{"title":"Defence","description":"","products":[{"product_id":"दक्षिण-आशिया-आणि-भारत-अमेरिका-संबंध","title":"दक्षिण आशिया आणि भारत-अमेरिका संबंध","description":"\u003cp\u003eराष्ट्रीय अखंडता, सार्वभौमत्व, नितीमूल्यांचे संरक्षण तसेच बाह्य आक्रमणांचा प्रभावी प्रतिकार, सर्व राष्ट्रांच्या सुरक्षा धोरणाचे मुख्य ध्येय असते. 20 व्या शतकाच्या शेवटच्या दशकात सोव्हिएत संघाचे विघटनामुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षा समिकरण तसेच जगातल्या शक्तीच्या राजकारणावर व्यापक असा प्रभाव पडला. अमेरिकी नेतृत्वात स्थापन झालेली एक ध्रुवीय जागतिक प्रणालीमुळे प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक परिवर्तन, अव्यवस्था तसेच असुरक्षेचे वातावरण निर्माण झाले. शीतयुद्धाच्या समाप्तीचे फलस्वरूप आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षेच्या समोर नविन आव्हाने निर्माण झाली. त्याचबरोबर प्रादेशिक संघर्षांनाही प्रोत्साहन मिळाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्लामिक कट्टरपंथियांचा उदय तसेच दहशतवादाचे ध्रुवीकरण एका शक्तीकेंद्राच्या रुपाने अमेरिकी प्रभुत्वास आव्हान देताना दिसत आहे. 11 सप्टेंबर 2001 रोजी अल कायदाने अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय सुरक्षा समिकरणात बदल झाल्याचे दिसते. भारताने आतापर्यंत पाकिस्तानला चारवेळा पराभूत केले. 2017 मध्ये भारत आणि चीनमध्ये डोकलामवरून संबंध ताणले गेले तर दुसरीकडे बांग्लादेश, नेपाळ व श्रीलंकेबरोबर भारताचे द्विपक्षीय संबंध मैत्रीपूर्ण नाहीत. सद्य:स्थितीत भारताने आपल्या अलिप्ततावादी भूमिकेला तिलांजली दिलेली असून आज भारत महाशक्ती बनण्याकडे वाटचाल करीत असून महाशक्ती अमेरिकेने देखील भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. भविष्यात भारत-अमेरिका युती आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, यात आता शंका राहिलेली नाही.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48458284531941,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Dakshin-Aashiyache-Aani-Bharat-Amerika-Sambandha_Dr-N-Z-Patil_cnvt-1.jpg?v=1771847083"},{"product_id":"भारताची-अंतर्गत-सुरक्षा","title":"भारताची अंतर्गत सुरक्षा","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470992421093,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Indias-Internal-Security-1.jpg?v=1772025032"},{"product_id":"राष्ट्रीय-सुरक्षा-जागतिक-दृष्टीकोन","title":"राष्ट्रीय सुरक्षा (जागतिक दृष्टीकोन)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473859031269,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rashtriy-Surksha-Jagatik-Drushtikon-1.jpg?v=1772087740"},{"product_id":"सायबर-युद्ध","title":"सायबर युद्ध","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eडिजीटल युग म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान विकासाची एक देणगी आहे. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील होणार्या गतीशील वेगाने मानवी समाजजीवन ढवळून निघाले आहे. माहिती तंत्रज्ञानाचे क्षेत्र अत्यंत जलदगतीने विस्तारीत आणि विकसीत होवून आयुष्याची ती मूलभूत गरज भासणार अशी स्थिती निर्माण झालेली आहे. मोबाईल किंवा इंटरनेटशिवाय कोणतेही कार्य सहजतेने पार पडणे अशक्य होणार आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eडिजिटल युगातील युद्धाची कार्यवाही ‘नेट’शी संबंधित आहे आणि यापुढेही राहणार आहे. माहिती तंत्रज्ञान आणि संगणकीय प्रणालीद्वारे घडविलेली अचानक विध्वंसक कार्यवाही हाच सायबर युद्धाचा उद्देश्य