{"title":"Economics","description":"","products":[{"product_id":"आधुनिक-बँकींग-आणि-भारतीय-वित्तीय-बाजार","title":"आधुनिक बँकींग आणि भारतीय वित्तीय बाजार","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआजच्या प्रगत काळात दिवसेंदिवस बँक व्यवहाराचे व वित्तीय बाजाराचे महत्त्व वाढत आहे. अर्थव्यवस्थेत बँका व वित्तीय संस्थांचा जस-जसा विकास आणि विस्तार होत जातो, तस-तसा आर्थिक विकासाचा वेग वाढत जातो. अर्थव्यवस्थेत अतिरिक्त निधी गोळा करण्याचे व तो गतिशील करण्याचे कार्य बँका व वित्तीय संस्था करीत असतात. अर्थव्यवस्थेत बँकांचे महत्व अनन्य साधारण आहे. बँक जे व्यवहार करते त्यात बरीच जोखीम असते. त्या जोखीमचे व्यवस्थापन करावे लागते. भारतासह जगातील सर्वच बँक व्यवसायामध्ये नवतंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. यात प्रामुख्याने बँकांचे संगणकीयीकरण, इंटरनेट बँकींग, मोबाईल बँकींग, कोअर बँकींग, एटीएम, डेबीट कार्ड, टेली बँकींग, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, इलेक्ट्रॉनिक क्लिअरींग सर्व्हिस, स्वीफ्ट, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, रियल टाईम ग्रास सेटलमेंट, नॅशनल सेटलमेंट सिस्टीम, ई-परचेस, ई-मनी, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर अॅट पाँईट ऑफ सेल इत्यादी साधनांचा वापर केला जात आहे. प्रतिभूती बाजार हे वित्तीय बाजाराचे एक अभिन्न अंग आहे. वित्तीय बाजारात अल्पकालीन आणि दिर्घकालीन कर्जाची देवाण-घेवाण केली जाते. नाणेबाजारात अल्पकालीन कर्जाची देवाण घेवाण चालते. यासाठी अल्पसूचनेद्वारे परत मिळणारी कर्जे, कोषागार हुंड्या, व्यापारी हुंडया या साधनांचा वापर केला जातो. भांडवल बाजार दीर्घकालीन कर्जे, गुंतवणूक देवाण घेवाण केली जाते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात आधुनिक बँकींग व वित्तीय बाजाराची इत्यंभूत माहिती देण्याचा यथोचित प्रयत्न केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451319824613,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhunik-Banking-Ani-Bharatiya-Vittiya-Bajar_Dr-N-L-Chavhan_cnvt-1.jpg?v=1771571790"},{"product_id":"वित्तीय-प्रणाली","title":"वित्तीय प्रणाली","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eवित्तीय प्रणाली (Financial System) यामध्ये बँकव्यवस्था, रचना, विविध बँका कार्य, उद्दीष्टे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेबी, आयआरडीए, तसेच आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था यामध्ये IMF, World Bank, ADB, Bribkr या घटकांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सदर पुस्तक हे विद्यार्थी, संशोधक यांना अत्यंत उपयुक्त आहे. याशिवाय SET, NET व MPSC साठी उपयुक्त आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदर पुस्तक हे अत्यंत साध्या पद्धतीने मांडणी करुन विद्यार्थ्याला सहज कसा समजेल यादृष्टीने मांडणी केली आहे. सदर पुस्तक लिहितांना उपयुक्त संदर्भग्रंथ, इंटरनेट वेब, शासकीय प्रकाशने, वेगवेगळे आर्थिक अहवाल यांचा वापर करण्यात आला असून हे पुस्तक प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक यांना अत्यंत उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451585343717,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vittiya-Pranali_Dr-Anil-Shitole-Copy.jpg?v=1771584752"},{"product_id":"सार्वजनिक-आयव्ययाचे-अर्थशास्त्र","title":"सार्वजनिक आयव्ययाचे अर्थशास्त्र","description":"\u003cp\u003eसार्वजनिक आयव्यय हा राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या दोन अभ्यास विषयांच्या सीमेवर असलेला विषय आहे. त्याचा एक पाय राज्यशास्त्राच्या दगडावर तर दुसरा पाय अर्थशास्त्राच्या दगडावर आहे. राज्यशास्त्र राज्यकारभार कसा चालवायचा हे सांगते तर राज्यकारभारातून समाजकल्याणात वाढ कशी करायची आणि त्यासाठी उत्पन्न कसे प्राप्त करायचे व ते कसे खर्च करायचे हे सांगते. सरकार कर आणि करेत्तर मार्गाने उत्पन्न प्राप्त करते. कर हे सक्तीचे अंशदान असते. त्याच्या बदल्यात करदात्याला कोणताही विशेष लाभ मिळत नाही. कर महसूल प्राप्त करण्याचे एक साधन आहे. याबरोबरच ते आर्थिक विषमता कमी करण्याचे प्रमुख साधन आहे. आधुनिक काळात कल्याणकारी राज्य संकल्पना स्विकारण्यात आली आहे. जनकल्याणासाठी सरकारला खर्च करावा लागतो आणि तो भागविण्यासाठी सरकारला महसूल प्राप्त करावा लागतो. खर्च आणि महसूल ताळमेळ बसत नसेल तर सार्वजनिक कर्ज, तुटीचा अर्थभरणा यांचा अवलंब करावा लागतो.