{"title":"FYBA Semester I","description":"","products":[{"product_id":"practical-botany","title":"Practical Botany","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eThe Practical Course BOT. 102 (P) based on theory course BOT-101 T-Applied Aspects of Plant Sciences (NEP2020) is to equip students with hands-on training experience is using essential laboratory instruments and equipments. This course material will provide students with thorough understanding of the theory course material from plant Biotechnology – to agricultural techniques to plant microbe interactions to post-harvest technology, plant disease management to environmental applications of plant sciences for sustainable development. The practical course work will train the students in handling instruments, microbial cultures, agricultural techniques, organic farming techniques, handling kitchen waste to transform into best fertilizer organic manure. Post-harvest technology will understand you some beautiful techniques to prepare something commercial food product that you will love the practical work in the Botany and visit report will train you how to write and submit reports.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eThis practical book is written in most simple style that students can do this practical course work material by their own way. Every care has been taken to introduce all the practicals with most standard protocol followed by research laboratories. This will train the students for Botany practicals and will love the botany subject whole heartedly.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387244818661,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BOT-102-P_Practical-Botany_cnvt-1.jpg?v=1770728075"},{"product_id":"प्राकृतिक-भूगोलाची-ओळख-आणि-प्रात्यक्षिके","title":"प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्यक्षिके","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभूगोल हा अतिशय प्राचीन व गतिशील असा विषय आहे. त्यामुळे या विषयाचा अभ्यास निरीक्षण अवलोकन व कृतीशील सर्वेक्षणावर अवलंबून आहे. हा विषय चार भिंतीच्या आत मध्ये शिकण्यापेक्षा चार भिंतीच्या बाहेर जास्त शिकता येतो. भूगोलाचा अभ्यास करताना प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. किंबहुना प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची महत्त्वाची शाखा आहे. प्राकृतिक भूगोलाची ओळख व प्रात्यक्षिके या ग्रंथाच्या पहिल्या भागात भूगोल म्हणजे काय?, भूगोलाच्या महत्त्वाच्या शाखा, प्राकृतिक भूगोलाची ओळख, शिलावरण, वातावरण, जलावरण या घटकांवर प्रकाश टाकला आहे. तर दुसऱ्या भागात उठाव दर्शवण्याच्या संख्यात्मक व गुणात्मक पद्धती व समोच्च रेषांच्या साहाय्याने उतार व भूरूपे दर्शवणे या घटकांचा अभ्यास केला आहे. प्राध्यापक विद्यार्थी व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सदरील पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391239041253,"sku":null,"price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prakritik-Bhugol-Olkha-Aani-Pratyakishike_Prof-Dr-Shailesh-Nikam_cnvt-1.jpg?v=1770793835"},{"product_id":"व्यक्तिमत्त्व-विकास-आणि-भाषा","title":"व्यक्तिमत्त्व विकास आणि भाषा","description":"\u003cp\u003eव्यक्तिमत्त्व विकासातील भाषेचे स्थान ‘व्यक्तिमत्त्व’ संकल्पना आणि स्वरूप, व्यक्तिमत्त्व विकासाचे जीवनातील स्थान आणि महत्त्व याविषयीची सविस्तर मांडणी म्हणजे हे पुस्तक. भावनेचे आणि विचारांचे एकनिष्ठ चिंतन अनेक अर्थाने जेव्हा एकत्र आले की, व्यक्तिमत्त्व विकास आणि भाषा हे पुस्तक लिहून होते. सर्जकाच्या भूमिकेशी असलेला प्रामाणिकपणा अभ्यासकाला जवळचा वाटणारा आहे. जीवनावर व्यक्तित्त्वाविषयी गडदगहन जेव्हा सावली पडते तेव्हा व्यक्ती