आणि योजना असते. यामुळे सामाजिक, आर्थिक, आर्थिक, मानसिक, बौद्धिक वगैरे सर्वच स्तरावर गोंधळ माजून समाजाची अथवा देशाची घडीदेखील विस्कळीत होते. जागतिक क्षेत्रात दररोज कोठे न कोठे सायबर हल्ले, सायबर गुन्हे होत आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबरच सायबर गुन्ह्यामध्येदेखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474014253285,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Cyber-Yuddha_cnvt-1.jpg?v=1772090055"},{"product_id":"भारतीय-युद्ध-तंत्राची-उत्क्रांती-1","title":"भारतीय युद्ध तंत्राची उत्क्रांती","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474299564261,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Yuddha-Tantra-1_1.jpg?v=1772094630"},{"product_id":"युद्ध-आणि-भारताच्या-संरक्षणाची-रुपरेषा-भाग-1","title":"युद्ध आणि भारताच्या संरक्षणाची रुपरेषा (भाग 1)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474442039525,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/War-1-1.jpg?v=1772099814"},{"product_id":"आंतरराष्ट्रीय-संबंध-2014-पासूनचे-भारतीय-परराष्ट्रीय-धोरण","title":"आंतरराष्ट्रीय संबंध 2014 पासूनचे भारतीय परराष्ट्रीय धोरण (International Relation Indian Foreign Policy After 2014)","description":"\u003cdiv class=\"exad-advance-tab-content exad-tab-image-has-no exad-tab-image-left active\"\u003e\n\u003cdiv class=\"exad-advance-tab-content-element\"\u003e\n\u003cdiv data-elementor-type=\"section\" data-elementor-id=\"22834\" class=\"elementor elementor-22834 elementor-location-single\" data-elementor-post-type=\"elementor_library\"\u003e\n\u003cdiv class=\"has_eae_slider elementor-section elementor-top-section elementor-element elementor-element-699ff59e elementor-section-full_width elementor-hidden-tablet elementor-hidden-mobile_extra elementor-hidden-mobile elementor-section-height-default elementor-section-height-default exad-glass-effect-no exad-sticky-section-no\" data-eae-slider=\"27764\" data-id=\"699ff59e\" data-element_type=\"section\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-container elementor-column-gap-no\"\u003e\n\u003cdiv class=\"has_eae_slider elementor-column elementor-col-100 elementor-top-column elementor-element elementor-element-444cebe5 exad-glass-effect-no exad-sticky-section-no\" data-eae-slider=\"51096\" data-id=\"444cebe5\" data-element_type=\"column\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-widget-wrap elementor-element-populated\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-element elementor-element-20adbf0 exad-sticky-section-no exad-glass-effect-no elementor-widget elementor-widget-wl-single-product-short-description\" data-id=\"20adbf0\" data-element_type=\"widget\" data-widget_type=\"wl-single-product-short-description.default\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-widget-container\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description\"\u003e\n\u003cp\u003eअलीकडच्या काळात म्हणजेच 20 व्या शतकात आंतरराष्ट्रीय संबंध हा महत्त्वाचा अभ्यास विषय म्हणून उदयास आलेला आहे. दळणवळणातील क्रांतीकारक बदलांमुळे जगाच्या विविध भागातील राष्ट्रांना एकमेकांच्या जवळ आणले आहे; तसेच या बदलांमुळे राष्ट्रांतर्गत वेगवेगळे संबंध वाढीस लागले आहेत. त्यातूनच