Your cart is empty now.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2019 च्या नवीन अभ्यासक्रमानुसार लिहिलेले ‘बँक व्यवसायाची मूलतत्त्वे’ हे पुस्तक प्रथम वर्ष वाणिज्याचे विद्यार्थी, शिक्षक, बँक अभ्यासक व वाचक यांच्या हाती देताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. हे पुस्तक लिहिणे आमच्या समोरील महत्वाचे आव्हान होते. हे आव्हान पेलण्यासाठी अनेक लेखकांचे संदर्भ ग्रंथ, विविध मासिके व वर्तमान पत्रातील लेख तसेच रिझर्व्ह बँकेचे बुलेटीन, वेबसाईट यांची मदत झाली आणि हे क्रमिक पुस्तक पुर्णत्वाला आले.
सदर पुस्तकाची मांडणी चार प्रकरणांच्या साहाय्याने केली आहे. प्रकरण क्र. 1 मध्ये बँक व्यवसायाची उत्क्रांती आणि बँक शब्दाचा उदय या विषयीची सविस्तर माहिती दिलेली आहे. प्रकरण क्र.2 मध्ये बँकेची प्राथमिक कार्ये आणि दुय्यम कार्ये याबाबत सविस्तर चर्चा केली आहे. प्रकरण क्र. 3 मध्ये ठेवी, खाती उघडण्याची व वापरण्याची कार्यपद्धती, त्याचबरोबर संस्थात्मक खातेदारांचा सखोल अभ्यास केला आहे. प्रकरण क्र. 4 मध्ये पैसे पाठविण्याच्या पारंपारिक व आधुनिक पद्धतीचा सविस्तर अभ्यास केला आहे.