{"title":"FYBA Semester I \u0026 II","description":"","products":[{"product_id":"मूलभूत-आणि-बोधात्मक-मानसशास्त्र","title":"मूलभूत आणि बोधात्मक मानसशास्त्र (सत्र 1-2)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमानसशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय ‘वर्तन’ हा आहे. वर्तनाचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र म्हणून आज जगात सर्वत्र मानसशास्त्राला मान्यता मिळाली आहे. मानसशास्त्राच्या या प्रवासात अनेक तत्ववेत्त्यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. अगदी इ.स.पूर्व काळातील ग्रीक तत्ववेत्त्वे प्लेटो व ॲरिस्टॉटल यांनी मानवाच्या मनाचा आणि आत्म्याचा अभ्यास केला. फ्राईडने मनोविश्लेषण सिद्धांत मांडून अबोध प्रेरणेचे मानवी जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. तत्वज्ञ जॉन लॉक आणि थॉमस रेड यांनी अनुभववादाचा पुरस्कार केला. जर्मन तत्वचिंतक हर्बार्ट ‘मानसशास्त्र हे शरीरशास्त्र व तत्त्वज्ञानापेक्षा वेगळे आहे’ असे मत मांडले. जर्मन शरीरशास्त्रज्ञ हर्मन हेल्महोल्टझ् यांनी ‘शरीरशास्त्रीय साधनांच्या आधारे मानसिक घटनांचे स्पष्टीकरण करता येते’ असे मत मांडले. जर्मन शास्त्रज्ञ फेक्नर यांनी ‘एश्रशाशपीीं ेष झूीलहेहूीिळली’ हा ग्रंथ 1860 मध्ये लिहून मानसशास्त्राला खऱ्या अर्थाने शास्त्रीय कक्षेत आणले. म्हणून त्यास ‘मानसभौतिकीचा जनक’ मानतात. आधुनिक मानसशास्त्राच्या विकासाचे श्रेय द्यावे लागेल ते म्हणजे जर्मन शरीरशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी विल्यम वुडण्ट यांना. विल्यम वुडण्ट यांनी मानसशास्त्राला शास्त्रीय दर्जा प्राप्त करून दिला आणि मानसशास्त्राला एक नवीन ओळख प्राप्त करून दिली. त्यामुळे विल्यम वुडण्टला आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हणतात. अशा प्रकारे तत्त्वज्ञानाशी बांधलेले मानसशास्त्र आज एक स्वतंत्र शास्त्र म्हणून ओळखले जाऊ लागले.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48480188301541,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mulbhut-Aani-Bodhatmak-Manasshastra_Prof-R-U-Jadhav_cnvt-1.jpg?v=1772283872"},{"product_id":"मुलभूत-बँकिंग-fundamentals-of-banking","title":"मुलभूत बँकिंग (FUNDAMENTALS OF BANKING)","description":"\u003cp\u003eभारत सरकारने 2020 मध्ये नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले त्यात पदवी अभ्यासक्रम कालावधी चार वर्षाचा करण्यात आला. या धोरणात बहुआयामी, बहुविषयी (Multidisciplinary) दृष्टिकोन स्वीकारण्यात आला. या मागील उद्देश विद्यार्थ्यांना सर्व विषयाचे किमान व्यावहारिक ज्ञान देऊन एक संपन्न मानवी संसाधन निर्माण करणे आहे. भारत सरकारच्या मानवी संसाधन मंत्रालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या विद्यापीठ अनुदान आयोग, दिल्लीने निर्देश केल्या प्रमाणे भारतातील सर्व विद्यापीठांनी 2020 च्या शैक्षणिक धोरणाचा स्वीकार करुन सर्व विद्याशाखांच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना 2024 पासून केली आहे.\u003cbr\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव हे भारतातील एक आघाडीचे आणि अग्रणीचे विद्यापीठ ठरत आहे. यात एक महत्त्वपूर्ण घटक अभ्यासक्रम नावीन्यपूर्ण बदल करणे, त्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नवोन्मेष प्रतिबिंबित करणे आणि कार्यक्षम मानवी संसाधन व जबाबदार नागरिकांची निर्मिती करणे हा आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे विद्यापीठाने 2020 चे नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारून जून\/जुलै 2024 पासून अभ्यासक्रमांची पुनर्रचना करुन त्यांची कार्यवाही केली. विद्यापीठात मानव्य विद्या शाखा, वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र विद्या शाखा, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा, अशा तीन प्रमुख विद्या शाखा आहेत. यांच्यात समन्वय निर्माण करण्यासाठी काही विषय Multidisciplinary म्हणून स्वीकारणे निश्चित झाले. त्यानुसार मानव्यविद्या शाखेच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाने Fundamentals of Banking हा विषय एक पर्यायी विषय म्हणून प्रथम वर्षाच्या सत्र 1 आणि सत्र 2 साठी सादर केला आहे.\u003cbr\u003eअभ्यासक्रम तयार करताना अभ्यास मंडळाने विचारपूर्वक मांडणी केली आहे. Fundamentals of Banking हा असा विषय आहे. ज्यात सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांमध्ये सहज रस निर्माण, होईल. खरे तर भारताला जर 5 ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था करायची असेल तर देशातील सर्व नागरिकांमध्ये बँकिंग विषयाचे ज्ञान आणि जाण असणे आवश्यक आहे. सदर अभ्यासक्रम विद्यार्थी आणि नागरिकामध्ये जाण निर्माण करण्यात निश्चितच यशस्वी ठरणार.\u003cbr\u003eFundamentals of Banking चा अभ्यासक्रम दोन सत्रात विभागला आहे. पहिल्या सत्रासाठी दोन युनिट्स आणि दुसऱ्या सत्रासाठी चार युनिट्सचा तयार केलेला आहे. पहिल्या सत्राच्या पहिल्या युनिट्समध्ये बँकिंंगचा अर्थ, उत्क्रांती आणि संरचना घटकांचा समावेश आहे, तर दुसऱ्या घटकात बँकांची कार्ये समाविष्ट आहेत. दुसऱ्या सत्राच्या पहिल्या घटकात खाते उघडणे व त्यावर व्यवहार करणे, दुसऱ्या घटकात बँकींगची तत्त्वे आणि बँकिंग व्यवसायात वापरली जाणारी बँक उत्पादने\/साधानांना समावेश आहे. तिसऱ्या घटकात चेक, व्यापारी हुंड्या वचनचिठ्ठ्या या चलनक्षम दस्तऐवज आणि त्याच्या पृष्ठांकनांचा समावेश आहे. चौथ्या घटकात बँक व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे.\u003cbr\u003eसदर क्रमिक पुस्तकात दोन्ही सत्राच्या सर्व घटकातील प्रमुख व उपमुद्यांची सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत मांडणी केली आहे. ज्ञान देतांना कोणत्याही शॉर्टकटचा वापर केलेला नाही. संपूर्ण पुस्तक माझ्या पातळीवर परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थी मित्र आणि सर्व अध्ययनकर्त्यांच्या प्राथमिक बँकिंग ज्ञानाची गरज यातून निश्चितच भागेल. याची मला खात्री आहे. पण तरीही काही उणिवा असू शकतात. कृपया त्या कळवाव्यात त्याचा मी स्वीकार करुन पुढील वेळेस उणीव दूर करण्याचा प्रयत्न करेल.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48633136709861,"sku":null,"price":220.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/MulbhutBanking_ProfDrNLChavhan-1.jpg?v=1774950409"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/fyba-semester-i-ii.oembed","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}