आंतरराष्ट्रीय संबंधालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे; वेगवेगळ्या कालखंडात आंतरराष्ट्रीय संबंधांच्या स्वरूपात बदल घडून आलेले आहेत. आज आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात व्यापक बनलेले आहे. आज मानवाने विज्ञान व तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीमुळे तसेच दळणवळणाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात झालेल्या बदलामुळे राष्ट्राराष्ट्रातील अंतर कमी होऊन ती एकमेकांच्या अगदी जवळ आली आहेत. तसेच अलीकडच्या प्रत्येक राष्ट्रांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्यांच्या गरजाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यातच मानवाने विनाशक स्वरूपाची शस्त्रास्त्रे निर्माण केल्यामुळे जागतिक परिस्थिती तणावाची बनून ती संरक्षणासाठी व इतर गरजांच्या पूर्ततेसाठी एकमेकांवर अवलंबून राहू लागली. त्याच वेळी दुसरीकडे अशा तणावाच्या परिस्थितीमधून जगाला बाहेर काढण्यासाठी आणि जागतिक शांतता व सुरक्षिततेसाठी आंतरराष्ट्रीय संघटनेच्या निर्मितीवर भर देण्यात आला. यातून आंतरराष्ट्रीय संबंध स्वरूपाच्या कक्षा रूंदावलेल्या आपणास दिसून येतात.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474918486245,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aantrastriya-Sambandh_cnvt_1.jpg?v=1772110930"},{"product_id":"आधुनिक-भारताची-लष्करी-व्यवस्था-1947-पर्यंत","title":"आधुनिक भारताची लष्करी व्यवस्था (1947 पर्यंत)","description":"\u003cp\u003eभारतातील ‘क्षात्र वृत्ती’ हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. मौर्य, गुप्त, चौल अशा असंख्य राजवटींनी भारताबाहेरही आपली सत्ता प्रस्थापित केल्याचे इतिहासात पदोपदी उल्लेख आढळतात. राजपूत, शीख, जाट, गोरखा मराठा, डोगरा, गढवाली व दक्षिणेतील नायर-कुर्ग, आग्नेय भारतातील नागा व मिझो जमाती शौर्याबद्दल प्रसिद्धच आहेत. भारतीयांच्या एकतेअभावी परकियांना या देशावर राज्य निर्माण करणे शक्य झाले. समुद्रमार्गे आलेल्या पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रज यांच्या सागरी शक्तींकडे भारतीय राजांनी खूप दुर्लक्ष केले. अपवाद फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा. महाराजांनी मोठ्या महत्प्रयासाने, दूरदृष्टिने उभारलेले मराठी आरमार पेशव्यांनी बुडविल्याने इंग्रजांना प्रतिकार करणारी सागरी सत्ताच उरली नाही. 1857 च्या सशस्त्र क्रांतीनंतर भारतातील कंपनी कारभाराला खीळ पोहचली. शिस्तबद्ध, आक्रमक, अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त अशा ब्रिटीशांनी स्थानिक लोकांचेच सैन्य उभारून भारतीय सत्तांचा पराभव करीत देशाला गुलामगिरीकडे ढकलले. 20 व्या शतकातील जागतिक महायुद्धांमध्ये भारतीय सैनिकांनी निर्णायक भूमिका बजावून आपले कर्तृत्व सिद्ध केले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAadhunik Bharatachi Lashakri Vyavsatha (1947 Paryant)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477482877157,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aadhunik-Bharatachi-Lashkari-Vyavastha_Dr-Devendra-Vispute_cnvt-1.jpg?v=1772177636"},{"product_id":"संरक्षण-व-सामरिकशास्त्र-मुलभूत-संकल्पना-आणि-भारत","title":"संरक्षण व सामरिकशास्त्र : मुलभूत संकल्पना आणि भारत","description":"\u003cp\u003eसंरक्षण या विषयाचा विचार करताना, मानवाला संरक्षण ही संकल्पना कधी व का सुचली असावी, असा प्रश्न पडतो. त्याच्या आदिम किंवा प्राथमिक अवस्थेत स्वसंरक्षणासाठी त्यास निसर्गाशी व जंगली श्वापदांशी सतत झगडावे लागत असे. कालांतराने तो प्रगत झाला. मानव प्राणी