{"title":"BA II","description":"","products":[{"product_id":"आनंद-आणि-निरामय-स्वास्थ्याचे-मानसशास्त्र","title":"आनंद आणि निरामय स्वास्थ्याचे मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशोपन हॉवर सारख्या टोकाच्या निराशावादी तत्त्वज्ञानापासून ते अनेक वैश्विक तत्त्वज्ञानाचे सार दर्शविते की “दु:खम सर्वम्” अर्थात ‘संसार-जीवन दु:खमय आहे.’ सिग्मड फ्राईड या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाच्या मते, मानव सुख तत्त्वावर काम करतो. प्रत्येकाला जीवनात सुख-आनंद हवा असतो. दु:ख, दु:खाची कारण राहणारच, पण दु:खातही सुख शोधण्याची दृष्टी सकारात्मक मानसशास्त्रातून अभ्यासली जाते. स्थितीस्थापकत्त्व भाव अंगीकारुन फिनीक्स पक्षांसारखे उभे रहा! दुर्दम्य इच्छाशक्ती, आशावादी वृत्ती आणि कणखरपणाच्या बळावर व्याधीवर मात करा! धैर्य आणि चिकाटीच्या बळावर कठिणतम निर्धारित ध्येय साध्य करा. प्रामाणिकपणा, सामंजस्य, उच्च नैतिक मूल्य अंगिकारुन जीवनात यशस्वी व्हा! भावनिक बुद्धिमत्ता साकारुन स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि इतरांच्या भावना जाणून सहानुभूतीपूर्ण व्यवहार करा! कृतज्ञताभाव आणि क्षमाशील वृत्तीतून इतरांप्रतीचा राग, द्वेष भावना मनातून हद्दपार करा! विचारात नाविण्यपूर्णता, खुलेपणा आसू द्या! सौंदर्यदृष्टी दर्शवून फ्लो आणि सेव्हरिंग अनुभवातून जीवनात पुरेपूर आनंद मिळवा. जीवनात सकारात्मक भावनांचे प्राबल्य दिसू द्या. मनोसजगता सारख्या ध्यानतंत्राद्वारा कटू, दु:खद नकारात्मक विचारांकडे स्थितप्रज्ञवृत्तीने पाहण्यास शिकून मन:शांती मिळवा! यातूनच जीवन आनंदमय होईल आणि निरामय स्वास्थ्य लाभेल. हेच सकारात्मक मानसशास्त्राचे सार या आवृत्तीतून प्रस्तुत करण्याचा प्रयास आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसर्व लिखाण बामगार्डनर आणि मँरी क्रोथर्स च्या ‘सकारात्मक मानसशास्त्र’ तसेच स्नायडर आणि लोपेझचे ‘हँडबुक ऑफ पॉझिटिव्ह सायकालॉजी’ या पुस्तकांच्या आधारे केलेले आहे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386672689381,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Anand-Aani-Niramay-Swasthyache-Manasshastra_Dr-Chudaman-Badgujar_cnvt-1.jpg?v=1770718032"},{"product_id":"गृहअर्थशास्त्र-आणि-रोजगार-संधी","title":"गृहअर्थशास्त्र आणि रोजगार संधी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बीए प्रथम वर्षाच्या गृहअर्थशास्त्र विषयाच्या प्रथम व द्वितीय सत्र अभ्यासक्रमामध्ये विद्यापीठाने नेऊन दिल्यानुसार प्रस्तुत ‘गृहअर्थशास्त्र व रोजगार संधी’ या पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे. प्रस्तुत पुस्तक हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) नुसार तयार केलेले असून यामध्ये गृहअर्थशास्त्राचा इतिहास, गृहअर्थशास्त्र परिभाषा, गृहअर्थशास्त्र शिक्षण हे जीवन शिक्षण, गृहअर्थशास्त्रात नोकरीच्या संधी, गृहअर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा, कौटुंबिक संसाधने, घर आणि कार्यक्रम व्यवस्थापन, कुटुंबनिवास, फर्निचर, अंतर्गत सजावट, पुष्परचना याविषयीचे शास्त्रशुद्ध ज्ञान देऊन त्यामध्ये आवड