Your cart is empty now.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (नॅक ‘अ’ श्रेणी प्राप्त) यांनी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या मार्गदर्शक सूचनानुसार तृतीय वर्ष कला स्तर-5.0 या वर्गातील अर्थशास्त्र हा विषय विशेष प्राविण्यासह व विशेष प्राविण्यासह संशोधन (With Honours and Honours with Research) या आधारावर अभ्यासक्रमाची पुनर्रचना मा. कुलगुरू प्रो. (डॉ.) व्ही. एल. माहेेशरी, प्र. कुलगुरू प्रो. (डॉ.) एस.टी.इंगळे, अधिष्ठाता प्रो. (डॉ.) जगदिश पाटील (मानव्यविद्याशाखा) प्रो. (डॉ.) अनिलजी डोंगरे (वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा) यांच्या मार्गदर्शनानुसार अर्थशास्त्र अभ्यासमंडळाने केली आहे. तृतीय वर्ष कला (T.Y.B.A.) वर्गासाठी 2026-2027 या शैक्षणिक वर्षांपासून विशेष विषय DSC-14 ECO-313 “आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यवहार” (International Trade and Practice) या विषयाची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक सत्रासाठी 4 श्रेयांक (क्रेडीट) निर्धारीत करण्यात आलेले असून एकूण मुल्यांकन 100 गुणांचे होणार आहे. त्यात अंतर्गत मुल्यांकन 40 गुणांचे व बहिस्थ मुल्यांकन 60 गुणांचे असेल. 1991 नंतर भारतीय अर्थव्यवस्था जागतिकीकरणाचा भाग झाली. गेली 35 वर्षे भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापाराचं चित्र बदलविणारा ठरला आहे. जागतिक व्यापारात भारतीय अर्थव्यवस्थेच, भारतीय व्यापारातील घडून आलेले बदल, त्यातील नवनवीन पैलू याबाबतचे अध्ययन करणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचे व्यावहारिक महत्व व त्यावर आधारीत देशाची व्यापार निती व त्यातून घडून येणार आर्थिक विकास याबाबतचे व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना आत्मसात करता येईल. हाच विद्यापीठ अनुदान आयोग व क.ब.चौ.उ.म.वि. च्या अभिनव उपक्रमाचा भाग आहे.
DSC-14 ECO-313 सत्र-V “आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यवहार” या पेपरच्या अभ्यासक्रमात अध्ययनासाठी चार प्रकरणे नियोजीत केली आहेत. त्यात आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र आणि आर्थिक विकास, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत, आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक धोरण आणि व्यापार शर्ती आणि व्यवहारतोल या प्रकरणांचा अंतर्भाव केला आहे.
प्रस्तुत पुस्तकात अभ्यासक्रमातील व त्याच्याशी संबंधीत चालु घडामोडीशी संबंधीत सर्व मुख्य व उपमुद्दयांची सखोल आणि मुद्देसूद मांडणी केली आहे.