Your cart is empty now.
औद्योगिक अर्थशास्त्र हा एक व्यावहारिक अर्थशास्त्राचा (Applied Economics) भाग आहे. याचा संबंध सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र, समग्रलक्षी अर्थशास्त्र, बँकिंग व वित्तीय व्यवस्था, विदेश व्यापार, सार्वजनिक अर्थशास्त्र यांच्याशी थेट येतो. औद्योगिक अर्थशास्त्र हा उद्योग संस्थेच्या वर्तनाच्या अध्ययनाचा विषय आहे. उद्योग संस्था कोणत्या वस्तूचे कोणासाठी, किती, कोणत्या पद्धतीने उत्पादन करायचे, किंमत कशी निश्चित करायची, नफ्याच्या महत्तमीकरणाबरोबरच विक्री महत्तमीकरण, वृद्धी महत्तमीकरण यांचेही अध्ययन औद्योगिक अर्थशास्त्रात केले जाते.
प्रस्तुत पुस्तकात औद्योगिक अर्र्थशास्त्राचा परिचय आणि औद्योगिकीकरण, बाजार संरचना आणि औद्योगिक निर्णय, औद्योगिक स्थानियीकरणाचे विश्लेषण, गुंतवणूक निर्णय आणि प्रकल्प मूल्यमापन, नवोन्मेष, संशोधन आणि विकास, किंमत निर्णय, औद्योगिक उत्पादकता आणि वित्त या महत्त्वपूर्ण मुद्द्यांची विस्तृत आणि मुद्देसूद मांडणी केली आहे.