निर्माण होऊन हा विषय सोपा करण्याचा या पुस्तकामध्ये प्रयत्न करण्यात आला आहे. हे पुस्तक विद्यार्थिनी व अध्यापकांच्या पसंतीला उतरेल अशी अपेक्षा आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eगृहअर्थशास्त्र आणि अंतर्गत सजावट याचा एकंदरीत विचार करता, गृहअर्थशास्त्र म्हणजे काय ते प्रथम पाहायला हवे गृह आणि अर्थ याचा शास्त्रीयदृष्ट्या योग्य तो ताळमेळ बसवणारे शास्त्र म्हणजे गृहअर्थशास्त्र होय. गृहअर्थशास्त्राचा प्रारंभ हा बऱ्याच कालावधीपासून झालेला असून विकास प्रक्रियेचा प्रारंभ हा आणखी विस्तारित होत आहे. मानवाचा विकास ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, यामध्ये मानवाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टी येणाऱ्या सर्व प्रक्रियेचा अंतर्भाव गृहअर्थशास्त्र विषयांमध्ये होत असतो. मानवाचा विकास व्हावा याकरिता मानवी जीवनामध्ये अनेकविध घटक असतात. त्यापैकी गृहव्यवस्थापन, अन्न व आरोग्यशास्त्र, वस्त्रशास्त्र, निर्णय प्रक्रिया, गृहव्यवस्थापन प्रक्रिया, जलसंधारणाची गरज, कचरा विल्हेवाटेची गरज, अंतर्गत सजावटीची संकल्पना, घरगुती पोशाख निवड व काळजी, पुष्परचनेचे विविध प्रकार या सर्वांचे अध्ययन यामध्ये अंतर्भूत असल्याने हा विषय गृहिणीबरोबर विद्यार्थिनी, अध्यापक वर्ग व सर्वसामान्य पातळीवर सर्व स्त्रियांसाठी उपयुक्त ठरणारा आहे. या अनुषंगाने या विषयाची मांडणी केलेली असून ही पुस्तिका सामान्य वाचकांना सुद्धा उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48392691581157,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Gruha-Arthashastra-and-Career-Sandhi_Dr-Jyoti-Haware_cnvt-1-198x300.jpg?v=1770804259"},{"product_id":"भौगोलिक-माहिती-प्रणाली-1","title":"भौगोलिक माहिती प्रणाली","description":"\u003cp\u003eभौगोलिक माहिती प्रणाली ही भौगोलिक माहिती मिळवणारी, साठवणारी आणि त्याचे व्यवस्थापन करणारी प्रणाली आहे. अनेक विद्याशाखांतील संकल्पना व विचार यांचा अभ्यास करुन तयार केलेले तंत्र आहे. या तंत्रज्ञानामुळे विश्वाची भौगोलिकदृष्ट्या माहिती तंत्रज्ञानाबाबतची जवळीकता निर्माण झाली आहे. जीआयएस तंत्रज्ञानाची विलक्षण क्षमता व सहज वापरण्यायोग्य कार्यप्रणाली यामुळे हे तंत्रज्ञान काळाची गरज आहे. या तंत्राचा वापर अनेक क्षेत्रात नियोजन, व्यवस्थापन, अभियांत्रिकी व अनेक दैनंदिन व्यवहारासाठी वाढत आहे. पर्यावरणीय, परिस्थिकीय, वातावरणीय आणि अनेक जैविक घडामोडी मध्ये जीआयएसचा वापर होत आहे.\u003cbr\u003eभौगोलिक माहिती प्रणालीच्या अनेक आज्ञावली आहेत. काही आज्ञावली मोफत उपलब्ध आहेत तर काही विकत घ्याव्या लागतात. गरजेनुसार आज्ञावलींंचा शोध घेवून त्यांचा सर्वसामान्यपणे वापर करता येतो. भौगोलिक विश्लेषणासाठी जीआयएस आज्ञावली वापरल्या जातात.\u003cbr\u003eभौगोलिक माहिती प्रणाली अवकाशिक व गुणविशेष माहितीवर कार्य करते. या प्रणालीमध्ये जाळी सांख्यिकी व सदिश सांख्यिकी प्रतिमानात सांख्यिकी संकलित केली जाते.\u003cbr\u003eभौगोलिक माहिती प्रणालीचे उपयोजन विविध क्षेत्रात प्रभावीपणे केले जाते.