स्वातंत्र्य खुलत जाते. तसे झाले की, क्षितिज विस्तारत जातात आणि मुळात असलेले बीजरूप नव्याने समजून घेण्यास मदत होते. व्यक्ती विकासाच्या या घडणीसाठी या संहितेचा नक्कीच उपयोग होईल. बौद्धिक आणि नैतिक गोष्टींना वास्तवात समजून सांगण्यासाठी या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391250280677,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyatkimatv-Vikas-Aani-Bhasha-_Dr-Haresh-Shelke_cnvt-1.jpg?v=1770794055"},{"product_id":"सुजाण-नागरिकत्व","title":"सुजाण नागरिकत्व (Good Citizenship)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात सखोल व सविस्तर माहितीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकत्वाचा अर्थ नागरीकांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, भारताच्या संदर्भात नागरिकत्वाची संकल्पना, नागरिकत्व कायदा व या कायद्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या दुरुस्त्या, सामाजिक न्यायाच्या व सर्वसमावेशकतेच्या समस्यांच्या अनुषंगाने लैंगिक समानता, वांशिक विविधता व समतामूलक समाजाला प्रोत्साहन, डिजिटल आव्हानाच्या रुपात ऑनलाईन गोपनियता, डिजिटल अधिकार व सोशल मिडिया नागरी सहभागावर परिणाम, पर्यावरणीय आव्हानांच्या रूपात हवामान बदल, शाश्वत विकास व याबाबत नागरीकांच्या जबाबदाऱ्या, राजकीय सहभागाचे व दुष्प्रचारांच्या आव्हानात्मक रूपात मतदार दडपशाही, मतदारांचे ध्रृवीकरण जागरूक व नागरिक निर्माण करण्यात नागरी शिक्षणाची भूमिका, खोट्या बातम्या प्रचार व डिजिटल हेराफेरीचा जागरूक व जबाबदार नागरिक निर्माण करण्यावर परिणाम यासंबंधात सविस्तर व सोप्या भाषेत मांडणी व विश्लेषण करण्यात आले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391258636517,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sujan-Nagarikatv_Dr-Arun-Wanarse_cnvt-1.jpg?v=1770794238"},{"product_id":"राज्यशास्त्राचा-परिचय","title":"राज्यशास्त्राचा परिचय (Introduction to Political Science)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘राज्यशास्त्राचा परिचय’ या पुस्तकामध्ये पारंपरिक व आधुनिक राज्यशास्त्राचे स्वरूप व वैशिष्ट्ये, राज्यशास्त्राची व्याप्ती महत्त्व, राज्यशास्त्राचे पारंपरिक व आधुनिक दृष्टिकोन, राज्य व राज्याचा विकास, राज्याचे घटक, राज्याच्या उत्पत्तीचे सिद्धांत, सार्वभौमसत्ता, सार्वभौमसत्तेचा एकतावादी व अनेकतावादी सिद्धांत, स्वातंत्र्य व समता संकल्पना, स्वातंत्र्यासाठी आवश्यक अटी. स्वातंत्र्य व समतेचे प्रकार इत्यादी गोष्टी सविस्तर स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे पुस्तक अत्यंत साध्या व सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला असून अभ्यासक्रमाच्या अनुरूप व्यावहारिक व सैद्धांतिक बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुत पुस्तक विद्यार्थी, शिक्षक व वाचकांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391436959973,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajyashastracha-Parichay_Dr-Arun-Wanarase_cnvt-1-198x300.jpg?v=1770794430"},{"product_id":"प्राकृतिक-भूगोलाची-ओळख-आणि-प्रात्यक्षिके-1","title":"प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्यक्षिके (Introduction to Physical Geography and Practicals)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्यक्षिके हा अतिशय प्राचीन व गतिशील असा विषय आहे. भूगोलाचा अभ्यास करताना प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची महत्त्वाची शाखा आहे. या विषयाचा अभ्यास निरीक्षण अवलोकन व कृतीशील सर्वेक्षणावर अवलंबून आहे. प्राकृतिक भूगोलाची ओळख व प्रात्यक्षिके या ग्रंथाच्या पहिल्या भागात भूगोल म्हणजे काय?, भूगोलाच्या महत्त्वाच्या शाखा, प्राकृतिक भूगोलाची ओळख, शिलावरण, वातावरण, जलावरण या घटकांवर प्रकाश टाकला आहे. तर दुसऱ्या भागात उठाव दर्शवण्याच्या संख्यात्मक व गुणात्मक पद्धती व समोच्च रेषांच्या साहाय्याने उतार व भूरूपे दर्शवणे या घटकांचा अभ्यास केला