मनुष्य या संज्ञेला जेव्हापासून पात्र झाला व मानव संस्कृतीचाही विकास झाला तेव्हापासून तो संरक्षणाचा अधिक विचार करू लागला. त्यामधून संरक्षण या संकल्पनेचा विकास झाला. आज तर मानव व मानवी संस्कृतीचा खूपच विकास झालेला आहे. त्याच्या वैज्ञानिक संशोधनातून त्याने प्रत्येक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे. परंतु संरक्षणाचे विचार त्याच्या मनाने आजही हद्दपार तर केले नाहीतच, उलट तो संरक्षणाच्या तरतुदींमध्ये अधिकाधिक गुंतत चालला आहे. स्वसंरक्षणासाठी त्यास पर्यावरण संरक्षण व पर्यावरण संतुलन देखील तितकेच महत्त्वाचे आहे. पर्यावरण संरक्षण हे मानवी संसरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. याच दृष्टिकोनातून संरक्षण संकल्पनेचा परीघ विस्तृत झाला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘संरक्षण व सामरिकशास्त्र : मूलभूत संकल्पना आणि भारत’ हा नाविण्यपुर्ण माहितीने नटलेला ग्रंथ आपल्याकडे सोपवताना अतिशय आनंद होत आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर वर्गातील संरक्षण व सामरिकशास्त्र, राज्यशास्त्र, तसेच नेट व सेट राज्यशास्त्र, संरक्षण व सामरिकशास्त्र यांचा अभ्यास करण्यासाठी हा ग्रंथ उपयुक्त पडेल.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477767041253,"sku":null,"price":695.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanrkshan-and-Samarikshastra_cnvt-1.jpg?v=1772189794"},{"product_id":"दहशतवाद-आणि-नक्षलवाद","title":"दहशतवाद आणि नक्षलवाद","description":"\u003cp\u003eविनाशकाले विपरीत बुद्धी जोपासणार्या नराधमांनी संपूर्ण जगात दहशतवादी कारवाया सुरु करुन स्थैर्य नष्ट केलेले आहे. दहशतवादींना जोपासणार्या भेकड राष्ट्रांचे भवितव्य अंधारात असून ते इतरांनाही अंधाराच्या गर्तेत ओढत आहेत. दहशतवादी परिस्थितीवर नियंत्रण आणण्यसाठी सर्वांची एकजूट आणि सहकार्य अपेक्षित आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपाकिस्तानने भारतामध्ये दहशतवाद पसरवून अनेक निष्पाप जीवांचे बळी घेतले असून जगभरात थैमान घालणार्या दहशतवादाचे मूळ पाकिस्तानातच आहे. पाकिस्तान हे धर्मांध राष्ट्र असून जागतिक दहशतवादाचा अड्डा बनलेला असून वेळीच आवर घालणे गरजेचे आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदरील पुस्तकात दहशतवादाचे प्रकार, अणुदहशतवाद, भारत-पाक दहशतवादी संघटना, दहशतवादी हल्ले, 7\/9 व 26\/11 चे हल्ले, भारत-अफगाण व दहशतवाद, प्रमुख दहशतवादी संघटना, भारतावरील हल्ले, पाकिस्तान दहशतवाद, नक्षलवाद, इतिहास, नक्षलवादी भारतीय समस्या, गंभीर स्वरुप, दहशतवाद-नक्षलवाद आणि सुरक्षा, दहशतवाद प्रतिबंध (नियंत्रण) वगैरे माहितीचा समावेश केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराष्ट्राचे भवितव्य घडविणार्या तरुण आधारस्तंभांनी दहशतवादाबद्दल सखोलता, वास्तविकता जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून भारताच्या तसेच जगाच्या विकासासाठी ते साहाय्यभूत ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477769760997,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Dahashatwad-and-Nakshalawad_cnvt-1.jpg?v=1772189867"},{"product_id":"भारताची-राष्ट्रीय-सुरक्षा-1","title":"भारताची राष्ट्रीय सुरक्षा","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eउपग्रहवेधी क्षेपणास्त्राची चाचणी, आक्रमक व शत्रुला विस्मयाचा धक्का देणार्या सर्जिकल स्ट्राईक्स, बालाकोट एअरस्ट्राईक आणि डोकलाम विवादात घेतलेल्या ठाम व कणखर भूमिकेमुळे चीनी सैन्याला घ्यावी लागलेली माघार या प्रासंगिकतेतून भारताने आज आक्रमक व वास्तववादी सुरक्षा धोरणाचा अंगिकार केल्याचे