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48468293976293,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhaugolik-Mahiti-Pranali_Prof-Dr-V-J-Patil_cnvt-1.jpg?v=1771926527"},{"product_id":"निवडक-राज्यघटना-आणि-आंतरराष्ट्रीय-संबंध-ब्रिटन-अमेरिका-व-सार्क","title":"निवडक राज्यघटना आणि आंतरराष्ट्रीय संबंध (ब्रिटन, अमेरिका व सार्क)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसदर पुस्तक एकूण पाच घटकांमध्ये ग्रेट ब्रिटन, अमेरिका आणि सार्क परिषद यांच्या राजकीय व्यवस्थेचे, घटनेचे व आंतरराष्ट्रीय संबंधच्या प्रयत्नांचे विभाजन करण्यात आले आहे. त्यात निवडक राज्यघटनेमध्ये ग्रेट ब्रिटन दोन घटकांमध्ये विभागण्यात आले असून ग्रेट ब्रिटनमध्ये 2005, 2010, 2014, 2016 पर्यंत जे महत्वपूर्ण राजकीय बदल झाले त्यास संविधानाचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्याचा अंतर्भाव सुरूवातीच्या दोन घटकांमध्ये करण्यात आला. न्यायपालिकेचे स्वतंत्र अस्तित्व, त्यामुळे लॉर्डस सभागृहाच्या कार्यकक्षेवर झालेला परिणाम, लॉर्डस सभेच्या सदस्यांच्या उपस्थिती कक्षेत झालेले महत्वपूर्ण निर्णय आदि मुद्दे घेऊन त्यावर संक्षिप्तपणे चर्चा केली आहे तर पुढच्या दोन घटकांमध्ये संयुक्त राज्य अमेरिकेच्या राज्यघटनेपासून तर तेथील राजकीय व्यवस्थेच्या जडणघडणीच्या बदलत्या परिणामाचा परामर्श घेण्यात आला आहे तर शेवटच्या घटकामध्ये दक्षिण आशियायी देशांनी एकत्रित येऊन विभागीय सहकार्य संघटना स्थापन केली. ज्याची ओळख ङ्गसार्कफ म्हणून आंतरराष्ट्रीय राजकीय पटलावर झाली आहे. आर्थिकर सहकार्य आणि एक दुसर्यांच्या देशामध्ये बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या मुख्य उद्देशाने आणि उद्योगांना प्रोत्साहन देण्यासोबतच इतरही सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक बाबींच्या वाढीसाठी एकत्रिपणे प्रयत्न करण्यासाठी विचार विमर्श, निर्णय आणि करारांसाठी सुरू झालेल्या सार्क संघटनेच्या वाटचालीचा आढावा, सार्कच्या स्थापनेमागील उद्देश कार्यपद्धती आणि स्वरूपाबाबत मांडणी करण्यात आली आहे त्या निमित्ताने विद्यार्थ्यांना सार्कची आणि त्यांच्या कार्यपद्धतीची ओळख अभ्यासातून होईल अशी आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474912325861,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Nivadak-Sanvidhane_Dr-Subhash-Gavai_cnvt-1.jpg?v=1772110775"},{"product_id":"उपयोजित-मराठी-भाग-2-sgbau","title":"उपयोजित मराठी (भाग 2) (SGBAU)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eविचारपूर्वक बोलता येणे व आपले विचार समर्पकपणे लिखित स्वरुपात मांडता येणे हे आज आवश्यक झाले आहे. ही क्षमता विकसित करण्यासाठी ‘वक्तृत्व’ स्पर्धामध्ये आपणास सहभाग घेता यावा, विविध उपक्रमांत ‘सूत्रसंचन’ करुन आपली नवी ओळख निर्माण करता यावी म्हणून पहिल्या दोन प्रकरणातून या कौशल्याची ओळख करुन दिली आहे. वक्तृत्व म्हणजे काय? उत्तम वक्ता होण्यासाठी कोणते प्रयत्न करावे? वक्तृत्व आणि भाषण यातील साम्यभेद कोणते? सूत्रसंचालनाचे तंत्र कसे आत्मसात करावे इत्यादी संदर्भातील माहिती आपणास या घटकाच्या अभ्यासातून मिळणार आहे. व्यावहारिक स्तरावर निमंत्रण पत्रिका-कार्यक्रम पत्रिका-विविध प्रकारची माहितीपत्रके यांचा परिचय आपणास असतोच. तिसरे व चवथे प्रकरणातून त्यासंदर्भातील माहिती समजून घेऊन त्याचे ‘लेखन कौशल्य तंत्र’ विकसित करता येईल. अभ्यासक्रमाशी संबंधित घटकांची सोदाहरण दिलेली माहिती नीट समजून देण्याचा प्रयत्न आहे. त्या आधारावर आपणास आपल्या ठिकाणी या कौशल्य अंगाचा विकास साधून आपले व्यक्तिमत्वाचा विकास साधता येईल. या हेतूनेच अभ्यासक्रमातील घटकनिहाय विवेचन प्रस्तुत पुस्तकात अभ्यासपूर्ण पद्धतीने देण्याचा प्रयत्न आहे. त्याचे स्वागत विद्यापीठाच्या परिसरातील अध्यापक, विद्यार्थीवर्ग करतील अशी आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477316448485,"sku":null,"price":95.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Upyojit-Marathi_cnvt-1_8df16796-9529-4b47-98a0-061e522e11bc.jpg?v=1772172028"},{"product_id":"निवडक-अभंग-ज्ञानेश्वर-ते-तुकाराम","title":"निवडक अभंग – ज्ञानेश्वर ते तुकाराम","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअभंग आणि ओवी या लोकाविष्काराचे माध्यम स्वीकारून संतकवींनी आपले अनुभव शब्दांकित केले. संतांचे साहित्य अध्यात्मपर, परमार्थपर असले तरी ते ज्या वास्तव जीवनातून बहरले, फुलले त्या वास्तव जीवनाचे रूप, रंग आणि गंध त्याला सहजच लाभले. सामाजिक वास्तवाचे भान त्यातूनच प्रकटले. विठ्ठलभक्तीबरोबरच दु:खमुक्ती आणि ऐहिक जीवनातील ताण-तणाव, संघर्ष यांचे चित्र त्यातून साकार झाले. यादव काळात महानुभाव आणि वारकरी असे दोन संप्रदाय उदयाला आले. वारकरी संप्रदाय अधिक खोलवर रुजला. संतवाङ्मयाच्या मागे वारकरी पंथाचे तत्त्वज्ञान होते. पंथीय प्रेरणा असूनही हे वाङ्मय केवळ प्रचारकी बनले नाही. ही चळवळ वाङ्मयीन बनली, जीवनस्पर्शी बनली. चळवळीचे साहित्य म्हणून त्याकडे पाहता येते. सभोवतालचे वास्तव, मध्ययुगीन गतिरुद्धता आणि भक्तीच्या निमित्ताने व्यक्तिस्वातंत्र्याचा केलेला पुकारा या सर्वांचा वाङ्मय निर्मितीवर काय परिणाम झाला हे तपासणे आज गरजेचे आहे. संत साहित्य केवळ अध्यात्मपर आहे, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. संतांच्या अभंगातील आकृतीसौंदर्य, रचना विशेष, गेयगुण यांच्या बरोबरच त्यातील आशयसंपन्नता, परिवर्तनवादी विचारशक्ती यांचाही परामर्ष घेणे मला आवश्यक वाटते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा अभ्यास आज दुर्लक्षित होत आहे. वारकरीपंथीय तत्त्वज्ञानातील परिवर्तनवादी विचार व संतसाहित्य यांचा परस्पर संबंध समजून घेतल्यास चळवळीतून साहित्यसृजन कसे होते व ते त्या चळवळीला व परंपरेला बळ देत देत पुढील साहित्य निर्मितीस कसे प्रेरक ठरू शकते, याचाही हिशेब मांडणे आजच्या संदर्भात शक्य होईल. विशिष्ट कालखंडाचा साहित्यावर प्रभाव व त्या साहित्यातून निर्माण झालेल्या विचारांचा कालखंडावर परिणाम असे परस्पर संबंधाचे स्वरूपही यातून पाहता येईल. साहित्य आणि समाजजीवन यांचे नाते तपासणे व साहित्य निर्मितीमागील प्रेरक शक्ती समजावून घेणे एवढे जरी भान या निमित्ताने आले तरी पुरेसे आहे. अभ्यासक, विद्यार्थी, रसिक या प्रयत्नाचे स्वागत करतील असा विश्वास वाटतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477443850469,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Nivdak-Abhang_Cnvt-1.jpg?v=1772176153"},{"product_id":"स्थूल-अर्थशास्त्र-8","title":"स्थूल अर्थशास्त्र","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477493264613,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sthul-Arthashastra_cnvt-1.jpg?v=1772178015"},{"product_id":"निवडक-संविधाने-आणि-आंतरराष्ट्रीय-संघटना","title":"निवडक संविधाने आणि आंतरराष्ट्रीय संघटना","description":"\u003cp\u003eग्रेट ब्रिटन, अमेरिका, चीन या देशांचे संविधान व दक्षिण आशियाई विभागीय सहकार्य संघटना (सार्क), यूनो यांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. ग्रेट ब्रिटनच्या शासनव्यवस्थेत संविधानात्मक सुधारणा कायदा-2005 मंजूर केल्यानंतर या शासनव्यवस्थेतील संरचनामध्ये काही महत्वाचे बदल झाले आहेत. विशेषत: ‘हाऊस ऑफ लार्डस’ सभागृहाचे न्यायविषयक अधिकार नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सर्वोच्च न्यायालयास देण्यात आले आहे तसेच या सभागृहाचा पदाधिकारी ‘लॉर्ड स्पीकर’ हे पदही निर्माण करण्यात आले आहे. संविधानात नवीन झालेल्या बदलांची नोंद या पुस्तकात घेण्यात आली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजगात आर्थिक व सामाजिक विकासासाठी अनेक आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्यात आलेल्या आहेत. दक्षिण आशियाई विभागीय सहकार्य संघटना (सार्क) दक्षिण आशियातील राष्ट्रांच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. या संघटनेची उद्दिष्ट्ये, रचना आणि कार्याचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. तसेच यूनो संदर्भातही माहिती दिली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदरील पुस्तकात ग्रेट ब्रिटनचे संविधान, ग्रेट ब्रिटनची संसदीय पद्धत, अमेरिकेचे संविधान, अमेरिकेचे कायदेमंडळ – काँग्रेस, दक्षिण आशियाई विभागीय सहकार्य संघटना, चीनचे संविधान, चीनचे अध्यक्ष, संयुक्त राष्ट्र संघ, सुरक्षा परिषद : रचना आणि कार्य, भारत-चीन संबंध महत्त्वाचे वाद प्रश्न या घटकांचा सविस्तर परामर्श घेण्यात आलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477955293413,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Nivadak-Savidhane-ani-Antarrashtriya-Sanghatna_cnvt-1.jpg?v=1772196320"},{"product_id":"प्राचीन-भारताचा-इतिहास-इ-पू-3000-ते-इ-स-1200","title":"प्राचीन भारताचा इतिहास (इ.पू. 3000 ते इ.स. 1200)","description":"\u003cp\u003eप्राचीन काळी भारत सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. त्याचा व्यापार दूरदूरच्या देशांबरोबर चालत असे. त्याच्या संस्कृतीची किर्ती संपूर्ण जगात पसरली होती. कलाकौशल्य, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि व्यापार यांच्या बाबतीत हा देश जगाला मार्गदर्शक होता. असे असतानाही आपणास मोठ्या दु:खाने सांगावे लागते, की आज या देशाचा प्राचीन गौरवशाली इतिहास उपलब्ध नाही. जो उपलब्ध आहे तो फारच अल्प आहे, म्हणून प्राचीन भारताचा अभ्यास करताना इतिहासकाराला मोठा त्रास पडतो. आज भारताचा जो इतिहास उपलब्ध आहे त्याच्या कैकपटीने प्राचीन