{"title":"Economic","description":"","products":[{"product_id":"मानव-विकास-व-शासकीय-कार्यक्रम","title":"मानव विकास व शासकीय कार्यक्रम","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमानव विकासाचा एकंदरीत विचार करता, मानव विकास काय ते प्रथम पहायला हवे. मानवाच्या विविध विकासाचा व वाढीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानव विकास होय. मानवी जीवनाचा प्रारंभ गर्भधारणेपासून होतो. गर्भधारणा ते किशोरावस्था या काळात मानवाची वृद्धी व विकास होतो. विकास प्रक्रियेचा प्रारंभ मात्र गर्भधारणेपासून ते मृत्यूपर्यंत सुरु असतो. निसर्गात असणाऱ्या विविध प्रकारच्या जीवसृष्टीमधील श्रेष्ठतम अशी सृजनात्मक प्रक्रिया जेव्हा घडली तेव्हाच मनुष्य निर्मिती झाली. मानवाचा विकास ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यामध्ये मानवाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने येणाऱ्या सर्व प्रक्रियांचा अंतर्भाव होतो. विकास प्रक्रियेवर आंतरिक तसेच बाह्य घटकांचा प्रभाव पडत असतो. बालवयात शारीरिक व मानसिक क्षमतांच्या स्वरूपात क्रमिक परिवर्तन होतात त्याला विकास म्हणता येईल. अशा प्रकारे मानवाच्या सर्वांगीण विकासाचे व विविध अवस्थेतील परिवर्तनाचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करणारे शास्त्र हे मानव विकासशास्त्र होय असे म्हणण्यास हरकत नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48414039703781,"sku":null,"price":525.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manav-Vikas-V-Shaskiya-Karyakram_Dr-Jyoti-Haware_cnvt-1-198x300.jpg?v=1771055119"},{"product_id":"बँक-व्यवसायाची-तत्त्वे-व-कार्यपद्धती","title":"बँक व्यवसायाची तत्त्वे व कार्यपद्धती","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474859405541,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bankvavsyachi-tatve-1.jpg?v=1776061967"},{"product_id":"आधुनिक-बँकिंग-प्रणाली","title":"आधुनिक बँकिंग प्रणाली","description":"\u003cp\u003eजगाला बँकिंग व्यवसाय देण्याचे श्रेय इंग्लंडला आहे. इंग्लंडमध्ये तिसर्या एडवर्ड राजाने 1304 मध्ये सरकारी बँकर किंवा सराफ नेमले. सुरुवातीला हे बँकर वेगवेगळ्या देशातील नाण्यांचे व्यवहार करीत असत. तसेच स्वत:जवळील पैसे सुध्दा कर्जाऊ देत असत. या व्यवहारातून मिळणार्या नफ्याचा काही भाग राजाला द्यावा लागत असे. कालांतराने सोनारांनी लंडनमध्ये हा व्यवसाय सुरु केला. सोनाराजवळ जमा झालेले पैसे बराच काळ पडुन राहत होते, म्हणून त्यांनी कर्ज देण्यास सुरुवात केली. ठेवींमध्ये वाढ व्हावी यासाठी ठेवींवर व्याज देणे सुरु केले. हे सर्व व्यवहार पावत्यांवर होवू लागले. सोनारांनी दिलेल्या पावत्या जी व्यक्ती घेऊन येत असे त्यास रक्कम मिळत असे, त्यामुळे त्या पावत्यांना नोटांचे स्वरुप प्राप्त झाले, अशा प्रकारे आधुनिक बँकिंग व्यवहाराचा पाया त्यावेळी घालण्यात आला. पुढे इ.स. 1694 मध्ये इंग्लंडमध्ये विल्यम पॅटर्सनच्या पुढाकाराने बँकाबाबत टनेजचा कायदा पास झाला. या कायद्यानुसार इंग्लंडमध्ये ‘दि गव्हर्नस अॅन्ड दि कंपनी ऑफ बँक ऑफ इंग्लंड’ ही बँक स्थापन झाली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदरील पुस्तकाची पाच घटकांमध्ये विभागणी करण्यात आली असून व्यापारी अधिकोष, केंद्रिय अधिकोष, सहकारी बँका आणि नाबार्ड, आंतरराष्ट्रीय मुद्रानिधी आणि जागतिक अधिकोष, बँकिंग क्षेत्रातील आधुनिक सेवांच्या बाबतीत विश्लेषण करण्यात आले आहे. पुस्तकाची घटकनिहाय मांडणी करतांना बँकिंग संदर्भातील अद्ययावत आकडेवारी देण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474883293413,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aadhunik-Banking-Pranali-1.jpg?v=1772110178"},{"product_id":"सहकार-कायदा-व-सुक्ष्म-अर्थपुरवठा","title":"सहकार कायदा व सुक्ष्म अर्थपुरवठा","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477222437093,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sahkar-Kayda-Va-Sukshma-Arthapurvatha-1.jpg?v=1772168031"},{"product_id":"m","title":"Macro Economics","description":"\u003cp\u003eThe primary objective of this curriculum is to provide students with a clear understanding of how these components influence a nation’s economy. It aims to familiarize them with diverse economic concepts, help them comprehend the functioning of the economy, and enhance their ability to make informed economic decisions.