Your cart is empty now.
वर्तनात्मक अर्थशास्त्राचा परिचय या शिर्षकान्तर्गत केलेला अभ्यासक्रम चार युनिटमध्ये विभागला आहे. पहिले युनिट परिचयात्मक आहे. यात अर्थशास्त्राच्या व्याख्या, अर्थशास्त्र आणि इतर शास्त्रे यातील संबंध, मुलभूत आर्थिक समस्या, त्याची सोडवणूक करणाऱ्या यंत्रणा आणि सूक्ष्मलक्षी व समग्रलक्षी अर्थशास्त्र या मुद्दयांचा समावेश आहे. दुसऱ्या युनिटमध्ये मागणी, मागणी निर्धारित करणारे घटक, मागणीचा नियम, मागणीवक्राचे स्थानांतरण, पुरवठा, पुरवठा ठरविणारे घटक, पुरवठा सिद्धान्त, पुरवठावक्र व त्यातील परिवर्तन, मागणी-पुरवठा समतोल, मागणीचा पूर्व अंदाज आणि उपभोक्त्याचे संतोषाधिक्य या मुद्दयाचा समावेश खर्च संकल्पना या तिसऱ्या युनिटमध्ये खर्च संकल्पना, खर्च निर्धारक, अल्पकालीन व दीर्घकालीन खर्च आणि खर्चवक्र, U आणि L आकाराचा सरासरी खर्च वक्र व त्याचे विश्लेषण, मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाच्या अन्तर्गत व बाह्य मितव्ययता आणि अमितव्ययता यांचा समावेश आहे तर उत्पादनाचे सिद्धान्त या चौथ्या युनिटमध्ये उत्पादन, उत्पादन घटक, बदलत्या प्रमाणाचा, प्रमाणफलाचा नियम, कॉब-डॅग्लस उत्पादन फलन, समउत्पत्ती वक्र आणि समखर्च रेषा या मुद्दयांचा समावेश आहे. प्रस्तुत क्रमिक पुस्तकात अभ्यासक्रमातील सर्वच मुख्य आणि उपमुद्दयांची आवश्यक तेवढी, समजेल अशी मांडणी केली आहे.