भारताचा इतिहास स्मृतीच्या गर्तेत नष्ट झाला. त्यामुळे बरेच इतिहासकार भारताचा इतिहास किंवा भारतीय संस्कृती ही आधुनिक संस्कृती आहे, असा समज करून घेतात. भारतीयांनी तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी अनेक विभागांत कार्य केले. परंतु इतिहासाबाबत संपूर्ण दुर्लक्ष केले. त्यामुळे फारच अशी थोडी प्राचीन इतिहासविषयक साधने उपलब्ध आहेत, की त्यांच्यावर विसंबूनच आपणास प्राचीन भारताचा इतिहास जाणून घ्यावा लागतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकात प्राचीन भारतीय इतिहासाची साधने, हडप्पा किंवा सिंधू संस्कृती, पूर्व वैदिक काळ, धर्मक्रांतीचे युग, मौर्य साम्राज्य व मौर्योत्तर काळ, गुप्त साम्राज्य, वर्धन घराणे, दक्षिण भारत या घटकांची अचूक माहिती देण्यात आली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477988454629,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Bhartacha-Itihas_cnvt-1.jpg?v=1772196832"},{"product_id":"भारताचा-इतिहास-इ-स-1757-ते-1947","title":"भारताचा इतिहास (इ.स. 1757 ते 1947) (History of India (1757 A.D. - 1947 A.D.))","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने इ.स.1757 मध्ये प्रथम बंगाल प्रांतात सत्तेचा पाया घातला. पुढे हळूहळू संपूर्ण भारत देशावर आपली सत्ता स्थापन केली. इ.स.1857 मध्ये भारतीयांनी कंपनी सरकारच्या विरोधात उठाव केला. त्यामुळे भारतात कंपनीची सत्ता संपुष्टात आली व त्याठिकाणी ब्रिटिश सम्राटाची सत्ता आली. ब्रिटिश सरकारने इ.स. 1947 पर्यंत भारतावर राज्य केले. या कालखंडात भारताची भौतिक प्रगती झाली असली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषणही झाले. परिणामी क्रांतिकारकांनी क्रांतिकारी चळवळ करून आणि जनतेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढा देऊन भारत देशाला ब्रिटनच्या राजकीय वर्चस्वातून मुक्त केले. याच काळात भारतात सामाजिक व धार्मिक चळवळीही झाल्या. या सर्व घटकांचा इतिहास या ग्रंथात दिला असून हा ग्रंथ विद्यापीठ स्तरावरील परिक्षा, नेट, सेट व तत्सम स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479682265317,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartacha-Itihas-1757-1947_cnvt-1.jpg?v=1772253612"},{"product_id":"सकारात्मक-मानसशास्त्र-2","title":"सकारात्मक मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसकारात्मक दृष्टीकोनाचा आपल्या एकंदरीत जीवनावर फार चांगला प्रभाव पडत असतो. त्यामुळे आपले मानसिक व शारीरिक आरोग्य स्वस्थ ठेवले जाते. सकारात्मक भावनांमुळे मनुष्याच्या सुस्थितीत सतत वाढ होत असते. आपल्या आनंदी राहण्यामागे आपला आयुष्याकडे बघण्याच्या वृत्तीचा महत्त्वाचा सहभाग असतो. सकारात्मक मानसशास्त्र मनुष्याच्या चांगल्या व सशक्त बाजूंवर लक्ष केंद्रित करते. सकारात्मक मानसशास्त्रज्ञांनी बर्याच व्यक्तिभेदाचा अभ्यास आणि अध्ययन केले आहेत. त्यामुळे व्यक्ती आरोग्यदायी व आनंदी राहते, याबद्दल त्यांनी विश्लेषण केले. आनंदी असण्यामागे सकारात्मक परिणामाचा फार मोठा हातभार असतो. सकारात्मक दृष्टीकोन असेल तर आनंदी राहाल. आनंदी व्यक्तीच्या जीवनामधील कारण