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकात राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आयव्ययाची भूमिका\/महत्त्व, आयव्ययाचे सिद्धांत, कर, सार्वजनिक वस्तू आणि खासगी वस्तू, कराघात, करभार आणि करभाराचे संक्रमण, बाजाराचे अपयश आणि सरकारचा हस्तक्षेप, सार्वजनिक खर्च, भारतातील सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती, सार्वजनिक कर्जाचे व्यवस्थापन आणि सार्वजनिक कर्जाची परतफेड, अंदाजपत्रक आणि तुटीचा अर्थभरणा, विकसनशील अर्थव्यवस्थेत तुटीच्या अर्थभरणाची भूमिका इ. महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश आहे. प्रस्तुत पुस्तक सर्वांना उपयुक्त ठरेल यात शंका नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eSarvajnik Ayavyayvache Arthashastra\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48457987752165,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sarvakamol-Ayavyayache-Arthashastra_Dr-Manoj-Gaikawad-1.jpg?v=1771832374"},{"product_id":"भारतीय-आर्थिक-पर्यावरण","title":"भारतीय आर्थिक पर्यावरण","description":"\u003cp\u003eभारतीय आर्थिक पर्यावरण (Indian Economic Environment) या अभ्यासक्रमावर आधारित क्रमिक आणि संदर्भ पुस्तकात 6 प्रकरणांचा समावेश केलेला आहे. पहिले प्रकरण व्यवसायाचे आर्थिक पर्यावरण हे आहे. यात उद्योग व्यवसायासाठी कोणकोणते घटक आवश्यक आहेत यांची सैद्धान्तिक आणि व्यावहारीक अशी मांडणी केली आहे. दुसर्या प्रकरणात उद्योग व्यवसायाच्या विकासासाठी आवश्यक असणार्या कृषी आणि पायाभूत संरचना यांची मांडणी केली आहे.  तिसर्या प्रकरणात 1991 चे औद्यागिक धोरण, औद्योगिक विकास व समस्या, खासगीकरण व निर्गुंतवणुकीकरण, मर्जर अँड टेकओव्हरची समर्पक मांडणी केली आहे. चौथ्या प्रकरणात औद्योगिक कामगार, कामगार कायदे, कामगार संघटना, औद्योगिक कलह, औद्योगिक आजारपण 2013 चा आजारी कंपन्या संदर्भातील कायदा, नादारी आणि दिवाळखोरी कोड यांची विस्तृत चर्चा केली आहे. पाचव्या प्रकरणात उद्योग व्यवसायाच्या विकासासाठी आवश्यक असणार्या भाववाढ, नाणेबाजार, भांडवल बाजार, स्टॉक मार्केट आणि विदेशी भांडवलाची मांडणी केली आहे. सहाव्या प्रकरणात सरकारचे वित्तीय धोरण, चलनविषयक धोरण, विदेश व्यापार धोरण, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eBharatiya Arthik Paryavaran\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48458360291557,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Arthik-Paryavaran_Dr-N-L-Chavhan_cnvt-1.jpg?v=1771851917"},{"product_id":"भांडवल-बाजार-आणि-वित्तीय-सेवा","title":"भांडवल बाजार आणि वित्तीय सेवा","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470660088037,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhandawal-Bajar-And-Vittiya-Seva_Prof-Kiran-Aher_cnvt-1.jpg?v=1772007896"},{"product_id":"औद्योगिक-अर्थशास्त्र-1","title":"औद्योगिक अर्थशास्त्र","description":"\u003cp\u003eआधुनिक काळात औद्योगिक व आर्थिक विकासात उद्योगधंद्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची समजली जाते. आधुनिक काळात ‘औद्योगिक अर्थशास्त्र’ हा विषय विकसित होत आहे. 1930 च्या जागतिक महामंदीच्या काळात औद्योगिक अर्थशास्त्र प्रस्थापित झाले. इंग्लंड, अमेरिका या देशांमध्ये मोठे उद्योग, व्यवस्थापक आणि व्यवस्थापन कार्ये यांचे महत्त्व वाढल्यामुळे औद्योगिक अर्थशास्त्र असेही म्हणतात. म्हणून उद्योग आणि उद्योगासंबंधीचे घटक या विषयीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच औद्योगिक अर्थशास्त्राचा अभ्यास करणे गरजेचे आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकात औद्योगिक अर्थशास्त्राची व्याप्ती, आवश्यकता, महत्त्व याबरोबरच औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक, उद्योग संस्थेची वर्तवणूक, संगनमत एकत्रीकरण यांचा अभ्यास केलेला आहे. तसेच उद्योगाची स्थाननिश्चिती, स्थानिकीकरणाचे घटक त्यासंबंधीचा वेबरचा व फ्लोरेन्सचा सिद्धांत याविषयीचा अभ्यास या पुस्तकात केलेला आहे. तसेच गुंतवणूक संशोधन विकास किंमतविषयक पद्धती, प्रकल्पाचे मूल्यमापन या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. किंमतविषयक निर्णय, किंमत पद्धतींचा हा अभ्यास केलेला दिसून येतो. पहिल्या भागात वरील सर्व गोष्टींचा अभ्यास केलेला आहे तर दुसर्या भागात खाजगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र, उदारीकरण, जागतिकीकरण, लघुउद्योग व मोठे उद्योग, त्यांच्या भूमिका व समस्यांचा विचार केलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474667778277,"sku":null,"price":380.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Audyogik-Arthashastra_cnvt-1-1.jpg?v=1772106508"},{"product_id":"लोकसंख्याशास्त्र-1","title":"लोकसंख्याशास्त्र","description":"\u003cp\u003eलोकसंख्याशास्त्र या पुस्तकाची विभागणी पाच घटकांमध्ये करण्यात आलेली आहे. पहिल्या घटकामध्ये लोकसंख्याशास्त्राचा परिचय, दुसर्या घटकामध्ये प्रजनन क्षमता आणि मृत्यू व तत्संबधी मापन पद्धती, तिसर्या घटकांमध्ये लोकसंख्येचे स्थलांतर, चौथ्या घटकामध्ये लोकसंख्येचे नागरीकरण तर शेवटच्या पाचव्या घटकामध्ये लोकसंख्या आणि विकास व भारतातील पंचवार्षिक योजना काळातील लोकसंख्या धोरणाबाबत माहिती देण्यात आली आहे. पुस्तकाची घटकनिहाय मांडणी करतांना भारतातील लोकसंख्येच्या संदर्भात अद्ययावत आकडेवारी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येक घटकाच्या शेवटी अभ्यासासाठी प्रश्नसंच देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करतांना या प्रश्नसंचाचा निश्चितच उपयोग होईल. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अर्थशास्त्र विषयांतर्गत भारताच्या लोकसंख्या संदर्भांतील घटकाची तयारी करतांना या पुस्तकातील माहिती उपयुक्त ठरणार आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474730070245,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/LoksankhayaShashra_Mahesh-Rithe-1-1.jpg?v=1772108577"},{"product_id":"कृषी-अर्थशास्त्र","title":"कृषी अर्थशास्त्र","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474863173861,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Krushi-Arthashatra-1.jpg?v=1775888271"},{"product_id":"कृषी-विकासाचे-अर्थशास्त्र-आव्हाने-व-उपाय","title":"कृषी विकासाचे अर्थशास्त्र (आव्हाने व उपाय)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारत कृषीप्रधान देश असून भारतातील 70 टक्के लोक कृषी व्यवसायाशी प्रत्यक्ष निगडित आहे. राष्ट्रीय उत्पन्नात एकेकाळी सर्वाधिक व आजही बहुतांश वाटा कृषी क्षेत्राचा दिसून येतो. भारतातील लघु, कुटिर व इतरही उद्योग क्षेत्र शेतीमधून निर्मित होणार्या कच्च्या मालावर अवलंबून आहेत. अतिरिक्त लोकसंख्या असणार्या या देशातील रोजगार निर्माण करून देणारे सर्वात मोठे क्षेत्र कृषी हेच आहे. पुरातन काळापासून भारतीय शेतीमधील उत्पादित कृषी माल विविध देशात निर्यात होत आहे. असे असूनही भारतीय शेतीची अवस्था आजही अविकसित स्वरुपाची दिसून येते. याला कोणती कारणे असतील याचा शोध घेण्यासाठी एका जिल्ह्यापुरता प्रयत्न करीत आहे. अमरावती महसूल, विदर्भ, महाराष्ट्र व काही प्रमाणात संपूर्ण देशातील कृषी घटकांचा व विकासाचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा प्रयत्नदेखील या पुस्तकात करण्यात आला आहे. कृषी क्षेत्रातील विविध पिकांचे, बाजारपेठेचे अध्ययन करून कृषकांची आज असलेली आर्थिक स्थिती अभ्यासण्याचा प्रयत्न केला आहे. संशोधनासाठी निवडलेल्या विषयाची सखोलता, विविध प्रकारच्या मर्यादा व अडचणी लक्षात घेऊन अधिक वास्तविकता वाचकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामीण वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेतून मांडणी करण्याचा आणि वाचण्याची गोडी निर्माण होईल, असाही प्रयत्न केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474870218981,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Krishi-Vikasache-Arthashtra-1.jpg?v=1772109698"},{"product_id":"सिंचन-प्रक्रिया-उद्योग-व-बाजार-पेठ","title":"सिंचन प्रक्रिया उद्योग व बाजार पेठ","description":"\u003cp\u003eभारत कृषीप्रधान देश असून भारतातील 70 टक्के लोक कृषी व्यवसायाशी प्रत्यक्ष निगडित आहे. राष्ट्रीय उत्पन्नात एकेकाळी सर्वाधिक व आजही बहुतांश वाटा कृषी क्षेत्राचा दिसून येतो. भारतातील लघु, कुटिर व इतरही उद्योग क्षेत्र शेतीमधून निर्मित होणार्या कच्च्या मालावर अवलंबून आहेत. अतिरिक्त लोकसंख्या असणार्या या देशातील रोजगार निर्माण करून देणारे सर्वात मोठे क्षेत्र कृषी हेच आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपुरातन काळापासून भारतीय शेतीमधील उत्पादित कृषी माल विविध देशात निर्यात होत आहे. असे असूनही भारतीय शेतीची अवस्था आजही अविकसित स्वरुपाची दिसून येते. याला कोणती कारणे असतील याचा शोध घेण्यासाठी एका जिल्ह्यापुरता प्रयत्न करीत आहे. सोबतच अमरावती महसूल, विदर्भ, महाराष्ट्र व काही प्रमाणात संपूर्ण देशातील कृषी घटकांचा व विकासाचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा प्रयत्नदेखील या पुस्तकात करण्यात आला आहे. अध्ययनासाठी बुलडाणा जिल्ह्याची निवड केली, कारण महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी असणार्या विदर्भातील बुलडाणा जिल्हा हा विविध अंगांनी महत्त्वपूर्ण आहे. माँ जिजाऊंचे जन्मस्थान, जग प्रसिद्ध लोणार सरोवर, थंड हवेचे ठिकाण म्हणून जिल्ह्याचा काही भाग आजही प्रसिद्ध आहे. अशा जिल्ह्यात कृषी क्षेत्रातील विविध पिकांचे, बाजारपेठेचे अध्ययन करून कृषकांची आज असलेली आर्थिक स्थिती अभ्यासण्याचा प्रयत्न केला आहे. जेणे करून त्याची तुलना विदर्भ व महाराष्ट्राशी करता येईल. संशोधनासाठी निवडलेल्या विषयाची सखोलता, विविध प्रकारच्या मर्यादा व अडचणी लक्षात घेऊन अधिक वास्तविकता वाचकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामीण वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेतून मांडणी करण्याचा आणि वाचण्याची गोडी निर्माण होईल, असाही प्रयत्न केला आहे. असे असले तरी अध्ययनाचा आणि मांडणीचा प्रयत्न त्रुटीरहीत नाही याची जाणीव आहे. वाचकांनी त्रुटी व सदोषता निदर्शनास आणून द्यावी, अशी विनंती आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474878050533,"sku":null,"price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sinchan-Prakriya-Udyog-and-Bazarpeth-1.jpg?v=1775888382"},{"product_id":"बँक-व्यवसायाची-मुलतत्त्वे-भाग-1","title":"बँक व्यवसायाची मुलतत्त्वे (भाग 1)","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2019 च्या नवीन अभ्यासक्रमानुसार लिहिलेले ‘बँक व्यवसायाची मूलतत्त्वे’ हे पुस्तक प्रथम वर्ष वाणिज्याचे विद्यार्थी, शिक्षक, बँक अभ्यासक व वाचक यांच्या हाती देताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. हे पुस्तक लिहिणे आमच्या समोरील महत्वाचे आव्हान होते. हे आव्हान पेलण्यासाठी अनेक लेखकांचे संदर्भ ग्रंथ, विविध मासिके व वर्तमान पत्रातील लेख तसेच रिझर्व्ह बँकेचे बुलेटीन, वेबसाईट यांची मदत झाली आणि हे क्रमिक पुस्तक पुर्णत्वाला आले.