आहे. प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्याक्षिके हे पुस्तक लिहिताना प्रत्येक प्रकरणाचे महत्त्व व त्याची व्याप्ती लक्षात घेऊन स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात विषयाचे आकलन होण्यासाठी नकाशानुसार आकृत्या व स्पष्टीकरण करून माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. सदरील पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391470711013,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prakritik-Bhugol-Olkha-Aani-Pratyakishike_Prof-U-P-Suryawanshi_cnvt-1.jpg?v=1770794619"},{"product_id":"पर्यावरण-शिक्षण","title":"पर्यावरण शिक्षण","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमानवाच्या अतिहव्यासापोटी मानवाने पर्यावरणात प्रचंड हस्तक्षेप केला आहे, परिणामी त्यामुळे पर्यावरण व पर्यावरणाच्या संदर्भात निर्माण झालेल्या समस्या हा जागतिक पातळीवर चर्चेचा एक मुख्य विषय आहे. स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय व जागतिक पातळीवर पर्यावरणामुळे निर्माण झालेले विघातक बदल विविध परिसंस्थांना मारक ठरत आहेत. पर्यावरण प्रदूषण, प्रदूषणांचे प्रकार, त्यांची कारणे, प्रदूषण नियंत्रणाचे उपाय, जैवविविधतेवरील संकटे, जैवविविधतेच्या संरक्षणाच्या पद्धती, याबाबतीतला आढावा पर्यावरण शिक्षण या क्रमिक पुस्तकात घेतलेला आहे. इतकेच नव्हे तर मानव-पर्यावरण संवाद, पर्यावरणवादाचा उदय, नैसर्गिक संसाधने, शाश्वत विकास, पर्यावरणीय समस्या आणि प्रमाणे, जमिनीचा वापर आणि जमिनीचे आच्छादन बदल, जागतिक बदल, इत्यादी पर्यावरण संदर्भातील बाबींचा वेध या संदर्भ ग्रंथातून घेतलेला आहे. पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला या पुस्तकाच्या माध्यमातून निश्चितच चालना मिळेल व पर्यावरण समतोलाची पुनर्स्थापना होवून शाश्वत विकासाला गती प्राप्त होईल अशी आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391539654885,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Paryavaran-Shikshan-Pune_cnvt-1.jpg?v=1770794834"},{"product_id":"ओझरता-आधुनिक-भारत","title":"ओझरता आधुनिक भारत","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eइ.स.1612 मध्ये सुरत येथे इंग्रजांची पहिली वखार स्थापन झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इ.स.1630 मध्ये झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याची बीजे या देशात रोवली गेली. मोगलानंतर ब्रिटिशांनी येथे राज्य स्थापन करुन भारतीयांना गुलाम बनविले. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची रोवलेली बीजे तशीच सुप्त अवस्थेत राहिली. त्यांतून 1857 चा स्वातंत्र्य संग्राम आणि 1885 मधील राष्ट्रीय काँग्रेसची स्थापन यातून पुन्हा संघर्ष सुरु झाला. हा संघर्ष सनदशीर मार्गाचा होता. दादाभाई नवरोजी यांनी कलकत्ताच्या अधिवेशनात चतुःसूत्रीला मान्यता देवून त्यांतून जहाल-मवाळ पक्ष निर्माण झाले. महात्मा गांधीजींनी असहकार व सविनय कायदेभंगाची चळवळ करुन ब्रिटिशांना काही घटनात्मक सुधारणा करण्यास भाग पाडले. शेवटी चलेजाव आंदोलन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना यांनी ब्रिटिशांना नमविले आणि त्यातून भारताला स्वातंत्र्य मिळाले. नवीन राज्यघटना तयार झाली. त्या मध्ये काही भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये होती या साऱ्यांचा संक्षिप्त आढावा म्हणजे हा ग्रंथ होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391581073637,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Ozarta-Adhunik-Bharat_Shah_cnvt-1.jpg?v=1770795030"},{"product_id":"indian-economic-policy-i","title":"Indian Economic Policy – I","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eAs per the National Education Policy – 2020 new syllabus ‘’Indian Economic Policy’’ (OE) this book is includes, Economy and Classification, role of Agriculture, Industry and Service Sector in India, New Economic Policy.