – 1) महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा परिचय – महाराष्ट्राची भौगोलिक वैशिष्ट्ये, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोल, 2) महाराष्ट्राची लोकसंख्या – महाराष्ट्राच्या लोकसंख्येची वैशिष्ट्ये, ग्रामीण लोकसंख्येचे स्थलांतर, महाराष्ट्रातील नागरीकरण, 3) महाराष्ट्रातील कृषी अर्थव्यवस्था – राज्याच्या अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्त्व, महाराष्ट्रातील पीक पद्धती व जलसिंचन, शेतीची उत्पादकता, विदर्भाच्या संदर्भात विशेष अध्ययन, 4) महाराष्ट्रातील उद्योग व पायाभूत संरचना – राज्याच्या औद्योगिक विकासाची वैशिष्ट्ये, लघुउद्योग व कृषिआधारीत उद्योग, महाराष्ट्रातील प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक, महाराष्ट्रातील वाहतुक व्यवस्थेचा विकास, 5) महाराष्ट्रातील सेवा क्षेत्र – महाराष्ट्रातील सेवा क्षेत्राची भूमिका आणि कामगिरी, सेवा क्षेत्राचे प्रकार व वर्गीकरण, महत्त्व आणि समस्या, महाराष्ट्रातील पर्यटन उद्योग इत्यादींचे विश्लेषण करण्यात आले आहे. पुस्तकाची घटकनिहाय मांडणी करतांना महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात अद्ययावत आकडेवारी देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक घटकाच्या शेवटी अभ्यासासाठी प्रश्नसंच दिला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करतांना या प्रश्नसंचाचा निश्चितच उपयोग होईल. पुस्तकाची साध्या, सोप्या भाषेत व सुलभ पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे तसेच विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477781295333,"sku":null,"price":265.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mahashastrachi-Arthavyavastha_Dr-Mahadev-Rithe_cnvt-1.jpg?v=1772190299"},{"product_id":"personality-development-soft-skills","title":"Personality Development \u0026 Soft Skills","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477784080613,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Personality-Development-Soft-Skills_Dr-S-M-Kolte_cnvt-1.jpg?v=1772190455"},{"product_id":"समाजशास्त्र-परिचय","title":"समाजशास्त्र परिचय","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसमाजशास्त्राचा अभ्यास ही आधुनिक काळाची गरज आहे. समाजशास्त्राचे महत्व दिवसेंदिवस वाढतच आहे. समाजाचा जसाजसा विकास होत गेला तसतश्या सामाजिक घटना, घडामोडी व सामाजिक समस्या यातील जटीलता वाढली. त्यामुळे सामाजिक घटना व घडामोडीचा काल सुसंगत अर्थ लावून निरनिराळ्या सामाजिक समस्यांची कारणे शोधून त्यावरील उपाययोजना करण्यासाठी समाजशास्त्रात काळानुरुप नवनवीन दृष्टीकोन विकसित होत गेले व मानवी समाजजिवन सुखकर करण्यास समाजशास्त्राची मदत होत गेली. समाजशास्त्रात ‘समाज’ हा शब्द एक संकल्पना म्हणून उपयोगात आणली व संकल्पना म्हणूनच ‘समाज’ हा शब्द समाजशास्त्रात अभ्यासल्या जाते. मानवाच्या इतिहासाकडे दृष्टीक्षेप टाकल्यास असे दिसून येते की, गरजापूर्तीसाठी माणुस स्वैर वर्तन करण्यास मागेपुढे पाहत नाही. अशा स्वैर वर्तनाने समाजात अराजकता निर्माण होईल, गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. व समाजजिवन विस्कळीत होईल असे होवू नये म्हणून सामाजिक नियंत्रणाच्या पद्धतीचे अध्ययन