हे फक्त सकारात्मक परिणाम होय. आनंदीवृत्ती आणि सकारात्मक परिणाम ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सकारात्मक परिणामाचा संबंध हा व्यक्तीची आय, शिक्षण वय, लिंग यावर आधारित नाही परंतू सकारात्मक परिणाम हे घनिष्ठ आणि समाधानी नातेसंबंध राखण्यास मदत करतात. सदरील पुस्तकात सकारात्मक मानसशास्त्राचा शास्त्रीय उहापोह करण्यात आलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479686426853,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sakaratmak-Manasashatra-1.jpg?v=1772254871"},{"product_id":"मूलभूत-समाजशास्त्र","title":"मूलभूत समाजशास्त्रीय संकल्पना","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48480045269221,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mulbhut-Samajshastriya-Sankalpna_Dr-B-H-Kirdak-1.jpg?v=1772279342"},{"product_id":"भूरूप-शास्त्राची-मुलतत्वे","title":"भूरूप शास्त्राची मुलतत्वे","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48480055296229,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhurupshastrachi-Multattve_Dr-Shankar-R-Chaudhari-1.jpg?v=1772279640"},{"product_id":"भारतीय-कृषी-अर्थव्यवस्था","title":"भारतीय कृषी अर्थव्यवस्था","description":"\u003cp\u003eभारतीय कृषी अर्थव्यवस्था’ या विषयाची 6 भागातील मांडणी अत्यंत सोप्या\u003cbr\u003eभाषेत, अद्ययावत आकडेवारीसह प्रा. डॉ. मनोजकुमार ज्योतिराम गायकवाड यांनी\u003cbr\u003eकेली आहे. हे पुस्तक अर्थशास्त्र व मानव्यशाखेतील विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक\u003cbr\u003eयांना निश्चितच लाभदायी होईल.     \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48480066339045,"sku":null,"price":215.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Krishi-Arthavyavastha_Dr-M-J-Gaikawad-1.jpg?v=1772279926"},{"product_id":"भारतीय-कृषी-अर्थशास्त्र","title":"भारतीय कृषी अर्थशास्त्र","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48480081838309,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Krishi-Arthavyavastha_Dr-Mahadev-Rite-1.jpg?v=1772280571"},{"product_id":"भारताचा-इतिहास-१७००-१२००","title":"भारताचा इतिहास (१७००-१२००)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48480085377253,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartacha-Itihas_700-1200_Dr-G-B-Shah-1.jpg?v=1772280700"},{"product_id":"antargat-sajawatiche-adhunik-pailu","title":"अंतर्गत सजावटीचे आधुनिक पैलू","description":"\u003cp\u003eसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील नवीन अभ्यासक्रमानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (छएझ) बी.ए. प्रथम वर्षाच्या वैकल्पिक गृहअर्थशास्त्र विषयाच्या द्वितीय सत्रा करिता असून प्रस्तुत पुस्तक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या अनुषंगाने या विषयांमध्ये अंतर्गत सजावटीची संकल्पना, परिभाषा, वर्तमान काळात अंतर्गत सजावटीची व्याप्ती, अंतर्गत सजावटीची मूलतत्त्वे, मूलभूत वैशिष्ट्ये, अंतर्गत सजावटीची क्षेत्र, घरगुती सजावट, संस्थात्मक सजावट, कार्यालय सजावट, बाजार सजावट या बऱ्याच विषयाचे अध्ययन समाविष्ट असून हा विषय मानवी जीवनाला परिपूर्ण करण्यासाठी फार उपयुक्त आहे.