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e The present book discusses in detail component-wise the syllabus, which is based on the reference material.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eReferences are prepared with the latest information on the Indian and a global economy. At the end of each topics, objective multiple-choice questions are given in terms of exam preparation as per the structure mentioned by the University. Therefore, we have written this book with the sincere intention that this book will be useful for all teachers as well as students preparing for various exams.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391614988517,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Indian-Economic-Policy-I_cnvt-1.jpg?v=1770795477"},{"product_id":"भारतीय-संविधान","title":"भारतीय संविधान","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘भारतीय संविधान’ या पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेची तोंडओळख करून देण्यात आली आहे. राज्यघटना बारकाईने समजून घेण्यासाठी राज्यघटनेच्या निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, राज्यघटना निर्मितीसाठी घटना समितीची मागणी, घटना समितीची निर्मिती, घटना समितीचे कामकाज, स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार राज्यघटनेत घडून आलेले बदल, घटना समितीच्या समित्या, घटनेची स्वीकृती, घटना समितीचा कार्यकाळ, राज्यघटनेचा सरनामा, राज्यघटनेचे उगमस्थान, सरनाम्याचे महत्त्व, भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये यांची साध्या व सोप्या शब्दांत मांडणी केली आहे. त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे यांचे सहज सोप्या भाषेत सविस्तर विश्लेषण करण्यात आलेले आहे. पुस्तकाच्या शेवटी भारतीय राज्यघटनेतील सर्व कलमांची यादी संक्षिप्त स्वरूपात देण्यात आलेली आहे. प्रस्तुत पुस्तकात 2024 पर्यंतची भारतीय राज्यघटनेची अद्यावत आणि अचूक माहिती देऊन हे पुस्तक परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या पदवी आणि पदव्युत्तर विभागांच्या राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल याबद्दल आम्हाला विश्वास वाटतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391648674021,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Sanvidhan_Dr-Dnyanoba-Dhage_cnvt-1.jpg?v=1770795683"},{"product_id":"भारतीय-राष्ट्रीय-चळवळ-इ-स-1857-ते-1950","title":"भारतीय राष्ट्रीय चळवळ (इ.स. 1857 ते 1950)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eइ. स. 1757 मध्ये झालेल्या प्लासीच्या युद्धाने ब्रिटिशांनी भारतात पाय रोवले. बंगालमध्ये आपले बस्तान बसविले. बक्सारच्या लढाईने ब्रिटिशांचे राज्य पक्के झाले. भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीत पडला. याची जाणीव भारतीयांना होताच त्यांनी 1857 मध्ये ब्रिटीशांविरूद्ध उठाव केला. या उठावात जरी भारतीय अपयशी झाले तरी या स्वातंत्र्य संग्रामाने भारतीयांच्या मनात राष्ट्रवादाची बीजे पेरल्या गेली. 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रीयवाद फोफावू लागला. त्यातून मवाळ आणि जहाल असे गट निर्माण झाले. दोन्ही पक्षांना स्वातंत्र्य हवे होते. पण त्यांचे ध्येय प्राप्त करण्याचे मार्ग वेगळे होते. यांतून दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य शब्दाची देणगी भारतीयांना देताच बंगालच्या फाळणीने अगोदरच पेटलेला भारत आणखी पेटला. वसाहतीच्या स्वातंत्र्याची स्वप्ने त्याला पडू लागली. लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य’ हा आपला जन्मसिद्ध अधिकार असल्याचे सांगितले. महात्मा गांधीयुगात सत्याग्रह, अहिंसा या मार्गाने स्वातंत्र्याची चळवळ चालू राहिली आणि शेवटी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेद्वारे तिच्यावर आघात करताच ‘चले जाव’ चळवळीने ब्रिटीशांना भारत सोडावा लागला. त्याची ही कहानी म्हणजेच भारतीय राष्ट्रीय चळवळ होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391728955621,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Rashtriya-Chalaval-CE-1857-to-1950_cnvt-1-198x300.jpg?v=1770795945"},{"product_id":"भारतीय-अर्थव्यवस्था-भाग-1-व-2","title":"भारतीय अर्थव्यवस्था (भाग 1 व 2)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 नुसार नवीन अभ्यासक्रमातील ‘भारतीय अर्थव्यवस्था भाग -1 व 2′ पुस्तकातील भाग – 1 यामध्ये अर्थव्यवस्था आणि भारतातील कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्राची भूमिका, अर्थव्यवस्थेची क्षेत्रीय रचना याबद्दल सबांधित इ. माहिती दिलेली आहे. तसेच भाग – 2 मध्ये प्रात्यक्षिक पेपर – 2 एले 102 साठी आवश्यक लोकसंख्या अभ्यासक्रम तसेच शिक्षक, विद्यार्थी, महाविद्यालय विभाग यासाठीची मार्गदर्शनपर माहिती, नमुना प्रात्यक्षिक आराखडा, मूल्यमापन पद्धती सविस्तर पणे दिलेली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात संदर्भ साहित्यावर आधारित अभ्यासक्रमाची घटकानुसार तपशीलवार चर्चा केलेली आहे. अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक आणि संकल्पना सखोल आणि तपशीलवार मांडलेली आहे. सर्व संदर्भ अद्ययावत माहितीसह तयार केलेले असून तसेच तक्ते, आलेख, आकृत्या आवश्यक तेथे वापरलेल्या आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या च्या शेवटी, परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने वस्तुनिष्ठ बहु-निवडीचे प्रश्न दिलेले आहे. त्यामुळे हे पुस्तक सर्व अभ्यासू शिक्षकांना तसेच परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल या प्रामाणिक हेतूने हे पुस्तक लिहिलेले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391753105637,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Arthavyavastha_Dr.-Sharad-Kakad_cnvt-1-198x300.jpg?v=1770796239"},{"product_id":"उपयोजित-आणि-व्यावसायिक-मराठी-लेखन-कौशल्य","title":"उपयोजित आणि व्यावसायिक मराठी लेखन कौशल्य","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399887597797,"sku":null,"price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Upyojit-Ani-Vyavaharik-Marathi-Kaushalye_Dr-Gitanjali-Chine-1-768x1154.jpg?v=1770880417"},{"product_id":"मूलभूत-मानसशास्त्र-आणि-मानसशास्त्रीय-चाचण्या","title":"मूलभूत मानसशास्त्र आणि मानसशास्त्रीय चाचण्या (Basics of Psychology and Psychological Testing)","description":"\u003cp\u003eभारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (National Education Policy-NEP-2020) प्रथम वर्ष कला मानसशास्त्र या विषयाचा सुधारित अभ्यासक्रम 2024-2025 या शैक्षणिक वर्षापासून लागू होत आहे. सुधारित अभ्यासक्रमाचा द्वितीय सत्रातील सर्व भाग या क्रमिक पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. या क्रमिक पुस्तकामध्ये असणाऱ्या सर्व संकल्पना आम्ही विस्ताराने देण्याचा प्रयत्न केला आहे. \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399912632549,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mulbhut-Manasshastra-ani-Manasshastriya-Chachanya_Prof-Vishnu-Adasare-1-768x1158.jpg?v=1770881048"},{"product_id":"मानसशास्त्राची-मुलतत्वे-आणि-प्रयोग","title":"मानसशास्त्राची मुलतत्वे आणि प्रयोग","description":"\u003cp\u003eभारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार(National Education Policy-NEP-2020) प्रथम वर्ष कला मानसशास्त्र या विषयाचा सुधारित अभ्यासक्रम 2024-2025 या शैक्षणिक वर्षापासून लागू होत आहे. सुधारित अभ्यासक्रमाचा सर्व भाग या क्रमिक पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. या क्रमिक पुस्तकामध्ये असणाऱ्या सर्व संकल्पना आम्ही सविस्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. कारण अभ्यासक्रम बदलला की बाजारामध्ये या विषयाची क्रमिक पुस्तके त्वरित उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनाची समस्या निर्माण होते.    \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399934947557,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manasshastrachi-Multattve_Dr-Sandip-Mali-1-768x1175.jpg?v=1770881372"},{"product_id":"भारतीय-आर्थिक-धोरण-1","title":"भारतीय आर्थिक धोरण","description":"\u003cp\u003eनविन शैक्षणिक धोरणानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विषयाच्या F.Y.B.Sc. व F.Y.B.Com करीता Open Elective करीता भारतीय आर्थिक धोरण या विषयाच्या अभ्यासक्रमानुसार प्रस्तुत पुस्तकात सखोल व सविस्तर माहितीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रस्तुत पुस्तकात भारताची लोकसंख्याशास्त्रीय रचना लोकसंख्येचे व्यावसायिक वितरण भारतातील लोकसंख्या नियंत्रणाचे धोरण व उपाय दारिद्य्राचा अर्थ प्रकार भारतातील दारिद्य्राची कारणे, भारतातील दारिद्य्र निर्मुलनासाठीचे उपाय इत्यादीसंबंधी सविस्तर वितरण प्रस्तुत पुस्तकात करण्यात आले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399991210213,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Aarthik-Dhoran_Dr-Rupali-Devre-1-768x1169.jpg?v=1770882695"},{"product_id":"आरोग्य-मानसशास्त्र-1","title":"आरोग्य मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमानवी मनोव्यापारांचा परिणाम व्यक्तीच्या शारीरिक स्वास्थ्यावर होत असतो. व्यक्तीचे विचार, भावना आणि दैनंदिन जीवनामध्ये इतरांशी होणार्या आंतरक्रिया जेवढ्या व्यापक, परिपक्व आणि प्रगल्भ असू शकतील तेवढे त्या व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असेल तर निरोगी आणि निरामय जीवन व्यक्तीच्या वाट्याला येते. मानवाच्या या मनोव्यापारांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करण्याचे कार्य आरोग्य मानसशास्त्राच्या क्षेत्रात आरोग्य मानसशास्त्रज्ञ करीत आहेत. हे अभ्यास केवळ सर्वेक्षण, व्यक्तिवृत्त अभ्यास आणि क्षेत्रीय अभ्यासापुरते मर्यादित राहिले नसून ते प्रायोगिक, सहसंबंधात्मक अभ्यास, जैवरासायनिक व न्यूरोट्रान्समीटर यांच्यामध्ये होणार्या बदलांमधील सूक्ष्म निरीक्षणापर्यंत पोहोचले आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात आरोग्य मानसशास्त्राची ओळख, शरीर-मन संबंध, आरोग्य क्षेत्रात मानसशास्त्राची भूमिका, ताण आणि साधक वर्तन, ताणाला प्रतिसाद\/प्रतिक्रिया, तणावाचा सामना करण्यासाठी सामाजिक संपर्क वाढविणे, दिर्घकालीन आरोग्य विकृतींशी (जुनाट आजारांशी) निगडीत व्यक्तिगत बाबी, प्रमुख दिर्घकालीन आरोग्य समस्या, प्राथमिक प्रतिबंध आणि आरोग्य प्रसार, जीवन गुणवत्ता आणि आरोग्य वर्तन, आरोग्य प्रसार वर्तन इ. मुद्द्यांचे सविस्तर विवेचन केलेले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451358916837,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Arogya-Manasshastra_Dr-Narendra-Deshmukh_cnvt-1.jpg?v=1771574648"},{"product_id":"मानसशास्त्रातील-मूलभूत-तत्वे-आणि-संकल्पना","title":"मानसशास्त्रातील मूलभूत तत्वे आणि संकल्पना","description":"\u003cp\u003eशैक्षणिक वर्ष 2022-23 नुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव मानसशास्त्र अभ्यास मंडळ यांनी दिलेल्या मार्गदर्शन तत्वानुसार ह्या पुस्तकाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या विशेषत्वाने ज्या नवीन बाबींचा समावेश करण्यात आला आहे. आदींचा सविस्तरपणे उहापोह करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याप्रमाणे बदल हा विश्वाचा नियम आहे. त्या नियमाला अनुसरून सातत्याने प्रवाही राहणे नवनवीन बाबींचा स्वीकार करणे ह्या विचारसरणीला अनुसरुन या पुस्तकात संशोधनातून प्राप्त माहितीचा समावेश करण्यात आला आहे. यातही काही त्रुटी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा त्रुटी आपल्या निदर्शनास आल्यास मला अधिकारवाणीने लेखी किंवा तोंडी स्वरूपात दिल्यास त्यांचे मी स्वागतच करेन यामध्ये जे काही चांगले योग्य निर्माण झाले, याचे सर्व श्रेय वाचकांचेच असेल.