केले जाते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत ग्रंथात समाजशास्त्राचा अर्थ, स्वरुप व व्याप्ती तसेच समाजशास्त्रात वापरल्या जाणाऱ्या विविध संकल्पनांची ओळख करुन देण्यात आली आहे. तसेच मानवाला जिवंत राहण्यासाठी विविध गरजांची परिपुर्ती करावी लागते. गरजांच्या परिपुर्तीसाठी मदत करणाचा विविध सामाजिक संस्था, संस्कृती, सामाजिकरण, सामाजिक अनुचलन, विचलन, सामाजिक नियंत्रण व्यक्तीमत्व विकास, सामाजिक चळवळी, सामाजिक स्पष्टीकरण व परिवर्तन, महिला सक्षमीकरण इत्यादी बाबींची समाजशास्त्रीय माहिती देण्याचा प्रयत्न प्रस्तुत ग्रंथात केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477793386725,"sku":null,"price":310.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samajshastra-Parichay_Dr-B-H-Kirdak_cnvt-1.jpg?v=1772190642"},{"product_id":"सूक्ष्म-अर्थशास्त्र-8","title":"सूक्ष्म अर्थशास्त्र","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477806133477,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sukshma-Arthashastra_Dr-H-R-Tiwari_cnvt-1.jpg?v=1772190836"},{"product_id":"प्राचीन-भारताचा-इतिहास-प्रारंभापासून-ते-इ-स-1206","title":"प्राचीन भारताचा इतिहास (प्रारंभापासून ते इ.स. 1206) (Ancient History of India (from Early to A.D. 1206))","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राचीन भारताचा इतिहास या ग्रंथाच्या आधारे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तसेच MPSC, UPSC व NET, SET सारख्या महत्वपूर्ण स्पर्धा परीक्षांचा सखोल अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्वपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय संस्कृतीच्या प्रारंभीपासून सर्व परीक्षांच्या दृष्टीने असणारे महत्वपूर्ण घटक अगदी मुद्देसूद पद्धतीने स्पष्टीकरण केले असून सोप्या शब्दात वर्णन केले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया ग्रंथात प्राचीन इतिहासाच्या उपलब्ध साधनांनुसार सिंधु संस्कृती, वैदिक संस्कृती, जैनधर्म, बौद्ध धर्म यासोबतच पूर्वीची राजकीय जीवनपद्धती, महाजनपदे आणि प्राचीन काळातील सर्वच महत्वपूर्ण राजघराण्यांविषयीची माहिती दिली आहे. प्राचीन भारतावर बौद्ध धर्माचा पडलेला प्रभाव स्वतंत्र प्रकरणाच्या अनुषंगाने दिला आहे. याशिवाय प्राचीन भारताचे सुवर्णयुग (गुप्तकाळ) सविस्तरपणे वर्णन केले आहे. तसेच भारतीय संस्कृतीची प्रारंभीची शैक्षणिक वाटचाल विविध विद्यापीठांची माहिती देऊन स्पष्ट केली आहे. प्राचीन स्त्रीजीवन, समाज, राज्य, अर्थ, संस्कृती व न्यायव्यवस्था याविषयीही योग्य ती माहिती सदर ग्रंथात दिली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477815013605,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Bharatacha-Itihas_Dr-R-P-Jhanake_cnvt-1.jpg?v=1772191007"},{"product_id":"व्यक्तिमत्व-विकास-आणि-सॉफ्ट-स्किल्स","title":"व्यक्तिमत्व विकास आणि सॉफ्ट स्किल्स","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eव्यक्तिमत्त्व रचना व व्यक्तिमत्त्व विकास यांचा विचार पाश्चात्य आणि पौर्वात्य तत्ववेत्ते आणि संशोधकांनी प्राचीन काळापासून केला आहे. व्यक्तीला व्यक्तित्व असते तसेच व्यक्तिमत्त्वदेखील असते. निसर्गातील सर्वच प्राणीमात्रांना व्यक्तीत्व असते. निसर्गाकडून प्राप्त झालेली ही देणगी स्वकर्तृत्वाने दैदिप्यमान होवू शकते. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी अनेक कौशल्यांची आवश्यकता असते. आजच्या गतिमान, स्पर्धात्मक अशा एकविसाव्या शतकात व्यवस्थापन कसे करावे हे माहित असणे अत्यंत आवश्यक आहे. यशस्वी लोक उपलब्ध वेळेचे व्यवस्थापन कौशल्य वापरून करतात. मानवी जीवनात बालपण, तरुणपण आणि उतारपण या अवस्थांमध्ये त्या त्या परिस्थितीनुसार ध्येय बदलत असतात. तात्पुरत्या यशाने हुरळून जावू नये आणि अपयश आले म्हणून मागेही हटू नये. आपण स्वतःविषयी काय विचार करतो यावर आपल्या आयुष्याची गुणवत्ता काय असेल हे बहुतांशी निर्धारित होत असते. सर्वात म्हणजे पैसे देऊन आपण स्वतःचा वेळ विकत घेऊ शकत नाही आणि एकदा निघून गेलेली वेळ कधीच परत येत नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477815537893,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyaktimatva-Vikas-Ani-Soft-Skill_Prof-A-P-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1772191166"},{"product_id":"महाराष्ट्राचा-आर्थिक-भूगोल","title":"महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल","description":"","brand":"Prashant Publication.","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477852369125,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Maharashtracha-Arthik-Bhugol_Bhaise14_cnvt-1.jpg?v=1772192096"},{"product_id":"प्राचीन-भारताचा-इतिहास-इ-पू-3000-ते-इ-स-1200","title":"प्राचीन भारताचा इतिहास (इ.पू. 3000 ते इ.स. 1200)","description":"\u003cp\u003eप्राचीन काळी भारत सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. त्याचा व्यापार दूरदूरच्या देशांबरोबर चालत असे. त्याच्या संस्कृतीची किर्ती संपूर्ण जगात पसरली होती. कलाकौशल्य, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि व्यापार यांच्या बाबतीत हा देश जगाला मार्गदर्शक होता. असे असतानाही आपणास मोठ्या दु:खाने सांगावे लागते, की आज या देशाचा प्राचीन गौरवशाली इतिहास उपलब्ध नाही. जो उपलब्ध आहे तो फारच अल्प आहे, म्हणून प्राचीन भारताचा अभ्यास करताना इतिहासकाराला मोठा त्रास पडतो. आज भारताचा जो इतिहास उपलब्ध आहे त्याच्या कैकपटीने प्राचीन भारताचा इतिहास स्मृतीच्या गर्तेत नष्ट झाला. त्यामुळे बरेच इतिहासकार भारताचा इतिहास किंवा भारतीय संस्कृती ही आधुनिक संस्कृती आहे, असा समज करून घेतात. भारतीयांनी तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी अनेक विभागांत कार्य केले. परंतु इतिहासाबाबत संपूर्ण दुर्लक्ष केले. त्यामुळे फारच अशी थोडी प्राचीन इतिहासविषयक साधने उपलब्ध आहेत, की त्यांच्यावर विसंबूनच आपणास प्राचीन भारताचा इतिहास जाणून घ्यावा लागतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकात प्राचीन भारतीय इतिहासाची साधने, हडप्पा किंवा सिंधू संस्कृती, पूर्व वैदिक काळ, धर्मक्रांतीचे युग, मौर्य साम्राज्य व मौर्योत्तर काळ, गुप्त साम्राज्य, वर्धन घराणे, दक्षिण भारत या घटकांची अचूक माहिती देण्यात आली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477988454629,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Bhartacha-Itihas_cnvt-1.jpg?v=1772196832"},{"product_id":"भू-माहितीशास्त्र","title":"भू-माहितीशास्त्र","description":"\u003cp\u003eअलिकडच्या