\u003cbr\u003eसदर पुस्तकाची मांडणी चार प्रकरणांच्या साहाय्याने केली आहे. प्रकरण क्र. 1 मध्ये बँक व्यवसायाची उत्क्रांती आणि बँक शब्दाचा उदय या विषयीची सविस्तर माहिती दिलेली आहे. प्रकरण क्र.2 मध्ये बँकेची प्राथमिक कार्ये आणि दुय्यम कार्ये याबाबत सविस्तर चर्चा केली आहे. प्रकरण क्र. 3 मध्ये ठेवी, खाती उघडण्याची व वापरण्याची कार्यपद्धती, त्याचबरोबर संस्थात्मक खातेदारांचा सखोल अभ्यास केला आहे. प्रकरण क्र. 4 मध्ये पैसे पाठविण्याच्या पारंपारिक व आधुनिक पद्धतीचा सविस्तर अभ्यास केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474905641189,"sku":null,"price":115.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bank-Vyavasayachi-Multattve_Dr-B-R-Pawar_cnvt-1.jpg?v=1772110720"},{"product_id":"आधुनिक-बँकिंग","title":"आधुनिक बँकिंग","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474927726821,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Modern-Banking-1.jpg?v=1772111336"},{"product_id":"बँकिंग-तत्त्व-आणि-व्यवहार","title":"बँकिंग तत्त्व आणि व्यवहार","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eज आपण 21 व्या शतकात वावरत आहोत. 20 व्या शतकाच्या मध्यात जगातील सर्व देशांमध्ये बँकींगचा विकास व विस्तार करण्यासाठी त्या-त्या देशाच्या सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केलेत. बँकिंगच्या सर्वांगीण विकासामुळे बँकिंग क्षेत्राला कार्पोरेट क्षेत्राचा दर्जा मिळाला. दररोजच्या आर्थिक व्यवहारांपैकी जवळपास 60% व्यवहार हे बँकांच्या माध्यमातून होतात असा संशोधकांनी निष्कर्ष काढला आहे. इतके आज आपण बँकिंग क्षेत्राशी निगडीत झालेले आहोत. बँकिंग क्षेत्रात अवलंबिण्यात येत असलेले नवीन प्रवाह, बँकिंग क्षेत्रातील अलीकडील सुधारणा ह्यामुळे तर बँकिंग क्षेत्र बँकेच्या ग्राहकांचा एक अविभाज्य असा घटक बनलेला आहे. आज व्यापार- व्यवसाय, औद्योगिक क्षेत्र, कृषीक्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र अशी विविध क्षेत्र बँकांनी व्यापली असून ह्या क्षेत्रात बँका महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. विषय अधिक आकलन होण्याच्या दृष्टीने पुस्तकात आवश्यक त्या ठिकाणी नवीन संज्ञा, नवीन संकल्पना, विविध आकृत्या, विविध नमुने (खारसशी) तसेच मराठी शब्दांना पर्यायी इंग्रजी शब्द देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा विषय समजण्यास सुलभ होईल अशी खात्री आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात ए.टी.एम., टेली बँकिंग, ई.एफ.टी., ई.सी.एस., डेबीट कार्ड, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, ई-पर्चेस, ई-मनी, कोअर बँकिंग, सी टी एस ई एफ टी ओ एस अशा बँकिंग क्षेत्रातील अलीकडील सुधारणा व तंत्रज्ञान या सारख्या बँकिंगमधील आधुनिक प्रवृत्ती अभ्यासण्यात आल्यामुळे हे पुस्तक बँकिंग संबंधात अत्याधुनिक झाले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474966524133,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Banking-tatve-ani-vyavhar-1.jpg?v=1772111980"},{"product_id":"मौद्रिक-प्रणाली","title":"मौद्रिक प्रणाली","description":"\u003cp\u003e“मौद्रिक प्रणाली” हा विषय विविध स्पर्धा परीक्षा तसेच अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी या पुस्तकामध्ये नवीन आकडेवारीनुसार मांडणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नोटाबंदीचा मुद्राबाजारावर झालेला परिणाम व त्याचे फायदे आणि तोटे इत्यादी बाबींचे विश्लेषण करण्यात आले आहे. या पुस्तकाची पाच प्रकरणामध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या प्रकरणामध्ये वस्तुविनिमय आणि त्याच्या अडचणी; मुद्रेचा इतिहास, अर्थ, व्याख्या आणि स्वरूप; मुद्रेची कार्ये आणि महत्व; मुद्रेचे प्रकार आणि निश्चलनीकरणाचे फायदे आणि तोटे बाबींचे विश्लेषण करण्यात आले आहे. दुसर्या ‘मुद्रामूल्य’ या प्रकरणात मुद्रेची मागणी व मुद्रेचा पुरवठा त्यांचा अर्थ आणि निर्धारक घटक, मुद्रेचे मूल्य, मुद्रेची मागणी व पुरवठा यांचे संतुलन, फिशरचा मुद्रा परिमाण सिद्धांत याबाबत विश्लेषण करण्यात आले आहे. तिसर्या प्रकरणामध्ये स्फिती व अपस्फिती आणि व्यापारचक्र; चौथ्या मुद्राबाजार या प्रकरणामध्ये भारतीय मुद्राबाजार व्यवस्था आणि त्यावर निश्चलनीकरणाचा झालेला परिणाम तर पाचव्या भांडवल बाजारावरील प्रकरणामध्ये भारतीय भांडवल बाजार, त्याचे महत्व आणि कार्य त्याचप्रमाणे सेबीच्या जबाबदार्या आणि कार्ये इत्यादीसंदर्भात मांडणी करण्यात आली आहे. नवीन आकडेवारीनुसार लिहिलेल्या या पुस्तकाचे स्वागत प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील अभ्यासक करतील याबद्दल विश्वास आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48475020361957,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Maudrik-Pranali_cnvt-1.jpg?v=1772113458"},{"product_id":"भारतीय-अर्थव्यवस्था-भाग-2","title":"भारतीय