Welcome to Prashant Publications

Rs. 250.00 10% OFF
Availability: 10 left in stock

सदर पुस्तकातील प्रकरणांची मांडणी व क्रम विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार केलेला नाही. त्यात लेखकाने थोडा बदल केला आहे. अभ्यासक्रमानुसार पहिले प्रकरण फक्त भूगोलाची व्याख्या, स्वरूप, व्याप्ती व महत्त्व या मुद्द्यांवर आधारित आहे.परंतु अभ्यासक्रम...

  • Name : प्राकृतिक भूगोलाची मूलतत्त्वे Principles Of Physical Geography
  • Vendor : Prashant Publication
  • Type : F.Y.B.A. PART - I SEM - I
  • Manufacturing : November 2024
  • Total Pages : 168 Pages
  • Barcode : 9789348537775
Categories:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

प्राकृतिक भूगोलाची मूलतत्त्वे Principles Of Physical Geography
- +

सदर पुस्तकातील प्रकरणांची मांडणी व क्रम विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार केलेला नाही. त्यात लेखकाने थोडा बदल केला आहे. अभ्यासक्रमानुसार पहिले प्रकरण फक्त भूगोलाची व्याख्या, स्वरूप, व्याप्ती व महत्त्व या मुद्द्यांवर आधारित आहे.परंतु अभ्यासक्रम हा प्राकृतिक भूगोलावर असल्यामुळे प्राकृतिक भूगोल- व्याख्या, स्वरूप, व्याप्ती व महत्त्व हे मुद्दे अभ्यासक्रमात असणे अभिप्रेत असावेत असे समजून या मुद्यांचा समावेश या प्रकरणात केला आहे. तसेच घटक दोन मधील ‘सूर्यकुल किंवा सूर्यमाला’ या मुद्द्याचा समावेश पाठ्यांशाच्या मांडणीच्या सोयीच्या दृष्टीने प्रकरण 2 मध्ये केला असून त्याच घटकातील ‘ग्रहणे’ हा मुद्दा शेवटच्या प्रकरणात घेण्यात आला आहे. प्रकरण 2 मध्ये सूर्यकुलाचा अभ्यासानंतर पृथ्वीची म्हणजेच ‘सूर्यकुलाची उत्पत्ती’ हा मुद्दा तिसऱ्या प्रकरणात समाविष्ट केला आहे. घटक चार मधील अक्षांश व रेखांश या मुद्द्याचा अंतर्भाव पुढील चौथ्या
प्रकरणात केला आहे. प्रकरण पाचवे अर्थात पृथ्वीच्या गती परिवलन व परिभ्रमण आणि त्यांचे परिणाम यावर लिहिले आहे. प्रकरण सहा- वेळेचे मापन- स्थानिक वेळ, प्रमाण वेळ आणि आंतरराष्ट्रीय वार रेषा या मुद्द्यांवर आधारित आहे. शेवटच्या प्रकरणात विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार फक्त सूर्यग्रहण व चंद्रग्रहण यावरच लिहिणे अपेक्षित असले तरी ग्रहणे ही संकल्पना समजून घेण्यासाठी चंद्र व चंद्रकला या मुद्द्यांचा अभ्यास आवश्यक वाटल्याने लेखकाने या मुद्द्यांना हात घातला आहे. कोणतेही अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक हे फक्त अभ्यासक्रमातील मुद्द्यांचा विचार करूनच लिहिले पाहिजे असे जरी अपेक्षित असले तरी पुस्तकाच्या पूर्णत्त्वाच्या दृष्टीने लेखकाने त्यापेक्षा काही अधिकची माहिती दिली आहे. हा भाग केवळ अभ्यासकांनां अधिक ज्ञानवृद्धी व्हावी या दृष्टीने दिला आहे. कारण पुस्तक फक्त परीक्षा आणि अभ्यासक्रम याच्या चौकटीत लिहून चालत नाही. कृपया लेखकाच्या भावना समजून पुस्तकाचा अभ्यास करावा. प्राकृतिक भूगोलाचे ज्ञान विद्यार्थ्यांना होण्याच्या दृष्टीने प्रत्येक संकल्पना आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट केली आहे. संपूर्ण पुस्तकात एकूण 66 आकृत्या काढल्या आहेत. हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी पाठ्यांशातील प्रत्येक मुद्द्यावर अतिशय बारकाईने अभ्यास करून सर्व प्रकारचे वस्तुनिष्ठ व दीर्घोत्तरी प्रश्न दिले आहेत. सर्व प्रश्नांची गुणवत्ता उच्चप्रतीचे असून बरेच प्रश्न भौगोलिक संकल्पनेच्या उपयोजनेवर आधारित आहेत. त्यामुळे एम. पी. एस्सी. यु. पी. एस्सी तसेच नेट सेट यासारख्या परीक्षांची
तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे प्रश्न निश्चितच उपयोगी ठरणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना स्वाध्ययन करणे सोपे होणार आहे.