\u003cbr\u003eWe are delighted to present this textbook and reference guide for Macroeconomics Semester-III. The book offers a detailed exposition of macroeconomics based on the prescribed curriculum and relevant reference materials. We have made every effort to present the concepts in simple and accessible language to enhance understanding for both students and researchers. Each topic is systematically and comprehensively explained, incorporating the latest updated information, relevant tables, lists, and diagrams wherever necessary.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eIn writing this book, we have diligently referred to the recommended books suggested by the Board of Studies in Economics. Additionally, we have consulted research papers by various experts, Open University materials, and reliable online sources. To aid in exam preparation, objective multiple-choice questions, aligned with the university’s evaluation pattern, are included at the end of each chapter. We are confident that this book will be beneficial to students across all universities.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48777566421221,"sku":null,"price":320.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/MacroEconomics-Copy.jpg?v=1776076259"},{"product_id":"भारतीय-बॅकिंग-व्यवस्था-चलनविषयक-धोरण-आणि-डिजिटल-बॅकिंग-indian-banking-system-monetary-policy-and-digital-banking","title":"भारतीय बॅकिंग व्यवस्था : चलनविषयक धोरण आणि डिजिटल बॅकिंग (Indian Banking System: Monetary Policy and Digital Banking)","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003eबँकिंग हे आधुनिक अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे. बँकिंग विषयाचा अभ्यास करणाऱ्या बी.कॉम., बी.ए. तसेच इतर विद्यार्थ्यांना बँकिंगच्या मूलभूत संकल्पना सुलभ आणि सोप्या भाषेत समजावून सांगण्याच्या उद्देशाने हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकामध्ये बँकिंग व्यवस्थेची मूलभूत तत्त्वे, विविध संकल्पना आणि व्यवहार्य माहिती विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":49913798492389,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/IndianBankingSystem_MaheshJadhav-1.jpg?v=1782814746"},{"product_id":"आंतरराष्ट्रीय-व्यापार-आणि-व्यवहार-international-trade-and-practice","title":"आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यवहार (International Trade and Practice)","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (नॅक ‘अ’ श्रेणी प्राप्त) यांनी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या मार्गदर्शक सूचनानुसार तृतीय वर्ष कला स्तर-5.0 या वर्गातील अर्थशास्त्र हा विषय विशेष प्राविण्यासह व विशेष प्राविण्यासह संशोधन (With Honours and Honours with Research) या आधारावर अभ्यासक्रमाची पुनर्रचना मा. कुलगुरू प्रो. (डॉ.) व्ही. एल. माहेेशरी, प्र. कुलगुरू प्रो. (डॉ.) एस.टी.इंगळे, अधिष्ठाता प्रो. (डॉ.) जगदिश पाटील (मानव्यविद्याशाखा) प्रो. (डॉ.) अनिलजी डोंगरे (वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा) यांच्या मार्गदर्शनानुसार अर्थशास्त्र अभ्यासमंडळाने केली आहे. तृतीय वर्ष कला (T.Y.B.A.) वर्गासाठी 2026-2027 या शैक्षणिक वर्षांपासून विशेष विषय DSC-14 ECO-313 “आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यवहार” (International Trade and Practice) या विषयाची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक सत्रासाठी 4 श्रेयांक (क्रेडीट) निर्धारीत करण्यात आलेले असून एकूण मुल्यांकन 100 गुणांचे होणार आहे. त्यात अंतर्गत मुल्यांकन 40 गुणांचे व बहिस्थ मुल्यांकन 60 गुणांचे असेल. 1991 नंतर भारतीय अर्थव्यवस्था जागतिकीकरणाचा भाग झाली. गेली 35 वर्षे भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापाराचं चित्र बदलविणारा ठरला आहे. जागतिक व्यापारात भारतीय अर्थव्यवस्थेच, भारतीय व्यापारातील घडून आलेले बदल, त्यातील नवनवीन पैलू याबाबतचे अध्ययन करणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचे व्यावहारिक महत्व व त्यावर आधारीत देशाची व्यापार निती व त्यातून घडून येणार आर्थिक विकास याबाबतचे व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना आत्मसात करता येईल. हाच विद्यापीठ अनुदान आयोग व क.ब.चौ.उ.म.वि. च्या अभिनव उपक्रमाचा भाग आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eDSC-14 ECO-313 सत्र-V “आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यवहार” या पेपरच्या अभ्यासक्रमात अध्ययनासाठी चार प्रकरणे नियोजीत केली आहेत. त्यात आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र आणि आर्थिक विकास, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत, आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक धोरण आणि व्यापार शर्ती आणि व्यवहारतोल या प्रकरणांचा अंतर्भाव केला आहे. \u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकात अभ्यासक्रमातील व त्याच्याशी संबंधीत चालु घडामोडीशी संबंधीत सर्व मुख्य व उपमुद्दयांची सखोल आणि मुद्देसूद मांडणी केली आहे. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52128787169509,"sku":null,"price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aantarrastriyavyaparaanivyavhar_N.L.Chavan_Gayakvad-1.jpg?v=1787218199"},{"product_id":"आर्थिक-विकास-आणि-वृद्धी-1-economic-development-and-growth-i","title":"आर्थिक विकास आणि वृद्धी-1 (Economic Development and Growth-I)","description":"\u003cp\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (नॅक ‘अ’ श्रेणी प्राप्त) यांनी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या मार्गदर्शक सूचनानुसार तृतीय वर्ष कला स्तर-5.0 या वर्गातील अर्थशास्त्र हा विषय विशेष प्राविण्यासह व विशेष प्राविण्यासह संशोधन (With Honours and Honours with Research) या आधारावर अभ्यासक्रमाची पुनर्रचना मा. कुलगुरू प्रो. (डॉ.) व्ही. एल. माहेेशरी, प्र. कुलगुरू प्रो. (डॉ.) एस.टी.इंगळे, अधिष्ठाता प्रो. (डॉ.) जगदिश पाटील (मानव्यविद्याशाखा) प्रो. (डॉ.) अनिलजी डोंगरे (वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा) यांच्या मार्गदर्शनानुसार अर्थशास्त्र अभ्यासमंडळाने केली आहे. तृतीय वर्ष कला (T.Y.B.A.) वर्गासाठी 2026-2027 या शैक्षणिक वर्षांपासून विशेष स्तरावरील हा विषय DSE-1 ECO-314A ‘आर्थिक विकास आणि वृद्धी-1’ (Economic Development and Growth-1) या विषयाची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक सत्रासाठी 4 श्रेयांक (Credit) निर्धारीत केलेले असून एकूण मुल्यांकन 100 गुणांचे होणार आहे. त्यात अंतर्गत मूल्यांकन 40 गुणांचे व बहिस्थ मुल्यांकन 60 गुणांचे करण्यात येणार आहे.\u003cbr\u003eआर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी हा विषय आधुनिक अर्थशास्त्रातील महत्त्वाची शाखा आहे. कोणत्याही देशाचा विकास केवळ राष्ट्रीय उत्पन्नावर अवलंबून नसतो तर त्या देशाचे नागरिकांचे जीवनमान, शिक्षण, आरोग्य, रोजगार, सामाजिक न्याय, पर्यावरणीय शाश्वता आणि सर्वसमावेशक विकास अशा अनेक महत्त्वपूर्ण घटकाचा त्यात सहभाग असतो. म्हणून विकास आणि वृद्धी या दोन परिमाणांतून देशाच्या विकासाचे मोजमाप केले जाते. कारण वृद्धी ही उत्पादन आणि उत्पन्नातील परिणामात्मक वाढ दर्शविते तर विकास हा आर्थिक, सामाजिक, मानवी आणि संस्थात्मक परिवर्तनाची व्यापक प्रक्रिया आहे. या पुस्तकातून विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता प्रत्यक्ष जीवनातील आर्थिक समस्यांचे विश्लेषण करण्याची क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.