Welcome to Prashant Publications

Rs. 180.00 10% OFF
Availability: 10 left in stock

पुणे विद्यापीठाअंतर्गत तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या ‘व्यापार कायदे
नियमात्मक रचना’ सत्र 6 या विषयाच्या बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारीत हे क्रमिक पुस्तक आपल्याला
सुपूर्त करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. विद्यार्थी, शिक्षक व कायद्याचे
अभ्यासक यांना...

  • Name : व्यापार कायदे नियमात्मक रचना – II
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Commerce
  • Barcode : 9789394403208

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

व्यापार कायदे नियमात्मक रचना – II
- +

पुणे विद्यापीठाअंतर्गत तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या ‘व्यापार कायदे
नियमात्मक रचना’ सत्र 6 या विषयाच्या बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारीत हे क्रमिक पुस्तक आपल्याला
सुपूर्त करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. विद्यार्थी, शिक्षक व कायद्याचे
अभ्यासक यांना या पुस्तकाचा निश्चितच उपयोग होईल.
वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना मराठीमध्ये लिहिलेल्या उत्तम
पुस्तकांची नेहमीच उणीव असते; ही उणीव भरून काढण्याचा हा एक सांघिक
प्रयत्न आहे. या पुस्तकात संबधित कायद्याच्या तरतुदी, संकल्पना, उदाहरणे,
न्यायालयाचे निर्णय, कालानुरूप कायद्यातील बदल यांचा समावेश केला आहे.
पाठाच्या शेवटी परीक्षेला उपयुक्त असे प्रश्नसंच दिले आहेत.
‘व्यापार कायदे नियमात्मक रचना’ हा विषय कायदेशीर बाबींचा, व्यापक
व गुंतागुंतीचा आहे; त्यामुळे या विषयावर लेखन करत असताना या विषयाचे
कायदेशीर स्वरूप कायम राहील आणि भाषा सहज समजेल अशा आशयाने
हे पुस्तक लिहिले आहे. तृतीय वर्षाच्या सत्र-6 या अभ्यासक्रमात चलनक्षम
दस्तऐवजांचा(पत्रकाचा) कायदा-1881, ई-करार,
ग्राहक संरक्षण कायदा-2019, बौद्धिक मालमत्ता अधिकार या प्रकरणांचा
समावेश यात केला गेला आहे. या विषयाचे अध्ययन व अध्यापन सुलभ व्हावे व
विद्यार्थ्यांना विषयाचे नेमके स्वरूप समजावे यासाठी हे पुस्तक लिहिले आहे. सदर
पुस्तक लिहिताना विविध संदर्भ ग्रंथांचा उपयोग करण्यात आला आहे.

चलनक्षम दस्तऐवजांचा(पत्रकाचा) कायदा, 1881 : 1.0 चलनक्षम दस्तऐवज, 1.1 चलनक्षम दस्तऐवजाची वैशिष्ट्‌‍ये, 1.2 चलनक्षम दस्तऐवजाचे प्रकार : वचनचिठ्ठी, विनिमय पावती, धनादेश, हुंडी, 1.3 चलनक्षम दस्तऐवजांचे हस्तांतर व पृष्ठांकन, 1.4 चलनक्षम दस्ताची नोंदणी व निषेधीकरण, 1.5 चलनक्षम दस्ताचा धारक व यथाविधिधारक.
ई-करार (ई-व्यवहार/ई-कॉमर्स) : 2.1 ई-कॉमर्स : स्वरूप, निर्मिती, कायदेशीरपणा, अधिकृत मान्यता. 2.2 ओळख निश्चिती, पोचपावती, ई-रेकॉर्ड्स पाठवणी, 2.3 डिजिटल स्वाक्षरी : अर्थ आणि कार्ये, डिजिटल स्वाक्षरी, प्रमाणपत्रे कलम 35-39, 2.4 ई-करार आणि वैयक्तिक माहिती संरक्षणासंबंधी कायदेशीर समस्या. (कलम.43-अ).
ग्राहक संरक्षण कायदा, 2019 : 3.1 ग्राहक संरक्षण कायदा, 2019 ची ठळक वैशिष्ट्ये, 3.2 व्याख्या-ग्राहक, तक्रारदार, सेवा, दोष आणि कमतरता, अनुचित व्यापार पद्धती, प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती, अनुचित करार, 3.3 ग्राहक संरक्षण परिषद, 3.4 तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया, आयोगाची तक्रार निवारण करण्याची प्रक्रिया आणि ग्राहकांना आयोग आणि ग्राहकांना उपलब्ध सवलत. (कलम 39), 3.5 ग्राहक विवाद निवारण आयोग (रचना, अधिकार क्षेत्र, अधिकार आणि कार्ये).
बौद्धिक मालमत्ता अधिकार : 4.1 आयपीआरचा अर्थ आणि महत्त्व, आयपीआरच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्न: थखझज (उद्दिष्टे आणि उपक्रम) आणि ट्रिप्स (ढठखझड) करार : उद्दिष्टे, 4.2 भारतीय वर्तमान कायद्यांतर्गत खालील बौद्धिक मालमत्ता अधिकाराची व्याख्या आणि संकल्पनाचा अर्थबोध, 4.3 पेटंट : व्याख्या आणि संकल्पना, पेटंट धारकाचे अधिकार आणि दायित्व, त्याचा कालावधी, 4.4 कॉपीराइट : कॉपीराइटची वैशिष्ट्ये आणि विषय, लेखक आणि त्याचे अधिकार, त्याचा कालावधी, 4.5 ट्रेडमार्क : वैशिष्ट्ये, कार्ये, चित्रे, विविध चिन्हे, संज्ञा, इंटरनेट डोमेन नाव- ट्रेडमार्क धारकाचे हक्क, 4.6 डिझाइन : महत्त्व, वैशिष्ट्‌‍ये, डिझाइन धारकाचे अधिकार, 4.7 भौगोलिक संकेत, गोपनीय माहिती आणि व्यापार रहस्ये, 4.8 पारंपारिक ज्ञान-अर्थ आणि व्याप्ती.

💬

Chat with us