स्पष्ट होते. परिणामी ‘सॉफ्ट स्टेट’ ही भारताची आजवरची प्रतिमा पुसून टाकण्यात आपण बर्यापैकी यशस्वी झालो आहोत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eराष्ट्रीय सुरक्षा ही देशासाठी प्राधान्यक्रमाची बाब असून कोणतीही आर्थिक, औद्योगिक प्रगती किंवा विकास हा पुरेशा सुरक्षेशिवाय निरर्थक आहे. प्रादेशिक समस्यांमध्ये भाषा, सामाजिक, राजकीय, भौगोलिक, धार्मिक व आर्थिक समस्या तसेच सांप्रदायिकता, स्थलांतर, निरक्षरता, लिंगभेद, नव्याने प्रस्थापित झालेली समाज माध्यमे व त्यापासून होणारे दुष्परिणाम, आरोग्य, पर्यावरण, माओवादी चळवळी, शेजारील राष्ट्रांचा अमानुष दहशतवाद, सायबर गुन्हेगारी आणि भारताच्या सीमा समस्या व सुरक्षा या सर्व समस्या आणि नव्याने उभ्या ठाकलेल्या आव्हानांचा यथायोग्य परामर्श ‘भारताची राष्ट्रीय सुरक्षा’ या ग्रंथात घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रशक्तीवर विविध समस्यांचा परिणाम होऊन देश दुबळा कसा बनतो व त्याचबरोबर करावयाच्या उपाययोजनाही सूचविण्यात आलेल्या आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477771956453,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatachi-Rashtriy-Surksha_cnvt-1.jpg?v=1772189928"},{"product_id":"भारताची-संरक्षण-संघटना-आणि-राष्ट्रीय-सुरक्षितता","title":"भारताची संरक्षण संघटना आणि राष्ट्रीय सुरक्षितता","description":"\u003cp\u003e1947 मध्ये परकीयांचे जोखंड दूर करून भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर काही समस्या निर्माण झाल्या त्या दूर करण्याच्या हेतूने भारताने प्रयत्न करायला सुरूवात केली. भारताच्या उत्तरेला चीन, पश्चिमेला पाकिस्तान, पूर्वेच्या अंतर्गत भागात असलेला बांगला देश व बाहय भागात असलेला म्यानमार या सर्वच देशाबरोबरचे भारताचे संबंध म्हणावे तेवढे चांगले नाहीत त्याचप्रमाणे भारताच्या तिन्ही बाजूला सागरी संपदा लाभलेली आहे. आजच्या परिस्थितीमध्ये राष्ट्राची सुरक्षितता हा प्रश्न राष्ट्रीय जीवनाशी अविभाज्य घटक बनला आहे. राष्ट्राच्या राष्ट्रीय सुरक्षिततेचा ज्यावेळी आपण विचार करतो, त्यावेळी सर्वप्रथम आपल्यासमोर संबंधीत राष्ट्राचे राष्ट्रीय हित येते. राष्ट्रीय हिताच्या पर्यायाने राष्ट्रीय सुरक्षिततेच्या संरक्षणाची जबाबदारी फक्त सशस्त्र सेनेवरच नाही तर देशातील सर्व कर्तव्यदक्ष आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांची सुद्धा आहे.कोणत्याही देशाची राष्ट्रीय सुरक्षितता किंवा सुरक्षा संबंधित देशाच्या सामाजिक व आर्थिक घटकावर ही अवलंबून असते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदर पुस्तकात 1947 नंतरचे भारतीय सशस्त्र दलांचे पुनर्निर्माण, भारतीय उच्चस्तरीय संरक्षण संघटना, सशस्त्र दलाची संरक्षण यंत्रणा\/यांत्रीकीकरण, गुप्तचर संघटना, सुरक्षेपुढील पारंपरिक व अपारंपरिक आव्हाने, हिंदी महासागराविषयीचे भारताचे धोरण वगैरे विविध मुद्दयांचा उहापोह केलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477796892901,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatachi-Savrankshan-Sanghatna-Ani-Rashtriya-Surkshitata_Dr-B-D-Todkar_cnvt-1.jpg?v=1772190769"},{"product_id":"रशिया-आणि-युक्रेन-युद्ध","title":"रशिया आणि युक्रेन युद्ध","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479986483429,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Russia-and-Ukraine-War_Prof-A-P-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1772277634"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/defence.oembed?page=2","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}