अर्थव्यवस्था (भाग 2)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477284303077,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiya-Arthavavstha-bhag-2-1.jpg?v=1772170506"},{"product_id":"आधुनिक-बँक-व्यवसाय-आणि-वित्तपद्धती","title":"आधुनिक बँक व्यवसाय आणि वित्तपद्धती","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477379559653,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Moderna-Banking-Financial-System_FNL2_cnvt-1.jpg?v=1772173605"},{"product_id":"rural-industrialisation-in-india","title":"Rural Industrialisation in India","description":"\u003cp\u003eSociety can flourish when all sections of populace, sectors of economy and different regions can draw benefits to prosper and progress. Despite India becoming a major power in terms of reasonably high growth rate, it is the home of the largest number of poor. There is a paradoxical situation that benefits of growth have not percolated to all regions and segments of population. Incidence of poverty on account of deprivation in many areas, in terms of socio-economic infrastructure is more evident in rural India. The book centers around this core theme hence takes up the case for rural folks living in countryside. The book covers suggestions based on appraisal to make rural industrialisation more pragmatic and practical in the present context of globalisation. It helps readers in better assimilation on the subject.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477550313701,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rural-Industrialisation-in-India_cnvt-1.jpg?v=1772180604"},{"product_id":"कौटुंबिक-संसाधनांचे-व्यवस्थापन-आणि-आंतरिक-सजावट","title":"कौटुंबिक संसाधनांचे व्यवस्थापन आणि आंतरिक सजावट","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eगृहव्यवस्थापन आणि अंतर्गत सजावट करतांना महिलांना अनेक प्रश्न पडतात. अशा वेळी महाविद्यालयीन स्तरापासूनच विद्यार्थिनींना व भावी गृहिणींना तसेच स्वतः व्यवसाय उभारणाऱ्या गृहिणीना सहकार्य करण्याच्या उद्देशाने लिखित हि पुस्तिका असून यामध्ये गृहअर्थशास्त्राचे महत्व, विविध शाखा, कौटूंबिक साधन संपत्ती व्यवस्थापन, निर्णय प्रक्रिया, रंग व रंग योजना, पुष्परचना, कार्यक्रमाचे व्यवस्थापन, कार्यसरलीकरणाचे महत्त्व, घरगुती कामात कार्यसरलीकरणाचे तंत्र, फर्निचर मांडणी, फर्निचर निवड व त्याची काळजी, जलसंधारण सांडपाण्याचे निष्कासन, कचऱ्याची विल्हेवाट, स्वयंरोजगार, गृहअर्थशास्त्रातील रोजगार संधी, महिला सक्षमीकरणात जिल्हा उद्योग केंद्र, स्वसहाय्यता गटाचे योगदान, महिला आर्थिक विकास मंडळाची भूमिका ब्लॉकचा परिचय, ब्लॉक प्रिंटींग तयार करणे, स्कार्फ, उशी, टेबल क्लॉथ हे सर्व प्रात्यक्षिक या सर्वभागाचा या पुस्तकात समावेश केला आहे. याचा उपयोग करुन उत्सुक महिला आवडीप्रमाणे व्यवसाय सुरु करुन आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करु शकतील. सदर पुस्तक हे विद्यार्थिनी, गृहिणी तसेच अध्यापकाकरिता उपयुक्त ठरणार आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477774938341,"sku":null,"price":525.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Kautunbik-Sadhansanpattiche-Vyavasthapan-v-Antarsajavat_Dr-Jyoti-Haware_cnvt-1.jpg?v=1772189995"},{"product_id":"कापूस-प्रक्रिया-उद्योग","title":"कापूस प्रक्रिया उद्योग","description":"\u003cp\u003e*कापूस प्रक्रिया उद्योग हे पुस्तक वाचकांच्या हाती सोपवितांना मला अतिशय\u003cbr\u003eआनंद होत आहे. या पुस्तकातून भारतीय अर्थव्यवस्थेत ‘पांढरे सोने’ म्हणून\u003cbr\u003eओळखल्या जाणाऱ्या कापूस पिकाविषयी आणि कापूस उत्पादक प्रदेशाची माहिती\u003cbr\u003eदेऊन, कापूस प्रक्रिया उद्योगाची ऐतिहासिक पोर्शभूमी आणि सर्वसाधारण माहिती\u003cbr\u003eवर्णनात्मक स्वरूपात स्पष्ट केलेली आहे. या उद्योगावर आधारित पुरक उद्योग व\u003cbr\u003eव्यवसायाची माहिती सविस्तर देऊन, कापूस प्रक्रिया उद्योगांशी संबंधित घटकांच्या\u003cbr\u003eसमस्या आणि या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना सुचविण्याचा प्रयत्न अत्यंत\u003cbr\u003eसाध्या-सोप्या भाषेत केलेला आहे. यात कापूस प्रक्रिया उद्योगाची जळगाव\u003cbr\u003eजिल्ह्यातील ऐतिहासिक पोर्शभूमी व सद्यस्थिती देखील दिलेली असून सर्वसामान्य\u003cbr\u003eशेतकरी, उद्योजक, संशोधक आणि वाचक यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल\u003cbr\u003eअसा मला विश्वास आहे.