\u003cbr\u003eया सत्रात आपण चार प्रकरणाचे अध्ययन करणार आहोत, त्या आर्थिक विकासाची संकल्पना, आर्थिक विकासाचे सिद्धांत, आर्थिक विकास प्रक्रियेतील संचनात्मक समस्या, शिक्षण आणि आरोग्य, दारिद्य्र आणि आर्थिक विषमता, प्रादेशिक असमतोल, नियोजन, तंत्रज्ञान यांची आर्थिक विकासातील भूमिका, \u003cbr\u003eनिती आयोग अशा वेगवेगळ्या महत्त्वाच्या भागाचे अध्ययन करुन विद्यार्थ्याच्या ज्ञान कक्षा वृद्धींगत होतील, ज्ञानधिष्ठित, सर्वसमावेशक, शाश्वत आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी आर्थिक विकासाबाबतचे सखोल आकलन आवश्यक आहे. हे पुस्तक विद्याथी, प्राध्यापक संशोधकांना उपयुक्त ठरेल.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52129076609253,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/AarthikVikasaanivruddhi_I_Gayakvad-1.jpg?v=1787219241"},{"product_id":"अर्थशास्त्रातील-सांख्यिकीची-मूलतत्वे-भाग-1-basics-of-statistics-in-economics-i","title":"अर्थशास्त्रातील सांख्यिकीची मूलतत्वे (भाग 1) (Basics of Statistics in Economics- I)","description":"\u003cp\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव. (नॅक ‘अ’ श्रेणी प्राप्त) यांनी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या मार्गदर्शक सूचनानुसार तृतीय वर्ष कला स्तर 5.5. विशेष स्तरावरील हा विषय DSE- 2 ECO - 314 - B “अर्थशास्त्रातील सांख्यिकीची मूलतत्वे” (Basics of Statistics in Economics- I) या विषयाची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक सत्रासाठी 4 श्रेयांक (क्रेडिट) निर्धारित केलेले असून एकूण मूल्यांकन 100 गुणांचे होणार आहे. त्यात अंतर्गत मूल्यांकन 40 गुणांचे व बहिस्थ मूल्यांकन 60 गुणांचे करण्यात येणार आहे.\u003cbr\u003eएकविसाव्या शतकातील ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेत निर्णय प्रक्रिया, धोरण निर्मिती, आर्थिक धोरण आणि संशोधन यांचा पाया वस्तुनिष्ठ माहिती व तिच्या वैज्ञानिक विश्लेषणावर आधारित आहे. आर्थिक घटनांचे स्वरूप त्यातील बदल, परस्पर संबंध आणि परिणाम यांचे अचूक आकलन होण्यासाठी सांख्यिकी (Statistics) हे एक प्रभावी साधन विकसित झाले आहे. त्यामुळे आधुनिक अर्थशास्त्राच्या अध्ययनात सांख्यिकीला केवळ पूरक विषय न समजता अर्थशास्त्रीय विश्लेषणाचा पाया मानले जाते. त्यामुळे अर्थशास्त्राच्या प्रत्येक विद्यार्थ्याने सांख्यिकीच्या मूलभूत संकल्पनांचे सखोल अध्ययन करणे आवश्यक आहे. या उद्देशानेच व अर्थशास्त्रातील सांख्यिकीची मूलतत्वे हा विषय आपणासाठी अभ्यासक्रमास आहे.\u003cbr\u003eप्रथम सत्रात आपण सांख्यिकीची ओळख, सांख्यिकीय विश्लेषणासाठी माहितीचे संकलन, तथ्यांचे वर्गीकरण, सारणीकरण आणि केंद्रीय प्रवृत्तीचे मापन या प्रकरणाचे अध्ययन करणार आहोत. या चारही प्रकरणात विषयाचे सादरीकरण सोप्या शुद्ध आणि शास्त्रीय मराठी भाषेत केलेले असून आवश्यक त्याठिकाणी इंग्रजी परिभाषा, तक्ते, आकृत्या, आलेख आणि सोप्या व सहज लक्षात राहणाऱ्या उदाहरणांचा समावेश केला आहे. त्यामुळे विद्यार्थी केवळ परीक्षाधिष्ठित ज्ञान न मिळविता संकल्पनांचे सखोल आकलन होऊन संशोधनाभिमुख दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होईल. सदर पुस्तक अर्थशास्त्रातील सांख्यिकीच्या अध्ययनासाठी एक मूलभूत संदर्भ ग्रंथ म्हणून विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना संशोधकांना उपयुक्त ठरेल.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52129689043173,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/ArthshastratilSankhyikichiMultatve_Part_1_Gayakvad-1.jpg?v=1787221502"},{"product_id":"1991-पासूनची-भारतीय-अर्थव्यवस्था-indian-economy-since-1991","title":"1991 पासूनची  भारतीय अर्थव्यवस्था - INDIAN ECONOMY SINCE 1991","description":"\u003cp\u003e“1991 पासूनची भारतीय अर्थव्यवस्था’ हा विषय ज्यांनी Minor म्हणून निवडला आहे. त्यांना भारतीय अर्थव्यवस्थेच्या दोन कालखंडाची अभ्यासपूर्ण माहिती समजून घेता येणार आहे. त्यात पहिला कालखंड हा 1951 ते 1990 व दुसरा कालखंड 1991 ते आतापर्यंत. हे दोन कालखंड भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाची व्युहरचना कशी आहे यांची अभ्यासपूर्ण माहिती देतात. त्यात नियोजन आयोग व निती आयोग महत्त्वाच्या संस्थाची भूमिका अभ्यासायला मिळते. कारण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी 1991 हे वर्ष एक ऐतिहासिक “संरचनात्मक बदलांचा वळणबिंदू” म्हणून अधोरेखित केले गेले आहे. कारण 1990-91 मध्ये निर्माण झालेल्या गंभीर आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने आर्थिक उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरण या त्रिसूत्रीवर आधारीत आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम स्वीकारला व यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची रचना, कार्यपद्धती, वित्तीय संस्था, चलनविषयक धोरण, परकीय व्यापार, आणि केंद्र-राज्य आर्थिक संबंध 4 | प्रशांत पब्लिकेशन्स \u003cbr\u003eअर्थव्यवस्थेचा अभ्यास हा केवळ आर्थिक धोरणाचा अभ्यास न राहता भारताच्या विकास प्रवासातील संरचनात्मक परिवर्तन समजून घेण्याचे हे क्रमिक पुस्तक महत्वाची भूमिका बजावेल. \u003cbr\u003eया पुस्तकात आपण चार महत्त्वाच्या प्रकरणाची सविस्तर व सोप्या भाषेत अद्ययावत आकडेवारीसह मांडणी केली आहे. त्यात भारतीय वित्तिय प्रणालीची ओळख, भाववाढ आणि मध्यवर्ती बँकेचे चलन विषयक धोरण, भारताच्या विदेशी व्यापार आणि जागतिकीकरण आणि वित्तीय संघवाद आणि वित्त आयोग इत्यादी. या क्रमिक पुस्तकाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे आर्थिक संकल्पना, धोरणे आणि संस्थात्मक बदल यांची मांडणी सोप्या, शास्त्रीय आणि विश्लेषणात्मक पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांना विषयाचे मूलभूत आकलन होण्याबरोबर स्पर्धापरीक्षा, संशोधन आणि अध्यापनासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52895119343845,"sku":"9789377762537","price":290.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BhartiyArthvyavstha1991Pasun_Gayakwad-1.jpg?v=1789641437"},{"product_id":"आंतरराष्ट्रीय-अर्थशास्त्र-international-economic","title":"आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र - International Economic","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003eविद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी पदवी अभ्यासक्रमासाठी नवीन शैक्षणिक धोरण (NEP-2020) श्रेयांक आणि सत्र पद्धतीचा अवलंब केला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी मानवविद्या शाखेअंतर्गत ‘तृतीय वर्ष अर्थशास्त्र’ विषयामध्ये Major Core म्हणून सत्र 5 साठी ‘आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र’ Eco 301 MJ (T) हा विषय 4 क्रेडीटसाठी लेखी पेपर म्हणून पदवी स्तरावर निश्चित केलेला आहे. ‘आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र’ या पुस्तकातील प्रकरण-1 आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची ओळख: आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रः अर्थ, व्याख्या, व्याप्ती आणि महत्त्व, आंतरप्रादेशिक व आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अर्थ व महत्त्व आणि आर्थिक वृद्धी व आंतरराष्ट्रीय व्यापाराची भूमिका याची माहिती देलेली आहे. तर या पुस्तकातील प्रकरण- 2 रे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सनातनवादी सिद्धांतांमध्ये, ॲडम स्मिथ यांचा निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत, डेव्हीड रिकार्डो यांचा तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांत, आधुनिक सिद्धांतामध्ये हेक्श्चर ओहलीन यांचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत, लिओनटिफ यांचा विरोधाभास, स्टोल्पर-सॅम्युएल्सन प्रशुल्क सिद्धांत, आंतर-उद्योग व्यापार इ. सिद्धांतांचे विश्लेषण केले आहे. तसेच प्रकरण 3 व्यापार धोरण यामध्ये व्यापाराचे लाभ, व्यापारशर्ती-अर्थ, प्रकार, व्यापारशर्ती निर्धारित करणारे घटक, विकसनशील देशांना व्यापारशर्ती प्रतिकूल असल्याची कारणे, व्यापारतोल व व्यवहारतोल संकल्पना, व्यवहारतोल घटक, व्यवहारतोल असंतुलन कारणे व त्यावरील उपाययोजना यासबंधी सविस्तर माहिती स्पष्टीकरण केले आहे.