Your cart is empty now.
गृहअर्थशास्त्र हा कला शाखेतील ऐच्छिक विषय अनेक वर्षापासून शिकवल्या जात आहे. गृहअर्थशास्त्र हा विषय आज केवळ अभ्यास विषय न राहता तो गृहिणीकरिता एक जीवनपयोगी विषय ठरत आहे. कारण गृहअर्थशास्त्र हा विषय आहार, कुटुंब, गृहव्यवस्थापन, आरोग्य, वस्त्र, ग्राहक उपभोक्ता अर्थशास्त्र, विस्तार शिक्षण, मानव विकास अशा विविध शाखांनी परिपूर्ण विषय असल्याकारणाने हा विषय आजच्या विद्यार्थिनी व उद्याच्या गृहिणीकरिता जीवनाला परिपूर्ण बनवणारा विषय ठरणार आहे. अन्न हे मानवी जीवनाशी संबंधित अमूल्य घटक आहे. अन्न नसेल तर मानव जीवन जगू शकत नाही. म्हणून अन्न पोषण व अन्न घटकांचे पोषणमूल्य याचे अध्ययन करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण खाल्लेल्या अन्नाचा शरीर कसा उपयोग करते. अन्नाचे पोषण, पचन कसे होते? कोणत्या आजारात कोणत्या प्रकारचा आहार घ्यायचा, कोणता आहार टाळायचा याची माहिती आपल्याला या शास्त्राद्वारा प्राप्त होते. भारतीय बाजारपेठ विक्रेत्याची आहे. त्यामुळे उपभोक्त्याची पिळवणूक होते. अन्नभेसळ ही फार मोठी समस्या आहे, ती कशी ओळखावी, अन्नभेसळ असल्यास त्यावर काय उपाययोजना करावी. अन्नभेसळीचा प्रतिबंध कशाप्रकारे करता येईल याबद्दलची माहिती व उपायाचे वर्णन या शास्त्रात केलेले आहे. आजच्या विद्यार्थिनी ह्या उद्याच्या भावी नागरिक असल्याने सशक्त आहार सशक्त जनता घडविण्यात हे शास्त्र एक वैज्ञानिक शास्त्र ठरणार आहे.
प्रस्तुत पुस्तकात अन्न, अन्नाचा अर्थ, संकल्पना, स्वास्थ्य आणि पोषण समस्या, कुपोषणाची कारणे, सार्वजनिक स्वास्थ्य व समाज पोषण संकल्पना तसेच समुदायातील स्वास्थ विषयक मुख्य समस्या, अन्न सवयी व वर्तनावर परिणाम करणारे घटक, समुदाय पोषण शिक्षण, भारतीय पोषण कार्यक्रम, आहार आयोजन सर्वेक्षण, मानवमिती आणि जैविक रासायनिक मूल्यांकन, आहाराचे प्रकार, शस्त्रक्रियापूर्व, शस्त्रक्रियेनंतर द्यायचा आहार, आहारशास्त्रज्ञाची भूमिका, यकृताची कार्य, किडनीची कार्य, हृदयाची कार्य, विविध आजारात द्यायचा आहारोपचार, औषधी अन्नाचा परिचय, समतोल आहारात औषधी अन्नाची भूमिका, औषधी अन्नाचे आरोग्यास फायदे व अशा अन्नाची गरज, पोषकतत्व पाकशास्त्र, तृणधान्य पाकशास्त्र, अन्न प्रतिनिधी, अन्नातील औषधी गुणधर्म, अन्नसेवा, व्यावसायिक उत्पादने व अन्नसेवा, वर्तमान काळात घरगुती उद्योगाची भूमिका या सर्वांची माहिती प्रस्तुत पुस्तकात असल्याकारणाने प्रस्तुत पुस्तक सर्व विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक तसेच गृहिणींना एक मार्गदर्शिका ठरणार आहे.