*\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477783654629,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Kapus-Prakriya-Udyog_cnvt-1_1.jpg?v=1772190508"},{"product_id":"सार्वजनिक-आयव्यय-3","title":"सार्वजनिक आयव्यय","description":"\u003cp\u003eअर्थशास्त्र स्पेशल पेपर - 4 करिता सार्वजनिक आयव्यय\u003cbr\u003e(र्झीलश्रळल ऋळपरपलश) हा पेपर लागू केलेला आहे. या नवीन सुधारित\u003cbr\u003eअभ्यासक्रमानुसार लिहिलेले हे पुस्तक सादर करण्याचा मला अतिशय\u003cbr\u003eआनंद होत आहे. या पुस्तकात विद्यापीठाच्या नव्या अभ्यासक्रमानुसार\u003cbr\u003eपहिल्या प्रकरणात सरकाराची भूमिका, सार्वजनिक आयव्ययाचे स्वरूप,\u003cbr\u003eव्याप्ती व महत्त्व स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे डॉ. डाल्टन यांच्या महत्तम\u003cbr\u003eसामाजिक लाभाच्या सिद्धान्ताचे विवेचन केले आहे. प्रकरण दोन मध्ये\u003cbr\u003eसार्वजनिक खर्चाचा, अर्थ, वर्गीकरण, तत्त्व, त्याची प्रवृत्ती, वाढीची\u003cbr\u003eकारणे आणि परिणामाची माहिती देण्यात आली आहे. प्रकरण तीन\u003cbr\u003eमध्ये सार्वजनिक उत्पन्नाचे मार्ग, यात कर, कराचे उद्दिष्टे, तत्त्व, कराचे\u003cbr\u003eप्रकार, कर आकारण्याची तत्त्वे आणि करासंबंधीत विविध संकल्पनाचे\u003cbr\u003eविश्लेषण दिलेले आहे. प्रकरण चार मध्ये सार्वजनिक कर्ज, त्याचा\u003cbr\u003eअर्थ, भूमिका, प्रकार, त्यानुसार विश्लेषण, सार्वजनिक कर्जाचा भार,\u003cbr\u003eपरतफेडीचे मार्ग इत्यादीचे विश्लेषण देण्यात आले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477815472357,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sarvajanik-Aayavyay_pagar-1_1.jpg?v=1772191229"},{"product_id":"कृषी-अर्थशास्त्र-1","title":"कृषी अर्थशास्त्र","description":"\u003cp\u003eभारत हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. ग्रामीण भागात शेतीक्षेत्राचा विस्तार मोठ्या प्रमाणात आहे. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 68% जनता या क्षेत्रात गुंतलेली आहे. जगातील कोणत्याही राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत शेतीला महत्वाचे स्थान असते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e20 व्या शतकाच्या सुरूवातीला अर्थशास्त्राची एक स्वतंत्र शाखा म्हणून ‘कृषी अर्थशास्त्र’ कार्यरत झाले. दुसर्या जागतिक महायुद्धानंतर या शाखेचे महत्व मोठ्या प्रमाणात वाढले. सध्या जगातील बहुसंख्य विकसनशील अर्थव्यवस्थांमधील उदा. राष्ट्रीय उत्पन्न, निर्यात, अन्नधान्य, कच्चा मालाचा पुरवठा, रोजगार वगैरे क्षेत्रात कृषी क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावत आहे. वाढत जाणार्या लोकसंख्येची अन्नधान्याची आणि सातत्याने वाढत जाणार्या विविध उद्योगांच्या कच्च्या मालाची गरज शेती क्षेत्राकडूनच पूर्ण होत आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकृषी आधारीत अर्थव्यवस्थेचे रूपांतर उद्योगाधारीत अर्थव्यवस्थेत होण्यासाठी शेतीबद्दलचा पारंपारिक दृष्टीकोन बदलवून आधुनिक दृष्टीकोनाचा स्विकार होणे काळाची गरज ठरते. संसाधनाचा योग्य वापर, घटकांचा युक्त संयोग, पर्यायी उत्पादन तंत्राची निवड, विपणनाच्या समस्या, व्यवस्थापन, उत्पादन फलन इत्यादी अनेक बाबतीत कृषी अर्थशास्त्र महत्वाची भूमिका निभावू शकते. शेती क्षेत्रात व्यापारी दृष्टीकोन रुजवण्यात शेतीच अर्थशास्त्र महत्वपूर्ण योगदान देवू शकते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eKrushi Arthashastra\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477838606565,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Krushi-Arthashastra_Dr-N-L-Chavhan_cnvt-1.jpg?v=1772191873"},{"product_id":"सार्वजनिक-अर्थशास्त्र","title":"सार्वजनिक अर्थशास्त्र","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479854199013,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sarvajanik-Arthashtra_Khose_cnvt-1.jpg?v=1772273486"},{"product_id":"भारतीय-कृषी-अर्थव्यवस्था","title":"भारतीय कृषी अर्थव्यवस्था","description":"\u003cp\u003eभारतीय कृषी अर्थव्यवस्था’ या विषयाची 6 भागातील मांडणी अत्यंत सोप्या\u003cbr\u003eभाषेत, अद्ययावत आकडेवारीसह प्रा. डॉ. मनोजकुमार ज्योतिराम गायकवाड यांनी\u003cbr\u003eकेली आहे. हे पुस्तक अर्थशास्त्र व मानव्यशाखेतील विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक\u003cbr\u003eयांना निश्चितच लाभदायी होईल.     \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48480066339045,"sku":null,"price":215.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Krishi-Arthavyavastha_Dr-M-J-Gaikawad-1.jpg?v=1772279926"},{"product_id":"१९१९-पासूनची-भारतीय-अर्थव्यवस्था-भाग-२-indian-economics-since-1919","title":"१९९१ पासूनची भारतीय अर्थव्यवस्था भाग - २ (Indian Economics Since 1919)","description":"\u003cp\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (नॅक 'अ' श्रेणी प्राप्त) यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या मार्गदर्शक सूचनांनुसार द्वितीय वर्ष कला स्तर-५.