माहितीच्या युगात विविध तंत्रज्ञान विकसीत होत आहेत. भूगोलशास्त्राच्या सर्वंकष अभ्यासासाठी विस्तृत माहिती व आकडेवारीची गरज असते. अशा आकडेवारीवर संस्कार करून उपलब्ध निष्कर्षाचा भविष्यातील नियोजन व व्यवस्थापनासाठी उपयोग होतो. अशी विस्तृत माहिती अद्यावत तंत्रज्ञानाद्वारे भूगोलशास्त्राच्या अध्ययन, अध्यापन व संशोधनासाठी अतिशय महत्वाची ठरते. बुद्धीवादी मानवाने ज्ञानाच्या जोरावर माहितीवर संस्कार करून, त्यात विज्ञान व तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करून नवनवीन व उपयुक्त माहितीची भर भूगोलशास्त्रात टाकली आहे. त्या सर्व माहितीचा उपयोग सर्वसामान्य माणसाला व्हावा की ज्यातून ‘मानवी कल्याण’ खर्या अर्थाने साधता येईल एवढा प्रामाणिक हेतू मानव बाळगून आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदरील भू-माहितीशास्त्र या पुस्तकात प्रामुख्याने सुदूर संवेदन, निष्क्रीय संवेदक, हवाई छायाचित्र, सक्रीय दुरस्थ संवेदक, भूप्रतिमाने, भौगोलिक माहिती प्रणाली, संगणक आणि जागतिक स्थान निश्चिती यासारख्या आवश्यक घटकांचा समावेश केल्याने सर्वांना उपयुक्त ठरेल यात शंका नाही.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479715852517,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhumahitishashtra_cnvt-1.jpg?v=1772258904"},{"product_id":"antargat-sajawatiche-adhunik-pailu","title":"अंतर्गत सजावटीचे आधुनिक पैलू","description":"\u003cp\u003eसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील नवीन अभ्यासक्रमानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (छएझ) बी.ए. प्रथम वर्षाच्या वैकल्पिक गृहअर्थशास्त्र विषयाच्या द्वितीय सत्रा करिता असून प्रस्तुत पुस्तक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या अनुषंगाने या विषयांमध्ये अंतर्गत सजावटीची संकल्पना, परिभाषा, वर्तमान काळात अंतर्गत सजावटीची व्याप्ती, अंतर्गत सजावटीची मूलतत्त्वे, मूलभूत वैशिष्ट्ये, अंतर्गत सजावटीची क्षेत्र, घरगुती सजावट, संस्थात्मक सजावट, कार्यालय सजावट, बाजार सजावट या बऱ्याच विषयाचे अध्ययन समाविष्ट असून हा विषय मानवी जीवनाला परिपूर्ण करण्यासाठी फार उपयुक्त आहे.\u003cbr\u003eसदर पुस्तकात अंतर्गत सजावटीचे आधुनिक पैलू याची सर्वांगाने चर्चा करण्यात आली आहे. यात अंतर्गत सजावटीचे घटक, फर्निचर, घरगुती कापड, सजावटीची साहित्य, उपकरणे, रंग, प्रकाश, नोकरीच्या संधी, व्यावसायिक अंतर्गत डिझाईनर, निवासी अंतर्गत डिझायनर, फर्निचर डिझाईनर, डिझाईनर सल्लागार इत्यादी विषयाची मांडणी सोप्या भाषेत मुद्देसूदरित्या करण्यात आलेली आहे.    \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48480106676453,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Antargat-Sajavatiche-Aadhunik-Pailu_Dr-Jyoti-Hawre-1.jpg?v=1772606517"},{"product_id":"प्राचीन-भारत-प्रारंभापासून-ते-इ-स-1000-पर्यंत","title":"प्राचीन भारत (प्रारंभापासून ते इ.