\u003cbr\u003eतसेच शेवटचे प्रकरण 4 थे आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक करार यामध्ये जागतिक व्यापार संघटनेची उद्दिष्टये व करार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँकेची भूमिका व कार्ये, प्रादेशिक व्यापार करार, सार्क, ब्रिक्स स्वरूप आणि कार्ये, द्विपक्षी व्यापार धोरण, 1997 चे आशियाई वित्तीय संकट, जागतिक वित्तीय संकट 2008, युरो क्षेत्र संकट याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे, तसेच प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने मुल्यांकन नमूद केलेल्या आकृतीबंधानुसार परिक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक विद्यापीठातील कार्य क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52900423860453,"sku":"9789377761530","price":335.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/AantarrashtriyArthshastra_Kapdi-1.jpg?v=1789732773"},{"product_id":"सार्वजनिक-वित्तव्यवहार-public-finance","title":"सार्वजनिक वित्तव्यवहार - PUBLIC FINANCE","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003eविद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी विविध विद्याशाखे अंतर्गत पदवी अभ्यासक्रमासाठी नवीन शैक्षणिक धोरण (NEP)2020 श्रेयांक आणि सत्र पद्धतीचा अवलंब केला आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून तृतीय वर्ष कला (TYBA) अर्थशास्त्र विषय कौशल्य संवर्धन कोर्स अंतर्गत (Major सत्र -5 साठी ‘ECO-302MJ)सार्वजनिक वित्तव्यवहार हा विषय 4 क्रेडीट साठी लेखी स्तरावर निश्चित केला आहे. या पुस्तकात एकूण - 4 प्रकरणांचा समावेश केलेला आहे. त्यात प्रकरण-1 ले सार्वजनिक वित्त व्यवहाराची ओळख असून त्यात सार्वजनिक वित्त अर्थ, महत्व भुमिका इ. बद्दल माहिती दिलेली असून प्रकरण- 2 रे ‘सार्वजनिक खर्च’ हे असून यात सार्वजनिक खर्च अर्थ, सिध्दांत, परिणाम इ. विषयक विवेचन दिलेले आहे तसेच प्रकरण - 3 रे ‘सार्वजनिक महसूल’ हे असून त्यात सार्वजनिक महसूल अर्थ, स्त्रोत, तत्वे, परिणाम, महत्व इ. घकांची माहिती आहे. तसेच प्र.- 4 थे ‘करप्रणाली’ असून त्यात कराचा अर्थ, प्रकार, तत्वे कारभार संकल्पना, सिध्दांत इ. घटकांचा विचार केलेला आहे. तसेच या पुस्तकातील तसेच प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने मुल्यांकन नमूद केलेल्या आकृतीबंधानुसार परिक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक विद्यापीठातील कार्य क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52900580196581,"sku":null,"price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/SarvajanikVittavyavhar_S.P.Aadhav-1.jpg?v=1789733255"},{"product_id":"भारतीय-बँकिंग-indian-banking","title":"भारतीय बँकिंग (Indian Banking)","description":"\u003cp\u003eहे पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सुधारित आणि अद्ययावत अभ्यासक्रमावर पूर्णपणे आधारित आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) च्या शिफारशींचा स्वीकार करत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उच्च शिक्षण क्षेत्रात जो अमूलाग्र बदल घडवून आणला आहे, त्याला अनुलक्षूनच या पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे. NEP चा मुख्य भर हा विद्यार्थ्यांना केवळ माहिती देणे हा नसून, त्यांच्यात विश्लेषणात्मक क्षमता आणि व्यावहारिक समज निर्माण करणे हा आहे. सत्र 5वे (Semester V) मधील Major Elective अंतर्गत समाविष्ट असलेल्या या 2 क्रेडिटच्या (02 Credits - Theory) अभ्यासक्रमातील प्रत्येक संकल्पनेला अत्यंत सोप्या आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही या ग्रंथातून केला आहे. या पुस्तकाची रचना दोन मुख्य आणि अत्यंत महत्त्वाच्या घटकांमध्ये (Modules) करण्यात आली आहे: पहिल्या घटकात (Banking System) आपण बँकिंग प्रणालीचा उगम, तिचा विकास आणि देशाच्या आर्थिक प्रगतीत बँका बजावत असलेली भूमिका याविषयी सखोल चर्चा केली आहे. मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ची स्थापना, तिची बदलती कार्ये आणि देशातील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारे मौद्रिक धोरण (Monetary Policy) यावर विश्लेषणात्मक प्रकाश टाकला आहे. पत नियंत्रणाची परिमाणात्मक व गुणात्मक साधने आजच्या आर्थिक परिस्थितीत कशी प्रभावी ठरतात, हे समजून घेण्यासाठी हा भाग अत्यंत उपयुक्त ठरेल. दुसऱ्या घटकात (Banking in India) भारतातील बँकिंगच्या अथांग विश्वाचा परिचय करून देण्यात आला आहे. व्यावसायिक बँका, सहकारी क्षेत्र, प्रादेशिक ग्रामीण बँका, सार्वजनिक व खासगी बँका, परदेशी बँका, ऑफशोअर बँकिंग आणि एदखच इरपज्ञ सारख्या विशेष संस्थांच्या कार्यपद्धतीची सोप्या भाषेत उकल केली आहे. यासोबतच, बँकिंग क्षेत्राचा पाया असलेली पतनिर्मितीची प्रक्रिया (Credit Creation Process), भारतीय बँकिंग क्षेत्राचे चित्र बदलणारे बँकांचे विलिनीकरण व संधारणा (Mergers and Consolidations) आणि आजच्या डिजिटल युगात बँकांसमोर उभी ठाकलेली विविध आव्हाने यावर अत्यंत वस्तुनिष्ठ मांडणी करण्यात आली आहे.