० या वर्गातील अर्थशास्त्र हा विषय विशेष प्राविण्यासह व विशेष प्राविण्यासह संशोधन (With Honours and Honours with Research) या आधारावर अभ्यासक्रमाची पुनर्रचना मा. कुलगुरू प्रो. (डॉ.) व्ही. एल. माहेश्वरी, प्र. कुलगुरू प्रो. (डॉ.) एस. टी. इंगळे, अधिष्ठाता प्रो. (डॉ.) जगदीश पाटील (मानव्यविद्याशाखा), प्रो. (डॉ.) अनिलजी डोंगरे (वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा) यांच्या मार्गदर्शनानुसार अर्थशास्त्र अभ्यास मंडळाने केली आहे. सामान्य स्तरावरील हा विषय मायनर म्हणून MIN-2 Eco 224 सत्र-IV साठी १९९१ पासुनची \u003cb data-path-to-node=\"2\" data-index-in-node=\"694\"\u003e\"भारतीय अर्थव्यवस्था\" (Indian Economy Since-1991)\u003c\/b\u003e या विषयाची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक सत्रासाठी २ श्रेयांक (क्रेडिट) निर्धारित करण्यात आलेले असून एकूण मूल्यांकन ५० गुणांचे होणार आहे. त्यात अंतर्गत मूल्यांकन २० गुणांचे व बहिस्थ मूल्यांकन ३० गुणांचे करण्यात येणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने १९९१ पासून नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार करून भारतीय अर्थव्यवस्था जागतिकीकरणाचा भाग बनली.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48587296047333,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BhartiyArthshashtra-2_Gaikwad-1.jpg?v=1773906856"},{"product_id":"स्थूल-अर्थशास्त्र-10","title":"स्थूल अर्थशास्त्र","description":"\u003cp data-path-to-node=\"2\"\u003eस्थूल अर्थशास्त्र हे पुस्तक चार घटकांत विभागले असून पहिला घटक हा समग्रलक्षी अर्थशास्त्राचा परिचय देणारा आहे. दुसरा घटक हा राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित आहे. तिसरा घटक उपभोग फलन आणि चौथा घटक गुंतवणूक फलनाचा आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"3\"\u003eलेखकाने वरील चारही घटकांची मुद्देसूद मांडणी केली आहे यात राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती, उपभोग फलन, केन्सचा उपभोग विषयक मानसशास्त्रीय नियम, निरपेक्ष उत्पन्न परिकल्पना, सायमन कुझनेटचे अनुभवाधिष्ठित विवेचन, ड्युसेनबेरीची सापेक्ष उत्पन्न परिकल्पना, मिल्टन फ्रीडमनची स्थायी उत्पन्न परिकल्पना, मोदिग्लियानी यांची जीवन चक्र परिकल्पना, गुंतवणूक फलन, भांडवलाची सीमांत कार्यक्षमता, गुंतवणूक गुणक तत्व यांची विस्तृत मांडणी केली आहे. संपूर्ण मांडणी विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत केली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48587397497061,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/SthulArthshastra-1.jpg?v=1773909223"},{"product_id":"कृषी-आधारित-उद्योग-भाग-२-agro-based-industry-ii","title":"कृषी आधारित उद्योग (भाग - २) (Agro-Based Industry-II)","description":"\u003cp\u003e‘कृषी-आधारित उद्योग’ हा विषय दोन- (2) क्रेडीटसाठी लेखी पेपर साठी हा विषय कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम म्हणून पदवी स्तरावर निश्चित करण्यात आला आहे. ‘कृषी आधारित उद्योग’ हे प्रस्तुत पुस्तक विद्यार्थ्यांच्या गरजा आणि बदलत्या औद्योगिक धोरणांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आले आहे. या पुस्तकाची विभागणी प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या भागांत केली आहे. पुस्तकातील प्रकरण-1 केंद्र आणि राज्य सरकारद्वारे कृषी-उद्योजकांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे. ज्यात PMEGP, मुद्रा योजना, Startup India आणि नाबार्ड यांची भूमिका सविस्तर मांडली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी कोणत्या वित्तीय आणि तांत्रिक संस्थांची मदत घेता येईल. इ. बद्दल सविस्तर माहिती देलेली आहे. तर पुस्तकाच्या प्रकरण- 2 मध्ये कृषी व्यवसायातील भविष्यकालीन संधी आणि आव्हानांचा वेध घेतला आहे. आजचे जग हे डिजिटल क्रांतीचे आहे, त्यामुळे e-NAM आणि ONDC सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा कृषी विपणनात होणारा वापर यावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच, हवामान बदलाचे संकट लक्षात घेऊन ‘शाश्वत कृषी उद्योग’ कसा उभारावा, यावरही मार्गदर्शन करण्यात आले आहे. विशेषतः खान्देशातील यशस्वी कृषी-उद्योजकांच्या यशोगाथांचा समावेश केल्यामुळे विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या संधींची प्रेरणा मिळेल. या संबधीची माहिती आहे.\u003cbr\u003eतसेच प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने मुल्यांकन नमूद केलेल्या आकृतीबंधानुसार परिक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक विद्यापीठातील कार्य क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून पुस्तकाचे आम्ही लिखाण केले आहे. हे पुस्तक केवळ परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त न ठरता, विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता विकास \u003cbr\u003eआणि ग्रामीण अर्थव्यवस्थेबद्दल एक नवीन दृष्टीकोन निर्माण करेल\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48598221062373,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/KrushiAadharitUdyog-II_Adhav-1.jpg?v=1774267424"},{"product_id":"प्रगत-समष्टी-अर्थशास्त्र-advanced-macro-economics","title":"प्रगत समष्टी अर्थशास्त्र (Advanced Macro Economics)","description":"\u003cp\u003eपहिले प्रकरण-पैशाची मागणी आणि पुरवठा या शिर्षकाचे आहे. यात पैशाची मागणी, तिचे निर्धारक, पैशाच्या मागणीचे सिद्धांत, पैशाच्या मागणीचे हेतू, रोखतेचा सापळा, पैशाचा पुरवठा, त्याचे दृष्टिकोण, पैशाच्या पुरवठ्याचे मापक, पैशाच्या मूल्याचा सिद्धांत यांची चर्चा व मांडणी केली आहे. रोजगार आणि उत्पादनाचे सिद्धांत या दुसऱ्या प्रकरणात जे.