Your cart is empty now.
मानव संसाधन विकास हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तेवढाच किचकट असा विषय आहे. उद्योग संस्था, बँक व्यवसाय, विमा व्यवसाय, शैक्षणिक संस्था अशा बहुविध क्षेत्रात मानव संसाधन विकासाची उपयोगिता महत्त्वपूर्ण मानली जाते. या विषयात व्यवस्थापनातील मानवीय घटकांबाबत असणाऱ्या सर्वच पैलूंचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. यावरून विषयाची व्याप्ती व स्वरूप सहजपणे लक्षात येते. म्हणूनच या विषयाचे विद्यार्थ्यांना सहज आकलन व्हावे आणि या विषयाबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी या दृष्टीने प्रस्तुत पुस्तकाचे लिखाण केले आहे. तसेच उपक्रमातील मानव संसाधनाच्या संदर्भात उपलब्ध झालेली सर्व प्रकारची आधुनिक माहिती यात देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच प्रत्येक घटकाच्या शेवटी प्रश्नसंग्रह दिलेला आहे. हे पुस्तक विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाच्या स्वाधीन करतांना आनंद होत आहे.
बदललेल्या अभ्यासक्रमानुसार प्रस्तुत पुस्तकाचे लिखाण करण्यात आलेले आहे.