1. भूगोल आणि प्राकृतिक भूगोल - व्याख्या, स्वरूप, व्याप्ती
आणि महत्त्व ............ 7
भूगोलाचे स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व - ‌‘भूगोल‌’ संज्ञेचा अर्थ,
भूगोलाच्या व्याख्या, भूगोलाचे स्वरूप, निसर्गवाद
किंवा पर्यावरणवाद, भूगोलाचा इतिहास,
भूगोलाची व्याप्ती, भूगोलाच्या शाखा, प्राकृतिक भूगोलाच्या शाखा,
मानवी भूगोलाच्या शाखा, भूगोलाच्या अभ्यासाचे महत्त्व प्राकृतिक
भूगोल : व्याख्या, स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व - प्राकृतिक भूगोलाच्या
व्याख्या, प्राकृतिक भूगोलाची निर्मिती, प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप,
प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती, प्राकृतिक भूगोलाच्या शाखा, प्राकृतिक
भूगोलाचे महत्त्व स्वाध्याय

2. सूर्यकुल .................................................................39
सूर्य, ग्रह, अंतर्ग्रह, बहिर्ग्रह, बुध, शुक्र, पृथ्वी, पृथ्वीचा उपग्रह चंद्र, मंगळ,
गुरु, शनि, युरेनस, नेपच्यून, लघुग्रह, धुमकेतू, अवकाशीय पाषाण, उल्का,
उल्का पाषाण, तारे, आकाशगंगा किंवा दीर्घिका, सूर्यकुलाची वैशिष्ट्ये
स्वाध्याय

3. पृथ्वीची आणि सूर्यकुलाची उत्पत्ती .....................................68
एकतारक परिकल्पना - इमॅन्युएल कांटची तेजोमेघ परिकल्पना,
कांटच्या परकिल्पनेचे परीक्षण द्वितारक परिकल्पना - (1) टी.
सी.चेंबरलेन व फोरेस्ट रे मुल्टन यांची ग्रहकण परिकल्पना, ग्रहकण
परकिल्पनेचे टीकात्मक परीक्षण (2) जेम्स जीन्स आणि सर हॅरॉल्ड
जेफरीज यांची भरती परिकल्पना, भरती परिकल्पनेची गृहीत तत्त्वे, सिगार
द्रव्यापासून ग्रह व उपग्रहांची निर्मिती (3) जेम्स जीन्स यांच्या भरती
परिकल्पनेत सर हॅरॉल्ड जेफरीज यांची सुधारित परिकल्पना - टक्कर
परिकल्पना, भरती परीकल्पनेचे टीकात्मक
परीक्षण स्वाध्याय

4. पृथ्वी : अक्षांश व रेखांश ...............................................85
स्थान निश्चितीसाठी भौगोलिक वृत्तजाळी, अक्षवृत्ते व अक्षांश,
स्वाभाविक अक्षवृत्ते, अक्षांश व रेखांश ठरविण्याच्या पद्धती, अक्षांश व
रेखांश निश्चिती, रेखावृत्ते व रेखांश स्वाध्याय

5. पृथ्वीच्या गती - परिवलन व परिभ्रमण .............................. 101
पृथ्वीची परिवलन गती, पृथ्वीच्या परिवलनाचे परिणाम, पृथ्वीच्या आसाचे
कलणे, पृथ्वीची परिभ्रमण गती, उपसूर्य स्थिती, व अपसूर्य स्थिती,
पृथ्वीच्या परिभ्रमणाचे परिणाम, पृथ्वीची वैश्विक गती स्वाध्याय

6. वेळेचे मापन .......................................................... 118
रेखावृत्ते, रेखांश व वेळ, स्थानिक वेळ, प्रमाण वेळ, ग्रीनिच मध्यम
वेळ, कालविभाग, संयुक्त संघराज्यातील कालविभाग
व त्यांचे प्रमाण रेखावृत्ते, आंतरराष्ट्रीय वार रेषा स्वाध्याय

7. चंद्र व ग्रहणे .......................................................... 135
चंद्राची उत्पत्ती, चंद्राचा पृष्ठभाग, चंद्राचा व्यास, वस्तुमान, व गुरुत्त्वाकर्षण,
चंद्राचा उदय व अस्त काळ, चंद्रप्रकाश व पृथ्वीप्रकाश, वातावरणाचा
अभाव, चंद्राच्या गती, चंद्रकला, शुक्ल व कृष्ण पक्ष, नीलचंद्र, सुपरमून,
चंद्राची उपभू आणि अपभू स्थिती, चंद्राच्या परिभ्रमणाच्या कक्षेची पातळी,
राहू आणि केतू ग्रहणाचे प्रकार - (अ) ग्रहणे: चंद्रग्रहणे
खंडग्रास चंद्रग्रहण, खग्रास चंद्रग्रहण; सूर्यग्रहणे
सूर्यग्रहणांचे प्रकार : (1) खग्रास सूर्यग्रहण (2) खंडग्रास सूर्यग्रहण (3)
कंकणाकृती सूर्यग्रहण, (ब) अधिक्रमण, (क) पिधान स्वाध्याय

संदर्भ ग्रंथसूची .............................................................. 167

💬

Chat with us