बी.से.चा बाजार नियम, केन्सचा सामान्य रोजगार सिद्धांत व प्रभावी मागणीचे तत्व, पूर्ण रोजगार आणि अपूर्ण रोजगार संतुलन, मागणी निर्धारित उत्पादनाचे विवेचन केले आहे. व्यापार चक्र आणि भाववाढ या तिसऱ्या प्रकरणात व्यापारचक्र, व्यापार चक्राच्या अवस्था, कारणे, भाववाढ, भाववाढीचे सिद्धान्त, भाववाढीची कारणे व परिणाम यांची मांडणी केली आहे. तर समग्रलक्षी आर्थिक धोरणे या चौथ्या प्रकरणात समग्रलक्षी आर्थिक धोरणे (चलनविषयक व वित्तीय धोरण), फिलिप्स वक्र, पुरवठा बाजूचे अर्थशास्त्र, लाफेर वक्र, यांची चर्चा व मांडणी केली आहे.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तक विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची गरज निश्चितपणे पूर्ण करेल अशी विस्तृत व सखोल मांडणी यात केली आहे. जी सोप्या आणि आकलनीय भाषेत केली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48598233710821,"sku":null,"price":220.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/PragatSamastiArthshastra-1.jpg?v=1774269638"},{"product_id":"बँकिंग-banking","title":"बँकिंग (Banking)","description":"\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तक हे याच सुधारित अभ्यासक्रमावर आधारित असून, विद्यार्थ्यांमधील बँकिंग विषयाची समज विकसित करण्याच्या उद्देशाने लिहिलेले आहे. या पुस्तकाची रचना मुख्यत्वे सहा महत्त्वाच्या घटकांभोवती करण्यात आली आहे. ‘बँकिंगचा परिचय’ या पहिल्या प्रकरणामध्ये बँकिंग क्षेत्राचा उगम, कार्यपद्धती आणि व्यावसायिक बँकांची बदलती भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. ‘केंद्रीय बँक’ (ठइख) या दुसऱ्या प्रकरणात भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना, तिची ध्येयधोरणे आणि पत नियंत्रणाद्वारे देशाची अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यात रिझर्व्ह बँकेचे असलेले महत्त्व यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. ‘नाबार्ड’ (छअइअठऊ) या तिसऱ्या प्रकरणात भारतासारख्या कृषीप्रधान देशात ग्रामीण आणि कृषी विकासासाठी ‘नाबार्ड’ ही शिखर बँक म्हणून कशा प्रकारे काम करते, याचा सविस्तर आढावा येथे घेतला आहे. चौथ्या आणि पाचव्या प्रकरणात जागतिक स्तरावरील आर्थिक स्थिरता आणि विकासासाठी कार्यरत असणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी’ (खचऋ) आणि ‘जागतिक बँक’ (थेीश्रव इरपज्ञ) या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थाच्या कार्याची माहिती देण्यात आली आहे. शेवटच्या सहाव्या प्रकरणात ‘बँकिंगमधील नवोन्मेष आणि आव्हाने’ या अंतर्गत डिजिटल युगात बँकिंग क्षेत्रात आलेली नाविन्यपूर्ण साधने आणि बँकिंग क्षेत्रासमोर उभी असणारी सायबर सुरक्षेची आव्हाने यावर चर्चा करण्यात आली आहे. प्रत्येक घटकाच्या शेवटी अभ्यासासाठी प्रश्नसंच दिला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करतांना या प्रश्नसंचाचा निश्चितच उपयोग होईल. विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.\u003cbr\u003e“बँकिंग” हे पुस्तक केवळ परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त नसून, विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी ओळखण्यासाठी आणि आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी एक मार्गदर्शक ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.\u003cbr\u003eअभ्यासक्रमातील क्लिष्ट संकल्पना सोप्या भाषेत मांडण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.                     \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48617124167909,"sku":null,"price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Banking_Rithe_marathi_-1.jpg?v=1774602311"},{"product_id":"बँकिंग-आणि-वित्त-banking-finance","title":"बँकिंग आणि वित्त (Banking \u0026 Finance)","description":"\u003cp\u003eपुस्तकाची वैशिष्ट्ये:\u003cbr\u003eI) अद्ययावत अभ्यासक्रम : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बदललेल्या ‘बँकिंग व वित्त’ विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित.\u003cbr\u003eII)  व्यावसायिक दृष्टिकोन : बँकिंग क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, सेवा आणि नियमांचा समावेश.\u003cbr\u003eIII) सुलभ भाषा : किचकट संज्ञांचे साध्या आणि सोप्या मराठी भाषेत स्पष्टीकरण.\u003cbr\u003eIV) विद्यार्थीभिमुख : परीक्षेत उत्तरे कशी मांडावीत, या दृष्टीने मुद्देसूद मांडणी.           \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48648853848293,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BankingaaniVitta_Ghotekar-1.jpg?v=1775044676"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/economics.oembed?page=2","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}