\u003cbr\u003eहे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी का नावीन्यपूर्ण व फायदेशीर ठरेल?\u003cbr\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पॅटर्ननुसार अचूक मांडणी: पुस्तकातील प्रत्येक घटक आणि प्रकरण हे पुणे विद्यापीठाने निश्चित केलेल्या क्रेडिट सिस्टीम आणि गुणदान पद्धतीशी तंतोतंत जुळणारे आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची दिशा ठरवणे सोपे जाईल.\u003cbr\u003eक्लिष्ट संकल्पनांचे सोपे मराठीकरण: अर्थशास्त्रातील तांत्रिक आणि इंग्रजी संज्ञा सर्वसामान्य विद्यार्थ्याला सहज रुचाव्यात अशा सोप्या, प्रवाही आणि सुटसुटीत मराठी भाषेत स्पष्ट करण्यात आल्या आहेत.\u003cbr\u003eपरीक्षेतील गुण मिळवून देणारी रचना: उत्तरपत्रिकेत मुद्देसूद आणि प्रभावी लेखन कसे करावे, याचा अदृश्य आराखडा या पुस्तकातील मांडणीवरून विद्यार्थ्यांना सहज मिळेल.\u003cbr\u003eस्पर्धा परीक्षांसाठी पायाभूत संदर्भ: हे पुस्तक केवळ विद्यापीठाच्या पदवी परीक्षेपुरते मर्यादित न राहता MPSC, UPSC, IBPS, RBI Grade B आणि इतर बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक भक्कम पाया (Base Concept Builder) म्हणून काम करेल.\u003cbr\u003eव्यावहारिक आणि अद्ययावत माहितीचा समावेश: पुस्तकात केवळ जुने सिद्धांत न ठेवता, अद्ययावत आकडेवारी आणि बँकिंग क्षेत्रातील ताज्या घडामोडींचा समन्वय साधला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांची विषयातील रुची नक्कीच वाढेल.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52900604051685,"sku":"9789377760816","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BhartiyaBanking_Ghotekar-1.jpg?v=1789735090"},{"product_id":"कृषी-अर्थशास्त्र-agricultural-economics","title":"कृषी अर्थशास्त्र - Agricultural Economics","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003eविद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांनी पदवी अभ्यासक्रमासाठी नवीन शैक्षणिक धोरण (NEP-2020) श्रेयांक आणि सत्र पद्धतीचा अवलंब केला आहे. शैक्षणिक वर्ष2025-26साठी मानवविद्या शाखेअंतर्गत ‘तृतीय वर्ष अर्थशास्त्र’ वर्गाकरिता VSC-I विषया अंतर्गत सत्र-5 साठी ‘कृषी अर्थशास्त्र’ हा विषय दोन (2) क्रेडीटसाठी लेखी पेपर म्हणून पदवी स्तरावर निश्चित केलेला आहे. ‘कृषी अर्थशास्त्र’ या पुस्तकातील प्रकरण-1 कृषीअर्थशास्त्राची ओळख यामध्ये कृषीअर्थशास्त्र अर्थ, कृषी अर्थशास्त्राचे स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व, भारतीय अर्थव्यवस्थेत कृषीची\/शेतीची भूमिका, कृषी आणि उद्योग यांच्यातील व्यापाराच्या अटी, कृषी आणि उद्योग यांच्यातील परस्परावलंबन, भारतीय शेतीची वैशिष्ट्ये आणि समस्या, कृषी उत्पादकता आणि कार्यक्षमता, शेतीचे प्रकार शाश्वत आणि सेंद्रिय शेती, करार शेती. इ. बद्दल सविस्तर माहिती देलेली आहे. तर प्रकरण-2 रे ‘ग्रामीण अर्थव्यवस्थेमधील महत्त्व आणि सामाजिक-आर्थिक परिणाम’ या मध्ये कृषी मधील उत्पादन फलन : आदान - प्रदान संबंध, घटत्या फलाचा नियम, खर्च आणि प्राप्ती संकल्पना, कृषी विपणन व्यवस्था (बाजारपेठ): अर्थ, प्रकार, आणि कार्य, विक्रीयोग्य आणि विक्री केलेला साठा, कृषी किंमत धोरण, किमान आधारभूत किंमत आणि सरकारी पाठिंबा इ. बद्दल सविस्तर माहिती आकृती आणि प्रतिमानानुसार देलेली आहे. \u003cbr\u003eतसेच प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने मुल्यांकन नमूद केलेल्या आकृतीबंधानुसार परिक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक विद्यापीठातील कार्य