\u003cbr\u003eविद्यार्थीकेंद्रीत पुस्तक होणे महत्त्वाचे आहे त्या दृष्टीने पुस्तकाची भाषा सामान्य विद्यार्थ्यांना समजेल अशीच ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर भारतीय मानसशास्त्रातील अभ्यासकांच्या द्वारे प्राप्त माहितीचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये किती यशस्वी झालो हे वाचकांनीच ठरवावे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477506535653,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manasshastratil-Mulbhut-Tatve-Aani-Sankalpna_Prof-R-U-Jadhav_cnvt-1.jpg?v=1772178405"},{"product_id":"मूलभूत-आणि-बोधात्मक-मानसशास्त्र","title":"मूलभूत आणि बोधात्मक मानसशास्त्र (सत्र 1-2)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमानसशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय ‘वर्तन’ हा आहे. वर्तनाचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र म्हणून आज जगात सर्वत्र मानसशास्त्राला मान्यता मिळाली आहे. मानसशास्त्राच्या या प्रवासात अनेक तत्ववेत्त्यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. अगदी इ.स.पूर्व काळातील ग्रीक तत्ववेत्त्वे प्लेटो व ॲरिस्टॉटल यांनी मानवाच्या मनाचा आणि आत्म्याचा अभ्यास केला. फ्राईडने मनोविश्लेषण सिद्धांत मांडून अबोध प्रेरणेचे मानवी जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. तत्वज्ञ जॉन लॉक आणि थॉमस रेड यांनी अनुभववादाचा पुरस्कार केला. जर्मन तत्वचिंतक हर्बार्ट ‘मानसशास्त्र हे शरीरशास्त्र व तत्त्वज्ञानापेक्षा वेगळे आहे’ असे मत मांडले. जर्मन शरीरशास्त्रज्ञ हर्मन हेल्महोल्टझ् यांनी ‘शरीरशास्त्रीय साधनांच्या आधारे मानसिक घटनांचे स्पष्टीकरण करता येते’ असे मत मांडले. जर्मन शास्त्रज्ञ फेक्नर यांनी ‘एश्रशाशपीीं ेष झूीलहेहूीिळली’ हा ग्रंथ 1860 मध्ये लिहून मानसशास्त्राला खऱ्या अर्थाने शास्त्रीय कक्षेत आणले. म्हणून त्यास ‘मानसभौतिकीचा जनक’ मानतात. आधुनिक मानसशास्त्राच्या विकासाचे श्रेय द्यावे लागेल ते म्हणजे जर्मन शरीरशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी विल्यम वुडण्ट यांना. विल्यम वुडण्ट यांनी मानसशास्त्राला शास्त्रीय दर्जा प्राप्त करून दिला आणि मानसशास्त्राला एक नवीन ओळख प्राप्त करून दिली. त्यामुळे विल्यम वुडण्टला आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हणतात. अशा प्रकारे तत्त्वज्ञानाशी बांधलेले मानसशास्त्र आज एक स्वतंत्र शास्त्र म्हणून ओळखले जाऊ लागले.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48480188301541,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mulbhut-Aani-Bodhatmak-Manasshastra_Prof-R-U-Jadhav_cnvt-1.jpg?v=1772283872"},{"product_id":"भारतीय-संविधान-मूलभूत-तत्वे-आणि-स्वरूप","title":"भारतीय संविधान : मूलभूत तत्वे आणि स्वरूप","description":"\u003cp\u003eप्रस्तुत अभ्यास विषय हा राज्यशास्त्र विषयाचे अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांसह अन्य विद्याशाखेचे विद्यार्थी सुद्धा या विषयाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. आंतरविद्या व बहुविद्याशाखीय विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणावर स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतात. अशावेळी त्यांना वैकल्पिक विषय म्हणून तसेच सामान्य अध्ययन-१, सामान्य अध्ययन-२ पेपरच्या तयारीसाठी राज्यशास्त्र विषय हा उपयुक्त ठरतो. UPSC, MPSC व तत्सम स्पर्धा परीक्षेत राज्यशास्त्रांतर्गत संविधान, राज्यव्यवस्था, चालू घडामोडी, पक्षपद्धती, तरतुदी यास अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. म्हणून Political Science, Public Administration विषय घेऊन असंख्य विद्यार्थी यश संपादन करताना आढळतात. या दोन्ही विषयांइतकेच अन्य मानव्यविद्याशाखेतील विषयांची सुद्धा उपयुक्तता आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48592150298853,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BharatiyaSanvidhanMulbhutTattveAaniSwarup_DrVijayTunte-1.jpg?v=1774007379"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/fyba-semester-i.oembed?page=3","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}