Your cart is empty now.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए. (भाग 1) साठी असलेला ‘डिजिटल बँकिंग’ हा विषय विविध स्पर्धा परीक्षा तसेच अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी या पुस्तकामध्ये 2024-25 च्या नवीन आकडेवारीनुसार मांडणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बँकिंग व्यवसायातील आधुनिक सेवांबद्दलचे विश्लेषण या पुस्तकामध्ये करण्यात आले आहे. या पुस्तकाची चार घटकांमध्ये विभागणी करण्यात आली असून पहिल्या चार घटकांमध्ये (1) बँकिंग, (2) डिजिटल समावेशन, (3) डिजिटल पेमेंट सिस्टीम, (4) डिजिटल बँक सेवांच्या बाबतीत विश्लेषण करण्यात आले आहे. पुस्तकाची
घटकनिहाय मांडणी करतांना बँकिंग संदर्भातील अद्ययावत आकडेवारी देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक घटकाच्या शेवटी अभ्यासासाठी प्रश्नसंच दिला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करतांना या प्रश्नसंचाचा निश्चितच उपयोग होईल. विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.
पुस्तक लेखनासाठी आवश्यक अनेक संदर्भ ग्रंथ, शासकीय अहवाल, लेख, शोध निबंध, मासिके, सांख्यिकीय अहवाल, विविध परिषद व चर्चासत्रांच्या स्मरणिका तसेच इंटरनेट (आंतरजाल) वरील माहितीचा उपयोग घेण्यात आला आहे, याबाबत संदर्भसूची देण्यात आली आहे