\u003cbr\u003eसदर पुस्तकात अंतर्गत सजावटीचे आधुनिक पैलू याची सर्वांगाने चर्चा करण्यात आली आहे. यात अंतर्गत सजावटीचे घटक, फर्निचर, घरगुती कापड, सजावटीची साहित्य, उपकरणे, रंग, प्रकाश, नोकरीच्या संधी, व्यावसायिक अंतर्गत डिझाईनर, निवासी अंतर्गत डिझायनर, फर्निचर डिझाईनर, डिझाईनर सल्लागार इत्यादी विषयाची मांडणी सोप्या भाषेत मुद्देसूदरित्या करण्यात आलेली आहे.    \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48480106676453,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Antargat-Sajavatiche-Aadhunik-Pailu_Dr-Jyoti-Hawre-1.jpg?v=1772606517"},{"product_id":"प्राचीन-भारत-प्रारंभापासून-ते-इ-स-1000-पर्यंत","title":"प्राचीन भारत (प्रारंभापासून ते इ.स. 1000 पर्यंत)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रारंभी ब्रिटिशांनी भारतीय संस्कृती ही आधुनिक असल्याचे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण या गोष्टीवर भारतीयांचा विश्वास नव्हता. कारण या देशातील धर्म, चालीरिती, श्रद्धा, रूढी आणि परंपरा या प्राचीन असल्याचे स्पष्ट दिसत होते. परंतु ईस्ट इंडिया कंपनीचे नोकर या प्राचीन संस्कृतीस मान्य करावयास तयार नव्हते. परंतु 19 व्या शतकात पंजाबमध्ये रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरु झाले आणि त्याठिकाणी प्राचीन वीटा आणि प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडू लागले आणि त्यातून ब्रिटिशांचे डोळे खाडकन उघडले. उत्खनन करण्यात आले तेव्हा मोहेनजोदाडो आणि हडाप्पा सारखी प्राचीन शहरे सापडली. सिंधु संस्कृतीचा शोध लागला. उत्कृष्ट नगर रचना, आरोग्यासाठी केलेली सांडपाण्याची व्यवस्था, स्नानगृह, मनोरंजनाची साधने जेव्हा तेथे उत्खननात सापडली त्यावेळी भारतीय संस्कृती जगातील प्राचीन चीन, इजिप्त आणि बॅबिलोनिया या प्राचीन संस्कृतीच्या रांगेत जावून बसली. आर्य संस्कृतीने या देशाला नवा मंत्र दिला. जैन आणि बौद्धांनी त्यातील दोष काढून येथील मानवाला अहिंसेचा संदेश दिला. सद्वर्तन आणि नैतिकता त्यांनी शिकविली. शिल्प आणि सांस्कृतिकजीवनात बदल घडविले. नंतर मौर्य, गुप्त, वर्धन, शुंग, राष्ट्रकूट इत्यादी यासारखी नवीन घराणी उदयास आली. येथील जीवनात क्रांती घडावी अतएव येथे नालंदा, तक्षशीलासारखी विद्यापीठे जन्मास आली. अरबांना या शैक्षणिक केंद्रांचे महत्व न कळाल्याने त्यांनी ती उध्वस्त केली. पण त्यापूर्वीच आग्नेय आशियात भारतीय संस्कृती जावून पोहोचली होती. यासारख्या अनेक गोष्टींचा अभ्यास म्हणजे प्राचीन भारत हा ग्रंथ होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48480184729829,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Bharat_Praranbhaasun-Te-CE-1000-Paryant_Dr-G-B-Shaha_cnvt-1.jpg?v=1772283774"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/ba-ii.oembed","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}