स. 1000 पर्यंत)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रारंभी ब्रिटिशांनी भारतीय संस्कृती ही आधुनिक असल्याचे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण या गोष्टीवर भारतीयांचा विश्वास नव्हता. कारण या देशातील धर्म, चालीरिती, श्रद्धा, रूढी आणि परंपरा या प्राचीन असल्याचे स्पष्ट दिसत होते. परंतु ईस्ट इंडिया कंपनीचे नोकर या प्राचीन संस्कृतीस मान्य करावयास तयार नव्हते. परंतु 19 व्या शतकात पंजाबमध्ये रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरु झाले आणि त्याठिकाणी प्राचीन वीटा आणि प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडू लागले आणि त्यातून ब्रिटिशांचे डोळे खाडकन उघडले. उत्खनन करण्यात आले तेव्हा मोहेनजोदाडो आणि हडाप्पा सारखी प्राचीन शहरे सापडली. सिंधु संस्कृतीचा शोध लागला. उत्कृष्ट नगर रचना, आरोग्यासाठी केलेली सांडपाण्याची व्यवस्था, स्नानगृह, मनोरंजनाची साधने जेव्हा तेथे उत्खननात सापडली त्यावेळी भारतीय संस्कृती जगातील प्राचीन चीन, इजिप्त आणि बॅबिलोनिया या प्राचीन संस्कृतीच्या रांगेत जावून बसली. आर्य संस्कृतीने या देशाला नवा मंत्र दिला. जैन आणि बौद्धांनी त्यातील दोष काढून येथील मानवाला अहिंसेचा संदेश दिला. सद्वर्तन आणि नैतिकता त्यांनी शिकविली. शिल्प आणि सांस्कृतिकजीवनात बदल घडविले. नंतर मौर्य, गुप्त, वर्धन, शुंग, राष्ट्रकूट इत्यादी यासारखी नवीन घराणी उदयास आली. येथील जीवनात क्रांती घडावी अतएव येथे नालंदा, तक्षशीलासारखी विद्यापीठे जन्मास आली. अरबांना या शैक्षणिक केंद्रांचे महत्व न कळाल्याने त्यांनी ती उध्वस्त केली. पण त्यापूर्वीच आग्नेय आशियात भारतीय संस्कृती जावून पोहोचली होती. यासारख्या अनेक गोष्टींचा अभ्यास म्हणजे प्राचीन भारत हा ग्रंथ होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48480184729829,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Bharat_Praranbhaasun-Te-CE-1000-Paryant_Dr-G-B-Shaha_cnvt-1.jpg?v=1772283774"},{"product_id":"प्रकृतीक-भूगोलाची-मूलतत्त्वे-principles-of-physical-geography","title":"प्राकृतिक भूगोलाची मूलतत्त्वे Principles Of Physical Geography","description":"\u003cp\u003eसदर पुस्तकातील प्रकरणांची मांडणी व क्रम विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार केलेला नाही. त्यात लेखकाने थोडा बदल केला आहे. अभ्यासक्रमानुसार पहिले प्रकरण फक्त भूगोलाची व्याख्या, स्वरूप, व्याप्ती व महत्त्व या मुद्द्यांवर आधारित आहे.परंतु अभ्यासक्रम हा प्राकृतिक भूगोलावर असल्यामुळे प्राकृतिक भूगोल- व्याख्या, स्वरूप, व्याप्ती व महत्त्व हे मुद्दे अभ्यासक्रमात असणे अभिप्रेत असावेत असे समजून या मुद्यांचा समावेश या प्रकरणात केला आहे. तसेच घटक दोन मधील ‘सूर्यकुल किंवा सूर्यमाला’ या मुद्द्याचा समावेश पाठ्यांशाच्या मांडणीच्या सोयीच्या दृष्टीने प्रकरण 2 मध्ये केला असून त्याच घटकातील ‘ग्रहणे’ हा मुद्दा शेवटच्या प्रकरणात घेण्यात आला आहे. प्रकरण 2 मध्ये सूर्यकुलाचा अभ्यासानंतर पृथ्वीची म्हणजेच ‘सूर्यकुलाची उत्पत्ती’ हा मुद्दा तिसऱ्या प्रकरणात समाविष्ट केला आहे. घटक चार मधील अक्षांश व रेखांश या मुद्द्याचा अंतर्भाव पुढील चौथ्या\u003cbr\u003eप्रकरणात केला आहे. प्रकरण पाचवे अर्थात पृथ्वीच्या गती परिवलन व परिभ्रमण आणि त्यांचे परिणाम यावर लिहिले आहे. प्रकरण सहा- वेळेचे मापन- स्थानिक वेळ, प्रमाण वेळ आणि आंतरराष्ट्रीय वार रेषा या मुद्द्यांवर आधारित आहे. शेवटच्या प्रकरणात विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार फक्त सूर्यग्रहण व चंद्रग्रहण यावरच लिहिणे अपेक्षित असले तरी ग्रहणे ही संकल्पना समजून घेण्यासाठी चंद्र व चंद्रकला या मुद्द्यांचा अभ्यास आवश्यक वाटल्याने लेखकाने या मुद्द्यांना हात घातला आहे. कोणतेही अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक हे फक्त अभ्यासक्रमातील मुद्द्यांचा विचार करूनच लिहिले पाहिजे असे जरी अपेक्षित असले तरी पुस्तकाच्या पूर्णत्त्वाच्या दृष्टीने लेखकाने त्यापेक्षा काही अधिकची माहिती दिली आहे. हा भाग केवळ अभ्यासकांनां अधिक ज्ञानवृद्धी व्हावी या दृष्टीने दिला आहे. कारण पुस्तक फक्त परीक्षा आणि अभ्यासक्रम याच्या चौकटीत लिहून चालत नाही. कृपया लेखकाच्या भावना समजून पुस्तकाचा अभ्यास करावा. प्राकृतिक भूगोलाचे ज्ञान विद्यार्थ्यांना होण्याच्या दृष्टीने प्रत्येक संकल्पना आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट केली आहे. संपूर्ण पुस्तकात एकूण 66 आकृत्या काढल्या आहेत. हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी पाठ्यांशातील प्रत्येक मुद्द्यावर अतिशय बारकाईने अभ्यास करून सर्व प्रकारचे वस्तुनिष्ठ व दीर्घोत्तरी प्रश्न दिले आहेत. सर्व प्रश्नांची गुणवत्ता उच्चप्रतीचे असून बरेच प्रश्न भौगोलिक संकल्पनेच्या उपयोजनेवर आधारित आहेत. त्यामुळे एम. पी. एस्सी. यु. पी. एस्सी तसेच नेट सेट यासारख्या परीक्षांची\u003cbr\u003eतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे प्रश्न निश्चितच उपयोगी ठरणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना स्वाध्ययन करणे सोपे होणार आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48632546394341,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/PrakritikBhugolachiMultattve_DrShankarChaudhari-1.jpg?v=1774946496"},{"product_id":"समाजशास्त्राची-मुलतत्वे-principle-of-sociology","title":"समाजशास्त्राची मुलतत्वे Principle Of sociology","description":"\u003cp\u003eपुस्तक विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाच्या स्वाधीन करताना आनंद होत आहे.\u003cbr\u003eसमाजशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व दिवसेंदिवस अनेक कारणांनी वाढत आहे. समाजशास्त्र हे केवळ सैद्धांतिक शास्त्र नाही तर ते उपयुक्ततावादी शास्त्र सुद्धा आहे. म्हणून समाजशास्त्राच्या अभ्यासकाला दिवसेंदिवस विविध क्षेत्रात रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या संधी वाढत आहेत.\u003cbr\u003eकौशल्य पूर्ण शिक्षण हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रस्तुत विषयाच्या माध्यमातून केला आहे.\u003cbr\u003eया लहानशा पुस्तकाच्या माध्यमातून असा दावा करता येणार नाही, की संपूर्णपणे समाजशास्त्राची ओळख या पुस्तकाद्वारे होईल. मात्र बी.ए. भाग 1 च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार सर्वच घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न निश्चितच करण्यात आला आहे.     \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48632710594789,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/SamajshastrachiMultattve_DrBHKirdak-1.jpg?v=1774948186"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/ba-i.oembed?page=5","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}