क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52905195340005,"sku":"9789377760748","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/KrushiArthshastra_S.P.Adhav-1.jpg?v=1789805821"},{"product_id":"भारतीय-अर्थव्यवस्था-indian-economy-1","title":"भारतीय अर्थव्यवस्था Indian Economy","description":"\u003cp\u003eभारतीय अर्थव्यवस्था ही विविधता, क्षमता, संधी आणि आव्हाने यांचा संगम असलेली अर्थव्यवस्था आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारताने नियोजनबद्ध विकासाच्या माध्यमातून कृषी, उद्योग आणि सेवा या तिन्ही क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती साधली आहे. आज भारतीय अर्थव्यवस्था वेगाने परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जात असून तंत्रज्ञान, कौशल्य विकास, नवउद्योजकता, डिजिटल अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा आणि मानवी विकास या घटकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेतील या बदलत्या प्रवाहांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेच्या दृष्टिकोनातून न करता, त्यांचा दैनंदिन आर्थिक जीवनाशी आणि देशाच्या विकास प्रक्रियेशी संबंध जोडून करावा, हा या पुस्तकामागील प्रमुख उद्देश आहे.\u003cbr\u003eया पुस्तकामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या भविष्यातील संभावना व समस्या, उदयोन्मुख अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, विकसित भारताचे उद्दिष्ट आणि मानवी विकास निर्देशांक यांचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच कृषी, उद्योग आणि सेवा या तीन प्रमुख क्षेत्रांची वैशिष्ट्ये, समस्या व भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान स्पष्ट करण्यात आले आहे. कृषी-व्यवसायातील नवीन प्रवाह, हवामान बदल, औद्योगिक विकास, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, कौशल्य विकास, नवउद्योजकता आणि मुद्रा योजना यांचाही समावेश करण्यात आला आहे. सेवा क्षेत्राचे वाढते महत्त्व आणि कृषी, उद्योग व सेवा क्षेत्रांमधील परस्परसंबंध स्पष्ट करून विद्यार्थ्यांना भारतीय अर्थव्यवस्थेची सर्वांगीण समज विकसित व्हावी, या उद्देशाने विषयांची सुलभ, सुबोध आणि अभ्यासपूर्ण मांडणी करण्यात आली आहे.\u003cbr\u003eहे पुस्तक लिहिताना विद्यार्थ्यांना विषय सहज समजावा, आर्थिक संकल्पना स्पष्ट व्हाव्यात, अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकाचा क्रमबद्ध अभ्यास करता यावा आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील समकालीन बदलांकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहता यावे, याला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. क्लिष्ट आर्थिक संकल्पना \u003cbr\u003eशक्य तितक्या सोप्या, स्पष्ट आणि प्रवाही मराठी भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हे पुस्तक केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर अर्थशास्त्र विषयाचे अध्यापक, संशोधक आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणाऱ्या इतर वाचकांसाठीही उपयुक्त ठरेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.\u003cbr\u003eपुस्तक लेखनाच्या प्रक्रियेत विविध संदर्भग्रंथ, अहवाल, शासकीय प्रकाशने आणि उपलब्ध शैक्षणिक साहित्याचा आधार घेण्यात आला आहे. तथापि, अर्थव्यवस्था ही सतत बदलणारी प्रक्रिया असल्यामुळे आकडेवारी, धोरणे आणि योजनांमध्ये कालानुरूप बदल होत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आवश्यकतेनुसार अद्ययावत आणि अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेणेही महत्त्वाचे आहे.\u003cbr\u003eहे पुस्तक विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्याबरोबरच त्यांच्यामध्ये आर्थिक दृष्टिकोन विकसित करण्यास, भारतीय अर्थव्यवस्थेतील समस्या व संधी समजून घेण्यास आणि भविष्यातील विकसित भारताच्या निर्मितीमध्ये आपली भूमिका ओळखण्यास निश्चितच मदत करेल, \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":67614029250789,"sku":"9789377761493","price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BhartiyaArthvyavastha_Dalavi_Bharaskar-1.jpg?v=1791195941"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/economic.oembed?page=2","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}